mobile बद्दल मदत / मार्गदर्शन

Madhavi_Bhave's picture
Madhavi_Bhave in काथ्याकूट
8 Nov 2013 - 1:41 pm
गाभा: 

हा प्रश्न मिसळपाव वर विचारू शकतो कि नाही ते मला माहित नाही, पण मला मार्गदर्शन हवे आहे आणि मिसळपाव मंडळींसारखी योग्य माहिती दुसरे कोण देणार?

मला mobile घायचा आहे. बजेट रु. १५००० ते १७०००/- पर्यंत आहे. मला शक्यतो चांगला कॅमेरा व सुस्पष्ट आवाज पाहिजे. इंटरनेट fast हवे जे mainly मला office mails वगैरे check करण्यासाठी पाहिजे. Whatsapp इत्यादी मी वापरते पण म्हणून मी काही youtube फ़ैन वगैरे नाही अहे. कधीतरी गाणी ऐकायला चालतात. चांगली memory हवी आहे

कोणतरी nokia लुमिया घे म्हणून सांगतय, कोण samsung ला पर्याय नाही म्हणते तर कोण Micromax घे म्हणून सांगत आहे. अगदी मस्त confusion वाढत चालले आहे.

माझ्यासाठी post sell service महत्वाची आहे. micromax service बद्दल काहीच कल्पना नाही, Samsung तर service च्या बाबतीत worst आहे, अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

मिपाकर मंडळी काही मदत करू शकतील का?

माधवी भावे

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Nov 2013 - 1:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

http://www.91mobiles.com/compare/Swipe/MTV+Slash/vs/Swipe/MTV+Volt+1000/...
ऑनलाइन ऑर्डर देणार असाल तर कोण कमी किंमतीत आणि फ्री डिलिव्हरी देतो बघा..माझ्यामते १० हजारमध्येही चांगला मोबाइल येइल्...स्वाइप,कार्बन्,लेनोवो चे फोन फिचरबाबत जबरा आहेत.
फोन चे आयुष्य फारतर २-३ वर्षे असते त्यामुळे post sell service ची फार चिंता करु नये असे माझे मत

जेपी's picture

8 Nov 2013 - 1:54 pm | जेपी

फिश फिश फिश फिश

मायक्रोम्याक्स डूडल २ घ्या.....

अलबेला सजन's picture

8 Nov 2013 - 3:14 pm | अलबेला सजन

आपण दिलेल्या बजेट मध्ये सध्या अनेक चांगले मोबाइल उपलब्ध आहेत.
नोकिया, samsung, सोनी ह्या बाजारातिल दादा कंपन्या आहेत. नोकिया लुमिया मधे विन्डोज ऑपरेटिंग सिस्टीम तर samsung, सोनी यामध्ये android ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि post sell service ही कोणतीही कंपनी असली तरी डोकेदुखीच असते.
Nokia lumia 620, Nokia lumia 625, Samsung Galaxy Grand Duos GT-I9082, Samsung Galaxy Core I8262, Sony Xperia M , Sony Xperia L ही आपल्यासाठी काही सजेशन्स आहेत. यातील नोकिया फोन हे सिंगल सिम कार्ड तर Samsung फोन हे डबल सिम कार्ड मध्ये उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी http://www.flipkart.com येथे तुलना करा, आपल्या मित्र परिवारामधील फोन हाताळून पहा व निर्णय घ्या..

शिद's picture

8 Nov 2013 - 3:37 pm | शिद

प्रेषक, Madhavi_Bhave,

हा प्रश्न मिसळपाव वर विचारू शकतो कि नाही ते मला माहित नाही,

Dhananjay Borgaonkar's picture

8 Nov 2013 - 4:09 pm | Dhananjay Borgaonkar

मी पण हीच प्रतिक्रिया देणार होतो.

Madhavi_Bhave's picture

8 Nov 2013 - 4:20 pm | Madhavi_Bhave

शिद

माफ करा पण मला आपला प्रश्न कळला नाही? मला विचारायचे होते कि असा प्रश्न आपण विचारू शकतो का मिसळपाववर. ह्यात काही चुकले असेल असे मला तरी वाटत नाहि.

