१० वी 'क' - भाग ५

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
18 Feb 2013 - 7:17 pm

१० वी 'क' - भाग १

१० वी 'क' - भाग २

१० वी 'क' - भाग ३

१० वी 'क' - भाग ४

"साल्या भिकारचोटा, कुठे उलथला होतास रे इतके दिवस?" बापलेकरला बघताक्षणीच शिव्या घालत त्याच्या पोटात मी दोन तीन गुद्दे ठेवून दिले. गुद्द्यांचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही उलटं दात काढून हसायला लागला. त्याला पाहताच आम्हा दोघानांही खुप आनंद झाला होता. त्याची नविन कोरी रेंजर पाहिल्यानंतर मला नि पाल्याला आश्चर्य वाटलं.

"आणि हे काय रे, नविन सायकल? कधी घेतली? कोणी घेतली??" माझ्या प्रश्नांचा भडीमार सुरू झाला.

"अरे हो हो! मला काही बोलून देणार आहात की नाही? परीक्षा संपल्यानंतर लगेचच आम्ही सगळे गावी गेलो होतो ते कालच घरी परतलो." बापलेकरने खुलासा करायला सुरूवात केली. नववीला पास झाल्यामूळे त्याच्या वडीलांनी शाळेत जाण्यासाठी त्याला सायकल घेऊन दिली होती. "मग काय? आता मजाय तुझी! रोज सायकलवरनं शाळेत येणार." त्याच्या नवीन कोर्‍या सायकलवरून अधाश्यासारखा हात फिरवत मी त्याला विचारलं.

"गांडू, उगाच गळे काढू नको." "मी एकटा थोडीच येणारे, आपण तिघेही एकत्रच यायचं" तोंडात शिव्या असल्या तरी माझ्या नि पाल्याविषयी त्याच्या मनात नितांत आदर होता. फक्त सतत अपशब्दात बोलण्याच्या निमित्ताने तो हे सगळं झाकोळण्याचा प्रयत्न करी. बाह्यरंगी तो कितीही आगाऊ, वात्रट आणि वांड असला तरी मुखवट्याआडचा त्याचा चेहरा वेगळाच होता जो फक्त मला नि पाल्यालाच ठाऊक होता. जीवाला जीव देणारा जिगरी यार होता तो. शाळा भरायला अवकाश असल्याने मग पाल्याने आणि मी त्याला शाळेच्या पहिल्या दिवसांपासून घडलेले किस्से सांगायला सुरूवात केली. मग इंगळी पासून ते आगलावे पर्यंतचे सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या. आगलावेची गोष्ट ऐकताच त्याचे डोळे चमकले आणि मग क्षण-दोन क्षण विचार केल्यानंतर आम्हा दोघांकडेही पाहत कुत्सित नजरेने हसू लागला. डोक्यात काही तरी शिजू लागलं होतं त्याच्या, पण ते आता कळणार नव्हतं. जे काही असेल ते करून झाल्यानंतरच बापलेकर आम्हाला येऊन सांगणार होता. लांबूनच घंटेचा आवाज ऐकू आला. मग ट्रिपलसीट बसून आम्ही शाळेत पोहचलो. आता शाळाही बर्‍यापैकी भरू लागली होती. सुरूवातीच्या दिवसात मोकळे मोकळे राहणारे बेंच हळू हळू भरू लागले होते.

