नेदरलँड्स - Keukenhof / क्युकेनहॉफ

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in भटकंती
15 Apr 2014 - 7:12 pm

ये कहाँ आ गये हम, यूं ही साथ साथ चलते....ह्या गाण्यात ट्युलिप्सचा बहर बघून आपल्या ही कधीतरी असा बहर बघायला मिळाला पाहीजे असे वाटून गेले होते. पहिल्या नेदरलँड ट्रीपमध्ये ऑगस्टमध्ये गेलो असल्यामुळे हा बहर बघता आला नाही म्हणून रूखरुख लागली होती. साधारण स्प्रिंग सुरु झाला की दोन महिने हा बहर Keukenhof / क्युकेनहॉफमध्ये बघायाला मिळतो. ह्यावेळेस अगदी पक्कं ठरवले की जायचेच आणी लगेच झुतरमिअरस्थित मित्राला फोन केला आणी ट्युलिप्स गार्ड्न कधी उघडते हे विचारुन घेतले. २० मार्च ते १८ मे २०१४ पर्यंत ट्युलिप्सचा बहर सगळ्यांना बघता येईल असे तो म्हणाला. लगेच प्लान करुन टिकिट्स बुक केले आणी आता वेध लागले होते ट्युलिप्स बघण्याचे.

११ एप्रिलच्या शुक्रवारी दुपारचे विमान होते त्याप्रमाणे मँचेस्टर एअरपोर्ट्वर आलो आणी विमानासाठी गेटपाशी जाऊन बसलो.

.

.

काही मिनिटात आमचे विमान लागले आणी आम्ही अ‍ॅमस्टरडॅम - स्किपोलला रवाना झालो. एअरपोर्टला उतरुन बाहेर पडलो आणी समोरचं आय अ‍ॅमस्टरडॅमचा लोगो दिसला आणी मग काय एक फोटो तो बनता है :)

.

एअरपोर्टच्या आवारातही छोट्या-छोट्या कुंड्यामध्ये ट्युलिप्सची फुलं लावली होती, वातावरण ही छान होतं , संध्याकाळचे साडेचार वाजले होते , कोवळं ऊन, हलका वारा आणी समोर ट्युलिप्स.

.

मित्र घ्यायला आला , तसेच पटापट सामान गाडीत टाकून थेट अ‍ॅमस्टरडॅम सिटी सेंटरला गेलो, मागेच सिटी, संग्राहलय बघून झाले होते त्यामुळे फारसे ते न करता दाम स्क्वेअरला थोडा टाईमपास केला, तेथूनच थोडे पूढे अ‍ॅमस्टरडॅमच्या "प्रसिध्द" गल्ल्यांमध्ये फेर-फटका मारला ;) आताशी सडकून भूक लागली होती म्हणून माओजमधल्या फलाफालची खादाडी केली. तिकडचा मालक हा पंजाबी आहे, त्याच्याबरोबर थोड्या गप्पा मारून आम्ही पुन्हा भट्कायला निघालो.

.

फलाफल

.

सिटीत थोडे फिरून आम्ही झुतरमिअरला मित्राच्या घरी आलो, जेवून झोपी गेलो. दुसर्‍या दिवशी Keukenhof / क्युकेनहॉफला निघायचे होते.

सकाळी लवकरचं नाश्ता करून आम्ही निघालो. Keukenhof / क्युकेनहॉफ हे लिस्स (Lisse) ह्या शहरात आहे. येथे जायला हार्लेम, स्किपोल ट्रेन स्टेशन्वरुन बसेस आहेत. Keukenhof / क्युकेनहॉफला गार्डन ऑफ युरोप असे म्हटले जाते. तेथे ट्युलिप्ससोबत, डॅफोडिल्स, हायसिंथ, ब्लूबेल्स, नारसीसस फुलांची ही लागवड केली जाते.

