जर संभाजी महाराज ........

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
30 Nov 2013 - 12:18 am
गाभा: 

संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल बरेच काही वाचले आहे आणि अजूनही वाचत आहे. शिवाजी महाराजांचे स्वराज्य समर्थपणे पेलणारा हा राजा काहीसा उपेक्षित राहिल्याची खंत मनाला लागत राहते… कारण आजही कित्येक लोकांना त्यांचे कार्य आणि बलिदान माहीतच नाहीये. काहींना तर फक्त "रंगेल" आणि "रगेल" या दोनच शब्दात संभाजी महाराजांचे वर्णन करता येते… आपल्या अल्पश्या आयुष्यामध्ये देखील त्यांनी इंग्रज फ्रेंच मोगल ई सत्तांना आव्हान दिले आणि हिंदवी स्वराज्य हे परकियांच्या हातात जाण्यापासून वाचवले. संभाजी महाराज हि फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडले. असा हा लढाऊ आणि पराक्रमी राजा केवळ रणांगणावर तलवार चालवण्यात तरबेज नव्हता तर संस्कृत,मराठी, ब्रिज, इंग्रजी ई भाषांवर प्रभुत्व असणारा ज्ञानी राजा होता.
जर संभाजी महाराजांना भरगोस आयुष्य (कमीत कमी शिवाजी महाराजांच्या इतके तरी ) लाभले आसते तर भारताची राजकीय अवस्था कशी झाली असती? मिपावर बरेच इतिहास संशोधक आणि अभ्यासक आहेत. आपले मत काय आहे?

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

30 Nov 2013 - 3:59 am | अर्धवटराव

पण सातारा, कोल्हापूर, नागपूर, इ. गाद्या निर्माण झाल्या नसत्या, पेशवाई नामक प्रकार अस्तित्वात आला नसता आणि इंग्रजांना आणखी ५० वर्ष भारतात फार काहि राजकारण करता आलं नसतं...

खटपट्या's picture

30 Nov 2013 - 4:35 am | खटपट्या

धन्यवाद बाप्पुराव,

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2013 - 9:34 am | टवाळ कार्टा

इंग्रजी???

खटपट्या's picture

30 Nov 2013 - 9:52 am | खटपट्या

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल मिपावर एवढी उदासीनता ? फक्त तीन प्रतिसाद?

राजेश घासकडवी's picture

30 Nov 2013 - 9:59 am | राजेश घासकडवी

शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज यांना मिपावर भरपूर मान आहे. हे फक्त तीन प्रतिसाद मिळाले आहेत ते बाप्पूंच्या लिखाणाला किती मान आहे हे दर्शवतात. 'संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल बरेच काही वाचले आहे आणि अजूनही वाचत आहे.' असं ते म्हणतात, आणि एक नुसता प्रश्न सोडून जातात. त्यांनी जर त्या पराक्रमाची वर्णनं केली असती तर खात्रीने आमची छाती फुगून आली असती आणि भरभरून प्रतिसाद दिले असते.

बाप्पू's picture

30 Nov 2013 - 1:24 pm | बाप्पू

>> हे फक्त तीन प्रतिसाद मिळाले आहेत ते बाप्पूंच्या लिखाणाला किती मान आहे हे दर्शवतात.
राजेश साहेब, मी मिपावर नवीन आहे हो. आणि हा माझा पहिलाच धागा आहे. थोड फार समजून घ्या ना. लगेच च आपल्या सारखे धडाधड लिखाण मी नाही चालू करू शकत . :)

क्लिंटन's picture

30 Nov 2013 - 9:59 am | क्लिंटन

इतिहासाच्या अभ्यासात जर-तर ला अर्थ नाही. जे काही झाले त्यामागे कारणे काय होती आणि त्याचे परिणाम काय झाले आणि संबंधित घटना नुकसान करणारी असेल तर परत तसे होऊ नये म्हणून काय करावे हा धडा घेणे याशिवाय इतिहासाच्या अभ्यासात काय असते?