शाळा सुरू झाली. ठोंबरे बाईंचा पिरेड तिसरा होता, गणिताचा पिरेड पहिला होता. कोपरापर्यंत बाह्या असलेला हाफ शर्ट घातलेले, साडे चार फुट उंचीचे सावळेशे चोपडे सर वर्गात शिरले आणि बापलेकर जवळ जवळ किंचाळलाच "अरे हा हाय काय गणिताला? मग गणिताची काशीच झाली माझ्या." बापलेकरची हि चिंताही तशी रास्तच होती. कारण चोपडे सरांच्या पिरेडला पोरांनी सिरियसली ऐकल्याचं किंवा अभ्यास केल्याचं आम्ही कधीच पाहीलं नव्हतं. त्यांच्या पिरेडला वर्गात कायम गोंधळ चालत असे आणि त्या गोंधळात पोरांना न जुमानता ते त्याचं शिकवण्याचं काम नित्यनेमाने पार पाडत. हुशार विद्यार्थी आणि जे क्लासला जात त्यांच चालून जाई पण जे फक्त शाळेच्याच अभ्यासावर अवलंबून असत त्यांचा मात्र परीक्षेत 'निकाल' लागे. पाल्या सोबत असल्यामुळे मला नि बापलेकरला तरी गणिताची काहीच चिंता नव्हती. आताही वर्गात गोंधळ सुरू झाला आणि त्या गोंधळाला न जुमानता सरांनी बीजगणित शिकवायला सुरूवात केली. बहुतेक सगळ्याच पोरांच्या आपापसात गप्पा सुरू झाल्या होत्या. बापलेकर मग हळूच माझ्या कानात कुजबूजला "ती आगलावे कोणती रे?" केसांचा मध्ये भांग पाडून दोन वेण्या घातलेल्या सावळ्या आगलावेची खुण मग त्याला मी सांगितली तेव्हा आगलावे बाजुच्या मोरेसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती. 'हम्म' असं म्हणत मग बापलेकर हातातलं कर्कटक बेंचवर वर्तुळाकार फिरवत त्यात शुन्य नजरेने उगाच पाहत राहिला.

मधल्या सुट्टीत झाली तसं बापलेकरने खिशातलं च्युइंगम काढून तोडांत टाकलं आणि चघळायला सुरूवात केली. थोड्या वेळाने मागच्या बेंचवरील पवार, भालेराव या टारगट पोरांच्या घोळक्यात गप्पा मारण्यासाठी जावून बसला. मी आणि पाल्याने डब्बा काढून खायला सुरूवात केली. पोरींमधल्याही बहुतेक जणी वर्गात बसूनच डब्बा खात होत्या. आगलावे तिच्यासोबतच्या मैत्रिणींबरोबर खाली मैदानात डब्बा खाण्यासाठी गेली होती. कुलकर्णी डब्बा खायला पाठमोरी बसली होती त्यामुळे तीचा चेहरा दिसत नव्हता. म्हणून मग तिकडे लक्ष न देता मी बापलेकर काय करतोय याचं निरिक्षण सुरू केलं. बापलेकर जिथे बसला होता त्याच्या बाजूचाच बेंच आगलावेचा होता. गप्पा मारता मारता याने हळूच कोणालाही न कळेल अश्या रितीने तोंडातला च्युइंगम काढून आगलावेच्या बेंचवर पाठच्या बाजुला चिटकवला. "मार खातोय आता बापलेकर." पाल्याला मी म्हटलं अनं तो बेंच दाखवला. तेवढ्यात मधली सुट्टी भरल्याची घंटा वाजली आणि साळसुदासारखा बापलेकर त्याच्या जागेवर परत येऊन बसला.

वर्ग पुन्हा भरला. हिदींच्या सावंत बाई वर्गात आल्या अनं त्यांनी लगेचच कविता शिकवायला सुरूवात केली. कवितेचं पहिलं कडवं त्यांनी म्हटलं असेल नसेल तोच आगलावेच्या बाजुची सकपाळ मोठ्याने किंचाळली.

"इइईईईऽऽऽऽऽऽ, हे बघ काय, तुझ्या पाठीला चिंगम लागलाय".आगलावेच्या जॅकेटकडे इशारा करत तीच्या बाजुची सकपाळ बोलली. एव्हाना बाईंनी कविता शिकवायची बंद करून नेमकं काय झालंय हे पाहायला आपला मोर्चा आगलावेच्या बेंचकडे वळवला. बेंचच्या पाठच्या बाजुला असलेलें च्युइंगम अर्ध त्याला आणि अर्ध आगलावेच्या जॅकेटला चिटकलं होतं. आगलावे!! तीचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. एकाच वेळेला तीच्या चेहर्‍यावर रडूही कोसळत होतं अनं रागही येत होता.

