टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
खेळ पैशाचा - भाग ७ (अंतिम भाग मराठीतुन)
राम राम मंडळी
आपण मी लिहिलेले लेखन ईंग्रजीत असले तरी वाचले याबद्दल मी आपला आभारी आहे. खरेतर मला आंग्ल भाषा तितकीसी आवडत नाही व नीट येत पण नाही, पण काही गोष्टींना आपला इलाज नसतो हेच खरे.
पैशाची निर्मिती ही बैंकाकडुन कशी केली जाते, जास्तीत जास्त लोकांनी कर्ज घ्यावे या चिंतेत असलेल्या बैंका भाव वाढ, चलन वाढ कशी आणतात व त्यामुळे चालना कशी मिळते हे आपण
खेळ पैशाचा - भाग १ (पैशाची निर्मिती) http://misalpav.com/node/2436
या भागात पाहीले.
भाव वाढ व चलनवाढ का होते तसेच आवश्यकता काञ ह्याचा आढावा आपण
खेळ पैशाचा - भाग २ (इन्फ्लेशन) http://misalpav.com/node/2437
या लेखात घेतला
बैकाची चलन वाढीसंबंधी काय भुमिका असते व त्यांचे याबाबतीतील धोरण यांचा परामर्श आपण
खेळ पैशाचा - भाग ३ (बँकांची गरज - सतत इन्फ्लेशन) http://misalpav.com/node/2464
या लेखात घेतला.
बाजारात आलेल्या पैशामुळे काय होते व त्याची परीणती कशात होते हे आपण
खेळ पैशाचा - भाग ४ (पैशाचा साठा, प्रगती, मर्यादा) http://misalpav.com/node/2465
या भागात पाहिले.
पैशामुळे मानव व पृथ्वी यांना किती गंभीर धोका निर्माण झाला आहे हे
खेळ पैशाचा - भाग ५ (अर्थव्यवस्था कोसळण्याची गरज) http://misalpav.com/node/2467
येथै आपण पाहीले व त्याचबरोबर जर आपण वेळेवर पाउल का उचलायचे हे आपण पाहीले
श्रीमंती आणण्यासाठी, किंमती स्थिर ठेवण्यासाठी व तिस-या जगातील लोकांना स्वस्तात राबविण्यासाठी केलेली कृती अमेरिकेच्या कशी अंगलट येत आहे व अमेरीकन अर्थव्यवस्था कशी कोसळण्याच्या मार्गावर आहे हे आपण
खेळ पैशाचा - भाग ६ (अमेरीकन बॉण्ड्स करतील जागतिक उलतापालथ ) http://misalpav.com/node/2468
या भागात पाहिले.
मुळात मला काही लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचे थेट उत्तर या लेखांतुन जरी मिळाले नाही तरी नीट वाचल्या नंतर तुमच्या लक्षात येऊ शकेल की आज जी बाजारात परिस्थीती आहे ती तशी का आहे व त्याचे काय परिणाम होवु शकतात याचा विचार या लेखमालेत झालेला आहे. कुठे मी कमी पडलौ असेल तर ते माझे अज्ञान आहे व ते मी कबुल करतो.
आता थोडे मागे विचारलेल्या प्रश्नांबद्दल
तेजी मंदी ही सतत चालु असतात. व्याज दर कमी जास्त होत असतात त्यावरुन आपल्याला बाजारातील पैसा कमी करण्ञाचे व वाढवण्याचे आर बी आय चे धोरण समजते. ज्या वेळेस दर कमी होतो त्या वेळेस कर्जे घेणे फायद्याचे ठरते कारण चलन वाढी मुळै आपल्याकडे येणारा पैसा पण वाढतो व आपण परत फेड करु शकतो.
ज्या वे ळेस व्ञाज दर कमी होतो तेव्हा गुंतवणुक दार अधीक नफ्याच्या अपेक्षेने शेअर बाजारात पैसा टाकतो अशावेळेस शेअर मधील गुंतवणुक फायदेशीर ठरते पण जेव्हा दर वाढायला लागतात तेव्हा गुंतवणुकदार पैसे काढून घेतात कारण कंपन्याच्या नफ्यावर विपरीत परीणाम होत असतो. लक्षात घ्या कंपनी ने मागे कितीही चांगली कामगिरी केली असली तरी तिचा भाव हा केवळ आणि केवळ भविष्यातील उत्पन्नावरच आधारीत असतो. चांगल्या चागल्या कंपन्या केवळ पुढील तिमाहीत नीट कामगीरी करणार नाहीत म्हणून या बाजाराने अक्षरक्षः नागवलेल्या आहेत. अशावेळी आपले पैसे शेअर बाजारातुन काढून स्थिर उत्पन्न देणा-या जसे मुदत ठेव रिकरींग किंवा सरळ बचत खाते यात टाकावे. बाजार काही संपुन जात नाही पुनःपुन्हा संधी मिळत असते. शोधावी लागते.