जर-तरची सुरवातच करायची असेल तर (महाराष्ट्राच्या संदर्भात) जर देवगिरीच्या किल्ल्यावर कोठारात मीठाच्या पोत्यांऐवजी खरोखरच धान्याची पोती असती तर--- पासून सुरवात करावी लागेल आणि मग त्याला काही अंतच राहणार नाही.

सुहास..'s picture

30 Nov 2013 - 7:59 pm | सुहास..

इतिहासाच्या अभ्यासात जर-तर ला अर्थ नाही. जे काही झाले त्यामागे कारणे काय होती आणि त्याचे परिणाम काय झाले आणि संबंधित घटना नुकसान करणारी असेल तर परत तसे होऊ नये म्हणून काय करावे हा धडा घेणे याशिवाय इतिहासाच्या अभ्यासात काय असते? >>>

सर्वात पहिले राम-राम घ्या , लई दिवसांनी दर्शन ...

या विषयावर , माझी सुरुवात इथुन आहे की मुळात आताच्या या जगात इतिहासाची काय गरज आहे हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे त्यातले एक सबळ कारण असे आहे की माणुस इतिहासामध्ये जनुकांचा शोध लावायला जातो मग मला त्या इतिहासाच्या पुस्तकाला आग लावावीशी वाटते ...एक साध उदा. आहे ..राजेंनी लढाई लढली ती औरंगजेबाच्या सुलतानी राजवटीच्या विरूध्द , पण आज ज्या तर्‍हेने समाज ( अर्थात अपवाद आहेत हे ही मान्य पण टक्का किती ? )त्यापासुन प्रेरणा घेतो , आणि एक विशीष्ट समाजाशी त्याचे वैर आहे असे ठरवुन बसतो त्या मुळे अगदी कुठलाही थोर ( इतिहासातुन ) आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वापासुन मिळणारी प्रेरणा त्याचा थेट अर्थच बदलला जातो ....दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे मेनेन्टन्स ...ईतिहास हा जसाच्या तस्सा लिहीणे ( माझ स्पष्ट मत आहे की तुम्ही काही ही सिध्द ( प्रुव्ह !! ) करु शकता, एक फक्त श्वाश्वत इतिहास सोडुन !! ) ...त्यमुळे अश्या विषयांना माझा नेहमी " जय महाराष्ट्र " असतो ...आज तु विषय काढलास म्हणुन हा प्रतिसाद ...

अ‍ॅन्ड फायनली ....हिस्टॉरियन रामचंद्र गुहांच एक वाक्य !!
WE, INDIANS, MAY HAVE CREATED THE GREAT HISTORY, BUT WE ARE NOT A GREAT HISTORIANS

बाप्पू's picture

30 Nov 2013 - 8:43 pm | बाप्पू

सुहास राव तुम्ही तर तर इतिहासाबद्दल आणि त्याच्या आभ्यासाबद्दल टोकाची व खूपच निगेटिव भूमिका मनात ठेवलेली दिसतेय.
असो, तुमचे म्हणणे काही अगदीच चुकीचे आहे नाही. तुमच्या विचारांशी एकदम सहमत आहे. आज समाजात कितीतरी वाईट गोष्टी घडत आहेत परंतु त्याचे कारण इतिहास नाही तर त्याचा नको तो आर्थ लावून लोकांची माथी भडकवणारे काहीं लोक आहेत.
पण फक्त या कारणासाठी आपल्या पूर्वजांच्या वैभवशाली आणि पराक्रमी इतिहासाला आपण विसरून कसे चालेल ?

"इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत" हे आपल्या इंग्रजी वाक्याला माझे उत्तर आहे.