"कोणी केलंय हे?" पोरांकडे पाहत बाईंचा रागीट आवाज संबंध वर्गाला ऐकू गेला. सगळे एकदम चिडीचुप्प. कोणीही हुं की चू करेना.

"आता लवकर सांगितलं नाहीत तर सगळ्यांना मार बसेल.” बाईंनी सरळ धमकीच दिली. पोरांमध्ये चुळबूळ सुरू झाली. च्युइंगम लावणारा समोरून येत नाही तर सगळ्याच पोरांना मार खायला लागणार होता. हा पराक्रम कोणी केलाय हे आम्हा तिंघाशिवाय इतर कोणालाही माहीत नव्हतं. बापलेकर! तो तर एकदम सज्जन मुलासारखा काहीच केलं नसल्याच्या थाटात बसला. "मॅडम, मला तर वाटतंय ह्याच मुलांनी चिंगम लावलं असावं.” शेवटच्या चार बाकांकडे बोट करून आगलावे एकदमच बोलली. तिच्या अनपेक्षित बोलण्याने शेवटच्या चार बाकांवरची ती पोरं एकदम गोंधळलीच. आणि मग 'बाई, आम्ही नाही केलं' असा एकच गलका सुरू झाला.

"आय रक्ताची शप्पत बाई, आमी चिंगम नाय लावला.”गळ्यावर दोन बोटं ठेवत भालेरावने त्यांची बाजू कळकळीने मांडण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून डाॅयलाग फेकला.खरंच बाई..खरंच. बाकीच्यांनीही त्याच्या सुरात सुर मिसळला. पण आगलावे तीच्या मतांवर ठाम होती.

झालं. त्या सगळ्यांना बोलवून बाईंनी प्रत्येकांच्या दोन्ही हातांवर एक एक रुळ आपटले. तोंडाने स्स्स्सस करत, हात चोळत ती सगळी मग आपापल्या जागी जावून बसली. एकमेकांना डोळ्यांनी खुन्नस देणं चालूच होतं. आता त्या पोरांना जर बापलेकरवर डाऊट आला असता तर शाळा सुटल्यानंतर बापलेकरला फटकेच पडणार होते, पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही. सगळ्या गोंधळातून भांडणाचा मुख्य सुत्रधार सहीसलामत बाहेर पडला होता.

पाल्याने सायकल काढली, बापल्या पुढे दांडीवर आणि मी मागच्या कॅरेजवर बसलो. "बैला, तुला काही अक्कल नाही. तुझ्याबरोबर आम्हीही मार खाल्ला असता ना!?” पाल्या जवळ जवळ उखडलाच. "असंच करत राहीलास तर गणितं नाय सोडवून देणार तुझी. मग बस बोंबलत!” "चोपड्या आहे माहितीय ना गणिताला.” चोपडे गणिताला आल्यानंतर पाल्याला आधीच माहिती होतं त्याच्याशिवाय आमची गणितं सुटणार नव्हती आणि याचा फायदा घेऊन त्याने बापल्याला धमकीच देऊन टाकली.

बापलेकर एकदम सुमडीत!

......आणि मी मागे बसल्या बसल्या गालातल्या गालात हसत होतो.