शैलेन्द्र's picture

8 Nov 2013 - 4:30 pm | शैलेन्द्र

अहो, "शकतो " हा टायपो आहे की खरं आहे असा त्यांचा प्रश्न आहे :)

उपास's picture

27 Nov 2013 - 8:11 pm | उपास

"एखादा किंवा आपण हा/ असा प्रश्न मिपावर विचारू शकतो का?" असं विधान असेल तर लिहिणारा स्त्रीलिंगी/ पुल्लिंगी असला तरी फरक पडू नये, असो! :)

आशु जोग's picture

7 May 2017 - 2:04 am | आशु जोग

स्त्रिलिंगी पुल्लिंगीने मोबाईल कोणाता वापरावा यामधे फरक पडत नसावा !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Nov 2013 - 4:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नोकिया ल्युमिया घेउन टाका. ब्रँड आहे आणि नोकिआ चे फोनं वापरायला दणदणीत असतात. तुमच्या बजेट मधे आणि गरजेसाठी ल्युमिया ७२० पुरेसा आहे.
ल्युमिया ७२०

सॅमसंग घेणार असाल तर बरेचं पर्याय उपलब्ध आहेत. पण पोस्ट सेल्स सर्विस च्या नावानी ठणठणाट आहे.

(नोकिआ चा पंखा)

धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे, मिनेश, अलबेला सजन,

आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. बाकी काही जणांना उगाचच मूळ विषयाशी कसलाही संबंध नसलेली प्रतिक्रिया देवून काय मिळते ते त्यांनाच माहित.

हरवलेला's picture

8 Nov 2013 - 4:46 pm | हरवलेला

:)

मी-सौरभ's picture

8 Nov 2013 - 4:57 pm | मी-सौरभ

माझा लुमिया ७१० विकायचाय मला...:)

गवि's picture

8 Nov 2013 - 5:11 pm | गवि

का ?

-(संशयी) गवि.

मी-सौरभ's picture

8 Nov 2013 - 6:02 pm | मी-सौरभ

खालच्या प्रतिसादात मी विकायचं कारण आहे :)

(सपष्ट)सौरभ

ल्युमिनावर मराठी दिसत नाही ना? म्हणजे मिपा वगैरे ब्राउज होईल का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Nov 2013 - 5:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्राऊसर ला अ‍ॅड-ऑन्स इन्स्टॉल करायचे, व्यवस्थित चालतात मराठी साईट्स.
शक्यतो मॉझिला आणि क्रोम ला काहीही त्रास होत नाही.

मी-सौरभ's picture

8 Nov 2013 - 6:03 pm | मी-सौरभ

लुमिया वर करता येतं का?
तुम्ही केलय क??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Nov 2013 - 7:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्याकडे ल्युमिया नाही. मित्राकडे आहे. त्यानी UC Browser इन्स्टॉल केलं आहे आणि त्याच्यावर फायरफॉक्स चे ईंटरचेंगेबल अ‍ॅड-ऑन्स इन्स्टॉल केले आहेत (लँग्वेज आणि फाँट पॅक). मी त्याच्याकडुन नीट माहीती करुन घेऊन उद्या इथे पद्धत पोस्ट करीन.

त्यानी UC Browser इन्स्टॉल केलं आहे आणि त्याच्यावर फायरफॉक्स चे ईंटरचेंगेबल अ‍ॅड-ऑन्स इन्स्टॉल केले आहेत (लँग्वेज आणि फाँट पॅक).

UC Browser वर फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन्स चलतात??
माझ्याकडे पण UC Browser आहे,पण त्यावर फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन्स नाहि इन्स्टॉल होत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Mar 2015 - 5:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

८.१ अपडेटनंतर नाही. आता माझ्या स्वतःकडेच ल्युमिया आहे. माझ्याकडे कुठलीही मराठी साईट चालायला त्रास होतं नाही.

