टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
यशवंत
" साहब आपके वो दोस्त बहुत दिनों से दिखाइ नहि दिये ? "
"कौन ? "
"वो जो चाय और पकोडे मंगाया करते थे ?"
" ओ... वो... वो इंडिया चले गये .."
"क्यूँ ... रीसेशन के कारण ? ले ऑफ ? "
"नहि नहि... अपनी मर्जी से गये हैं ... उनका मन नहि लगा यहाँ "
"अच्छि बात है.. बडा जिन्दा दिल आदमी था.... उनके जैसा दुसरा आदमी जिन्दगी में नहि देखा हमने.. एक दिन इंडिया का नाम जरुर ऊंचा करेंगे.. "
"सहि बात कि आपने बलबीर जी "
भारतीय रेस्टॉरन्ट मधील वेटर बरोबर चा संवाद तिथेच संपला पण मनात विचारांचे एक चक्र सुरु झालं. तसा मी यशा ला विसरलो नव्हतो पण त्याच्याशी बरेच दिवसात फोन, पत्र, एमेल... काहि काहि नाहि ह्या जाणिवेने मन व्याकुळ झालं...
अमेरीकेतल्या वास्तव्यात भारतीय (इंडियन) रेस्टॉरन्ट हे भारतीय जेवण आवडणारया लोकांचे एक प्रकारचे घरच असते.. समविचारी लोकं अशा ठिकाणी आठवडा-दोन आठवड्यात भेट होत असे.. असाच आमचा कट्टा भरायचा.... अगदी मुंबईत शिवाजी पार्क वर किंवा पुण्यात "वैशाली" वर भरतो तसा... सर्व मित्र मंडळींना एकत्र जोडणारी कडि म्हणजे... यशा.. यशवंत.
ह्याने येथिल इंडियन रेस्टॉरन्ट च्या पंजाबी माणसाला सुध्दा कांदा भजी, बटाटे वडे, मिसळ ची तर्री, मिसळ, थालिपीठ असले पदार्थ शिकवले होते... कांदा तर हा इसम इतका सुंदर, समान आणि बारीक कापायचा कि एखाद्या फाईव स्टार च्या शेफ ला सुध्दा लाजवेल....
ह्या माणसाला काय म्हणुन येत नाहि असे नाहि... मराठि, इन्ग्रजी, साहित्य, संगित, फिलॉसॉफि, सायन्सेस.. सर्व विषयांचा भरपुर अभ्यास आणि जोडिला आधुनिक कॉम्पुटर विषयात पदवी...त्यामुळे कुठल्या हि विषया वर बोलताना एक प्रकार च वजन जाणवायचं .. ह्या माणसाने मला अगदी पहिल्या भेटित खिशात टाकलं होतं ..
चार पाच वर्षा पुर्वी ची त्याची पहिली भेट आठवली... विमान तळावर त्याला उतरवायला म्हणुन मी गेलो होतो.. आधि आम्हि कधिहि एका-मेकां ना पाहिले-ऐकले नव्हते..माझ्या मावस भावाचा यशवंत चुलत मित्र !! मी अमेरीकेत ज्या शहरात रहात होतो तेथिल विद्दापीठात यशा उच्च शिक्षण घेण्या साठि आला आणि आमच्या तारा जुळल्या ..भेटी होत राहिल्या.. अगदी गट्टी जमली... विकएन्ड ला त्याची भेट झाली नाहि कि चुकल्या-चुकल्या सारख वाटत रहायचं.
अमेरीकेत "भारतीय" म्हणुन बरीच लोकं एकत्र येतात .. भेटतात.. नंतर विसरतात हि पटकन.. पण यशवंत त्यामधील नव्हता. आमची "वेवलेंक्न्थ" चांगलिच जुळली होती.. वैचारीक संस्कृती, शाकाहारी खाद्द संस्कृती , संगित आणि स्पोर्ट्स हे आमचे समान धर्म ... यशा तसा माझ्याहुन वयाने लहान .. माज्या मावस भावाच्या वयाचा.. वर्गात सर्वात हुशार आणि कॉलेज मधे सर्वांचा आवडता.. माझ्या मावस भावा कडुन मी हा त्याचा मित्र "हायजाक" केला असं त्याच नेहमी म्हणणं असायचं !
भारतातुन अमेरीकेत येणारया लोकांन मधे तसे दोन प्रमुख वर्ग असतात... काहि विद्दार्थी म्हणुन येतात तर काहि नोकरी च निमित्त करुन ... तसे दोन्हिहि वर्गाचे व्यवहार "बजेट" वर चालतात पण विद्दार्थि वर्गा चे "बजेट" कडक असल्याने ते अपार्टमेन्ट वैगरे सहसा "शेयर" करुन काटकसरीने राहतात. यशा अमेरीकेला आला तो विद्दार्थि म्हणुन पण तो स्वतंत्र एका छानशा "एफिशन्सी" अपार्टमेंट मधे एकटा रहायचा. अर्थात त्याला पुर्ण स्कॉलरशिप होती हे जरी खरं असलं तरी तो खर्च करताना हात आवरता घेत नव्हता हे जाणवलं ..
