कैरी केशर सरबत

मोदक's picture
मोदक in पाककृती
23 May 2013 - 9:38 pm

कैरी केशर सरबत

.

साहित्यः

.

कच्च्या (व शक्यतो आंबट) कैर्‍या - चार ते पाच
साखर - अर्धा किलो (साखरेचे नक्की प्रमाण पाककृती करताना स्पष्ट होईलच)
वेलदोडा पावडर - १ चमचा
प्रिझर्वेटीव्ह - आवश्यकतेनुसार
केशर - चवीप्रमाणे

पाककृती:

१) सर्वप्रथम कैर्‍या स्वच्छ धुवून व स्किन करून घ्याव्यात.

.

२) स्किन केलेल्या कैर्‍या खिसून घ्याव्यात. कैर्‍या खिसताना कोयीचा / बाठीचा कोणताही भाग खिसला जाणार नाही याची काळजी घ्यावी. कोय खिसली जावून कैरीच्या गरामध्ये मिसळली गेल्यास चवीत फरक पडतो.

.

३) कैरीचा खिसलेला गर हाताने घट्ट पिळून त्याचा रस काढावा व तो रस गाळण्याने गाळून घ्यावा.

.

४) एक वाटी रसाला दोन वाट्या साखर या प्रमाणामध्ये साखरेचा पक्का पाक तयार करावा.

.

५) साखरेचा पाक गरम असतानाच त्यामध्ये केशर व वेलदोडा पूड मिसळावी व लगेचच एकत्र करावे.

.

६) वरील मिश्रण संपूर्णपणे थंड झाले की त्यामध्ये कैरीचा रस मिसळावा व पुन्हा एकत्र करावा.

.

७) सरबत तयार आहे. चवीप्रमाणे थंड पाण्यात मिसळून आस्वाद घ्यावा!

.

******** अधिक माहिती ********

१) कैर्‍या शक्यतो आंबट असाव्यात.
२) सरबतामध्ये आवश्यक असल्यास सर्वात शेवटी प्रिझर्वेटीव्ह मिसळावे.
३) आमच्याकडे हे सरबत "वार्षिक व टिकाऊ खाद्यपदार्थांच्या गटात" येत असल्याने एप्रिल / मे महिन्यात एकदम तयार केले जाते. तसेच मागच्या वर्षी केलेले सरबत या वर्षी वापरात आणले जाते. वर्षभरात केशर आणि वेलदोडा मुरल्यामुळे अफलातून रंग व चव येते.

***********************डिस्क्लेमर***********************

सदर पाककृतीचे संपूर्ण श्रेय मातोश्रींना. मी फक्त क्लिकक्लिकाट करून येथे अपलोडवले. ;-)

****************************************************

प्रतिक्रिया

होतकरु उमेदवाराची छान पाककृती. :)
आवडली. सरबत देण्याघेण्याचा मौसम सुरु झाला तर. ;)

सस्नेह's picture

23 May 2013 - 9:48 pm | सस्नेह

सरबत. मस्त कलर आलाय.
आईने केले की ताईने ? अ

डिस्क्लेमर वाचून प्रश्न मागे घेण्यात आला आहे.

लाल टोपी's picture

23 May 2013 - 10:52 pm | लाल टोपी

हेच म्हणतो

लॉरी टांगटूंगकर's picture

24 May 2013 - 9:33 am | लॉरी टांगटूंगकर

अग्दी हेच म्हणतो

लग्नाळू झाल्याची झायरात आवडली कार्यक्रम ठरलेले दिसतायत. ;) सरबताचा रंग झकास आलाय. चव घेण्यास नंतर येऊ.पहिला फोटू मस्त. डिस्क्लेमर टाकला नसता तरी चालले असते, आम्ही समजून घेतो.

श्रीरंग_जोशी's picture

23 May 2013 - 10:48 pm | श्रीरंग_जोशी

अरे वा केसर अन कैरी, रोचक पाकृचे उत्तम सादरीकरण.
केशर Trader Joe's असल्याने अमेरिकेतून आयात केल्याचे दिसत आहे. देवा काय दिवस आले रे.... ;-).

पैसा's picture

23 May 2013 - 11:15 pm | पैसा

काहीतरी खवचट बोलणार होते, पण आईने दिलेली पाकृ आहे म्हटल्यावर काही शंका नाहीत! प्यायला कधी येऊ? कांदेपोहे करायला शिकलास का?