आणि मी जो विषय मांडलेला आहे तो इतिहासापेक्षा कल्पनाशक्ती शी जास्त निगडीत आहे असे मला वाटते :)

सुहास..'s picture

30 Nov 2013 - 9:03 pm | सुहास..

:)

पहिली गोष्ट : अहो -काहो करण्या इतपत मी वयानेच काय पण मानाने देखील मोठा नाहीये मित्रा , तु ही नसशीलच ! असाल तर माझा अरे-कारे मागे घेतो ;)

प्रेरणाच घ्यायची असली तरी सद्य स्थितीत कमी नाही , आमटे आहेत, ज्युनियर कर्वे आहेत , अवचट आहेत., दाभोळकर आहेत, यांना पाहिले आहे मी....अशी कित्येक नावे आहेत :) !! मी संभाजीमहराजांना किंवा औरगजेबाला नाही पाहिले.
लोकांनी तरी का म्हणुन स्वतःची माथी भडकावावीत बर दुसरे म्हणजे जाळपोळ, दंगली झाल्यावर ही बोघ घेत नाहीत , त्या घडलेल्या दंगलीच्या इतिहासाचा देखील रिव्हेंज हवा असतो ...हे पाहिले आणि मग इतिहासातुनच एक वचन घेतले ..

|| जो सांगे बाप-जाद्याची किर्ती ||
|| तोचि एक मुर्ख समजावा ||

:)
इतिहास जाणुन असलेला पण आत्तामध्ये जगणारा
वाश्या

sorry मित्रा… मिपावर नवीन आहे त्यामुळे इथल्या senior सभासाद्दंशी आजून इतकीशी ओळख नाहीये. आणि मला आहो कहो करू नकोस… तुझ्यापेक्षा मी वयाने लहानच आहे. :)

एखादी गोष्ट इतिहासजमा झाल्यानंतर आपण त्याला विसरून फक्त आत्ता काय चाललेय किंवा आता ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या विषयी च बोलायचे का ? मग तुझ्या म्हणण्यानुसार आजून १०० -१५० वर्षानंतर लोकांनी आमटे,कर्वे, अवचट, दाभोलकर यांचा आदर्श घेतला नाही पहिजे… कारण १०० -१५० वर्षानंतरच्या लोकांनी या सर्वांना पहिलेच नसणार जसे कि तू आज शिवाजी, संभाजी औरंगजेब यांना पहिले नाहीयेस तसे…

|| जो सांगे बाप-जाद्याची किर्ती ||
|| तोचि एक मुर्ख समजावा ||

एकदम सहमत. पण त्यांच्या चांगल्या सवयी आणि आदर्श नक्कीच घेऊ शकतो. त्या आपल्या अंगी आणून आपणही त्यांच्यासारखे बनण्यचा प्रयत्न करणे यात काहीच गैर नाही. त्यनी ज्या चुका केल्या त्या आपण टाळून आपण त्यांच्यापेक्षा हि मोठे होऊ शकतो ना? (तसे पाहायला मिळत नाहीये हि वेगळी गोष्ट :) )आणि त्यासाठी इतिहास माहित आसने आणि त्याबद्दल विचार करणे गरजेचे आहे.

या प्रतिसादाशी सहमत आहेच पण "इतिहासाची नेमकी गरज काय" या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे नाही. सर्वसामान्य माणसाला वीज-पाणी-अन्न वैग्रेइतकी इतिहासाची गरज नसते हे सत्यच आहे. पण राजकीय नेतृत्वाला त्याची गरज असते. अमुक एका प्रकारची संस्कृती रुजवायला इतिहासाचा उपयोग करता येतो त्या बळावर समाजाला चांगले झुलवता येते. अन समाजाला झुलवता आले की अजून काय पाहिजे!!! मग ते "भारतावर १००० वर्षे राज्य करणारे" असोत नैतर "भूमिपुत्र" असोत किंवा बहुजन असोत नैतर अजून कोणी. इतिहास ही राजकीय नेतृत्वाची एक गरज होती आणि यापुढेही राहील.