आमचा कोरम पुर्ण झाला. शाळाही नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. कुलकर्णीकडे चोरून पाहणं नियमित चालूच होतं. तिच्या चेहर्‍याकडे बघत असलो म्हणजे शाहरूखचं 'न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो यही था अभी खो गयाँ' हे गाणं मनात वाजे. तीच माझ्याकडे लक्ष होतं की नाही कोणास ठावूक? पण कधी कधी मी बघत असताना तिची नि माझी अचानक नजरानजर होई. त्या वेळी ओशाळल्यासारखं लाजून मी खाली पाहायला लागे. शाळा सुरू व्हायच्या आधीच ती वर्गात येई. काही वेळेला पुस्तक काढून बसे, काही वेळेला फळ्यावर सुविचार लिहायला घेई. एक दिवस सहजच शाळेत लवकर पोहचलो तेव्हा कुठे मला माहीती पडलं. आमचा बेंच फळ्याच्या अगदी जवळच असल्यामुळे ती सुविचार लिहायला आली म्हणजे काहीतरी कारण काढून तीची ओळख करून घेता येईल असा विचार मनात यायचा. पण नेमकं बोलायचं तरी काय हेच कळत नव्हतं. आणि त्यात तिच्याशी बोलताना कुणी बघितलं असतं तर मग मेलोच मी. योग्य संधीची वाट पाहणंच नशिबात होतं.

श्रावण लागला अनं ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू झाला. क्षणात ऊन पडे तर क्षणात श्रावणसरी बरसू लागत. आषाढ मनसोक्त अंगावर झेललेली सगळी झाडं एखाद्या नव्या नवरीने अंगावर हिरवागार शालू पांघरावा अशी दिसत होती. आकाशात काळ्या-पांढर्‍या ढगांचे छोटे मोठे पुंजके चुकार कोकरांसारखे उंडारत होते. रस्ते स्वच्छ धुतलेले, काळ्या कुळकूळीत काजळापरी दिसू लागले होते. त्यांच्या दुतर्फा पोपटी रंगाची वार्‍यावर डोलणारी किनार डोळ्यांना सुखावून जात होती. पिवळ्या रंगाची छोटी छोटी फुलपाखरं मुक्तपणे बागडताना आणि लहान मुलं त्यांना बोटाच्या चिमटीत पकडायला पळताना पाहून मला माझं बालपण आठवत होतं. निसर्गाने मुक्तहस्ते केलेली रंगाची ती उधळण मी घेता येईल तितकी डोळ्यात साठवून घेत होतो अनं त्याच वेळी, नेमकं त्याच वेळी कुलकर्णीच्या आठवणींनी मन कासाविस होई. चाळीसमोरच्या मोकळ्या जागेत चाफ्याचं एक ठेंगणं झाडं होतं. फांद्या बर्‍याच ठिकाणी वाकड्यातिकड्या पसरलेल्या होत्या, त्याच फांद्यांची एक ठिकाणी बेचकी तयार झाली होती. माझं बसायचं ठिकाण! अशा कासाविस वेळी मी तासन तास त्या बेचकीत जाऊन अंतर्मुख होत असे. मन थार्‍यावर आलं म्हणजे मग पुन्हा घराचा रस्ता पकडायचा.

आणि अशातच एका दुपारी वर्गात ठोंबरे बाई तल्लीन होवून शिकवत होत्या आणि पोरंही मन लावून ऐकत होती तोच वर्गाच्या दरवाजात शाळेचा शिपाई जाधव येऊन उभा राहिला. "मॅडम, सचिन बनकरला खाली मुख्यधापकाच्या केबीनमध्ये दप्तर घेऊन बोलावलंय."

"का रे? काय झालंय??"

"त्याची आई आलीय त्याला न्यायला."पुढचं काही विचारायच्या आत तो निघूनही गेला.

ठोंबरे बाईंसकट सगळा वर्ग प्रश्नार्थक चेहर्‍याने माझ्याकडे पाहू लागला. काय झालं असावं याचा काहीच अंदाज येत नव्हता. डोक्याचा भुगा व्हायची पाळी आली होती, हृदयाचे ठोकेही जलदगतीने पडू लागले होते. काहीच सुचेना. बाईंनी सांगितल्यानंतर दप्तर उचललं आणि निघालो. वर्गाकडे पाहायची बिलकूल हिमंत होत नव्हती पण त्यातल्या त्यातही जाताना कुलकर्णीकडे एक ओझरता कटाक्ष टाकला. चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह आणि डोळ्यात काळजी दिसत होती तिच्या. पळतच खाली मुख्यधापकांच्या केबीनपाशी पोहचलो. मला पाहून झटकन पुढे आली, हात घट्ट पकडला.

"सच्चु पटकन चल. आपल्याला हॉस्पीटलमध्ये जायचंय, दादाला अपघात झालाय रे."

ऐकलं आणि कानशील गरम झाली, हृदय आणखी जोरात धडधडायला लागलं. चटकन डोळ्यात पाणी जमा झालं. आईचा हात घट्ट पकडला आणि तिथेच धाय मोकलून रडायला सुरूवात केली.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Feb 2013 - 8:40 pm | यशोधरा

वाचते आहे..

जोशी 'ले''s picture

18 Feb 2013 - 8:49 pm | जोशी 'ले'

वाचतोय...उत्कंठा वाढलीय
पु.भा.प्र.

लेखाच्या सुरुवातीचे दोन शब्द वाचून "करुन करुन भागला आणि देवपूजेला लागला" ही म्हण आठवली.

विनोद बाजूला, छान लिहिलंय.

>>"आय रक्ताची शप्पत बाई, आमी चिंगम नाय लावला.”
हा डायलॉक आम्ही शाळेच्या दिवसांमध्ये सर्रास म्हणत असू.

अग्निकोल्हा's picture

18 Feb 2013 - 8:56 pm | अग्निकोल्हा

झकास जमलय.

पैसा's picture

18 Feb 2013 - 9:01 pm | पैसा

पुढच्या भागात एवढं अंतर नको ठेवू रे!

अभ्या..'s picture

18 Feb 2013 - 9:54 pm | अभ्या..

चिट्ठी आणल्याशिवाय कसा काय आलास? एवढे दिवस कुठे होतास? ;)
बाकी आलायस रंगात हळूहळू. मस्त

सानिकास्वप्निल's picture

18 Feb 2013 - 10:19 pm | सानिकास्वप्निल

पाचही भाग एकदम वाचून काढले
लेखमाला छान चाललीये :)
पुढचा भाग खरचं लवकर येऊ द्या

प्रचेतस's picture

18 Feb 2013 - 10:25 pm | प्रचेतस

किती रे वेळ लावतो एकेक भाग टाकायला.
पटापट येऊ देत आता पुढचे भाग.

दिलखुष!

आदूबाळ's picture

18 Feb 2013 - 11:14 pm | आदूबाळ

६...७...२६...७०

किसनराव, ही चढती श्रेणी "दहावी क"च्या दोन भागांमधल्या अंतराची आहे! पुढचा भाग १५० दिवसांच्या आत येऊद्या!

किसनराव, ह्या भागाचं पहिलं वाक्य हाच आमचा प्रतिसाद समजा. उत्कंठा टांगणीला लावून ठेऊ नका आता!

इनिगोय's picture

19 Feb 2013 - 6:03 am | इनिगोय

मस्त जमतंय!

पुढचा भाग मे महिन्याच्या सुट्टीअगोदर टाकणार ना?

उगा पिक्चर पहात वेळ घालवता अन शाळा राहुन जाते बघा. केव्हढी गैरहजेरी ती.

असो. फार छान लिहितं आहात.

५० फक्त's picture

19 Feb 2013 - 8:16 am | ५० फक्त

मस्त रे, एकदम मस्त झाला आहे हा भाग,

आता आयड्या आयड्या खेळायचं म्हंजे थोडा वेळ लागणारच की लिहाला, जरा धीर धरावा सर्वे आयड्यांनी ही न्रम वितंनी.

हां, हे बाकी बरोबर.. आता त्या सीतेच्या गोष्टीबाबत नाही का सगळनी धीर धरलाय? तसंच ते.

स्मिता चौगुले's picture

19 Feb 2013 - 10:07 am | स्मिता चौगुले

वाचते आहे..

अनन्न्या's picture

19 Feb 2013 - 11:11 am | अनन्न्या

१०० पैकी १०० मार्क!!

झाले ते झाले. आता पुढचा भाग आज संध्याकाळपर्यंत हजर करणे ही विनंती.

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Feb 2013 - 11:14 am | श्री गावसेना प्रमुख

मायच्यान लय झ्याक हाय

विलासिनि's picture

19 Feb 2013 - 12:35 pm | विलासिनि

अपर्णाताईचा प्रतिसाद एकदम सही. अजून कथा वाचली नाही. आधिची कथा काही आठवत नाही त्यामुळे ती वाचून मग प्रतिसाद देवू (अर्थात प्रतिसाद क्रमशः).

मृत्युन्जय's picture

19 Feb 2013 - 12:40 pm | मृत्युन्जय

काहितरी कलाटणी मिळणार बहुधा कथेला. वाचतोय हो किसनदेव.

मनराव's picture

19 Feb 2013 - 1:23 pm | मनराव

वाचतो आहे......

सूड's picture

19 Feb 2013 - 1:57 pm | सूड

वाचतोय !! पुभाप्र !!

मोदक's picture

20 Feb 2013 - 12:14 am | मोदक

वाचतोय...

सस्नेह's picture

20 Feb 2013 - 4:22 pm | सस्नेह

अत्यंत सहज अन ओघवती भाषा.
पुभाप्र.

आन्दो आन्दो आन्दो आन्दो आन्दो
आन्दो आन्दो आन्दो आन्दो आन्दो
आन्दो आन्दो आन्दो आन्दो आन्दो
आन्दो आन्दो आन्दो आन्दो आन्दो
आन्दो आन्दो आन्दो आन्दो आन्दो

सुहास..'s picture

22 Feb 2013 - 12:20 pm | सुहास..

हा ही भाग आवडेश !

( वेळ का घेतो आहेस, संदर्भ लक्षात रहात नाहीत. ५ वा समजायल ४ पुन्हा वाचावा लागतो आहे)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Feb 2013 - 1:59 am | निनाद मुक्काम प...

आय रक्ताची शप्पत
जाम आवडले

स्मिता चौगुले's picture

18 Apr 2013 - 1:33 pm | स्मिता चौगुले

वाचते आहे..
आता पुढचा भाग कधी?

प्रसाद गोडबोले's picture

8 Jul 2015 - 5:02 pm | प्रसाद गोडबोले

पुढील भाग कुठे आहे ?

पद्मावति's picture

8 Jul 2015 - 7:41 pm | पद्मावति

हेच विचारायचे आहे मलाही.
मस्तच आहे कथा. सगळे भाग वाचून काढले. नववी दहावीच्या मुलाच्या आयुष्यात, त्यांच्या मर्यादित अनुभावविश्वात काय काय गमती जमति चाललेल्या असतात त्याचे सुंदर चित्रण. आता मात्र जरा गंभीर वळण घेणार आहे कथा असे दिसतय. प्लीज़ पुढचे भाग लवकर टाका.

समिर२०'s picture

18 Sep 2015 - 10:59 pm | समिर२०

पुढील भाग कुठे आहे ?

स्नेहश्री's picture

13 Jul 2016 - 1:37 pm | स्नेहश्री

पुढचा भाग?

बंट्या's picture

13 Jul 2016 - 6:59 pm | बंट्या

कृपया पुढचा भाग टाका .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2017 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१० वी 'क'चा पुढील भाग कुठे वाचायला मिळेल ? ब्लॉग वगैरे ?

-दिलीप बिरुटे

संजय पाटिल's picture

23 Aug 2017 - 9:40 pm | संजय पाटिल

किस्ना नी बेगने बा....रो...
लय दिस.. झालं...
फुढचा भाग कुठ्ठाय??????

पुढील भाग कुठे वाचायला मिळेल ....??????

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2022 - 6:11 pm | चौथा कोनाडा

पुढचा भाग किसनभाऊंनी लिहिला नाही की काय ?