अशोक पतिल's picture

8 Nov 2013 - 7:29 pm | अशोक पतिल

मी सध्या नोकिया लुमिया ५२० विन्डोज ८ हा वापरतोय. खुप छान फोन आहे व त्यावर मराठी दिसते. बहुतेक विन्डोज ७ ( ५१०,६१०,७१० इ )मराठी दिसत नाही.माझ्या फोनवर आता पर्यंत जे पण अप्स लोड केलेत ते व्यवस्थित चालतायत .इन्ट्रनल मेमरी ८ जीबी आहे. त्यामुळे मेमरी कार्ड अजुन टाकलेले नाही. M S office ( word,Exell.PPT)हे ही आहे. महत्वाचे म्हणजे ह्या फोन मध्ये नोकीया मप्स (Maps) आफलाइन मोड मध्ये ही वापरु शकतात वा नेविगेशन पण करु शकतात . दुसरे म्हणजे नोकीय म्युजिक हे फ्रि व लाइफ टाइम आहे. छान फोन आहे हा.
अंवांतर..... Samsung च्या बर्याच फोन मध्ये,खास करुन Android model समोरील पार्टीला इको साउंड एकु येतो असे मा़झा अनुभव आहे.

बोका's picture

8 Nov 2013 - 7:38 pm | बोका

मिसळपाव व्यवस्थित दिसते• हा प्रतिसाद लुमिया ५२० वरुन कुठल्याही अॅड आॅन। न वापरता लिहित आहे•

NiluMP's picture

8 Nov 2013 - 6:30 pm | NiluMP

www.phonecurry.com ला भेट दया.

सोनी xपेरिया एम किंवा xपेरिया एल

जेपी's picture

8 Nov 2013 - 7:42 pm | जेपी

बरच काय बोलायची ईच्छा आहे . पण आमी ज्युनियर सदस्य हाव मनुन गप बसताव

अभ्या..'s picture

8 Nov 2013 - 8:42 pm | अभ्या..

तुमी बोला सोयरं.
हिकडं नेणतेच लै बोलतेत. :)
...............................................................
सगळ्या डुआयडी ह्या आमच्याच शाखा हैत ;)

त्यात तथ्य आहे काय ?

पाषाणभेद's picture

9 Nov 2013 - 3:39 am | पाषाणभेद

पिक्सटेल MD543I हे मॉडेल घेवून टाका.
I हे आपल्यासाठीचे मॉडेल आहे.
किंमत १२७५३/- ऑल ईन्कूसीव्ह

फिचर्सः मोठी स्क्रीन- ७.४३ ईंच
Screen: 7.43" Caoacitive, Capacitive Touch Screen (If you need other type of touch screen you can order that one.)
This is a MultiOS Phone. (If you want, you can install any versions of OS available in the Market like: Java, BADA, Simbian, Android, Windows etc.)

Factory Setting: Android based (Upgradable to future versions also.)
Dolby Sound with BOSE Speakers
Camera: 25Mega Pixel
HD supported
Wireless FM with Recording and Scheduling
Audio Record
Support of all media file type.

Price: Rs. 12753/- (All Inclusive)

ही कंपनी ओईएम आहे. सॅमसंग, नोकीया, अ‍ॅपल, ब्लॅकबेरी यांची. केवळ आपल्याकडे ही कंपनी सप्लाय करते.

:-)
:-)
:-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2013 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाभे, जरा लिंक द्या बरं...

-दिलीप बिरुटे

वेताळ's picture

9 Nov 2013 - 6:01 pm | वेताळ

लिंक पाठवा. शोधुन जाम बोअर झालो.

भाते's picture

13 Nov 2013 - 8:57 pm | भाते

पाभेंच्याच शब्दात या मोबाईलची माहिती
http://www.misalpav.com/node/25374

वेल्लाभट's picture

9 Nov 2013 - 9:23 am | वेल्लाभट

अँड्रॉईड चा सद्ध्या अतिरेक होत चाललाय. विंडोज हटके आहे. विंडोज अँड्रॉईड पेक्षा फास्ट आहे, लाइट आहे, आणि वापरायला छान वाटतं. सोशल साइटस चं सिंक्रोनायजेशन यात मस्त आहे. ही काही प्रमुख वैशिष्ट्ये विंडोज ची. मला तरी आवडतो लुमिया. बाकी अँड्रॉईड ची ही आपली वैशिष्ट्ये आहेतच.