ते सोडून सामान्य माणसाला खरे तर काही उपयोग नाही-संशोधक वगळता. त्यांनाही जिज्ञासा भागवणे सोडले तर अजून आर्थिक फायदा कै मिळत नाही. हां बाकी जे सांस्कृतिकदृष्ट्या अ‍ॅक्टिव्ह असतात त्यांना जरा फायदा असतो इतकेच.

त्यामुळे किती निरुपयोगी वाटला/असला तरी इतिहासाचा वापर राजकारण्यांकडून किंवा विचारवंतांकडून होतच राहणारे बर्‍यावाईट कामासाठी. त्याचे उपद्रवमूल्य प्रचंड असल्याने त्याच्याशी अनाठायी खेळ करू नये.

इथे अर्थात राजकीय इतिहासाबद्दलच बोलतोय. बाकी कलेचा, तंत्रज्ञानाचा, इ. इतिहास पाहिला तर त्यांचे फायदे अजून वेगळ्या स्वरूपाचे आहेत आणि तिथे काहीवेळेस प्रत्यक्ष फायदेही मिळू शकतात.

शिवाय इतिहास म्हंजे गतघटनांची स्मृती ठेवणे. अशी स्मृती ठेवल्यानेच आदिमानव प्रगती करू शकला, नैतर दरवेळी नव्याने सुरू करू पाहिल्यास प्रगतीच झाली नसती. आपला देह काय किंवा आजचे आपले राहणीमान काय, इतिहासाचाच परिपाक आहेत. अमुक एक गोष्ट शरीराला चांगली/वाईट अशी स्मृती आपल्या शरीरात असते, ते इतिहासाचे स्मरणच आहे एकाप्रकारे. अभ्यास करताना, प्रोग्रॅमिंग करतानाही ही स्मृतीच आपल्या कामाला येते.

त्यामुळे या अंगाने पाहिले तर इतिहासाचे महत्त्व फार आहे. पण नेहमी आपल्या समोर इतिहास म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, शिवाजीमहाराज, औरंगजेब, अल्लाउद्दीन खिल्जी, झालंच तर पेशवे अन मग ब्रिटिश अन गांधी इतकेच येत असल्याने असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. असो.

अस्वस्थामा's picture

2 Dec 2013 - 3:57 am | अस्वस्थामा

साक्षात दंडवत ..!!
इतक्या सुंदर विवेचनाबद्दल साक्षात दंडवत वाल्गुदेया..!!

यशोधरा's picture

2 Dec 2013 - 9:36 am | यशोधरा

सुरेख प्रतिसाद. आवडला.

मालोजीराव's picture

2 Dec 2013 - 12:01 pm | मालोजीराव

आताचा संपूर्ण वर्तमान हे इतिहासाचेच आउटपुट आहे...ब्याट्या लई भारी प्रतिसाद

प्यारे१'s picture

2 Dec 2013 - 12:13 pm | प्यारे१

छान प्रतिसाद रे बॅटमॅन!

-अ‍ॅक्सिलेटरबरोबर ब्रेकवर तेवढाच विश्वास असलेला प्यारे

विटेकर's picture

2 Dec 2013 - 3:23 pm | विटेकर

इतिहासाचे अवघड ओझे , डोक्यावर घेऊन ना नाचा
करा तयांचे पडस्थल आणिक च्ढून त्यावर भविष्य पहा
- ज्ञानपीठ वि़जेते विन्दा.

पडस्थल?? पेडेस्टल चे मराठीकरण मस्त केलेय बाकी.

विटेकर's picture

2 Dec 2013 - 3:28 pm | विटेकर

ओ भाषा शास्त्री .. जरा संबळून घ्या की !

असं कं ओ करता विटेकरजी, मला ती कविता माहिती नव्हती म्हणून तो शब्द वापरल्याचे आश्चर्य वाटले इतकेच. चूक काढण्याचा उद्देश नव्हता ओ.

