आम्ही नसताना काय झाले ?

मंडळी,

येथील काही प्रतिसादांवरून (आणि भोचकपणे वाचलेल्या खरडवह्यांतून) आपल्याला जाणवलेच असेल, की मिसळपावाचे आम्ही २२ नंबराचे सदस्य असलो तरी कार्यबाहुल्यास्तव आम्हाला पूर्वीप्रमाणे येथे येणे जमत नव्हते. त्यामुळे गेले दोन महिने आम्ही मिसळपावच काय, तर आमची इतर टवाळक्यांची स्थाने देखील टाळत होतो.

गेल्या आठवड्यापासून जर फुर्सत मिळाली, आणि पुन्हा एकदा मिसळपावावर आमचा वावर सुरू झाला. त्यानिमित्ताने झंडू बामचा खपही वाढला असे काही सदस्य म्हणतात.

असो, पण मुळात, आम्ही नसताना येथे काय घडले, ह्याचा गोषवारा कुणीतरी द्यावा, अशी आमची विनंती आहे. नाहीतर उगाच गेल्या दोन महिन्यातले सगळे लिहिलेले वाचावे लागेल.

ते नकोच. उगाच कुणाच्या लहानपणी लहानभावाने व्रात्यपणा केला त्याचे वर्णन वगैरे थोर साहित्य वाचण्यात आमचा बहुमूल्य वेळ जाईल, माहितीच असलेल्या "थोर" संगीत कारांची चित्रे (महाजालावरून संकलीत केलेली) वगैरे उतरवून घेता घेताच आमचे अर्धे आयुष्य व्यतीत होईल, आणि मिसळपावाची आम्ही टवाळकी करण्यासाठी केलेली निवड व्यर्थ जाईल.

त्यापेक्षा कुणी जर संक्षिप्त रूपात येथे गेल्या २-४ महिन्यात काय घडले असे लिहिले, तर सोपे जाईल.

गेले दोन दिवस मी येथे भटकतोय, त्यातून मला कळलेल्या गोष्टी अशा:

१. संजोपराव आणि तात्यांचे चंची-सख्य आता मिटले, आणि चांगलेच वाजले आहे. ह्याला कारणीभूत संरा चे आसपास, सु आणि च वगैरे, असे कळते.
२. सुभाषिणीदेवी तात्याच्या आतल्या गोटात सामील झाल्या असून आता त्यांना सगळ्यांची इत्थंभूत माहिती आहे. (माझा आय पी ऍड्रेस कळवावा Wink
३. येथील नवीन सदस्यांची लग्ने झाली, कट्टे झालेत वगैरे सर्व सोशल ऍक्टिव्हिटीजला ऊत आलेला आहे, पण तात्या अजूनही त्या पिरंगुटच्या कट्ट्याची आठवण काढून हळहळतो आहे.
४. पोष्टमनची मनोगतावरून (पण) हकालपट्टी झाली, आणि तो आता न घरका न घाटका असा मुंजा म्हणून फिरतो आहे.
५. येथील एक जुना संपादक ही टल्ली होऊन सध्या "आबोदाना ढूंढता है" असे कळते.
६. कुणी पोलीस झालेत, कुणी इण्ड्या ला जाऊन आले, कुणी समर्थ भोजनालयात मासे हाणले.
७. कुणी संपादक झालेत, पाहुणे, आणि मिपा हा एक टवाळकीचा अड्डा नसून काहीतरी गंभीर प्रकरण आहे, हे उगाच लोकमनात ठसवू लागले.

या व्यतिरीक्त बर्‍याच घडामोडी असतील. प्रकट सांगता येत नसतील तर पोष्टकार्डाने कळवा.

- सर्किट

हम्म!...

बरेचसे मुद्दे आले आहेत..असेच बाईकाईने वाचन सुरू ठेवा.... Smile

तात्या.

अजून एक...

जन पळभर म्हणाले सर्कीटराव, आम्ही समजावा का हा आपला "बाय बाय"? Big Grin Wink

खल्लास !

फारच सुरेख विनोद !

आणखी काही वाचने :)

पिरंगुटच्या कट्ट्याची आठवण काढून हळहळतो आहे.