पेस्तन काका's picture

28 Nov 2013 - 11:45 am | पेस्तन काका

+१

उद्दाम's picture

9 Nov 2013 - 9:45 am | उद्दाम

मलाही हाच प्रश्न पडला आहे .कोणता मोबाईल घेऊ ?त्यामुळे मी फोन परीक्षण करणाऱ्या या वेबसाईट नेहमी वाचतो .(१)http://gadgets.ndtv.com/reviews (2)http://www.gogi.in/ (3)http://techradar.com/

मराठी कथालेखक's picture

13 Nov 2013 - 6:06 pm | मराठी कथालेखक

Micromax Canvas Music A88 चांगला आहे. आणि स्वस्त पण. Micromax चे नवीन अधिक महागडे मोडेल्स पण पाहू शकता. पण नोकियाइतका चांगला कॅमेरा त्यात नाही (5 mp आणि flash असूनही). Camera चांगला हवा असेल तर Nokia with Carl Zeiss lens is best.
पण Windows पेक्षा Android चांगले असे मला वाटते. Android मध्ये सर्वात चांगला कॅमेरा कुणाचा ते नाही सांगता येणार.

विंडोज तेव्हाच वापरणं इष्ट जेव्हा कस्टमाईझेशन करण्यात फार रस नाही. (पन्नाशी उलटलेल्यांना उत्तम). अन्यथा अ‍ॅन्ड्रॉईडला पर्याय नाही. त्यांच्याइतका अ‍ॅप सपोर्ट, स्क्रीन आणि ओएस कस्टमाईझेशन दुसरी कोणतीही ओएस देऊ शकत नाही.
१५-१७ मध्ये एक से एक अ‍ॅन्ड्रॉईड सध्या बाजारात आहेत. सोनी एक्पेरिया एल, झोलो चे बरेच फोन्स आहेत. सॅमसंग शक्यतो टाळाच. जाम च बंडल फोन्स राव. (मी स्वतः सॅमसंग वापरत असल्यामुळे स्वानुभव)
एक्स्पेरिया एल बघा, भन्नाट फोन आहे. तगडी स्क्रीन क्वालिटी, उत्तम आवाज, कॅमेरा, बॅटरी, सगळंच भारी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2013 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या मित्राकडे नोकिया लुमिया ६२० आहे. मराठी लेखन उमटत नाही. चौकोनी बॉक्स दिसतात. काही उपाय आहे का ?

-दिलीप बिरुटे

नानबा's picture

15 Nov 2013 - 10:32 am | नानबा

भारताबाहेरून आणला असावा. भारतात मिळणार्‍या लुमिया ६२० मध्ये व्यवस्थित मराठी दिसतं. आणि देवनागरी कीबोर्डसुद्धा आहे त्यात

नानबा's picture

15 Nov 2013 - 11:55 am | नानबा

हे स्क्रीनशॉट्स पहा. मित्राच्या लुमिया ६२० वर घेतले आहेत.

अगदी व्यवस्थित मराठी दिसतंय.
sdf

आणि हा देवनागरी कीबोर्ड..
dh

इन्टॉल केलेल्या कीबोर्डमधली मराठी अक्षरं दिसणं वेगळं.. ते लक्षात आलं.

पण ब्राउजरमधे मिसळपाव वगैरे उघडल्यावर त्यात:
१.मराठी लेखांच्या जागी चौकटी दिसणं.
२. मराठी अक्षरं लेखात दिसतात पण लॉगिन करण्याच्या अथवा कॉमेंटच्या बॉक्समधे टाईप करु गेल्यास इंग्रजीच उमटते.

किंवा कसे याविषयी स्क्रीनशॉट्स किंवा कन्फर्मेशन देता येईल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2013 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्याच्या मोबाईल मधे दिसत नाही. सेटींग वगैरे मधे काही फेरफार करावे लागतात काय ?
परदेशातून वगैरे काही त्याने आणला नसावा....

-दिलीप बिरुटे

वेल्लाभट's picture

19 Nov 2013 - 8:20 pm | वेल्लाभट

आहे तो अ‍ॅप स्टोअर मधे

सार्थबोध's picture

15 Nov 2013 - 11:05 am | सार्थबोध

मला माइक्रोमेक्सचा पोस्ट सेल्स सर्व्हिस अतिशय चांगला अनुभव आहे, नवीन अनड्रोइड फोन घेऊन २ दिवस झाले होते आणि टच पॅडला काही प्रोब्लेम आला होता, तक्रार नोंदवली त्याच्या दुसऱ्या दिवशी रिप्लेसमेंट ओर्डर मिळाली. पुण्यात फक्त बिबवेवाडीला सर्व्हिस सेंटर आहे खास अनड्रोइडचे.