पैसा's picture

2 Dec 2013 - 8:12 pm | पैसा

इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनी त्यावर भविष्य वाचा

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 12:13 am | बॅटमॅन

धन्यवाद!

बाप्पू's picture

3 Dec 2013 - 12:06 am | बाप्पू

छान स्पष्टीकरण. आवडले :)

क्लिंटन's picture

1 Dec 2013 - 11:13 pm | क्लिंटन

याविषयी दोनच गोष्टी लिहितो:

The only thing we learn from history is that we don't learn anything from history. आणि Those who don't learn from history are condemned to commit the same mistakes.

इतिहासाचा अभ्यास नक्की कशाकरता करायचा?भूतकाळातील वैर काढून सद्यकालीन तेढ वाढवायला की भूतकाळात आपल्या पूर्वजांच्या हातून नक्की काय चुका झाला ते समजावून घ्यायला (म्हणजे आपण त्याच चुका टाळू शकू) हे ज्याचे त्याने ठरवायचे.पण एक गोष्ट नक्कीच की जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाहीत.त्यामुळे इतिहाराचा अभ्यासच निरूपयोगी वाटत असेल तर त्याविषयी काय बोलणार?

बाय द वे, शास्त्राचा अभ्यास करून अनेक चांगल्या गोष्टी बनविल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रे-बॉम्ब हे पण बनविले आहेतच.मग तुम्ही म्हणता त्याच न्यायाने शास्त्राचा अभ्यास सुध्दा टाकाऊच म्हणायला हवा!!

पैसा's picture

30 Nov 2013 - 10:02 am | पैसा

याला तसा खरा काही अर्थ नसतो, पण कल्पना लढवायची तर, भारतातून पोर्तुगीजांचा सफाया झाला असता, इंग्रजांना एवढे हातपाय पसरता आले नसते, कदाचित व्यापार करण्यावर समाधान मानवे लागले असते. आणि औरंगजेबालाही कदाचित काबूलला पळून जावे लागले असते. आदिलशाही मराठ्यांनी संपवली असती. मिळाले तेवढ्या अल्प काळात संभाजीराजांनी राज्याचा विस्तार केला ते पहाता आणखी २५/३० वर्षात काय झाले असते याची कल्पना करणे अवघड नाही. शाहू आणि येसूबाईचे आयुष्यही पूर्ण वेगळे झाले असते यात शंका नाही. आणि कदाचित शाहू हा स्वतः शांत रहाणारा राजा झाला तसा न होता छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तडफदार राजा झाला असता. पेशवाई आली नसती. आणि सगळे सरदार जे राजापेक्षा डोईजड झाले तेही झाले नसते. ताराबाईला कर्तृत्व गाजवायला मिळाले नसते आणि येसूबाईंना अधिक काही करता आले असते.

अमोल मेंढे's picture

30 Nov 2013 - 10:49 am | अमोल मेंढे

१००% सहमत

आणि काही लोक म्हणतात तसे इंग्रज आले नसते, तर आज आपण आफ्रिकेतल्या कांगो किंवा घाना सारख्या देशा सारखे राहीलो असतो. आपल्यातल्या ९९% लोकांचा जन्म ही होऊ शकला नसता हे नक्की, कारण आपले पुर्वज दुष्काळ, पुर,कुपोषण छोटया संस्थानातील लुटुपुटीची युद्धे ह्यात मेले असते.

पैसा's picture

2 Dec 2013 - 12:57 pm | पैसा

चीन आणि जपानचं काय झालं?

प्रसाद१९७१'s picture

2 Dec 2013 - 1:06 pm | प्रसाद१९७१

आपण चीन ही नाही आणि जपान तर अजीबात च नाही.
घोडा तो घोडा आणि गाढव ते गाढव.

पैसा's picture

2 Dec 2013 - 1:07 pm | पैसा

आपल्याच लोकांबद्दल एवढी कमीपणाची भावना बाळगू नका हो!