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

मराठी संस्थळावर प्रस्थापितांकडून नवलेखकांवर होणारा अन्याय पाहून भरून आले. :'(

कोण म्हणे नवलेखक? तू? हॅ हॅ हॅ.

पैसा's picture

24 May 2013 - 8:07 am | पैसा

कांदेपोहे करायला शिकलास का, या मुदलाच्या प्रश्नाला सोयिस्कर बगल देण्यात आलेली आहे. :[

५० फक्त's picture

25 May 2013 - 12:16 am | ५० फक्त

होय होय, हल्ली ब-याच मुद्द्याच्या प्रश्नांना बगल कशी द्यायची याचं ट्रेनिंग चालु आहे,लग्नाच्या बाजारात उभं राहुन सुखी नवरा होण्यासाठी लागणारा हा एक महत्वाचा गुण आहे,

रामदास's picture

26 May 2013 - 6:00 pm | रामदास

कांदेपोहे खाके बोका चला ....असे म्हणायचे का ?

पैसा's picture

26 May 2013 - 7:29 pm | पैसा

पण मग त्याची यात्रा मांडवात संपेल!

प्रभाकर पेठकर's picture

24 May 2013 - 3:32 am | प्रभाकर पेठकर

ह्यालाच कैरीच्या कोळाचे, साखर + केशर घातलेले, पन्हे असेही म्हणतात.

रंग भन्नाट आहेच, चव सुद्धा अप्रतिम असणार ह्यात शंका नाही.

इनिगोय's picture

24 May 2013 - 12:37 pm | इनिगोय

पन्ह्यात कैरीचा गर शिजवून घेतात ना? कैरीचा नुसता रस वापरल्याने हे चवीला पन्ह्यापेक्षा वेगळं लागेल.

पैसा's picture

24 May 2013 - 1:40 pm | पैसा

आणि मला आठवतंय, माझी आई असं टिकाऊ पन्हं करायची ते कैर्‍या शिजवूनच करायची. त्यात इतर कसलं प्रिझर्व्हेटिव्ह घालत नव्हती ती.

पन्हे वेगळे.. सरबत वेगळे. ;-)

या सरबतामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह घालायचे कारण ते पुढे वर्षभर टिकवायचे असते. अगदी महिन्याभरात सरबत संपणार असेल तर प्रिझर्व्हेटिव्ह ची गरज नाही!

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2013 - 2:05 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या मते हे दोन्ही पन्ह्याचेच प्रकार आहेत.

कैर्‍या उकडून त्यांच्या गरात गुळ आणि वेलची घालून करतात ते पन्हे जास्त प्रसिद्ध आणि महाराष्ट्रात केले जाते.
उत्तरेकडे हेच पन्हे कैर्‍या किसून त्यात साखर आणि केशर घालून करतात. (हल्ली महाराष्ट्रातही केले आणि विकले जाते.)

सरबत म्हंटले तरी कांही हरकत नाही. चवीला दोन्ही वेगवेगळी पण ब्येष्ट लागतात.

यशोधरा's picture

24 May 2013 - 5:27 am | यशोधरा

आपल्या माऊलीच्या जिवावर मोदकाप्पा उदार! :D

प्रचेतस's picture

24 May 2013 - 9:03 am | प्रचेतस

मस्त रे.
बाकी उच्च दर्जाचे काश्मिरी केशर उपलब्ध असताना स्पॅनिश का म्हणून वापरलेस?

स्पंदना's picture

24 May 2013 - 9:03 am | स्पंदना

कोण मोदक राव?
डोंगरावर चढायच सोडुन इकडे कुठे? डायरेक्ट पाककृती?
फिरले रे देवा फिरले, सारे सारे ग्रह फिरले.
एकुण किती माणस पिउन गेली म्हणे हे सरबत?
कुणाकुणाला आवडल म्हणे ते? अन तुम्हाला कोण कोण आवडल?
आमच्या मोदकान केलय हं ! अस बीस कुणी म्हंटल की नाही?

बाकि आईंना सांगा झकास झालय. आवडल. वर्षभर टिकतय म्हणजे दिवाळीच्या मोसमाला पण चालुन जाईल अशी अपेक्षा.