कपिलमुनी's picture

19 Nov 2013 - 8:04 pm | कपिलमुनी

सात जन्माचा पुण्य असाव तुमच्या पाठीशी ..

तुषार काळभोर's picture

20 Nov 2013 - 4:58 pm | तुषार काळभोर

सारसबागेजवळ पाटील प्लाजा मध्ये सर्विस सेंटर आहे, तेथे गेलो होतो, तर नंबर येईपर्यंत १तासापेक्षा जास्त थांबवे लागले. कारण (सर्विससेंटरमधील काम करणार्‍या मुलांच्या म्हणण्याप्रमाणे) पुण्यात माय्क्रोमॅक्सचे स्मार्टफोनसाठीचे एकमेव सर्विससेंटर तेच आहे.
तासाभरात एकहि अशी केस दिसली नाही, की जेथे २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी कमिट केला असेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 7:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे जावा रन टाइम अपडेट नसेल तर होउ शकते का? पीसीवर मराठी साइट वाचताना हा प्रॉब्लेम येतो कधी कधी

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2013 - 7:47 pm | टवाळ कार्टा

Karbonn A 12+ आणि xolo q1000 कसे आहेत???
मी Karbonn A 12+ घ्यायच्या विचारात आहे

पैसा's picture

20 Nov 2013 - 8:47 am | पैसा

Karbonn A 12+ माझ्या मुलासाठी घेतला. त्या किंमतीत ड्युअल कोअर फोन म्हणजे लूट आहे. खूप मस्त, फास्ट आणि स्मूथ आहे.

नानबा's picture

20 Nov 2013 - 10:14 am | नानबा

Karbonn A 12+ आणि xolo q1000 कसे आहेत???

xolo q1000 घ्या.

GENERAL 2G Network GSM 900 / 1800 - SIM 1 & SIM 2
3G Network HSDPA 900 / 2100
SIM Dual SIM (Mini-SIM)
Announced 2013, May
Status Available. Released 2013, May
BODY Dimensions 143.5 x 70.8 x 8.8 mm (5.65 x 2.79 x 0.35 in)
Weight 171.1 g (6.03 oz)
DISPLAY Type IPS LCD capacitive touchscreen, 16M colors
Size 720 x 1280 pixels, 5.0 inches (~294 ppi pixel density)
Multitouch Yes
SOUND Alert types Vibration, MP3, WAV ringtones
Loudspeaker Yes
3.5mm jack Yes
MEMORY Card slot microSD, up to 32 GB
Internal 4 GB, 1 GB RAM
DATA GPRS Yes
EDGE Yes
Speed HSDPA, 42.2 Mbps, HSUPA, 11.5 Mbps
WLAN Wi-Fi 802.11 b/g/n, Wi-Fi hotspot
Bluetooth Yes, v4.0
USB Yes, v2.0
CAMERA Primary 8 MP, 3264 x 2448 pixels, autofocus, LED flash
Features Geo-tagging
Video Yes, 1080p@30fps
Secondary Yes, 1.2 MP
FEATURES OS Android OS, v4.2 (Jelly Bean)
Chipset MTK 6589
CPU Quad-core 1.2 GHz Cortex-A7
GPU PowerVR SGX544
Sensors Accelerometer, proximity
Messaging SMS(threaded view), MMS, Email, Push Email, IM
Browser HTML5
Radio FM radio
GPS Yes, with A-GPS support
Java Yes, via Java MIDP emulator
Colors Black, White
- SNS integration
- MP4/WMV/H.264/H.263 player
- MP3/WAV/WMA/AAC player
- Organizer
- Document viewer
- Image/video editor
- Google Search, Maps, Gmail,
YouTube, Calendar, Google Talk
- Voice memo
- Predictive text input
BATTERY Li-Ion 2100 mAh battery
Stand-by Up to 350 h (2G) / Up to 346 h (3G)
Talk time Up to 14 h (2G) / Up to 10 h 30 min (3G)
MISC SAR EU 0.80 W/kg (head) 0.67 W/kg (body)

बोल्डमधली फिचर्स कार्बन देत नाही. फक्त किंमतीत बराच फरक आहे. (कार्बन ७००० च्या आसपास तर झोलो १२०००). पण झोलो पैसा वसूल फोन्स आहेत.