जसे जसे आम्ही Keukenhof / क्युकेनहॉफ जवळ येऊ लागलो तसे तसे ट्राफिक आम्हाला लागू लागले. बर्‍याच देशातून असंख्य पर्यटक येथे हा बहर बगायला येतात. तिथे सायकलवरून ही फिरता येतं, पार्कमध्ये सायकल नेण्यास बंदी आहे, त्यासाठी त्यांनी वेगळे सायकल रूट्स बनवले आहेत, तसेच बोटींग करुन ही तुम्ही ह्या ट्युलिप्सचे सौंदर्य बघू शकता. काही गाईडेडे टुअर्सदेखील आहे. Keukenhof / क्युकेनहॉफबद्दल माहिती तुम्हाला इथे मिळेल.

हळू-हळू करत आम्ही एकदाचे तेथे पोहोचलो. गाडी पार्क करुन थेट तिकिटघर गाठले. इतकी गर्दी असूनही तिकिटाला भली मोठी रांग अशी नव्हती. पटापट तिकिटं काढून आम्ही आत गेलो.

.

आता येताच विविध रंगानी सजलेली ती बाग, ते सुंदर ट्युलिप्सचे बल्ब बघून खरचं दिल ट्युलिप ट्युलिप हो गया :)

.

'Jan Bos' - ह्या फुलांचा सौम्य सुवास दरवळत राहतो.

.

टोरंटो

.

ट्युलिपा क्युबेक

.

हार्ट्स डिलाईट

.

विविध रंगाचे ट्युलिप्स

.

.

.

रेड इम्प्रेशन

.

Purissima

.

युडिथ लेस्टर

.

युनायटेड स्टेट्स

.

ऑरेंज एम्परर

.

ऑलम्पीक फ्लेम

.

.

.

मध्ये थोडं थांबून Oranje Nassau Pavilion मध्ये मस्तं फिश एन चिप्स खाल्लं आणी पुढची भटकंती सुरु केली.

.

.

.

.

.

.

.

लेडी जेन

.

फायर विंग्स

.

.

निघता निघता आम्ही Poffertjes house मधले डच पॅनकेक्सवर ताव मारला. मस्तं लुसलुशीत, बटर व पिठीसाखर भरुभूरलेले गरमा-गरम पॅनकेक्स अहाहा!! हेवन!!

.

तेथून आम्ही जवळचं असलेल्या ट्युलिप्स फिल्ड्वर गेलो, खरं तर हे प्रायव्हेट फिल्ड्स आहेत पण काहीजणं तेथे फोटो काढायची परवानगी देतात. मनसोक्तं फोटो काढले अगदी यश चोप्रा स्टाईल ;)

.

.

.

दिवस कसा गेला समजले नाही, आम्ही इथे सहा तास होतो चक्क!! कॅमेरात सगळे सौंदर्य किल्क करुन ही समाधान मिळत नव्हते, मेमरी कार्ड भरले पण मन काही भरत नव्हते. जितके साठवून घेऊ तितके घेण्याचा प्रयत्न करत होते.

जिथे मिपावर जोरदार कट्टे सुरु असताना माझा आनंद द्विगुणीत झाला तो क्षण म्हणजे जेव्हा माझी आणी मिपाकर-अनाहिता मैत्रीण मधूरा देशपांडेची भेट झाली. अगदी अचानक समजले की आम्ही दोघी तेथे ह्याच विकांताला जाता आहोत, म्हटले ही संधी सोडायची नाही, भेटायचेच. ती जर्मनीहून आणी मी राणीच्या देशातून येऊन भेटलो थेट Keukenhof / क्युकेनहॉफला :) किती किती आनंद झाला शब्दात व्यक्त करु शकत नाही :) आमचा ही इल्लूसा कट्टा झाला, थोड्या गप्पा झाल्या व मग पुन्हा नक्की भेटू म्हणत आम्ही आप-आपल्या वाटेने निघालो.

ट्युलिप बघून शांत, प्रसन्न वाटत होते. स्वप्नपुर्ती झाली. आता निघायचीही वेळ झाली होती आणी दूर तक निघाहों में हे गुल खिले हुए म्हणत आम्ही Keukenhof / क्युकेनहॉफचा निरोप घेतला.