यशवंत होताच तसा वेगळा... बाकिच्या विद्दार्थि वर्गा पेक्षा हा फारच शांत संयमी , विचारवंत, आणि ज्याला इंग्रजी मधे "हंबल" म्हणतात असा..इतका तडफदार, प्रसन्न आणि बहुश्रुत दुसरा माणुस माझ्या पहाण्यात नाहि. त्यांचं बोलणं ऐकत राहावसं वाटायचं. अशा लोकांना भेटलं कि मला नेहमी आपण खुप लहान आहोत ह्याची जाणिव होते.. हवी हवी शी सुखद जाणिव.. त्याचं बोलणं आणि सहवास अगदी हवाहवासा वाटायचा..आमचं सूत चांगल जमलं .. शनिवार रविवार एका मेकां च्या भेटी शिवाय जाणं अशक्य होतं !
वयाने लहान असली तरी अशी गुणवान माणसं लगेच आसपास च्या सगळ्या लोकांचा आदर प्राप्त करुन घेतात.. आणि तसंच झालं. मास्टर डिग्री दिड-दोन वर्षात मिळवुन कॉम्पुटर सायन्स मधील आपले प्रभुत्व सिध्द करताच एका मोठ्या कॉम्पुटर कम्पनी ने यशा ला चांगली नोकरी बहाल केली... त्या नंतर आमच्या भेटि गाठि बरयाच कमी झाल्या... यशवंत "सिएटल" ला गेल्यावर तर कधी महिन्यात एखादा फोन किंवा ईमेल वरच "कॉन्टॅक्ट" राहिला !
सहा महिन्या पुर्वी अचानक यशा चा फोन आला होता.. " मी भारतात चाललो आहे .. माझं अमेरीकेतलं काम संपल आहे"
मी म्हणालो.. संपलं आहे ?? काय झालं एकदम ?
" अरे तसं काहि नाहि... मला कोणी हाकलत वैगरे नाहिये... तुला आठवतं का मी तुला सांगितलं होतं ? "
काय ?
" मला आयुष्यात फक्त दोन लोकांना भेटायचं आहे..."
हो.. हो ..आठवत ना .. बिल गेटस आणि झानेश्वर !!!
" हो बरोबर .... बिल गेटस बरोबर वैयक्तिक रित्या एका प्रोजेक्ट वर काम केलं मी.. धन्य झालो.. आता परत जातो "
मी अवाक झालो... काय म्हणणार ?
स्वत: ला सावरत म्हणालो.. "यशा टेक केयर ऍन्ड गुड लक... बट डु किप इन टच.."
" शुअर... योग आला तर नक्कि भेटु... भारतात गेल्यावर टाकिन तुला फोन "
बाकि काहिच बोलता आलं नाहि.
देवावरचा विश्वास उडालेल्या काळात.. यशा नी मला सावरलं होतं.. धीर दिला होता.. मी त्याला काय उपदेश देणार?
ज्ञानेश्वरी, दासबोध, तुका, चोखामेळा सगळे अगदी ओठावर खेळवणारा यशवंता.. त्याच्या कडुन "पसायदान" , "अवचिता परीमळु", "अरे अरे ज्ञाना झालासी आणि " पांडुरंग कांती" ह्यावरचं निरुपण ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आहे... त्या दिवशी.. रात्री त्याने "विश्वाचे आर्त" खरंच माझ्या मनी प्रकाशले असं मला वाटलं !!
मी त्याला एकदा "ज्युनियर राम शेवाळकर" म्हणल्यावर तो जो लाजला होता तो चेहरा मला अजुन आठवतो. यशवंता मधे एक "स्पार्क" होता.
कुठे असेल आत्ता यशा ? मला काहि सुचेना.. थोडाफार स्वतःवरच राग आला.. मी तरी असा कसा ? इतके दिवसात मी का नाहि केला त्याला फोन... ? पण माझ्या कडे त्याचा फोन नंबर तरी कुठे आहे ? हो खरच... इमेल पाठवला होता मी त्याला वाढदिवसाला.. पण काहिच उत्तर नाहि.. थँक्यु सुध्दा नाहि ! बहुतेक पर्सनल ईमेल बघायला वेळ झाला नसेल त्याला..
तडक मावस भावाला फोन लावला.. त्याला रात्री झोपेतुन उठवलं .. आणि विचारलं
तो म्हणाला " कोण यशा ? " .. भारतात ... अरे माझा तर त्याच्याशी जवळ जवळ वर्षभरात कॉन्टॅक्ट नाहिये...
"असं कसं म्हणतोस? तो तर सहा महिन्यापुर्वीच भारतात गेला की... बघ जरा चौकशी करुन... "
दुसरयाच दिवशी मावस भावाचा फोन... अरे यशा बद्दल माहिती समजली....