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2013 - 1:08 pm | टवाळ कार्टा

Flipcart वर Karbonn A12+ फक्त ५००० ला आहे...तोच घेतोय सध्ध्या

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 7:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक स्वानुभव सांगतो
माझ्यामते मोबाइल स्क्रीन ५ इंच,टॅब्लेट १० इंच आणि लॅपटॉप १५ इंच हे गणित बरोबर बसते.
उगाच स्वस्त मिळाला म्हणुन मोठा घ्यायला जाउ नये (तिन्हीला लागू)

साहना's picture

20 Nov 2013 - 1:17 pm | साहना

गुगल नेक्सस ह तुमच्या बजेटमध्ये आहे

Madhavi_Bhave's picture

20 Nov 2013 - 1:41 pm | Madhavi_Bhave

आपण सर्वांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार. आता mobile घेणे खूप सोपे झाले आहे.

वेताळ's picture

20 Nov 2013 - 5:03 pm | वेताळ

ते आवर्जुन लिहा. म्हणजे इथला तुम्हाला मोबाईल घेताना किती फायदा झाला ते कळेल.

तो कॉलेजमध्ये जातो आणि सध्याच्या फोनवर कानात गुंड्या घालून गाणी ऐकतो. वेळ तर वाया जातोच पण ते धोकादायक ही आहे.फोन काढून घेतला तर ठाव-ठिकाणा कळत नाही. पोलिसिंग म्हनून नव्हे पण संपर्क तर करावाच लागतो ना.
असा साधा फोन मिळेल का की ज्यामध्ये फक्त बोलणे आणि समस असेल ? रेडिओ , कॅमेरा, मेमरी कार्ड, गाणी काही नको. बेसिक मॉडेल्मध्ये सुद्धा रेडिओ आहे!

प्यारे१'s picture

20 Nov 2013 - 6:04 pm | प्यारे१

>>>फोन काढून घेतला तर ठाव-ठिकाणा कळत नाही. पोलिसिंग म्हनून नव्हे पण संपर्क तर करावाच लागतो ना.

मला माझे कॉलेजचे दिवस आठवले.
फर्स्ट इयर, वालचंद सांगली १९९८.
हॉस्टेलला होतो.
घर पांचगणीला. फोन नव्हता घरी. शेजारचे नाटकं करत होते म्हणून तिथे फोन नाही केला.
आळस नि कचकच झालेली काही त्यामुळे पत्र नाही लिहीलं.
जवळपास महिनाभर संपर्क नाही. हो, महिनाभर.
बाबा नोकरीमुळं रसायनी भागात होते. घरी आईच.
आई डायरेक्ट कॉलेजवर आली.
आमचं काही प्रॅक्टीकल सुरु होतं.
नंतर तासभर कानात शब्दच. नंतर रडारडी.

हल्ली जीव जरा जास्त लवकर हळवा व्हायला लागलाय सगळ्यांचा.
आमच्या मागच्या पिढीनं काय केलं कुणास ठाऊक.

विटेकर's picture

28 Nov 2013 - 11:52 am | विटेकर

हल्ली जीव जरा जास्त लवकर हळवा व्हायला लागलाय सगळ्यांचा.
आमच्या मागच्या पिढीनं काय केलं कुणास ठाऊक.

खर आहे तुमच म्हण्ण ! तेव्हा पत्रे हाच एकमेव अधार होता. होस्तॅलवरच्या माम्याला फार भाव होता.. सारी पत्रे त्याच्याकडे असायची.
मी त्यावेळची काही पत्रे अजून जपून ठेवली आहेत. तेव्हा आई - बाबांनी जीवावर धोंडा ठेऊन शिकायला बाहेर ठेवले होते..

मिनेश's picture

20 Nov 2013 - 6:59 pm | मिनेश

.

पण आता मिळतो का पहा.