याचाच आम्हाला लै राग Smile

येथील एक जुना संपादक ही टल्ली होऊन सध्या "आबोदाना ढूंढता है" असे कळते.

हाहाहाहा, सर्कीटच्या वाचनाचा टच आवडला !!!
आमचा मित्र, कोणत्या तरी ट्रॆकींगला जाऊन आल्यानंतर,त्यांना काही दिवस तुकारामाच्या अभंगाने पछाडले होते, आणि सध्या अणूकरार भंपक आहे का ? अणूकराराला विरोध भंपक आहे याचा अंदाज घेत आहेत, मल्लीकाला विचारुन ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील Wink

अवांतर : एखाद्या कट्ट्यात सन्मानपुर्वक ती चंची घरी जाउन परत करायची योजना चाललेली आहे असे आमच्या गुप्तहेर खात्याक्डून कळाले आहे. Smile

काय सर?

एखाद्या कट्ट्यात सन्मानपुर्वक ती चंची घरी जाउन परत करायची योजना चाललेली आहे असे आमच्या गुप्तहेर खात्याक्डून कळाले आहे.

तुमचंही गुप्तहेर खातं आहे? कशाला आमच्या पोटावर पाय आणता बॉ?

आमचं कसलं गुप्तहेर खातं

तुमचंही गुप्तहेर खातं आहे? कशाला आमच्या पोटावर पाय आणता बॉ?

आमचं गुप्तहेर खातं नाही, आपलेच डिपार्टमेंट भारी आहे, तेव्हा आम्ही आपल्याच विभागाची माहिती गृहीत धरुन काही धाडसी विधाने करतो.

जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

कुठलेच

कुठलेच संदर्भ लक्षात आले नाहीत
स्वगतः लेका मिपावर तू नुस्ताच टाईम्पास करत असतोस्...जरा अभ्यासू वृत्तीने रहात जा की रे. पाच /सहा महिन्यात राहुनही तू कोरडाच की रे)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

काय विजुभौ !

तुम्ही म्हणजे "मी नाही बाई त्यातली नि कडी लावा आतली !"

बाकी नंतर लिहिते.

माझा आय पी ऍड्रेस कळवावा

आयपी ऍड्रेस काय घेऊन बसलात? आपला फोन नंबर आणि आपला पत्ता आपल्यालाच व्य. नि. ने पाठवत आहे. Smile

माहिती काढण्यासाठी सुभाषिणीदेवींना आतल्या गोटातील होण्याची कधीही गरज नव्हती. त्यांचे गुप्तहेरखाते बरे चालले आहे. सर्वांची खबर ठेवून असते. कोणी कोणते आणि किती पापड लाटले हे लक्षात ठेवून असते पण त्यावर लेख लिहून टल्ली होण्याचे कारण नाही असे त्यांना वाटते. (मागून कोणीतरी चिरक्या आवाजात संतोष, परम संतोष असे उसासे टाकत म्हणते आहे) आल्या आल्या आपल्याला माहिती कळली आहेच त्यामुळे अविश्वास नसावा.

आपली,
प्रियाली होम्स.

अवांतर: बाकी सु आणि च हे मस्तच.... मराठी शुद्धलेखनाप्रमाणे (अरेरे तात्या मारणार!) सू असे लिहावे का? Wink

वारंवार ठसका लागूनही

मिपाच्या ठेल्यावर बसून तर्री चापण्याची आपली खोड जात नाही ह्यातच काय ते आले सर्किटराव!
खाल्लं तर ठसकतंय सोडलं तर मळमळतंय अशातली गत आहे!

(वैधानिक इशारा - वारंवार 'शॉर्टसर्किट' होणे मेंदूच्या आरोग्यास घातक असते! Wink )

चतुरंग

सह्ही!

मिपाच्या ठेल्यावर बसून तर्री चापण्याची आपली खोड जात नाही ह्यातच काय ते आले सर्किटराव!
खाल्लं तर ठसकतंय सोडलं तर मळमळतंय अशातली गत आहे!

हे बाकी सह्हीच बोललास रे रंगा! Smile

आपला,
(ठेलेवाला) तात्या.