बाप्पू's picture

3 Dec 2013 - 12:11 am | बाप्पू

एवढे कमी का समजताय? आपण काही गाढव नाही आहोत हे नाकी.
पण आत्ताचा विचार करता आपल्या इथे सत्ता गाढवांच्या हाती आहे. आणि आणि जे गाढव नाही आहेत ते सत्तेवर गेल्यानंतर आपोआप गाढव बनतात. :( कसे काय ते माहित नाही बुवा….

मालोजीराव's picture

2 Dec 2013 - 2:27 pm | मालोजीराव

इंग्रज नसते आले तर काही स्टेट अगदी मागास राहिली असती,काही स्टेट इस्लामीस्ट झाली असती (हैद्राबाद सारखी) तर काही स्टेट अगदी इंग्लंड ,अमेरिकेच्या तोडीची झाली असती उदा. जयपूर, बडोदा,ग्वाल्हेर,कोल्हापूर इ.

राजे हैदराबाद बद्दल हे विधान मराठवाड्यावर अन्याय केल्यासारखे आहे. पोलिस एक्शन जरी वल्लभ्भाइनि केलि तरी लढा इथल्याच लोकानी दिला.
तसेच गोव्याबद्दल काय म्हणता येइल हो मग ?

लढा मराठवाड्याने दिला अन ते नाकारण्यात काहीच प्वाइंट नाही. पण निजामाने अत्याचार लै केले हेही तितकंच खरंय. उसका बस चलता तो इस्लामाईझ करके छोडता असे वाटते खरे वाचून.

मालोजीराव's picture

2 Dec 2013 - 3:39 pm | मालोजीराव

निजामाला अन्यायाने आणि जोरजबरदस्तीनेच इस्लामीकरण करायचे होते, स्टेट ऑफ जुनागढ आणि हैद्राबाद स्टेट यांच्यावर कारवाई नसती झाली आणि प्रजा विरोधात गेली नसती तर भारताच्या पोटात अजून २ पाकिस्तान असते…

+१ अभ्या

प्रचेतस's picture

30 Nov 2013 - 11:00 am | प्रचेतस

अहो तुम्ही राजांच्या चरित्राचे इतके वाचन केले आणि अजूनही वाचताय असे म्हणताय तर ती भाषा ब्रिज नसून ब्रज आहे आणि इंग्रजांबरोबरचा संवाद दुभाषा मार्फत होत असे हे कसे काय वाचले नाही.

बाकी इतिहासात जर..तर.. ला काही अर्थ नसतो.

बाप्पू's picture

30 Nov 2013 - 1:45 pm | बाप्पू

ब्रज बद्दल माहिती आहे आणि नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक याबद्दल हि माहिती आहे . typing mistake आहे ती माझी. :)
आणि राज्यांच्या इंग्रजी बद्दल म्हणाल तर त्यांचे लिखाण आहे कि नाही माहित नाहिये मला. पण तू नळीवर एक व्याखान ऐकल होते ज्यामध्ये असे सांगतात कि "संभाजी महाराज स्वतः इंग्रजांशी इंग्रजीत बोलायचे" आणि आंतरजालावर पण काही ठिकाणी असे लिहिलेले पहिलेय.… तुमच्या कडे याबद्दल जर काही विश्वासार्ह विश्वासार्ह पुरावे असतील तर जरूर सांगा.

प्रचेतस's picture

30 Nov 2013 - 3:04 pm | प्रचेतस

संभाजीराजांचे हिंदी, ब्रज, संस्कृतवर प्रभुत्व होते याचे सबळ पुरावे त्यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथांद्वारे आहेतच. पण त्यांना इंग्रजी मात्र येत नसे.