आता जायचे होते वॉलंदाम आणी झान्सेस स्कांन्सला.

क्रमशः

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2014 - 7:16 pm | दिपक.कुवेत

सानिका आणि भटकंती मधे??? असो मी पहिला. आता निवांत फोटो बघतो आणि वर्णन वाचतो. फोटो काय पाकॄ सारखे देखणे असतीलच ह्यात तीळमात्र शंका नाहि. क्रमशः वाचुन बरं वाटलं.

आज मी पयली!
सुंदर फोटो,मस्त वृत्तांत !

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2014 - 7:24 pm | दिपक.कुवेत

नुसते फोटो बघुन जीव एवढा वरखाली होतोय तर तीथे प्रत्यक्षात वेड न लागलं तर नवलचं. ट्युलिपना त्यांच्या रंगानुसार दिलेली नावं पण एकदम सार्थ.

राघवेंद्र's picture

15 Apr 2014 - 7:32 pm | राघवेंद्र

खुपच सुंदर फोटो !!!

अनुप ढेरे's picture

15 Apr 2014 - 7:40 pm | अनुप ढेरे

यशराजचा पिच्चर पहातोय असं वाटलं. छान फोटो...

अनन्न्या's picture

15 Apr 2014 - 7:41 pm | अनन्न्या

लकी आहेस सानिका, भारी आलेत सगळे फोटो!

सखी's picture

15 Apr 2014 - 7:47 pm | सखी

क्लासच सानिका कसले मस्त फोटु काढले आहेस, शेवटचे २ बघुन डोळ्याचं पारणं फिटलं.

मधुरा देशपांडे's picture

15 Apr 2014 - 7:55 pm | मधुरा देशपांडे

सुंदर फोटो आणि वर्णन. हे सगळे सोबतच पहिले आपण याचे अजून वेगळे समाधान. :)
मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हाचा हा वृत्तांत. त्यावर्षीची सगळी कसर यावेळी भरून निघाली. मोअर फोटोज कमिंग सून.

खरचं दिल ट्युलिप ट्युलिप हो गया ...मस्त आवडले ..+)

यशोधरा's picture

15 Apr 2014 - 8:05 pm | यशोधरा

झक्कास!!

प्रभाकर पेठकर's picture

15 Apr 2014 - 8:05 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं छायाचित्रं आणि वर्णन.
शाकाहारी खाण्यापिण्याची सोय आहे हे पाहून काकू खुश होतील. मेच्या ८ ते ११ तारखांना आहोत आम्ही अ‍ॅमस्टरडॅम मध्ये.
(पण आता मी वृत्तांत्त काय लिहू? तुम्ही तर चौफेर लिहिले आहे.)

भाते's picture

15 Apr 2014 - 8:20 pm | भाते

सगळेच फोटो सुरेख आले आहेत.

रेवती's picture

15 Apr 2014 - 8:21 pm | रेवती

पर्यटनक्षेत्रही काबीज केल्याबद्दल अभिनंदन! सगळी पिक्चरे अतिषय सुंदर आलीत यापेक्षा काही बोलता येणार नाही. मधुरा आणि तू तिथे भेटलात म्हणजे आनंदाची Purissima झाली म्हणायची.
अगदी विमानतळापासूनचे दर्शन झाल्याने प्रवास घडल्याचे समाधान मिळाले.

मितान's picture

15 Apr 2014 - 8:25 pm | मितान

सुंदर फोटो !
पवनचक्की आणि तिच्या मागे असणारी ट्यूलिप शेतं ? पवनचक्कीसमोर मिळणारी स्ट्रॉबेरी नि क्रीम ?
मी इथे फोटो काढण्याचा माझाच विक्रम मोडला होता. एका दिवसात ७८० फक्त !
वेड लागतं अक्षरशः !

आठवणी जाग्या झाल्या. आता भारतातल्या ट्युलिप गार्डनला भेट द्यावी म्हणते...

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2014 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !!! अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन.