" तो सहा महिन्या पुर्वी भारतात आला ते त्याच्या आइ च्या आजारपणा मुळे.. कॅन्सर.. महिनाभर त्याने आईची सुश्रुषा केली... एकुल ता एक मुलगा.. लहान पणीच वडिल गेल्या मुळे आइनेच सर्व केले होते त्याचे... "
" काहि महिन्या पुर्वी आई गेली.. अगदि सुखात... मुलाच्या मांडिवर डोकं ठेवुन प्राण सोडले "
"यशवंता नी सर्व घर, दार, शेती विकुन टाकली आणि सन्यास घेतला आहे.. त्याचा कोणाला हि पत्ता माहित नाहि"
फोन च्या दुसरया बाजुला मी अवाक होउन ऐकत होतो.. ... फोनवरच अशा गोष्टि ऐकणं सोपं असतं.. म्हणजे फोन म्युट करुन ढसा-ढसा रडणं कोणाला ऐकु येत नाहि ..
देव देव म्हणतात ते तरी नक्कि काय हो ? असाच यशवंता सारखा कोणी आपल्या आयुष्यात यावा... भाजुन जर-जर झालेल्या अंगावर चंदनाचा लेप लावुन.. नव चैतन्य आल्यावर .. एक लहानसा चटका लावुन ..पत्ता न सांगता परत निघुन जावा...तो असल्याची जाणिव करुन देत !!!
आषाढी एकादशी च्या दिवशी मला यशवंताची आठवण यावी ह्यात काहि नवल नाहि!
भारतातील प्रत्येक तिर्थक्षेत्राच्या दर्शनाच्या वेळी माझी नजर यशवंता ला शोधत होती..कोणाला यशवंत भेटला तर नक्की कळवा... तसा तो चार चौघात ओळखायला अवघड नाहि... त्याला म्हणावं पत्ता कळव.. मी त्याची वाट पहातो आहे.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


जबरदस्त..
जबरदस्त !!!!!
मदनबाण.....
अगदि मन
अगदि मन हेलावुन गेल वाचुन
अतिशय
अतिशय सुंदर वर्णन
मला नेहमी प्रश्न पड्तो हुशार लोक संन्यासच का घेतात? माझ्या माहितीतही दोघे जण असेच .... फार हुशार....पण अचानक संन्यास घेवुन गेले (डोक्यावर कर्ज पण नाही की ते कारण असावे म्हणायला)....
नाना
सुरेख.....
यशवंताचे व्यक्तीचित्रण अतिशय उत्तम शब्दबद्ध केले आहे.
मनाला भिडणारे लेखन.
देव देव म्हणतात ते तरी नक्कि काय हो ? असाच यशवंता सारखा कोणी आपल्या आयुष्यात यावा... भाजुन जर-जर झालेल्या अंगावर चंदनाचा लेप लावुन.. नव चैतन्य आल्यावर .. एक लहानसा चटका लावुन ..पत्ता न सांगता परत निघुन जावा...तो असल्याची जाणिव करुन देत !!!
हे बाकि खासच.
अभिज्ञ.
डिस्क्लेमर (नाना चेंगट यांस)
हे व्यक्तिचित्र कुठल्या हि व्यक्तिच नाहि. ( नाना चेंगट यांस)
मला भेटलेल्या हजारो लोंकान मधुन हे व्यक्तिचित्र तयार झालं. जर कोणि ह्या लेखाच श्रेय पु. लं ना दिल तर वावग होणार नाहि ! त्यांच्या लेखनाचा प्रभाव माझ्या आयुष्यावर आहे !
लिहिताना मला सारख सारख वाटत होतं कि जर ह्यातील कुठल्या आयडियाज कुणि लेखकाने आधिच प्रकाशित केल्या असतिल तर लोकं मला शिव्या घालतिल.
मी हे व्यक्ति चित्र एका सिटिंग मधेच पुर्ण करु शकलो ! प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद.
सुरेख..
भारतातील प्रत्येक तिर्थक्षेत्राच्या दर्शनाच्या वेळी माझी नजर यशवंता ला शोधत होती..कोणाला यशवंत भेटला तर नक्की कळवा... तसा तो चार चौघात ओळखायला अवघड नाहि... त्याला म्हणावं पत्ता कळव.. मी त्याची वाट पहातो आहे.
वा! सुरेख लिहिलं आहे...!
आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
थोडा
थोडासा रंग अजून भरायला हवा होता.
तरी पण आहे तसे वाचल्यानंतर कल्पनेला पण वाव मिळाला हे खरं.
छान झालयं
छान झालयं व्यक्तिचित्रण.
>>असाच यशवंता सारखा कोणी आपल्या आयुष्यात यावा... भाजुन जर-जर झालेल्या अंगावर चंदनाचा लेप लावुन.. नव चैतन्य आल्यावर .. एक लहानसा चटका लावुन ..पत्ता न सांगता परत निघुन जावा...तो असल्याची जाणिव करुन देत !!!
हे फारच छान लिहीलंत.
ईश्वरी