संभाजीराजांबरोबर तह करण्यासाठी मुंबैच्या गव्हर्नरने कॅप्टन रिचर्ड केजविन, कॅ. हेन्री गॅरी आणि थॉमस विल्म्यस यांना वकील म्हणून आणि राम शेणवी यास दुभाषा म्हणून पाठवले. त्यांनी कर्णाटकात वखारी काढण्याबद्दल मनसुबा सांगितला.
(संदर्भ - शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले -Factory Records Sambhaji to Keigwin, Bombary April 1684, भारत इतिहास संशोधक मंडळ-त्रैमासिक अक २ रा, १९२२ पृष्ठ ३१)

कपिलमुनी's picture

30 Nov 2013 - 3:41 pm | कपिलमुनी

पहिला इंग्रजी शिकलेला मर्‍हाटी माणूस कोण असेल बरे ?

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2013 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले

तरखडकर

वल्लीच्या प्रतिसादात नारायण शेणवीचे नाव आलेले आहे. इंग्रजी शिकलेल्या अगदी सुरुवातीच्या काही मराठी/कोंकणी लोकांत याची गणना करता यावी.

प्रचेतस's picture

1 Dec 2013 - 4:30 pm | प्रचेतस

राम शेणवी असे नाव आहे.
नारायण शेणवी हां त्याआधीच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडातील दुभाषा का वकील होता.

बॅटमॅन's picture

1 Dec 2013 - 4:41 pm | बॅटमॅन

ब्रोब्र. अंमळ चूक झाली. नारायण शेणवी हा अजून जुना नक्कीच म्हणता येईल.

खरे तर पहिला इंग्रजी दुभाषी कधी? याचे उत्तर पहिला इंग्रज भारतात कधी आला? याच्या उत्तराशी निगडित आहे.

बाप्पू's picture

30 Nov 2013 - 6:14 pm | बाप्पू

सन्धर्भासहित आपले म्हणणे मांडल्याबद्दल खूप धन्यवाद. :) तुम्ही उल्लेख केलेले पुस्तक नक्की वाचेन. मी तुनळि वर हा एक व्हिडीओ पहिला. यामध्ये संभाजी महाराज इंग्रजी बोलताना दिसत आहेत. ते कसे काय मग ? हे नाटक लिहिताना लेखकाने काहीतरी संदर्भ घेतलाय कि नाही हा प्रश्न पडलाय मला. :)
http://www.youtube.com/watch?v=3IoiiVG2s9E

विद्युत् बालक's picture

30 Nov 2013 - 6:20 pm | विद्युत् बालक

गांधीच्या अनेक चित्रपटात त्यांचा वध होताना त्यांनी "हे राम " असे म्हटल्याचे दाखवले आहे . पटकथा लिहिताना कशाचा संदर्भ घेतला असावा असा मला प्रश्न पडला आहे :)

प्रचेतस's picture

30 Nov 2013 - 6:28 pm | प्रचेतस

कमल गोखले यांनी लिहिलेले 'शिवपुत्र संभाजी' हे संभाजी महाराजांचे अस्सल चरित्र जरूर वाचा. अस्सल कागदपत्रांचा धांडोळा घेऊन लिहिलेले हे चरित्र अत्यंत अभ्यसनीय आहे.

बाप्पू's picture

30 Nov 2013 - 8:45 pm | बाप्पू

नक्कीच… इतके छान पुस्तक सुचवल्याबद्दल खूप धन्यवाद :)

इतिहासातल्या जर तर वरून आठवलं - समांतर विश्व या कल्पनेवर जयंत नारळीकरांची एक झकास विज्ञानकथा आहे. "भाऊसाहेब पानिपतावर दिसेनासे न होता राहिले असते आणि मराठे युद्ध जिंकले असते तर..." भविष्यकाळ कसा घडला असता अशी कल्पना आहे. बहुतेक "यक्षांची देणगी" कथासंग्रहात ही कथा आहे.