सोने चांदी यात पैसे टाकण्यास हरकत नाही पण मराठी माणसांचा ( जास्त करुन स्त्रियांचा) अवगुण असा की जरीचांगली किंमत येत असेल तरी ते विकत नाहीत तसेच सोने शुद्ध स्वरुपात न बाळगता दागिन्यांच्या रुपात वापरतात त्यामुळे परतावा चांगला मिळत नाही.
साधारण बाजारात काय चालु आहे ... लोक नवीन कर्ज घेत आहेत की जुने परतफेड करुन शांत बसण्याचे धोरण अंगिकारत आहेत यावरुन पुढील ६-१२ महिन्यात काय होवु शकते हे समजते. थोडे हिंडले, चर्चा केली की शहाणपण येते असे जे म्हणतात ते चुकीचे नाही .
महत्वाचे म्हणजे गांगरुन जायचे नाही. मुद्दल काही करुन गमवायचे नाही. फायदा कमी जास्त झाला तरी फरक पडत नाहि व मागिल आठवणींनी गहिवरुन जायचे नाही असे केले म्हणजे त्रास होत नाही
करा गुंतवणूक करा
सर्वांना शुभेच्छा
नाना चेंगट
(लेख आवडले वा नाही आवडले हे कृपया प्रतिसाद, खरड, व्यनि तुन कळवावे ही विनंती)
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


वरिल
वरिल लेखमाला इंग्रजीत असली तरी लिहीण्यास परवानगी दिल्याबद्दल मी तात्यांचे आभार मानतो
व आपल्या सर्वाचा मनापासुन ऋणी आहे.
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
खेळ पैशाचा!
नाना चेंगट,
आपले ह्या विषयावरचे सर्व ७ लेख संगणकावर उतरवून घेतले आहेत.
ते पचायला जड दिसतात, त्या मुळे सवडीने वाचावे लागतील.
आपण घेतलेले परिश्रम आभार प्रगट करण्या पलिकडचे आहेत.
आपण आपल्या लेखाद्वारे केलेले विवेचन सर्व मि.पा. वासियांना उपयोगी पडोत, हि आशा करुया!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
अगदी
मीही वाचनखुणा म्हणून साठवले आहेत सगळे लेख्. आरामात वाचून तुम्हाला प्रतिक्रीया देते...
पण हा उपक्रम मस्त आणि तुमचा एवढा मोठा थिसीस आमच्यावरोबर शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद!
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
डॉ. नाना...
आम्हा अज्ञ लोकांना तुम्ही जे काही साहेबाच्या भाषेत लिहिलंय ते झेपलं नाही. उगाच खोटं कशाला बोला.
आता जरा आईच्या भाषेत लिहिलंत तरच आम्ही समजून घेऊ आणि मगच त्यावर काहीतरी मतप्रदर्शन करू शकू. तुमच्या व्यस्ततेतून काही जमलं तर बघा. आम्ही वाट पाहतो.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
धन्यवाद
नाना, मिपाकरांच्या ज्ञानात या लेखमालेने नक्कीच मोलाची भर पडेल असे वाटते. मी सर्व लेख वाचनखुण म्हणून साठवले आहेत. सविस्तर वाचावे लागतील.
संग्राह्य लेखमाला..
धन्यवाद नाना!
तात्या.
प्रतिसाद
नाना,
तुमचा लेखसंग्रह उतरवून , जमेल तेव्हढा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
तुमचे अनेकानेक आभार. जमतील तसे प्रश्न विचारीनच.
आन्थ्राप्रुनरशिप् बद्दल काही लिहीता येईल का ? काळाची बदलती पाऊले ओळखून , भविष्यातल्या उपाययोजना म्हणून येथील तरुण , सळसळत्या रक्ताच्या युवकाना (आणि करीयर बदल करू इच्छिणार्या प्रौढांकरताही ) काही व्यवसाय मार्गदर्शन करणे तुम्हाला शक्य असेल तर फार बरे होईल.
+१
भविष्यातल्या उपाययोजना म्हणून येथील तरुण , सळसळत्या रक्ताच्या युवकाना (आणि करीयर बदल करू इच्छिणार्या प्रौढांकरताही ) काही व्यवसाय मार्गदर्शन करणे तुम्हाला शक्य असेल तर फार बरे होईल.
चेंगटराव अगदी हेच म्हणतो..
मदनबाण.....
निवांत वाचायला हवेत
निवांत वाचायला हवेत