(( वाढीव ))सांगीतिक भटकंती :सवाई गंधर्वांचा वाडा(कुंदगोळ), गंगुबाई हंगालांचे घर (हुबळी) आणि संगीत गुरुकुल

पुतळाचैतन्याचा's picture
पुतळाचैतन्याचा in भटकंती
18 Apr 2014 - 7:04 pm

फार दिवसांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मुहूर्त लागावा लागतो. केवळ वेळ असून चालत नाही, वेळ यावी लागते. हुबळीची बायको असून वर्षात ४ वेळा सासुरवाडीला जाऊन पण केवळ १६ कि.मी. असणाऱ्या गावाला जायला झाले नव्हते. आज महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ गायक कोण होते हा प्रश्न आला कि भीमसेन जोशींच्या गुरूंचे म्हणजेच सवाई गंधर्व रामभाऊ कुन्दागोलाकारंच नाव ओघानेच येत. त्यांच्या वाड्यात जाउन त्या हवेचा फील घ्यायचा नंतर काही फोटो पहायचे असा फार वर्ष पासूनचा बेत होता. तसे गंगुबाई हंगालांचे घर हुबळी गावातच आहे. पूर्वी एकदा तिथे जाऊन आलो होतो पण फोटो काढायचा विसरलो होतो. आता नक्की प्लान करून गेलो होतो.

कसे जाल: कुंदगोळ हे हुबळी पासून केवळ १६ कि.मी. वर आहे. पुणे-बंगलोर(रा. म. क्र. ४) वर धारवाड-हुबळी बायपास संपला कि गब्बुर हे ठिकाण येते. तिथून २ कि.मी. अंतर मधेच डावीकडे कुंदगोळ ला रस्ता जातो. पूर्वी तिथे फलक होता. आता दिसला नाही. रस्ता चुकून सरळ ४० कि.मी. गेल्यावर चूक लक्षात आली. परत फिरून मधेच एका गावात राईट मारून गुन्दगोळ ला पोहोचलो.
Survat

NH-4

Windmill

गाव यथा तथाच आहे.तिथे एक स्मारक चांगले बांधले आहे. तिथे गेल्यावर सरकारी उत्तर मिळाले --- मालक लग्नाला गेले आहेत. बघायला मिळणार नाहि.ठिक आहे. वाडा कुठे आहे हे तरीनित सांगीतले. तिथे गेल्यावर पण आनंदच होता. वाडा सुंदर असून पण "आत पूजा चालू आहे" सोडणार नाहि. हे उत्तर मिळाले. गंधर्वांचे वडील येथील नाड्गिर वाड्या मध्ये क्लार्क होते आणि त्यांनी गन्धर्वाना आश्रय देवून फार मोठे उपकार केले आहेत असे दाखवण्याचा तेथील सध्याच्या पिढीचा प्रयत्न होता. अनेक वेळा विनंती केल्यावर सकाळी ८ च्या आधी आणि दुपारी ३ नंतरच प्रवेश मिळेल असे काही तरी सांगितले. रामाभौंची केवळ एक मूर्ती पाहायला मिळाली. तरीही तो सुंदर वाडा, त्याच्या बाजूचा गोठा वगेरे पाहून परत निघालो. भीमसेन जोशी जिथून पाणी भरून घागरी घेऊन जायचे तो तलाव कम विहीर वाटेत लागते. ती पाहून बिलकुल निराश न होता हुबळी चा रस्ता धरला. पर्यटनाला गेल्यावर निराशा होते कधी कधी…ठीक आहे. पण वाडा पहिल्यचे समाधान होते. आपण याचे देणे लागतो, हि जागा निट केली पाहिजे असा काहीसा भाव मनात आला. याचे कारण देखील समजले…राम भाऊ अथवा भीमसेन यांना कर्नाटक जवळचा वाटत नव्हता. तेथील लोकांना विशेष किंमत नव्हती यांच्या गुणांची।म्हणुन इतर ठिकाणी पर्यटन वाढवणाऱ्या या राज्याने रामभाऊ अथवा भीमसेन यांच्या घरी काही विशेष संघ्रहालय मात्र केलेले नाही.
Smarak