विटेकर's picture

28 Nov 2013 - 11:53 am | विटेकर

आता मिळत नाही !

एम.जी.'s picture

20 Nov 2013 - 7:51 pm | एम.जी.

नोकिया लुमिया ...
उत्तम आहे.
देवनागरीचा काहीही प्रोब्लेम नाही [ मी कतारमधे आहे आणि कतारमधेच फोन विकत घेतलाय ]
फॉन्टसाईझ मोठा आहे..

अग्निकोल्हा's picture

27 Nov 2013 - 8:03 pm | अग्निकोल्हा

.

उपास's picture

27 Nov 2013 - 8:18 pm | उपास

पंधरा हजाराच्या बजेट साठि आवडलाच, अ‍ॅन्ड्रॉईड बेस्ड आहे.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2015 - 12:59 pm | पिलीयन रायडर

मला एक मोबाईल घ्यायचा आहे.
- १०- १५ हजार बजेट
- अ‍ॅण्ड्रॉईड हवा. विंडोज आवडत नाही.. जमत नाही.. काही म्हणा..
- डिस्प्ले मोठा आवडतो, पण आग्रह नाही.
- मेमरी भरपुर हवी. गेम वगैरे खेळत नाही त्यामुळे बाकी सगळं ठीक ठाक चालेल.
- कॅमेरा शक्य तितका चांगला हवा. (फ्रंट कॅमेराही चांगला हवाय..)
- बॅटरी किमान दिवसभर तरी जावी.
- ड्युअल सिम हवा.

तर कोणता मोबाईल घ्यावा?

माझ्यामते मोटोरोला जी २ घ्या. फ्लिपकार्टवर किंमत : १२९९९/-

Samsung बद्दल मला चांगला अनुभव आला नाही. मी Grand DUOS हा फोन साधारण वर्षभर वापरला, फोन नेहमी hang व्हायचा, फोन रिसीव्ह करता यायचा नाही, रिस्पोन्स टाईम खूप जादा. शेवटी कंटाळुन moto X घेतला, सुपर्ब फोन आहे . अजून कोणताही इश्यु आला नाही.

माझ्या मित्रांनी मागील महिन्यात moto X-Gen 2 आणि moto G- Gen 2 हे फोन घेतले. त्यांचा Review देखील चांगला आहे.

Review
Model Name Moto G (2nd Gen)
Model ID XT1068
SIM Size Micro SIM
SIM Type Dual Sim, GSM + GSM
OS Android v5.0 (Lollipop)
Processor 1.2 GHz + Qualcomm Snapdragon 400, Quad Core
Display Size 5 Inches
Resolution HD, 720 x 1280 Pixels
Display Features Corning Gorilla Glass 3
Primary Camera 8 Megapixel
Secondary Camera 2 Megapixel
Size 70.7x141.5x10.99 mm
Weight 149 g

~आसिफ.

मायक्रोमैक्स युरेका घ्या. अमेझोन.कोम वर फक्त मिळ्तो. रु. ८९९९/-

कपिलमुनी's picture

19 Mar 2015 - 1:49 pm | कपिलमुनी

कॅमेरा क्वालिईटी भिक्कार आहे याची !
कॅमेरा चांगला ह्वा असेल तर सोनी किंवा सॅमसंग शिवाय पर्याय नाही

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2015 - 1:57 pm | पिलीयन रायडर

सॅमसंग मी गेले ४ वर्ष वापरतेय. माझा अनुभव चांगला आहे.
ग्रॅण्ड, प्राईम, निओ असे अनेक फोन दिसत आहेत.
कुणी अनुभव सांगु शकेल का?

मी स्वतः वापरतोय, ऐवढा काय भिकार नाही वाटला आणि ८९९९/- मध्ये किती अपेक्षा ठेवावी ?

कपिलमुनी's picture

19 Mar 2015 - 2:04 pm | कपिलमुनी

१३ मेगापिक्सेल कडून जेवढ्या अपेक्षा असतात तेव्ढ्या ठेवणार

पंतश्री's picture

19 Mar 2015 - 3:24 pm | पंतश्री

हा हि तसा भारी आहे.
Micromax's Yu Yureka

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 4:11 pm | धर्मराजमुटके

नोकीया ६ येतोय १४ जुलै ला.