कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
29 Mar 2014 - 9:21 am

मार्च महिना सुरु झाल्या बरोबरच सौ.चे उपद्व्याप सुरु होतात. आलू चिप्स, बटाटे-साबूदाण्याचे पापड आणि मुगोड्या इत्यादी प्रकार करण्याची तैयारी आणि त्या साठी आमच्या सारख्या हक्काच्या गुलामांचा वापर ही होणारच. तसे म्हणाल तर या वर्षी हिवाळा थोडा जास्त वेळ राहिला. तरी ही होळी नंतर आकाशमधून मधून स्वच्छ राहते. होळी नंतर ४ दिवसांची सुट्टी घेतली, थोड आराम करावा म्हणून. पण घरी नवरा सुट्टीवर असेल तर त्याला कसे कामात गुंतवून ठेवावे जेणेकरून सुट्टी घेण्याच्या फंदात पडणार नाही. झाले ही तसेच. या सुट्टीत सर्वात आधी केलेला पदार्थ म्हणजे मुगोड्या. बाजारात जाऊन मुगाची डाळ विकत आणली सौ.ने निवडून भिजत घातली. सकाळी सकाळी चहा पिऊन डाळीला धुऊन साल वेगळी केली. पाणी काढून, मिक्सर मध्ये पाण्याचा वापर न करता पिसून काढली व एका परातीत मिश्रण पसरवले.(अर्थातच हे कार्य अस्मादिकांना संपन्न करावे लागले). शिवाय हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक बारीक कार्य ही कार्य अस्मादिकांनी संपन्न केले. सौ. फक्त मेथी बारीक चिरली. सर्व साहित्य पिसलेल्या डाळीत मिसळले. चवी साठी जिरे-मिरी पावडर व मीठ मिसळले. वरतून आले किसून टाकले. मिश्रण थोड गाढे असेल तर मुगोड्या टाकायला त्रास होत नाही आणि मुगोड्या वाळतात ही लवकर. आता कृती ही खाली देत आहे:

बटाटे चिप्स, साबूदाणा-बटाट्यांचे पापड इत्यादी) विकत घेतलेले आहे. त्या वर छोट्या आकाराच्या मुगोड्या घातल्या. (सौ. ला मदत करावीच लागली) थोड्या वेळ उभे राहून माश्यांना दूर ठेवण्याची कामगिरी सौ. ने अस्मादिकांवर सौपवली. (मनात मनात शिव्या देत ती जवाबदारी ही पार पडली जवळपास पाउण तासानंतर एक मलमलची चुन्नी त्या वर घातली आणि क्लिपा लाऊन ती उडणार नाही याची दक्षता घेतली. कामाच्या मोबदल्यात एक कप चहा एक्स्ट्रा प्यायला मिळाला. दिल्लीच्या उन्हात दोन दिवस वाळायला लागले. वाळल्या वर मुगोड्या अलगद निघून येतात. त्यांना एका परातीत काढून पुन्हा दोन-तीन दिवस ऊन दाखविले. चांगल्या वाळल्यावर एका डब्यात बंद करून ठेवता येतात.

[साहित्य: १ किलो धुतलेली किंवा साल असलेली मुगाची डाळ, मेथी २५० ग्रम, १ जुडी कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, जीर काळी मिरी पावडर (३ चमचे) किंवा तिखट चवी पुरती मीठ व आलं.]

वाळताना मुगोड्या

मुगोड्यांचा उपयोग: मुगोड्या टाकलेल्या वांग्याची भाजी भलतीच चविष्ट लागते. शिवाय बटाट्याच्या भाजीत ही मुगोड्या टाकता येतात. पण मला नुसती मुगोड्याची भाजी जास्त आवडते आणि ती ही लोखंडी कढईत (काही भाज्या लोखंडी कढईत बनविल्या तर त्यांचा स्वाद द्विगुणित होतो उदा: वांग्याची भाजी, बारीक चिरलेल्या बटाट्याची भाजी इत्यादी ). ही भाजी सौ. जशी बनविते, कृती देत आहे.

साहित्य: एक वाटी मुगोड्या, तेल, लसूण, किसलेलं खोबर किंवा लसूण खोबरऱ्याची चटणी (लसूण आणि खोबर किसून थोड तेल घालून सौ. चटणी तैयार करून ठेवते) , हिरवी मिरची १-२, हिंग,मोहरी तिखट, हळद, चिंच आणि गुळ (चिंच गुळाचे कोळ ही करून ठेवली कि फ्रीज मध्ये १०-१५ दिवस टिकते) व मीठ.

कृती. आधी मुगोड्या लाटण्याने थोड्या फोडून घ्याव्या किंवा खलबत्यात हलक्या हाताने कुटाव्या. मग लोखंडाच्या कढईत. दोन चमचे तेल घालून त्यात मुगोड्या लाल होत पर्यंत परताव्या. मुगोड्या एका ताटात काढून कढईत पुन्हा तेल टाकावे. त्यात मोहरी टाकावी, मोहरी फुटल्यावर हिंग, हिरवी मिरची घालावी नंतर लसूण आणि खोबऱ्याची चटणी (किंवा लसूण आणि खोबर घालावे), नंतर हळद आणि तिखट टाकून तीन-चार वाट्या पाणी घालावे व एक उकळी आल्यावर मुगोड्या त्यात टाकाव्या. झाकण ठेवावे. १० एक मिनिटात मुगोड्या शिजतात. त्यात मीठ चिंच गुळाचे कोळ (एक किंवा दोन चमचे (कोळ किती गाढे बनविले आहे त्यावर अवलंबून आहे) घालावे. पुन्हा एक उकळी द्यावी. मस्त भाजी तैयार होते.

