टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
कोण कोण येणार धम्याचा लग्नाला ?
धमाल्या ८ जुलैला विवाहाच्या पवित्र बंधनात पुणे येथे अडकत आहे.
(सस्नेह निमंत्रण.)
त्याला प्रोत्साहन व धीर देण्यासाठी कोण कोण हजर राहणार आहे?
गेल्या वेळीच्या दंगलीला मी अनुपस्थित राहील्याने आंद्या ने नको त्या भागावर लाथा मारल्या. त्याच्या अजुन वेदना होतायत.
म्हणुन ते पापमार्जन करण्यासाठी, मी खास त्या दिवशी सुट्टी घेउन धमाल्याच्या लग्नात जाणार आहे.
अजुन तरी धम्याला भेटवस्तु द्यायचा निर्णय झाला नाही. त्यामुळे मी त्याला आहेर करायच्या विचारात आहे.
पण मला ऐकादी गणपतीची मुर्ती वैगेरे द्यावशी वाटते आहे. अजुन ऐकादा चांगली भेट वस्तु आहे का?
जर अजुन कोणाला भेट द्यायची असेल तर ऐकत्र मिळुन भेट देउ शकतो.
त्याला प्रोत्साहन व धीर देण्यासाठी कोण कोण हजर राहणार आहे?
कोणी भेटवस्तु देणार आहे का?
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


प्रयत्न..
मी निश्चितपणे यायचा प्रयत्ब करणार आहे.
सकाळी साडेनऊच्या सुमारास इंद्रायणी एक्सप्रेसने पुण्यात येईन. रामनाथ किंवा काटाकीर्र ची मिसळ खाईन. त्यानंतर धम्याच्या लग्नाला कार्यालयात हजर होईन. तिथे मनसोक्त जेवून दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसने पुन्हा ठाण्यात परत येईन असा बेत आत्ता तरी ठरवला आहे. बघुया कसं जमतं आहे ते!
आपला,
(वक्तशीर) तात्या.
अजुन ऐकादा चांगली भेट वस्तु आहे का?
जर अजुन कोणाला भेट द्यायची असेल तर ऐकत्र मिळुन भेट देउ शकतो.
अहो पण पत्रिकेत तर "आपली उपस्थिती हाच अहेर!" असं म्हटलं आहे. मग कसला अहेर?
आपला,
(पत्रिका वाचक!) तात्या.
गटणे, पण तरीही तुम्ही मंडळी जर अहेर करणारच असाल, काही भेटवस्तू घेणार असाल तर त्यात माझाही सहभाग गृहीत धरावा. काही कारणांमुळे जर मी येऊ शकलो नाही तर तुमचा घरचा पत्ता मला मिपावर पोष्टकार्ड टाकून कळवा. माझ्या वाटणीच्या पैशांची मी तुम्हाला मनीऑर्डर करेन. कृपया विश्वास ठेवा!
आपला,
(पैशांच्या बाबतीत चोख!) तात्या.
तात्या
तात्या येणार हे ऐकुन आंनद झाला.
गटणे, पण तरीही तुम्ही मंडळी जर अहेर करणारच असाल, काही भेटवस्तू घेणार असाल तर त्यात माझाही सहभाग गृहीत धरावा. काही कारणांमुळे जर मी येऊ शकलो नाही तर तुमचा घरचा पत्ता मला मिपावर पोष्टकार्ड टाकून कळवा. माझ्या वाटणीच्या पैशांची मी तुम्हाला मनीऑर्डर करेन. कृपया विश्वास ठेवा!
आम्ही भेटवस्तु चे नक्की केले तर सांगुच.
पण मला अजुन तरी पुण्यातल्या कोणाचा संपर्क झाला नाही.
सखाराम गटणे
भेटवस्तू....
भेटवस्तूच्या वर्गणीत माझेही नांव धरावे. माझा भ्रमणध्वनी क्रमांक : ९८५०५ ८३००५.
आमच्या लांबूनंच शूभेच्छा..
फार आनंद झालाय ..(स्वगत : साला हट् ... गूलाबजाम्स खायचा चान्स हूकलाच)
गटणे काका माझ्या वाटचे ५० गूलाबजाम तुम्हीच खावेत ही नम्रविनंती ....
आम्ही आफ्रिकन देवाकडे धम्याला शक्ती मिळण्यासाठी एक शक्तीखिचक यज्ञ करू ..
गूलाबजाम चापनारा ) कु ख
http://picasaweb.google.com/prashants.space
मी येतोय...
आनंदयात्री, इनोबा आदी येताहेतच.
बाकी बाबी फोनवर होतीलच.
नीलकांत
लग्नाला जातो मी लग्नाला जातो मी
लग्नाला मीपण येणार! आहेर म्हणून बत्तीस अक्कलदाढा॑ची माळ आणण्याचा विचार आहे
तात्या मिसळीच्या नाश्त्यास मीपण येणार.. काटा किर्रलाच जाऊ
सहमत...
तात्या मिसळीच्या नाश्त्यास मीपण येणार.. काटा किर्रलाच जाऊ
सहमत. मी पण आहेच.
चालेल..
शिवाजीनगर स्टेशणात उतरलो की तुम्हा दोघांना फोन करतो. नक्की जाऊया!
अरे मिसळ खायला अजून कुणी येणारे का रे?
डॉ दाढे, हे काटाकीर्र कुठे आहे? मला पत्ता माहिती नाही..
तुमचा नम्बर मला कृपया कळवा...
तात्या.
ठाऊक आहे...
ठाऊक आहे मला. तुम्ही नुसता फोन करा बस.
:)
ओक्के, डन..!
अरे अजून कोण कोण येणारे रे मिसळ खायला?
तुम्च्या....
फुल्या फुल्या फुल्या..
साले हो माझ्या नावची चमचा भर मिसळ काढून ठेवा.. नाहीतर तुम्हा सगळ्यांची पोटे बिघडतील...
छळछावणीत आहे म्हणून असे हवरट विषयांवर चर्चा करून माझा छळ करता काय ***नो
कुठे फेडाल ही पापं..
असो..धमुला माझ्या तर्फे शुभेच्छा द्या..
(****)केशवसुमार
अरे अजून
अरे अजून कोण कोण येणारे रे मिसळ खायला?
आपण धमुच्या लग्नाला येणार आहे बरं का...
तात्या...मिसळ खायला पण यायचं जमवतोच...
... खुद्द धमु आम्हाला भेटून आमंत्रण करून गेले काही दिवसांपूर्वी...
...
यायलाच पाहिजे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
लाभ.
आम्हीही त्या दिवशी बहुतेक पुण्यात असू. रसिकाग्रणी तात्यासाहेबांबरोबर मिसळ खायचा आम्हीही लाभ घेऊ.
अशोक गोडबोले.
इच्छा
धमाल मुलाशी मागे एकदा भेट झाली होती मात्र त्यावेळी जास्त बोलणे झाले नाही. लग्नाला येण्याची फार इच्छा आहे. कार्यालयीन व्यापातून वेळ मिळाल्यास लग्नमंडपात आमचे धुळीचे पाय यावेत असे वाटते.
मात्र धमाल मुलाच्या पाठीशी आमच्या शुभेच्छा (आणि सहानुभूती) आहेच.
आपला,
(व्यस्त) आजानुकर्ण
सध्या
सध्या बंगलोर-हैदराबाद वा-या चालु असल्याने लग्नाला उपस्थित रहाणे जमेल असे वाटत नाहि.
तरीहि आपल्या पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा.
अभिज्ञ.
अवांतर-कुठल्यातरी पत्रिकेत आहेर आणु नये असे वाचल्याचे स्मरणात आहे,ती पत्रिका धम्याचीच तर नव्हे??

ह.घ्या.
येळेची केळं
सध्या आम्च्याकडे महाग झाली आहेत त्यामुळे जमणार नाही लग्नाला यायला.
पण भेटवस्तु देण्यासाठी माझा हात वर.
मी पैसे कोणाकडे आणि कसे देवु???
गटणे पैसे ओन्लाइन ट्रान्स्फर करु का????
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
हो,
हो, नक्कीच.
अजुन थोडीशी लोक हवेत म्हणजे चांगली भेट्वस्तु घेता ऐईल.
सोमवरी सध्यांकाळी जाउन बघतो.
आता मुक्काम वाई प्रांती आहे.
सखाराम गटणे
मंडळी...
पत्रिकेत
"आपली उपस्थिती हाच आहेर"
असे सपश्ट लिहिलेले आहे. तेव्हा कृपया कोणतीही भेटवस्तु आणण्याच्या फंदात पडू नका रे!
अरे खुद्द माझ्या मिपागावाची मंडळी, माझे घरचे लोकच येताहेत, तिथे आहेर आणि फिहेराच्या कसल्या रे सो-कॉल्ड रिती पाहताय?
यायचं, मस्त सगळ्यांनी एकत्र भेटायचं, चार क्षण मजेत घालवायचे, बरोबर जेवायचं...कसल्या भेटवस्तु आणी कसलं काय?
गटण्या, जर काही घेशील तर ते तुझ्याच बोकांडी पडेल हां...मी काहीही घेणार नाही!
ए गटण्या,
गटण्या, जर काही घेशील तर ते तुझ्याच बोकांडी पडेल हां...मी काहीही घेणार नाही!
ए गटण्या बघ रे! धमाल मुलगा काही घेणार नसेल तर उगाच खर्च कशाला?
आपला,
(पैसे जपून वापरणारा) तात्या.
वेडा...
कुठला..
तुला काय करच वाटल काय ही मंडळी आहेर आणतील.. 

लेका तुझे स्वातंत्र कस संपतय हे बघायला येणार आहेत ही सगळी..
(सावध)केशवसुमार..
स्वगतः आहेर कसला ...तुझ्याकडूनच काही घेउन गेले नाहीत म्हणजे मिळवले.. हा हा हा..
>>लेका तुझे
>>लेका तुझे स्वातंत्र कस संपतय हे बघायला येणार आहेत ही सगळी..
बरोबर आहे.
मला धमाल मुलाचा हमाल मुलगा कसा होतो आहे ते पहायचे आहे.
सखाराम गटणे
मला धमाल
मला धमाल मुलाचा हमाल मुलगा कसा होतो आहे ते पहायचे आहे.
हा हा हा! धमाल-हमाल हे यमक आवडलं रे गटण्या!
असो,
आपला,
(लग्न वगैरे करून 'माझी बायको', 'माझी मुलं', 'त्यांचं कसं होईल?', 'त्यांची पुन्हा लग्न', 'त्यांचं शिक्षण', 'त्यांचं करियर', 'माझी नातवंडं', इत्यादी कोणतेही पाश मरताना मागे नको असलेला!) तात्या.
--
हे पाश फार तापदातक असतात! सुटतच नाहीत शेवटपर्यंत! ८० वय झालं तरी 'आता माझ्या नातवाचं कसं होईल?!' ही चिंता असतेच! त्यापेक्षा नकोच ते पाश! साला, 'आप मेला जग बुडाला!' या सांसारिक मायामोहात कोण गुंतून राहणार?
आमी
आमी मणानं आम्ची प्रेजेंटी लावनार हये.
फोटुं नीट काडायचं न् हितं डकवायचं. हेच्यात आनाकानी जाली तर बरं न्हाय वायचं.
गोडगोजीरा...
गोडगोजीरा लाजलाजरा? धमु तु होणार नवरा!
फुलाफुलाच्या बांधून माळा, मंडप घाला गं दारा <
आम्ही लग्नाला येउ शकत नाही तेव्हा आमच्या वाटच्या अक्षता पण टाका.
मी येणार .......
लग्नाला मीपण येणार!
कुठे व किती वाजता जमायचे ते जमल्यास कळवा....
भेटवस्तु देण्यासाठी माझा पण हात वर
शेखर...
गटणे साहेब
आहेरा करिता कुठे संपर्क करावा... आपल्याला कींवा चिंचवड भागातील "मिपाकर" सांगा
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"