टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
औद्योगीक इसापनीती भाग चार (शेवटचा) - गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
भाग एक- http://www.misalpav.com/node/2330
भाग दोन- http://www.misalpav.com/node/2345
भाग तीन- http://www.misalpav.com/node/2363
औद्योगीक इसापनीती भाग तीन - गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्र येवून भरपूर शिकार मिळेल.
गढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.
रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत कही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.
घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण आभास एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.
सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्या जंगलात निघून गेला.
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
१) आपापल्या जंगलातील गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह ओळखा, आणि तेच का निवडले ह्याची कारणे द्या.
२) औद्योगीक इसापनीती साठी पुढचे भाग लिहा
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


चारही भाग-
वाचले. पहिला तितका आवडला नाही तरी पुढचे तीन झकास!
डिल्बर्टसारखे कॉर्पोरेटवरचे खरपूस व्यंग यानिमित्ताने वाचायला मिळत आहे.ही मालिका इतक्यात संपू नये असे वाटत आहे.
कृपया पुढे चालू ठेवावी.
आवाडले. माल
आवाडले.
मालिका संपवल्याबद्दल निषेध !!!!!!!!!!!!!!
सखाराम गटणे
)
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला
अगदी असेच
अगदी असेच म्हणतो.
मालिकेचे १३ भाग तरी करा हि विनंती.
प्रत्तेक भाग व्यवस्थापन दृष्टिनेही खुप शिकवुन जातो.
अमोल
-----------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
असेच म्हणतो..
तुम्ही लिहिलेले मस्त आहे..आवडले
अजुन लिहा..
स्वप्निल..
हा भाग
हा भाग मस्तच आहे...
आवडला...
आता गृहपाठाचे मनावर घ्या कोणीतरी असे म्हणतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
वा!
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
वा! तीनही बोध झकास!
अरूणराव, मालिका अजून सुरू ठेवा. छान चाल्लंय!
तात्या.
मालीका
औद्योगीक ईसापनीती पुढे चालू ठेवायला मलाही आवडेल. पण तुर्तास नको. त्याआधी मिपाकरांनी औद्योगीक ईसापनीतीच्या काही कथा लिहील्या तर वेगळीच मजा येईल. कारण वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव वाचायला मिळतील. कॉर्पोरेट जग अशा विविध घटनांनी भरलेले आहे!
रसिकांनी दिलेल्या उत्तेजनासाठी ॠणी आहे.