तात्या आणि तर्री

तात्या त्याच्या तर्रीत काय मिसळतो माहिती नाही, पण एकतरी ठसका लागल्याखेरीज दिवस जात नाही. (दिवस जाणे ह्यावरून कुणा सुपीक डोक्यातल्या काही पेशी खाजल्या असतीलच Wink

(अवांतरः माझा एक भाचा तर्रीला टल्ली म्हणतो Wink

- सर्किट

अजुन बरेच काही झाले महाराजा ...

कमाल आहे हा सर्कीटराव, तुम्ही २ महिने इथे नव्हता आणि बर्‍याच गोष्टी घडुन गेल्या. त्यातल्या काही आपणाल्या कानापर्यंत पोहचल्या व काही नाही पोहचल्या. पण एका बाबतीत आपल्याला मानतो मी, ज्या आपण इथे "नसुन" सुद्धा आपल्याला समजल्या त्या आम्ही इथे पडिक "असुन" सुद्धा आम्हाला समजल्या नाहीत.
आम्हाला वरच्यापैकी काहीच माहित नाही राव. बरे झाले आपण लिहलेत ते...

असो. आता काही घडलेल्या व आम्हाला दिसलेल्या "गोष्टी" सांगतो ...

  1. काही नविन सदस्यांची लग्ने झाली हे बरोबर पण त्याच्या लग्नाला "काही मिपाकर" आपल्या पदराला खार लाऊन वेळात वेळ काढुन पोहचले ही सुद्धा नमुद करण्यासारखी बाब आहे...
  2. ते "सख्य" वगैरे काही माहित नाही पण बर्‍यापैकी "मिपाकरात" एक सामंजस्य येऊन लोक आपलेपणाने "ऍन्टी - मिपा " गोष्टीवर तुटुन पडायला लागले. मी जर जास्त आतिशयोक्ती करित नसेन तर "लोक आता मिपा एक समांतर कुटुंब मानतात"...
  3. जागोजागी "कट्टे" भरले व गाजलेही. लोक एकमेकांना पर्सनली ओळखायला लागले. त्यातुन एकमेकांना असणार्‍या समस्यांबद्दल लोक चर्चा करुन समस्या सोडवायला एकमेकांना मदत करायला लागले. ह्या आंतरजालाच्या "आभासी दुनयेत" अशी उदाहरणे विरळच ना !
  4. "मिपा एक व्यासपीठ" मानुन काही सुजाण लोक त्यातुन "समाजकार्य, लोकांचे नेटवर्क, मराठीमाणसासाठी काहीतरी करायचे " असे प्लान आखुन त्यासाठी अभ्यास करायला लागले. त्यापुढची गोष्ट म्हणजे त्याला "भरघोस पाठिंबा" ही मिळत आहे.
  5. लोक अनावश्यक व अर्थहिन व ज्यंचा कधीही शेवट होणार नाही अशा "चर्चा" करायच्या सोडुन "काही तरी जमेल तसे लिहु" लागले मग ते भले काहींच्या नजरेत "नित्कॄष्ट दर्जाचे" का असेना. त्याला सुद्धा मिपा करांनी चांगले सल्ले देऊन, पाठ थोपटुन त्यांचा "आत्मविश्वास " वाढवला. हे पण विरळच ना ?
  6. बाकी कोण काय झाले, कोण कोठे गेले ह्या गोष्टी जरा पर्सनल होतात. पण लोकांनी बरीच मजल मारली. मिपाकरांनी त्यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुकही केले. पण शेवटी कसे आहे की "आम्ही कोणाचे काय खातो, आमचा राम आम्हास देतो" ह्या समर्थांच्या उक्तीप्रमाणे लोक वागतात व त्यात त्यांना यश मिळते.

सध्या तरी मला जेवढ्या आठवतील तेवढ्या गोष्टी लिहल्या. बाकीच्या पुन्हा सवडीने कधीतरी.
बाकी आपण "जाणुन" घेण्याची इच्छा दाखवली, आम्हाला फार बरे वाटले...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बहुमुल्य वेळ!!!!!!!!!

