माणुसकी आणि भावना मरत चालल्याय का ?

वात्रट मेले's picture
वात्रट मेले in काथ्याकूट
13 Jan 2014 - 2:09 pm
गाभा: 

मागच्या आठवड्यात सौ आणि लेकीला घेऊन फिरायला जाताना आमच्या कॉलोनी च्या कॉर्नर वरतीच गर्दी दिसली, मीही मनुष्य योनितला असल्यामुळे साहजिकच थांबलो, बघतो तर काय, एका आपे रिक्श्याने एका जुन्या एस्टीम ला धडक दिली होती आणि त्या चारचाकी मधले एक दक्षिण भारतीय जोडपे त्या रिक्श्यावाल्याबरोबर तावातावाने भांडत होते. तसे पहिले तर ते जोडपे हि वयस्कर होते आणि त्यांची परिस्तिथी पण चांगली होती. तो रिक्श्यावाला पण म्हातारा होता परंतु गरीब दिसत होता. बरीच मंडळी जमली होती. ती स्त्री पोलिसात तक्रार दाखल करण्याविषयी बोलत होती तर काही लोक मिटउन घेण्यास सांगत होते. चारचाकी चे इतके काही नुकसान झाले नव्हते परंतु दरवाजा आत गेला होता. गाडी चा विमा उतरवलेला असल्यामुळे लोक मिटउन घेण्यास सांगत होते. बिचारा रिक्षावाला जरा घाबरलेला होता. कसे तरी करून शेवटी प्रकरण मिटले..रिक्षावाल्याला लोकांनी कटवले बाकी बाई ची बडबड चालूच होती .. आम्हीही निघालो तर बाजूने ३/४ तरुण जात होते, ते पण ते भांडण बघूनच जात होते नाही काही पण १६/१७ वर्षाचे असतील ते, त्यातला एक बोलत होता कि यार आता माझा मोबाइल चार्ज पाहिजे होता लगेच भांडणाचे आणि गाडीचे फोटो काढून फेसबुक आणि whatsApp वरती share केले असते. मी जरा shock झालो, मनात विचार आला कि ह्या सोशिअल मेडिया ने आजची पिढी भावना हरउन बसलीय का..लोकांना मदत करण्यापूर्वी ह्यांना त्या गोष्टीचे फोटो काढायचे असतात आणि ते share करायचे असतात. मला बर्याच वेळी असे मेसेजेस आलेत कि ती व्यक्ती मृत असते ट्रक चे चाक डोक्यावरून गेलेले असते जे बघूनच एखाद्याचा थरकाप उडेल असे हे फोटो लोक "आज झालेला अपघात" या शीर्षकाखाली share करतात. आज लोकांना दुसर्याला मदत करण्यापेक्षा त्या घटनेचे छायाचित्रण करण्यात धन्यता वाटते.

माणुसकी आणि भावना मरत चालल्याय का ?

चू. भू. माफ असावी.

प्रतिक्रिया

बर्फाळलांडगा's picture

13 Jan 2014 - 2:46 pm | बर्फाळलांडगा

म्हणून वापरला जातोय इतकच. फार विचार नको फेसबुक शेरिंग मुळे मानुसकिवर फर्क पड्त नाही.

शशिकांत ओक's picture

16 Apr 2014 - 6:27 pm | शशिकांत ओक

आपला हा धागा देखील शेअर करून आपण सर्वच मीडियाचा पर्याय वापरतोय. माणुसकीचा तो एक वेगळा अविष्कार मानला तर... असे बलांना सुचवायचेय असे वाटते.

शुचि's picture

15 Apr 2014 - 6:17 pm | शुचि
तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 11:45 pm | तुमचा अभिषेक

कधी कधी अपघाताचे लेटेस्ट फोटो वॉस्सपवर शेअर झालेले बघून बरेचदा येते खरे मनात की काश यार कधीतरी हा असा एखाद्या मोठाल्या दुर्घटनेचा पहिला फोटो खेचण्याचा मान आपल्याला मिळावा. बाकी अश्या परीस्थितीत नक्की वागेन कसा ते वेळ आल्यावरच समजेल.

तरी एक बरे या दुर्घटनेचा साक्षीदार म्हणून स्वतालाही त्या फोटोत घेऊन त्या बॅकग्राऊंडवर फोटो टिपले जात नाहीत. कदाचित पोलिस आणि कायद्याच्या कचाट्यात पडायला नको या भितीने असावे.

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2014 - 9:00 am | चौथा कोनाडा

हो, माणुसकी आणि भावना मरत चालल्यायत. याला कारणीभूत बरेच घटक आहेत. एक वेगळा धागा काढुया का त्या साठी ?
धागा: माणुसकी आणि भावना का मरत चालल्यायत ?

असंका's picture

16 Apr 2014 - 3:34 pm | असंका

होय...अगदी खरे आहे. मी फेसबूकवर एक विनोदि शीर्षक वाचून त्याखालील दुवा उघडला. तो दुवा एकाच कुटुंबातील चौघे जण पाण्यात वाहून गेले होते त्याचा होता. मुळात आपण मागे राहून चित्रीकरण करणे हे जाउ द्या. पण ती चित्रफीत विनोदी शीर्षक देउन इतरांना बघायला प्रवृत्त करणे म्हणजे जरा असंवेदनशील झाले.

आणि हे सगळं करणं इतकं सोपं आहे, की आपण जे लिहिलं/शेअर केलं आहे, त्याचे परीणाम काय होतील त्याचा विचार करायच्या आत तो संदेश सगळीकडे पोचून बघूनही झालेला असतो. वर मी उल्लेख केलेली चित्रफीत इतकी अंगावर येणारी होती, की त्यापे़क्षा भयंकर असे काही बघायला मिळेल असे वाटत नाही. आणि बघितले तरी तेव्हढा धक्का बसणार नाही. कारण आपण म्हणालात तसे...ती भावना आता बोथट झाली आहे.