अहो एवढे दिवस तिकडं चिंचवडात राहात होता, तिथुन सिंहगड पार लांब, तोवर होतं डोंगराचं कौतुक, आता त्याचं घरच निम्म्या डोंगरात आहे, गच्चीवर गेल्यावर सिंहगडाच्या बाबुच्या घरात पिठल्याला फोडणी दिल्याचा धुर दिसतो, मग आता कशाला आलंय कौतुक डोंगरा बिंगराचं, असंही ट्रेकिंग करावं वाटलं की वडगावच्या पुलावरुन खाली उतरायचं आणि अर्धवट प्ल्यायओव्हरच्या रगाड्यातुन चालत चालत मोदकच्या घरी जाईपर्यंत मोद्काच्या सगळ्या पाकळ्या खुललेल्या असतात.

प्यारे१'s picture

25 May 2013 - 12:22 am | प्यारे१

मोदकनं वास्तुशांतीला न बोलावल्याचा एवढा राग? नै सगळ्या पाकळ्या खुलवून उमलवताय म्हणून विचारलं ब्वा! ;)
-हलकं घ्या.

अक्षया's picture

24 May 2013 - 9:59 am | अक्षया

वा! मस्त. :)

पिलीयन रायडर's picture

24 May 2013 - 10:27 am | पिलीयन रायडर

आई ने केलं असणार हे मला धागा न उघडताच कळालं होतं..!!
आई नसेल तर मॅगी+चिवडा खाणारा माणुस तु.. इतकं अवघड काहीतरी कसं रे जमणार तुला..!!
आईला सांग मस्त आहे सरबत.. प्यायला कधी येऊ?

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2013 - 10:54 am | अत्रुप्त आत्मा

ह्हा........!!! पहिला/शेवटचा फोटू बघुन कावरे कोल्ड्रिंक्सची अठवण झाली एकदम! :)

पिंगू's picture

24 May 2013 - 1:39 pm | पिंगू

मोदक कधी येऊ रे घरी?

मस्त दिसतय कैरीचे सरबत.

सुहास झेले's picture

24 May 2013 - 2:22 pm | सुहास झेले

व्वा व्वा... भन्नाट रे !!

आता कुठल्या गडावर भेटल्यावर माझ्यासाठी हे सरबत नक्की आणावे मोदकराव :) :)

धनुअमिता's picture

24 May 2013 - 2:33 pm | धनुअमिता

छान दिसतेय सरबत

सानिकास्वप्निल's picture

24 May 2013 - 4:00 pm | सानिकास्वप्निल

काकूंना स्पेशल धन्यवाद कळव बरं का
केशर-कैरीचे सरबत छानचं दिसतयं :)
+११११

दिपक.कुवेत's picture

25 May 2013 - 11:19 am | दिपक.कुवेत

फक्त कुणालाहि देताना तुझं तेवढं वरीजनल नाव सांग बरं! (ह.घे.रे)

विसोबा खेचर's picture

25 May 2013 - 11:55 am | विसोबा खेचर

जबरा..!

तुम्हाला चालणार असेल तर आम्ही सिह्गडावर जाणार आहोत, तेव्हा तुम्च्याकडे सरबत प्यायला येवू का?

मोदक's picture

25 May 2013 - 6:50 pm | मोदक

या की.. जरूर. :)

पिंगूशेठ.. पिलीयन रायडर.. - कधी येताय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2013 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त दिसतेय ! शिवाय कैरी, आंबे म्हणजे वीक पॉइंट...

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2013 - 6:58 pm | परिकथेतील राजकुमार

फटू पाहूनच तहान भागली.

मदनबाण's picture

25 May 2013 - 7:56 pm | मदनबाण

मस्त... :)
कैर्‍या न-उकडता केलेलं पन्ह पहिल्यांदाच पाहिलं. लहानपणी याच मोसमात आमच्या घराच फ्रीज पन्हाच्या गरांच्या पातेल्यांनी पूर्णपणे भरलेला असायचा ! इतक्या कैर्‍या मी तोडल्या आहेत की विचारु नकोस.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2013 - 3:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जबरा रे मोदका....!

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

26 May 2013 - 7:23 pm | कवितानागेश

प्यायलाशिवाय कळणार नाही, कसे झालय ते. :)

पुंबा's picture

7 Apr 2017 - 11:40 am | पुंबा

एक नंबर.. हे करून बघणार..