अनिल तापकीर's picture

30 Nov 2013 - 12:26 pm | अनिल तापकीर

धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

बाप्पू's picture

30 Nov 2013 - 6:19 pm | बाप्पू

काव्य आवडले…… धन्यवाद

अनिल तापकीर's picture

30 Nov 2013 - 12:28 pm | अनिल तापकीर

राजा शिवछत्रपतीनां नि संभाजी राजांना मानाचा मुजरा

वेल्लाभट's picture

30 Nov 2013 - 1:13 pm | वेल्लाभट

फार ज्ञान नाही इतिहासाचं मला, त्यामुळे पाजळणार नाही. पण लई भारी काहीतरी झालं असतं संभाजी महाराजांना उदंड आयुष्य लाभलं असतं तर.

दुश्यन्त's picture

30 Nov 2013 - 4:50 pm | दुश्यन्त

जर संभाजी राजे जर पकडले गेले नसते तर राजाराम छत्रपति झाले नसते आणि महाराणी सोयराबाईची इच्छा अपूर्ण राहिली असती .
बाकी स्वकीयांनीच (त्यांचे सक्खे मेव्हणे गणोजी शिर्के) शंभू राजांना पकडवून दिले . मात्र कोकणातून देशावर नेत असता त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत असेच दिसते. यामागे स्वराज्यातील दुही तर नसावी अश्या प्रकारची चर्चा
आंतरजालावर मागे वाचली होती. थोरले महाराज हयात असतानाच शेवटी दरबारामध्ये शेवटी संभाजी राजे आणि सोयरा बाई / राजाराम अशी विभागणी झाली होती. पूर्वी संभाजी राजे एकदा स्वराज्याविरुद्ध मोगलांना जावून मिळाले होते यामुळे सुद्धा काही दरबारी त्यांच्या विरुद्ध होते.जगातील इतर सत्तांप्रमाणेच स्वराज्यामध्येही भाऊबंदकी उफाळून आली होतीच.

ग्रेटथिन्कर's picture

30 Nov 2013 - 7:39 pm | ग्रेटथिन्कर

वा वा छान छान

मालोजीरावांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

विवेकपटाईत's picture

1 Dec 2013 - 2:36 pm | विवेकपटाईत

संभाजी राजना दगा-फटका झाला, ते कैद झाले. भावनेच्या वश न जाता स्पष्ट म्हणेल -ज्या राजाची गुप्तचर यंत्रणा कुचकामी असेल, जो आपल्या विरोधकांविरुद्ध षड्यंत्र करून त्यांना नष्ट करण्यास कचरत असेल (सख्खा भाऊ का असेना) तो राज्य सुख भोगू शकत नाही. म्हणून म्हंटले आहे. गरुड हा पक्ष्यांचा राजा होतो. राजहंस नाही.

गरुडाला म्हैत असते का हो आपण राजा आहोत ते?

किसन शिंदे's picture

1 Dec 2013 - 11:02 pm | किसन शिंदे

मालोजीराजे कुठे गेले म्हणायचे?? त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...

बाकी सध्या विश्वास पाटलांचं 'संभाजी' वाचतोय. लई म्हणजे लईच्च भारी वाटतंय.!!

राजेश घासकडवी तुमच्या मताशी सहमत अहे. संभाजी राजांचा पराक्रम सांगितला असता तर बरं झालं असतं .
पहिले ३ प्रतिसाद सोडून बाकीचे सगळे प्रतिसाद लेखाशी विसंगत आहेत असं वाटतंय .

निर्वात's picture

13 Apr 2015 - 6:35 am | निर्वात

माझ्या मते सम्भजीराजे हे फार बुध्हिमान होते.तसेच त्यांचे राजाराम वर प्रेम ही होते.त्या मुले त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राजे स्वत :च पकडले गेले असावेत.

खटपट्या's picture

13 Apr 2015 - 11:34 am | खटपट्या

शक्यता फारच कमी वाटते...

संभाजी राजांप्रमाणेच मिपा वर या विषयावर चर्चा करणाऱ्या या सगळ्या ज्येष्ठ आयडी ना थोडं अधिक सक्रिय आयुष्य मिळालं असतं तर?