जुन्या आठवणींना बहर आला. तपकिरी झालेल्या कागदावरच्या प्रकाशचित्रांमधले रंग मनातल्या मनात उजळ झाले !

फुलांची शेती करण्याबरोबरच त्या शेतांच्या सफरींचे आणि दोन फूटबॉल मैदानाइतक्या फुलांच्या यांत्रिक लिलावगृहांच्या सफरींचे मार्केटिंग करण्याच्या डच कल्पकतेचे कौतूक करावे तेवढे कमीच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2014 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !!! अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन.

जुन्या आठवणींना बहर आला. तपकिरी झालेल्या कागदावरच्या प्रकाशचित्रांमधले रंग मनातल्या मनात उजळ झाले !

फुलांची शेती करण्याबरोबरच त्या शेतांच्या सफरींचे आणि दोन फूटबॉल मैदानाइतक्या फुलांच्या यांत्रिक लिलावगृहांच्या सफरींचे मार्केटिंग करण्याच्या डच कल्पकतेचे कौतूक करावे तेवढे कमीच.

ट्युलिप्सचा पहिलाच फोटो पाहून एकदम स्वर्गात पोहोचल्याचा भास झाला!!!

तुमची खादाडी असो वा भटकंती फोटोग्राफी मात्र एकदम हुच्च्च्च्च!!

मैत्र's picture

15 Apr 2014 - 9:33 pm | मैत्र

नेहमीप्रमाणे अप्रतिम फोटो.. विभाग बदलला पाहून आश्चर्य वाटलं.. पण फोटोग्राफीचं कौशल्य वादातीत आहे आणि वेगळ्या ऑब्जेक्टस साठी पण झळकतं आहे..

नेदरलँड्सचे फोटो पाहून नॉस्टॅल्जिक वाटलं..
poffertjes म्हणजे डच मिनी पफ्स प्रमाणेच डच पॅनकेक्स pannenkoek अतिशय चविष्ट आणि मस्त लागतात!

खटपट्या's picture

15 Apr 2014 - 10:48 pm | खटपट्या

फोटो एवढे सुंदर आलेत कि याच एक छान पैकी कैलेन्डेर बनू शकते.

प्रचेतस's picture

15 Apr 2014 - 10:59 pm | प्रचेतस

सुंदर फोटो आणि वर्णन.

कवितानागेश's picture

15 Apr 2014 - 11:09 pm | कवितानागेश

स्वर्ग स्वर्ग...... अतिशय सुंदर फोटो आलेत. कितीतरी वेळ बघत बसलेय... :)

दिपस्तंभ's picture

15 Apr 2014 - 11:17 pm | दिपस्तंभ

फोटो जबरी आलेले आहेत. अतिशय सुंदर आणि रमनीय ठिकाण दिसतय!!!

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 11:21 pm | तुमचा अभिषेक

क्लास!
तो रनिंग ट्रॅकसारखा पसरलेला ट्युलिपच्या बल्बांचा फोटो खूप आवडला.

मुक्त विहारि's picture

15 Apr 2014 - 11:35 pm | मुक्त विहारि

आणि

एक मस्त कट्टा केल्याबद्दल अभिनंदन.

(कट्टेकरी) मुवि

संजय क्षीरसागर's picture

15 Apr 2014 - 11:45 pm | संजय क्षीरसागर

डोळ्यांचं पारणं फेडणारी सफर घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2014 - 12:13 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/awesome-smiley-emoticon.gif

http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-pink-smiley-emoticon-animation.gif

खटपट्या's picture

16 Apr 2014 - 12:15 am | खटपट्या

हे अशी फुलं टाकून अजून जळवत्यात

पैसा's picture

16 Apr 2014 - 12:18 am | पैसा

मस्त मस्त आणि मस्तच!

स्पंदना's picture

16 Apr 2014 - 6:34 am | स्पंदना

लेडी जेन खुप आवडली!
बाकीचे फोटोपण सुरेखच. अन त्यात भर म्हनजे चक्क कट्टा करणे अश्या ठिकाणी. हुच्च!

जेनी...'s picture

16 Apr 2014 - 8:50 am | जेनी...

ओह्ह !
लेडी जेन खुप खुप आवडली ... सानिका टू गूड !

प्रीत-मोहर's picture

16 Apr 2014 - 8:51 am | प्रीत-मोहर

सु आणि रे आणि ख!!!!!

__/\__

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2014 - 10:58 am | पिलीयन रायडर

फारच सुंदर फोटो.. आणि खादाडीचे फोटो ही एक नम्बर!!

Mrunalini's picture

16 Apr 2014 - 11:00 am | Mrunalini

अतिशय सुंदर. माझ्या आयुष्यातले पाहिलेले सगळ्यात बेस्ट गार्ड्न आहे हे. फक्त अप्रतिम.

मोहनराव's picture

16 Apr 2014 - 1:57 pm | मोहनराव

खुपच छान!! इकडे जाण्याचा नक्कीच बेत केला जाईल!!

अप्रतिम फोटो.. मस्त.

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 2:19 pm | प्यारे१

खल्लास!
वेड ! वेड!! वेड!!!

नेदरलॅण्ड्चा व्हिसा कुठे मिळतो हो?????
इकडे अल्जिरियन लोकांना अगदी युरोपसारखं वातावरण असूनही आळशीपणानं काही करत नाहीत हे लोक! :(

सूड's picture

16 Apr 2014 - 4:05 pm | सूड

सुंदर !!

नंदन's picture

16 Apr 2014 - 4:09 pm | नंदन

फारच छान

भावना कल्लोळ's picture

16 Apr 2014 - 4:33 pm | भावना कल्लोळ

पल्ले, डोळ्यांचे पारणे फेडलेस बघ … बाकी तुच ग तुच, खरेखुरे कधी जाऊ माहित नाही पण फोटोतून तरी सफर घडवून आणलीस ग बायो … जियो !!!

दृष्ट्र काढल्या गेली आहे !!

मराठे's picture

16 Apr 2014 - 7:28 pm | मराठे

वाह मस्त. आम्ही काही वर्षापूर्वी गेलेल्या 'ट्युलिपोत्सवाची आठवण झाली.

सविता००१'s picture

16 Apr 2014 - 7:47 pm | सविता००१

तू मला तिकडे यायला स्पॉन्सर कधी करणार?

अनन्या वर्तक's picture

16 Apr 2014 - 7:51 pm | अनन्या वर्तक

टुलीप चे फोटो मस्त आहेत अगदी तुमच्या नेहमीच्या रेसिपी सारखे. डच पॅनकेक्स माझे सुद्धा आवडते.

दिल ट्युलिप ट्युलिप हो गया :)

सुधीर कांदळकर's picture

18 Apr 2014 - 12:46 pm | सुधीर कांदळकर

ट्यूलिप ट्यूलिप झाले. नेत्रानंदसोहळा झकास. धन्यवाद.

सुंदर , छान हे शब्दच थिटे पडतील असे फोटो आहेत :-)
घरबसल्या सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद :-)

मदनबाण's picture

18 Apr 2014 - 6:45 pm | मदनबाण

सुरेख ! :)

डोळ्याचे पारणे फिटेल असे सुंदर फोटो व छान लेख!
धन्यवाद, आमची अशी मस्त सफर घडवल्याबद्दल.

विषय ट्युलीप गार्डन चा निघालाच आहे तर हे गाणे must आहे बघणे! देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये...

डोळ्यांचे पारणे फिटले. सुंदर. . . . . अवर्णनीय.

रामदास२९'s picture

2 Jun 2017 - 2:01 pm | रामदास२९

अप्रतिम !!!

वेल्लाभट's picture

2 Jun 2017 - 4:51 pm | वेल्लाभट

वेड लागलं! फुलं बघून वेड लागलंय !

अहाहा.. काय सुरेख फोटो आहेत!

त्याच्या जोडीला वर्णनही छानच.