vaada
murti
khamb
vaada
vaada
vaada

Vihir
गंगुबाई हंगालांची गोष्ट तशी नाही. या उलट गंगुबाई हंगालांच्या घरी उत्तम सहकार्य मिळाले. घर जरी २-५ बंद असले तरी मी कराडहून आलो आहे हे सांगितले मग त्यांनी प्रवेश दिला. सर्व ४ खोल्यांमध्ये दिवे लावले मग सुरु झाला फोटोंचा धडाका. एवढा कि त्या माणसाने मला विचारले…."पाहायला आलाय का फोटो काढायला?" मी लगेच फेकले "ऑफ्कोर्स…बघायला…पण डोळ्यात मावत नाहीये म्हणून फोटो काढून घरी जाउन नीट पाहीन"…त्याला गोळी पचली. गंगुबाई हंगालांच्या घरी मात्र मस्त स्मारक आहे. हुबळी च्या देशपांडे नगर मध्ये हे घर आहे. इथे त्यांचे अनेक गायक, राजकारणी यांच्या बरोबर चे फोटो आहे. अनेक वाद्य ठेवली आहेत. तिथे गाण्याचे वर्ग देखील चालतात…त्याला अजून "कोचिंग" चे रूप आलेला नाहि. त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार येथे नीट जवळून पाहता येतात. याचे काही फोटो देत आहे. एका मागून एक सुंदर फोटो, साहित्य होते…सतारी, तंबोरे, तबले, पेट्या …किति मोजु…!! पुरस्कार आणि भेट वस्तू यांचा खच पडला होता. पहिल्यांदा मी माझ्या डोळ्याने पद्म भूषण आणि पद्म विभूषण हे स्वताच्या डोळ्यांनी पाहत होतो…आता जास्त वर्णन न करता सरळ फोटो पहा.
GH
GH
GH
Padmabhushan
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH

(( वाढीव ))

आज सकाळी हुबळी इथे गंगुबाई हनगल यांच्या नावाने संगीत गुरुकुल चालवले जाते याची माहिती मिळली. लगेच तिकडे दौरा काढला. कर्नाटक सरकार ने संगीताच्या पंढरीत हा उपक्रम केला आहे. अतिशय छान जागी, डोंगराच्या पायथ्याशी ६ एकर जागेवर हे गुरुकुल बांधले आहे. ३० विद्यार्थी व सुमारे ६-८ गुरुजन हे कायम स्वरूपी इथे वास्तव्याला आहेत. विद्यार्थ्यांना पूर्णवेळ करीयर संगीतात करता यावे म्हणून हि सोय आहे. विद्यार्थ्यांना मानधन देखील दिले जाते. आधुनिक आणि पारंपारिक चा सुंदर मिलाफ येथे आहे. रीयाझा साठी उत्तम बैठक व साथीला छान वाद्य-वृंदा आहे. कायम गाण्याचे सूर इथे दरवळत असतात. तसेच सोलर हीटर, पाणी शुद्धीकरण अशा आधुनिक सोयी, स्वतंत्र लायब्ररी अशा अनेक सोयी आहेत. योग्य ठिकाणी सरकार ने पैसे खर्च केल्याचे समाधान वाटले पण आमच्या दळभद्री महाराष्ट्र सरकार ची पण आठवण आली कम स्वताची लाज वगेरे नेहमी प्रमाणे वाटली…सांगली-मिरज सारख्या संगीत पंढरी मध्ये असे काही का होऊ शकत नाही? नारायणराव बालगंधर्व यांच्या सारखा गायक जिथे झाला आणि ३-३ मोठे मंत्री ज्या जिल्ह्यातून आहेत अथवा आमच्या कराड गावात मुख्यमंत्री आहेत अथवा यशवंतराव चव्हाणन सारखे रसिक व दूरदर्शी नेतृत्व होते तिथे हे कधी होणार? आमची अस्वस्थता संपत नाही …!!!
GH

GH

GH

GH

GH

GH
GH

GH

GH

पुढील भागात:बाइक वरून बंगलोर- म्हैसूर-बंदीपूर-मुदुमलाई- उटी- कुनूर

प्रतिक्रिया

आनंद's picture

18 Apr 2014 - 7:14 pm | आनंद

श्री गणेशा.

