टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वहिंनीच्या बांगड्या - चित्रपट भाग - ५
भाग १ - http://www.misalpav.com/node/1834
भाग २ - http://www.misalpav.com/node/1895
भाग ३ - http://www.misalpav.com/node/2127
भाग ४ - http://www.misalpav.com/node/2207
----------------------------
येथे श्री गजाननाच्या क्रुपेने आम्ही सादर करत आहोत,
मिपावर वात्रट मंडळीतर्फे, वात्रट माणसांसाठी, वात्रट लोकांनी बनवलेला वात्रट प्रेक्षकासाठी चित्रपट
वहिनींच्या बांगड्या
प्रमुख कलाकार:
सरपंच - चित्रपटातील भुमिका: 'जगाला फाट्यावर कसे मारावे' या विषयाचे प्राध्यापक.
अनुष्काताई (सगळ्यांच्या ताई, फक्त ऐकाच्या सोडुन): 'जगात सभ्यपणे कसे राहवे' याच्या प्राध्यपिका.
मदणबाणः नुकताच १० पास झालेला ऐक होतकरु मुलगा, सध्या महाविद्यालयात प्रवेशाच्या प्रतिक्षेत
शुभ्रा कानेटकर: नुकताच १० पास झालेली ऐक मस्त सुंदर मुलगी, सध्या महाविद्यालयात प्रवेशाच्या प्रतिक्षेत
डॉन आणि गैग - धमाल, आम्बोळी, कुंदन, कुबड्या खविस, वैताळ, इ.
विजुभाउ - गैग चे ब्रेन
पिडा: गैग चे हिसाब - किताब वाले
खास भुमिकेत आहेत, बिरुटेसर - प्राचार्य 'प्रेमसंगम' महाविद्यालय
इतर भुमिकेत आहेत आपले लाडके मिपाकर
--------------------------------------
प्रसंग पहीला:
सकाळचे १० वाजलेत, डॉन आपल्या बुलेटवरुन चहाच्या टपरीवर पोचलाय. टपरीवर आधीच धमाल, कुंदन, वैताळ येवुन चहा पित होते.
'काय रे, वाजवला काय त्याचा भेळवाल्याचा बाजा?' - डॉन
'साला, दिवसाला, ११०० - १२०० भेळी विकतोय आणि आम्हाला देत नाही, ऐका सोफ्ट्वेअर इजिंनीअर पेक्क्षा जास्त पैशे कमावतोय, आणि टैक्स पण नाही, त्याला सांग ऐक बादली पैसा आणुन द्यायला'
'सांगतले आहे, मी त्याला' - धमाल
'ह्या कु ख ने, ऐक त्याच्या पाठीत लाथ घालुन त्याला सोम्य समज दिली आहे' - कुंदन
'चांगले आहे, चांगले आहे, ते विजुभाउ कुठे दिसले नाहीत' - डॉन
'ते पहा, तेथे बसलेत ते' - धमाल्या.
'सापड्ले, सापड्ले' - विजुभाउ ऐकदम आंनदाने ओरड्ले.
'काय, झाले हो' - डॉन आणि त्याची गैंग ऐकदम ओरड्ली.
'सापड्ले, सापड्ले, ऐकदाचे सापड्ले, मिपावर नवीन आय. डी बनवायला मजबुत नाव सापडले' - विजुभाउ.
'विजुभाउ, आता हे उद्योग सोडा, लोक आता तुमच्या नावावर न खालेंल्या गोष्टीचे बिल फाडायला लागली आहेत' - आम्बोळी, आता मयत सोडुन इतर गोस्टीत सुध्दा लक्ष घालायला सुरवात केली होती.
पण हे ऐकायला विजुभौ होतेच कुठे, ते कधीच पळाले नवीन आय. डी बनवायला.
चला रे, आपण पण जरा नवीन पक्षी बघुन येउ - डोन्या, त्याबरोबर, गैग आत मध्ये महाविद्यालयात गेली.
-------------------------------------------------
प्रसंग दुसरा: शुभ्राचे घर
'हे बघ, मी सगळा अर्ज भरुन ठेवलाय, तु पैसे घेउन जा आणि महाविद्यालयात प्रवेश नक्की कर' - शुभ्राचे वडील
शुभ्रा कॉलेजात गेली.
'ह्या पोरटीला आभ्यास करायला नको, नको ते उद्योग करत फिरायला हवे, हिच्या नादाने म्हणे, शाळेतली ३ पोरे नापास झाली' शुभ्राच्या वडील तीच्या आईला सांगत होते. 'ह्या वर्षी महाविद्यलयात काय काय दिवे लावनार काय म्हाहीत?'
-------------------------------------------------
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


क्रमशः
क्रमशः
सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
हे अस्स अपुर्ण नाय लिहायच :)
गटणे,
प्रसंग फार लहान झाले राव, तीन-चार तरी प्रसंग एका लेखनात येऊ द्या
प्रस्तावनेतच समारोप झाल्यासारखा वाटला !!!
सध्या मिपावर येणा-या साहित्याचा वेग पाहता एकाच बैठकीत लेखनाचा आनंद मिळाला पाहिजे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
बिरूटे
बिरूटे सरांशी सहमत आहे...
(ह्.घ्या.)
भाग थोडे मोठे लिहा नाहीतर शेवटच्या भागापर्यंत पोहोचता पोहोचता कंटाळवाणा होइल सिनेमा...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हो हो
थोडे अजून मोठे भाग टाक ना....
बाकी सुरुवात छान झालेय
ए त्या शुभ्रा ला वाया गेलेली पोरगी म्हणताना सांभाळ बरं का..तो मदनबाण पंखा आहे तिचा मोठा....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
मजा येत आहे..
पण असे थोडे थोडे नको लिहु..अबे लेका एकदाच मोठा भाग टाक ना..
>>पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
मी पण....
स्वप्निल..
टाकतोय
टाकतोय मोठा भाग,
आज मुहुर्ताचा नारळ फोडला.
जरा वातावरण तयार करतोय,
सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
ओके
झालं आता वातावरण तयार.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
लै भारी...
सही जा रहा है भिडू... अब वातावरण तयार हो गयेला है ... सो ...पुढचा भाग लवकर टाको...
नाय तर ..................................
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
हिच्या
हिच्या नादाने म्हणे, शाळेतली ३ पोरे नापास झाली'
हे हे असं व्ह्यायचच पोरगी फटाकडी असली की पोर फारच मन लावुन अभ्यास करतात त्याचाच हा परिणाम !!
(शुभ्रा चा फुल टाईम पंखा)
मदनबाण.....