आमच्या बालपणच्या आठवणी आणि संगीतकारांची छायाचित्र मालिका अशा तर्‍हेच्या क्षुल्लक गोष्टी वाचण्यात,पाहण्यात आमच्या एका दूरस्थ पुतण्याचा बहुमुल्य (!!!!!!!) वेळ फुकट गेला आणि त्याच्या दैनंदिन 'संध्या' करण्यात त्यामुळे व्यत्यय आला .. असे नव्यानेच कळाल्यामुळे आम्ही धास्तावलो आहोत. नकळत फार मोठे पाप आमच्या हातून घडले हे लक्षात येताच आम्ही त्याचे प्रायश्चित्त म्हणून ह्यापुढे असे क्षुल्लक साहित्य न प्रसवण्याची घोर(?) प्रतिज्ञा करत आहोत. झाले तेवढे पाप पुरे झाले!
Wave Smile Wave Smile Wave Smile Wave Smile

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मिसळ्पावाच्या सदस्यांचा निषेध !

मिसळपाव सुरू झाल्यापासून आजवर येथील सर्व सदस्यांनी "मिसळ्पाव" हे आमचे कुटुंब आहे, मिसळपावाला आमच्या भावविश्वात स्थान आहे वगैरे बरेच लिहून झाले.

पण ह्या फक्त पोकळ गप्पाच आहेत, हे लक्षात आलेले आहे.

म्हणूनच, मी मिसळपावाच्या सदस्यांचा निषेध करीत आहे.

आमच्या दूरस्थ आणि तरीही (की म्हणूनच Wink आवडत्या काकांनी येथे पुन्हा लिहिणार नाही अशी घोर प्रतिज्ञा १२ तासांपूर्वी केली, आणि तरीही त्यांना त्यांची प्रतिज्ञा मागे घेण्यासाठी कुणाही सदस्यांचे उत्तर नाही ? ह्या बारा तासांत किमान ५० सदस्य येथे चक्कर टाकून गेले. आणि तरीही काकांना एकही जाहीर विनंती नाही ?

छा ! कसले कुटुंबीय आणि कसले काय !

सरळ सरळ सांगा इथे फक्त टवाळक्या करायला येतो, म्हणा !

आमच्या कुटुंबियांनी जर अशी घोर प्रतिज्ञा केली असती, तर आम्ही सर्व सोडून त्यांची मनधरणी करू लागलो असतो.

येथील जनरल डायरांनी पूर्वीच्या एका संकेतस्थळावर अशा भीष्म प्रतिज्ञा केल्या होत्या, तेव्हा त्यांना परत आणणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजले होते, आणि किमान तीन वेळा तरी ते परत आले होते.

आणि येथे तर वेगळेच चित्र दिसते आहे.

निषेध. निषेध. निषेध.

त्रिवार निषेध.

- (संध्याप्रेमी) सर्किट

(ता. क. काका, "बहुमुल्य" हे चुकीचे अहे. खरे ते "बहुमूल्य" आहे.)

प्रतिक्रिया

प्रमोद देवांचे पोस्ट मी आधीच वाचले होते. वाचून अर्थातच वाईट वाटले होते. त्यानी अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये असेदेखील अर्थातच वाटले होते.

पण एखाद्या सभासदाने सहभाग घ्यायचे नाकारावे हा त्या सभासदाचा व्यक्तिगत निर्णय ठरतो असे मला वाटले. मिसळपाव सारख्या स्थळामधे मैत्रीपूर्ण , सौहार्दाचे वातावरण आहेच. कुणी त्याला कुटुंबाची उपमाही देईल. पण नियमांच्या चौकटीमधे बसून लिहीण्याचे - न लिहीण्याचे , लिहीण्यातील मजकूर , शैली इत्यादि गोष्टींवर कुणी कुणावर बंधन घालतो यावर माझा , एक सर्वसामान्य मिपा सदस्य म्हणून विश्वास नाही.

भावनेच्या , मूडच्या भरात आपण लिहीण्याचे थांबवतो - किंवा अचानक सुरूदेखील करतो. हे करण्याचे स्वातंत्र्य ज्याचे त्याचे.