टीप १: काही लोक फक्त थोड मीठ घालून मुगोड्या टाकतात.

टीप २ : नौकरी पेशा आणि फ्लेट मध्ये राहणार्यांसाठी: घर कामासाठीच वेळ नाही, शिवाय गच्ची ही नाही. मग मुगोड्या कश्या घालाव्या. प्रश्न आहे. पण एखाद वाटी मुगाची डाळ भिजवून, एका परातीत मुगोड्या टाकून वर पातळ कापड टाकून २-३ तास ऊन येणाऱ्या बाल्कनीत वाळवतात येतात. जास्तीस जास्त ५-६ दिवस लागतील. शिवाय रात्री पंख्याखाली ही वाळविता येतात.

mugodya

प्रतिक्रिया

पैसा's picture

29 Mar 2014 - 2:24 pm | पैसा

बहु उपयोगी कृती!

आम्ही ज्याला सांडगे किंवा कोकणीत "वड्यो" म्हणतो तशा प्रकारची कृती दिसते आहे.
तुमचे लिखाण आवडले. इंदुरीसारखी हिंदी मिश्रित दिल्लीची मराठी!

भावना कल्लोळ's picture

29 Mar 2014 - 3:57 pm | भावना कल्लोळ

उपयुक्त माहिती.

त्रिवेणी's picture

29 Mar 2014 - 4:16 pm | त्रिवेणी

माझी आवडती भाजी.

स्पंदना's picture

29 Mar 2014 - 4:58 pm | स्पंदना

अहो हे तर डाळीचे सांडगे. पण नॉर्थचे मुगोडे जरा आकाराने भरभक्कम असतात.
मी तूर डाळीचे सांडगे करते. आम्ही लसूण कोथींबीर घालुन करतो. मेथी घालू शकतो हे कधी लक्षातच नाही आल.
पुढल्यावेळी मेथी घालुन थोडे सांडगे करुन पहाते.
धन्यवाद!

बाकी तुम्हाला मुगोड्याची भाजी आवडते असे दिसते. तरीही कुरकुर!!

अनन्न्या's picture

29 Mar 2014 - 7:57 pm | अनन्न्या

मेथी बारीक चिरली असेही लिहीलेत आणि मेथी २५० ग्रॅम असेही लिहीलेत. पालेभाजी ग्रॅमवर मिळते का तिकडे?
बाकी पाकृ. लिहीण्याची पध्दत आवडली.

विवेकपटाईत's picture

30 Mar 2014 - 8:43 am | विवेकपटाईत

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, मी राहतो बाह्य दिल्ली या भागात भाज्या किलो, २-१/२ किलो (अर्धा धडी) या भावाने मिळतात. पाव अर्धा किलो भाजी घेण्याची परंपरा इथे नाही. बाकी किती मेथी मिसळावी हे कळण्यासाठी ग्रम

मधुरा देशपांडे's picture

30 Mar 2014 - 2:34 am | मधुरा देशपांडे

अतिशय आवडता प्रकार. घरात कुठलीच भाजी नाही किंवा त्याच त्याच भाज्यांचा कंटाळा आला असेल तर अशा वेळी अगदी योग्य. लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या. पाकृ आवडली हे वे.सां.न.

श्रीरंग_जोशी's picture

30 Mar 2014 - 4:39 am | श्रीरंग_जोशी

उत्तम पाकृ व रोचक कथाकथन.

आमच्याकडे या भाजीला मुगवड्यांची भाजी असे म्हणतात. गेल्या भारतभेटीत खाल्ली होती त्यानंतर योग आला नाही.

पियुशा's picture

30 Mar 2014 - 4:54 pm | पियुशा

मस्त ! बणवनार नक्की :)

सांडग्यांची आठवण आली. छान पाकृ!

सूड's picture

31 Mar 2014 - 5:59 pm | सूड

मुगडाळीच्या सांडग्यांसारखी पाकृ. फक्त इथे मेथी, कोथिंबीर घालीत नाहीत. लाल तिखट, लसूण वैगरे घालतात. बाकी पिसून, गाढे हे शब्द मराठीवरील हिंदीचे संस्कार अधोरेखित करतात. ;)

बॅटमॅन's picture

31 Mar 2014 - 7:03 pm | बॅटमॅन

बाकी पिसून, गाढे हे शब्द मराठीवरील हिंदीचे संस्कार अधोरेखित करतात. Wink

वशाडी येवो!!! मिटक्या मारतानाही तुझे व्याक्रणावर लक्ष =))

मागल्या जन्मी संपादक होतास की शाळेत शुद्धलेखनाबद्दल मास्तरानं लै फोडलाता तुला ;)

सेकंड वन इज करेक्ट. चवथीत असताना सूर्य चा 'सू' र्‍हस्व काढला म्हणून छड्या खाल्ल्या प्लस तो शब्द शंभर वेळा लिहून आणून त्याखाली पालकांची स्वाक्षरी आणायला सांगितलं होतं आमच्या वर्गशिक्षिका बाईंनी. घरी आमची वेगळी पूजा मांडली नाही हे बघून जीव भांड्यात पडला होता. ;)

बॅटमॅन's picture

1 Apr 2014 - 3:36 pm | बॅटमॅन

आयला. काय बै आहे की हिटलर? समजू शकतो हो ;)