पुतळाचैतन्याचा's picture

18 Apr 2014 - 7:20 pm | पुतळाचैतन्याचा

फोटो दिसत आहेत का?

मुक्त विहारि's picture

18 Apr 2014 - 7:43 pm | मुक्त विहारि

फोटो दिसत आहेत.

जुइ's picture

18 Apr 2014 - 7:58 pm | जुइ

लेख आवडला :)

प्रभाकर पेठकर's picture

18 Apr 2014 - 8:10 pm | प्रभाकर पेठकर

भरपूर छायाचित्रे आहेत. अशा भारावल्या वातावरणात आपण स्वतःलाच कस्पटासमान भासू लागतो. एके वेगळ्याच विश्वात आपण प्रवेश केला आहे. निदान असा प्रवेश करण्याचे भाग्य आपल्याला लाभले हेही नसे थोडके असे वाटू लागते. शास्त्रिय संगीताचे ज्ञान नसले तरी सवाई गंधर्व, गंगूबाई हनगळ वगैरे दिग्गजांचा मोठेपणा, संगित क्षेत्रातला दबदबा जाणून आहे.
आज त्यांचे घर आणि परिसर पाहताना आपण प्रत्यक्ष त्या स्थळी पोहोचल्याचे पुण्य लाभले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Apr 2014 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

असेच म्हणतो.

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Apr 2014 - 11:34 pm | लॉरी टांगटूंगकर

+१

एक चांगले काम केलेत .संगीत कळत नाही पण यांची चरित्रे वाचली आहेत .भिमसेनांचे चरित्र फार आवडले होते .रत्नागिरी ,मालगुंडची टिळक आणि केशवसुतांची स्मारके आहेत तशी सर्वांची असावीत असे वाटणे स्वाभाविक आहे .परंतु जागेची मालकी बऱ्याच वेळा इतरांकडे असते .

बहुगुणी's picture

18 Apr 2014 - 8:20 pm | बहुगुणी

वाड्यातील किती जागा उपलब्ध आहे माहीत नाही, पण डॉ. गंगुबाई हनगलांच्या घरातली असंख्य वाद्ये आणि छायाचित्रे यांची व्यवस्थित स्वतंत्र काचेच्या बॉक्सेसमध्ये, प्रत्येकाच्या इतिहासासह/ तपशीलासह, सुरक्षित रचना व्हावी असे वाटून गेले. या आणि सवाई गंधर्व रामभाऊ कुंदगोळकरांच्या स्मारकाचे सध्याचे कार्यवाहक कोण आहेत, त्याच्याशी संपर्क कसा केलात/ करता येईल हेही लिहा. [सवाई गंधर्वांचे स्मारक चांगले बांधले आहे. तिथे गेल्यावर सरकारी उत्तर मिळाले --- मालक लग्नाला गेले आहेत. बघायला मिळणार नाहि. ठिक आहे हे काही झेपलं नाही; स्मारक असेल आणि ते सरकारी असेल तर त्याला 'मालक' कसे?]

पुतळाचैतन्याचा's picture

18 Apr 2014 - 8:54 pm | पुतळाचैतन्याचा

तेच ना. स्मारक सरकारी अथवा ट्रस्ट ने सांभाळलेले असावे पण ते खाजगी मालमत्ता असल्या प्रमाणे वापरले जात आहे. आम्हाला मालक नाहीयेत या शब्दात हाकलून देण्यात आले. जास्त कोणाला काही पडलेली नाहीये त्यांची…!!! अशीच एक भेट देणार आहे शहाजी राजांचे स्मारक….!!!

विकास's picture

18 Apr 2014 - 8:22 pm | विकास

येथे प्रकाशचित्रे ठेवल्याबद्दल आणि माहितीबद्दल धन्यवाद!