मला मनोमन असे वाटते की त्यांची सध्याच्या मनःस्थिती बदलली की देव परत येतील. तसे त्यांनी यावे अशी माझी सदिच्छा. परंतु तसे करण्याचे - न करण्याचे , करायचे असल्यास केव्हा करायचे याचा निर्णय त्यांचा.

सरतेशेवटी मी इतके म्हणतो : मी हे जे वर काही लिहीले ते एक सर्वसामान्य मिपाकर म्हणून. मालक , संपादक , प्रशासक , चालक या नात्याने मला कुठलाही अधिकार नव्हता आणि नाही.

खात्री.../निवेदन!

देवकाकांनी जरी असे लिहिले असले तरी ते तात्कालिक आहे असे मी समजतो. ज्याला फक्त काहीना काही विषय काढून मिपावर वादंगच निर्माण करायचा आहे अश्या व्यक्तिच्या कॉमेन्टसमुळे जर देवकाका लिहिण्याचे बंद होणार असतील तर ते मी दुर्दैव समजेन!

तरीदेखील देवकाका इथे निश्चितपणे लिहिणे सुरू ठेवतील अशी मला खात्री आहे. आपण कितीही गरळ ओकलीत तरी मिपा हा एक परिवारच आहे आणि कुठला विषय किती सिरियसली घ्यायचा आणि त्याबद्दल कुणाची समजूत काढायची हे येथील लोकांना चांगलेच समजते.

असो!

सर्किटराव,

'मिपा' या विषया व्यतिरिक्त येथे आपण काही वेगळे व वैविध्यपूर्ण लेखन केलेत तर ते आम्हाला अधिक आवडेल. तेवढे लेखनकौशल्य, तेवढी बहुश्रुतता आपल्याकडे निश्चित आहे असे मी मानतो. तेव्हा प्लीज, स्पेअर द मिपा फॉर द टाईम बिईंग! मिपाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. गरज लागेल तेव्हा आपल्याशी अवश्य सल्लामसलत करेन!

अन्यथा, नाईलाजाने मिपासंदर्भातले आपले या पुढील सर्व लेखन मला येथून काढून टाकवे लागेल. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात हे मी आपल्याला सांगायला नको. मिपा हे संकेतस्थळ आणि त्याबाबतची उलटसुलट चर्चा ही कशी लाईमलाईटमध्ये राहील हा आपला प्रयत्न आपण सोडून द्यावा हे उत्तम!

ज्यांचं खरोखरंच मिपावर प्रेम आहे अशी सभासद मंडळी येथे उत्तमोत्तम लिहून मिपाला लाईमलाईट मध्ये आणायला समर्थ आहेत!

कृपया या विषयावर हे माझे शेवटचे निवेदन समजा! यापुढे निवेदन देत न बसता केवळ डिलिटचे बटण दाबले जाईल. कृपया या प्रतिसादालाही काही उत्तर द्यायचे असल्यास मला खरड किंवा पत्र पाठवा. इथे उत्तर दिल्यास तेही नाईलाजाने उडवले जाईल याची आगऊ कल्पना देत आहे!

तात्या.

निंदकाचं घर असाव शेजारी

अहो तात्या, निंदकाचं घर असाव शेजारी असं म्हनत्यात. आणि तस पण...

"आपण कितीही गरळ ओकलीत तरी मिपा हा एक परिवारच आहे आणि कुठला विषय किती सिरियसली घ्यायचा आणि त्याबद्दल कुणाची समजूत काढायची हे येथील लोकांना चांगलेच समजते."

हे खरंय न्हवं? मग लिहूद्या की सर्कीट सायबाला काय लिहायचेय ते. आमी मिपाकर्स ठरवू वाचायचे का नाही ते. काय म्हणता?

आपला,
बैलोबा

बाकींच्याचं बी काय म्हनन हाय रं?

गुगली!

फिरकी घेण्याचा मक्ता काय फक्त पुतण्याकडे असतो? काका देखिल गुगली टाकू शकतात म्हटलं!
ह्या गुगलीला मिपाकरांनी का फसावे? शक्यच नाही! कारण तो त्यांच्यासाठी नव्हताच हे समजण्याइतपत मिपाकर समजदार आहेत.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे