कोथिंबीर वडी

इशा१२३'s picture
इशा१२३ in पाककृती
22 Mar 2014 - 6:25 pm

साहित्य:

२ वाट्या हरभरा डाळ(भिजवलेली)
कोथिंबीर (धूवून चिरलेली) ३ वाट्या
३ चमचे डाळीचे पीठ (बेसन)
२ चमचे ओवा
१ चमचे धने
२ चमचे तीळ
तिखट ३ चमचे(आवडीप्रमाणे)
मीठ चवीप्रमाणे
२ चमचे चिंचेचा कोळ
२ चिमूट खायचा सोडा
तेल
पाककॄती :
हरभरा डाळ ३ -४ तास भिजत घालावी.कोथिंबीर धुवून चिरावी.(फार बारीक चिरू नये).
भिजलेली डाळ मिक्सरमधून वाटुन घ्यावी.
वाटलेल्या डाळीत तिखट,मीठ्,ओवा,धने,चिंचेचा कोळ्,खायचा सोडा,डाळीचे पीठ आणि कोथिंबीर घालावे.
वरील सर्व साहित्य एकत्र करावे.
कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून वरील मिश्रण त्यात थापावे.त्यावर तीळ लावून एकसारखे थापून घ्यावे.
कुकरमधे भांडे ठेवून नेहेमीप्रमाणे शिजवून घ्यावे(कुकरच्या तीन शिट्ट्या पुरतात).
n
थोडेसे गार झाल्यावर वड्या पाडव्यात.आता वड्या तळायला घेउ शकता.जास्त तेलकट नको असतील तर थोड्या तेलावर
परतून घेतल्या तरी छान लागतात.
gdfg
वड्या नूसत्याही छान लागतात.मी डाळीचा चटका(चटणी) केला होता.(भिजवलेली डाळ हाताशी असल्याने ही पळवाट.)
डाळीचा चटका:
साहीत्यः
३ चमचे भि़जवलेली हरभरा डाळ
४-५ मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
१/२ चमचा साखर
कोथींबीर १ चमचा
जीरे
पा़कॄ:
वरिल सर्व साहीत्य एकत्र करून मिक्सर मधून वाटणे.
हिंग ,जीरे ,कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार चटणीवर घालावी.
ghfh

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Mar 2014 - 6:27 pm | मुक्त विहारि

झक्कास...

पिलीयन रायडर's picture

22 Mar 2014 - 6:31 pm | पिलीयन रायडर

फारच मस्त.. मी पण परवा केल्या होत्या.. पण फार कोरड्या झाल्या होत्या.. तेलात शॅलो फ्राय करुनही काही फायदा झाला नाही. तुझ्या फारच सुबक झाल्या आहेत.. माझ्या वड्यांचा भुगाच जास्त होतो ;)

मस्त .... आवडता प्रकार आहे ....

मृत्युन्जय's picture

22 Mar 2014 - 6:36 pm | मृत्युन्जय

खल्लास. अगदीच अप्रतिम. डाळीचा चटका तर काय कातिल दिसतो आहे.

कंजूस's picture

22 Mar 2014 - 6:47 pm | कंजूस

कधिकधी कोथिंबीर वडीतली कोथिंबीर काळपट का दिसते /होते ?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2014 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

वडी तो वडी...चटनी भी सुभान्नल्हा! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

गोरेगाव डेपो(माणगाव कडचा)च्या एसटी कैंटीनची कोथिंबीर वडी(+ताक)फार चांगली मिळायची .दापोली बस गोरेगाव मार्गे असेल तर मिळते .

मधुरा देशपांडे's picture

22 Mar 2014 - 7:01 pm | मधुरा देशपांडे

सुंदर. डाळीचा चटका तर खासच दिसतोय.

अनन्न्या's picture

22 Mar 2014 - 7:04 pm | अनन्न्या

दोन्हीही मस्त! फोटो झक्कास आलेत गं!

रेवती's picture

22 Mar 2014 - 7:51 pm | रेवती

कातील फोटू.

सुहास झेले's picture

22 Mar 2014 - 8:03 pm | सुहास झेले

शब्द खुंटले... ;-)

जबरी एकदम :)

इशा१२३'s picture

22 Mar 2014 - 10:37 pm | इशा१२३

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे धन्यवाद!
@पिलीयन रायडर :भिजवलेली डाळ वापरली तर वड्या कोरड्या होत नाहीत.आणि या कुकरमधे वाफवून घेतल्याने त्याचा भूगाही होत नाही. :-)

@कंजूस: कोथिंबीर जास्त वेळ ओली राहील्यास साधारणपणे काळी पडते.