किसन शिंदे's picture

18 Apr 2014 - 8:37 pm | किसन शिंदे

खुप भाग्यवान आहात मालक, तुम्हाला या दोन्ही ठिकाणांना भेट देता आली ते! त्या ठिकाणांचे फोटो आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल तुमचे आभार. शिर्षक वाचलं आणि लगेच गंगूबाई हनगलांच्या आवाजातल्या अनेक लावण्या मनात तरळून गेल्या.

रच्याकने ते गंगूबाई हनगल असं आहे ना?!

पुतळाचैतन्याचा's picture

18 Apr 2014 - 8:57 pm | पुतळाचैतन्याचा

मालक गंगुबाई हनगल या शास्त्रीय गायिका होत्या…तुम्हि कोणत्या लावण्या ऐकल्या आहेत जर प्रकाश टाकला तर बर होईल.

ठुमर्‍या म्हणायचे असेल त्यांना :)

किसन शिंदे's picture

19 Apr 2014 - 1:16 am | किसन शिंदे

गलतीसे मिस्टेक हो गया. ठान्कू शुचिमामी :-)

शुचि's picture

19 Apr 2014 - 10:59 am | शुचि

sorry ठुमरी चे अनेकवचन ठुमरीच होते.

पैसा's picture

18 Apr 2014 - 9:05 pm | पैसा

मस्त लेख आणि छायाचित्रे. सवाई गंधर्व महित्सव आयोजित करणार्‍यांनी इकडे पण थोडे लक्ष दिले तर बरे होईल.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2014 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

खेडूत's picture

20 Apr 2014 - 1:53 am | खेडूत

>> सवाई गंधर्व महित्सव आयोजित करणार्‍यांनी इकडे पण थोडे लक्ष दिले तर बरे होईल.

त्यांनी पुण्यात राहुल सिनेमाजवळ स्मारक केले आहे. अद्याप आत जाउन पाहणे झाले नाही, किंवा स्मारक म्हणजे गुरुकुल पण तिथे आहे का हे माहित नाही पण अधिक माहिती इथे मिळेल.

पेट थेरपी's picture

19 Apr 2014 - 6:56 am | पेट थेरपी

खास कर्नाटकी शैलीतला वाडा आवडला. जीएंच्या कथेतल्यासारखे वाट्ते. खरे तर दोन्ही ठिकाणी, माहिती पट, संगीताची रेकॉर्डिंग्ज उपलब्ध करून चाहत्यांसाठी एक चांगला अनुभव क्रिएट करता येइल. रस्त्याचे फोटो बघून मस्त वाटले.

चौकटराजा's picture

19 Apr 2014 - 9:15 am | चौकटराजा

हा जगावेगळा धागा काढल्याबद्द्ल आभार. बाकी या दोन्ही घरांच्या आसमंतातील कण अन कण सांगत असणार
ताल गया तो बाल गया , स्वर गया तो सर गया !

रुमानी's picture

19 Apr 2014 - 10:07 am | रुमानी

मस्त लेख आणि फोटो.

राही's picture

19 Apr 2014 - 1:10 pm | राही

आगळावेगळा धागा. आवडलाच.
देवास, मिरज, गोवा या आणखी काही संगीत-तीर्थक्षेत्रांविषयीही असे धागे निघावेत.
मुंबईतला भेंडीबाज़ार, गिरगाव-दादर परिसरातले जुने गायनअड्डे, कोल्हापूरचा देवल क्लब (नाव बरोबर असावे. चूभूदेघे.) यांविषयी माहिती अनेकांच्या आठवणींमधून वाचलेली आहे. पुन्हा उजाळा द्यायला,वाचायला आवडेल.

श्रीवेद's picture

19 Apr 2014 - 1:17 pm | श्रीवेद

मस्त लेख आणि छायाचित्रे.
धन्यवाद !!

रमेश आठवले's picture

20 Apr 2014 - 1:40 am | रमेश आठवले

कुंदगोळ येथील सवाई गंधर्व यांच्या स्मारक वास्तूत त्यांच्या पुण्यतिथीच्या सुमारास एक संगीत समारोह दर वर्षी होतो आणि प्रथितयश कलाकार त्यात हजेरी लावून जातात.

इतकी सुरेख माहिती आणि फोटो दिल्या बद्धल धन्यवाद. :)