अतिशय उपयोगी जिन्नस व स्वादिष्ट, आरोग्यदायी पाकृ.
वाह, व्वा! काय झकास फोटो आणि पाकृ!!
धन्यवाद.

गणपा's picture

23 Mar 2014 - 2:54 am | गणपा

चटका करताना डाळ शिजवायची नाही?
कच्च्याच वाटलेल्या डाळीवर नुसती फोडणी द्यायची?
फोटो बाकी झक्कास.

माझ्या पुरता बोलायचं झाल्यास मला उकडलेल्या कोथिंबीर वड्या जास्त आवडतात.
पण वरुन फोडणी आणि ओलं खोबरं मस्ट.

स्पंदना's picture

23 Mar 2014 - 3:40 am | स्पंदना

दिल गार्डन गार्डन हुवी गवा!

विवेकपटाईत's picture

23 Mar 2014 - 9:36 am | विवेकपटाईत

नक्कीच करायला सांगेल.
बटाटा चिप्स

पियुशा's picture

23 Mar 2014 - 10:12 am | पियुशा

मस्त झाल्यात ! नविन प्रकार कळला को.व. चा धन्यु :)

सानिकास्वप्निल's picture

23 Mar 2014 - 3:59 pm | सानिकास्वप्निल

खमंग वड्या आणी चटकदार चटका आवडले आहे :)

त्रिवेणी's picture

23 Mar 2014 - 8:54 pm | त्रिवेणी

मस्त. मी कायम ईड्ली पात्रात वाफवते. आता कुकरमध्ये ३ शिट्टी करुन बघणार.

नेहमीच्या आवडीची गोष्ट. आता येत्या विकांती घरी करुन हादडण्यात येईल..

इशा१२३'s picture

24 Mar 2014 - 6:12 pm | इशा१२३

@गणपा:हो ..हा चटका असाच कच्च्या डाळीचाच करतात....आणि न तळताही या उकडलेल्या वड्या छान लागतात वरून फोडणी घालून. :-)

मस्त दिसताहेत वड्या... मला चिक्कार आवडतात कोथिंबीर वड्या...

आमच्याकडे वाफवून नंतर तव्यावर शॅलोफ्राय करतात पण वरून फोडणी घालून केलेल्या पहील्यांदाच पाहतो आहे. फर्माईश करायला हवी आता घरी...

मस्तच ! फोडणीची चटणी पण एकदम भारी ! :)

{अळुवडी प्रेमी} :)

पैसा's picture

30 Mar 2014 - 12:07 pm | पैसा

आवडता प्रकार आहे!

सुंदर आहेत.... वाह ! तोंडाला अगदी पाणी सुटलं.....

निवेदित's picture

30 Mar 2014 - 6:38 pm | निवेदित

सुंदर

किसन शिंदे's picture

3 Apr 2014 - 9:59 pm | किसन शिंदे

काल संध्याकाळी घरी बनवून पाहिल्या(बनवल्या अर्थात सौंनी), मस्त कुरकूरीत झाल्या होत्या. चिंचेचा कोळ आणि धने वापरले नव्हते.

1

मस्तच दिसतायेत वड्या!!

>>चिंचेचा कोळ आणि धने वापरले नव्हते.
एकदा वापरुन बघा चिंचेचा कोळ, पुन्हा त्याशिवाय वड्या करायचा विचारदेखील करणार नाही. भरीस भर गुळाचा खडाही घाला एखादा.

प्यारे१'s picture

3 Apr 2014 - 10:36 pm | प्यारे१

मस्तच!
सौ. किस्नाची पाकृ पण आवडली.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!!
@किसन शिंदे..प्रतिसादबद्दल आभार.तुमच्या सौ.नी बनवलेल्या वड्याही छान दिसतायत.धने नाहि घातले तरी फार फरक पडत नाही.आणि चिंच आवडत नसल्यास थोडे आंबट दही घातले २ चमचे तरी चालते.वड्या जास्त कुरकुरीत होतात.:-) :)

सखी's picture

4 Apr 2014 - 8:06 pm | सखी

छान दिसतात वडया आणि चटका तर खासच एकदम हिरवागार, करुन बघायला पाहीजे आता. इतके दिवस फोटु दिसत नव्हते (बरच होत ते)आज अचानक दिसायला लागले.