टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मायमराठी!
मिसळपाव अथवा मराठी संकेतस्थळावर मराठीतून लेखन करताना तिथल्या अंगभूत सोयीमुळे कोणतीच अडचण येत नाही. मात्र ऑर्कुट अथवा कोणत्याही संवादकात(मेसेंजर) लिहिताना बहुसंख्य लोक रोमन लिपीचा वापर करून मराठी लिहितात;थोडक्यात मिंग्लीशमध्ये संभाषण होत असते.
माझी अशी धारणा आहे की निदान दोन मराठी भाषकांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे मराठीत आणि लेखी संभाषणात देवनागरीतून संवाद साधावा. त्यासाठी मेतकूटवर आम्ही काही जणांनी मायमराठी हा समूह स्थापन केलेला आहे. आपण तिथे जरूर भेट द्या आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करा. आपल्या सूचना,शंका-कुशंका जर काही असतील तर जरूर विचारा. त्यावर विचार केला जाईल. शक्य त्या सर्व शंकांची उत्तरे दिली जातील .
या.मराठीचा झेंडा त्रिखंडात फडकवू या!
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


शुभेच्छा!
मायमराठीला अवश्य भेट देईन..
मायमराठीला अनेकानेक शुभेच्छा...
आपला,
(मराठी) तात्या.
ज्यांचे मेतकूटवर खाते नाही त्यांच्या माहिती साठी.
प्रत्येक मराठी माणसाने दुसर्या मराठी माणसाबरोबर कटाक्षाने मराठीतच बोलावे असे मी सगळ्यांना आवाहन करतो.
इथे लिहितांना अथवा कोणत्याही लेखी संभाषणात आग्रहपूर्वक देवनागरी लिपीचा आणि मराठीचाच वापर करावा आणि आपल्या मराठी भाषक मित्रमंडळींतही ह्याचा आवर्जून प्रचार करावा.
त्यासाठी बरहाआयएमई हे एक छोटेसे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर उतरवून घ्या आणि देवनागरीतून लिहायला आजपासूनच सुरुवात करा.
इथे लिहिताना सुरुवातीला थोडे जड जाईल पण थोड्या सरावाने हे सहजसाध्य होईल हे मी स्वानुभवावरून सांगतो.
काही अक्षरे लिहितांना उडणारा गोंधळ दूर करण्यासाठी ही एक मदत:
ख=kha,Ka
घ=gha,Ga
ङ=~ga
च=ca,cha
छ=Ca,Cha
झ=jha,Ja
ञ=~ja
ट=Ta
ठ=Tha
ड=Da
ढ=Dha
ण=Na
थ=tha.
ध=dha
फ=pha,Pa
भ=bha,Ba
श=Sa,sha
ष=Sha
ळ=La
क्ष=kSha
ज्ञ=j~ja
ॐ=oum
ऐ=ai
ऍ=~e
ऑ=~o
औ=ou
अं=aM
अ:=a:,aH
र्य=r^ya
म्=m^^(पाय मोडायचा असेल तर)
आशा आहे की आता आपण आपापसात देवनागरीतून मराठी भाषेत संवाद साधाल.
तथास्तु!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
बरहाआयएमई
हे सॉफ्टवेअर संगणकावर उतरवून घेउन लोड केले. वापरायला खुप सोपे वाटले , पण एक समस्या अशी आली कि संगणकावर आधिपासुन असलेले जे जे सॉफ्टवेअर होते त्यात परवलीचा शब्द स्विकारला जात नव्हता. जेव्हां बरहा काढुन (uninstall) टाकले तेव्हांच पुढे जाता आले.
परवलिचा शब्द!
हा रोमनमध्ये टंकला जातो. त्यासाठी जेव्हा बरहा आयएमई सुरु असते तेव्हा एफ११ही कळ दाबा. आता आपन रोमन मध्ये लिहू शकाल. पुन्हा देवनागरीसाठी एफ११ दाबा.
ह्याचा सराव व्हायला थोडा वेळ लागतो पण नंतर हे खूप सहजपणे करता येते.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
एफ११
ते मि सुरवतिलाच करुन पाहिले होते. हि सोय साध्या टंकण्यासाठि (पत्र वै. ) उपायोगि आहे पण परवलिच्या शब्दा साठि चाललि नाहि.
मी तर नियमित वापरतो!
आपल्याला हा त्रास का होतोय नक्की कळत नाही कारण मी तरी ही सोय नियमितपणे वापरतोय. कुठल्याही खात्यात पासवर्ड वगैरे भरतानाही त्रास होत नाहीये.
अजून एकदोनदा प्रयत्न करून पाहा. जमायला हवे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
कारण कळत नाहि
मि काल बराह लोड केल्या नंतर काहि वेळ वापरले , मला खुप आनंद झाल होता कारण गूगल टॉक मधे मरठित टंकता येत होते. दरम्यान मि थोडावेळ बाहेर गेलो होतो तेव्हां डेस्कटॉप लॉक झाला. आल्यावर पासवर्ड टाकला तर त्याने घेतला नाहि (ह्या वेळेस बराह इन्ग्लिश मोड मधे होता) . मला आधि असे वाटले कि माझे काहितरि चुकत आहे (कारण कालच मला माझा डेस्कटॉप चा पासवर्ड एक्सपायरि च्या कारणासाठि बदलावा लागला होता आणि मला असे वाटले कि नुकताच बदलेला पासवर्ड मला आठवत नाहिए). बरेच अयशस्वि प्रयत्न झाल्यावर असे आढळले कि माझा युजर आयडी लॉक झाला. मग प्रशासकाच्या मदतिने तो अनलॉक केला आणि पासवर्ड रिसेट केला.
आज सकाळि ऑफिस मधे आल्यावर जेव्हां मेल उघडत होतो तेव्हां त्याने परत त्रास दिला, मि मेलच्या प्रशासकाला गाठले , तो पण बरेच प्रयत्न करत होता, तेव्हढ्यात मला बराह चि शंका आलि आणि मि मेलच्या प्रशासकाला थांबायला संगितले. मि मग बराह अनइंस्टॉल केले आणि नेहमिचा पासवर्ड टाकला आणि त्याने तो स्विकारला.
(बराह रन होत असताना आणि पासवर्ड टाकाताना मि प्रत्येक वेळेस खात्रि केलि कि तो इन्ग्लिश मोड आहे)
बरहा मधून बाहेर पडा!
असा प्रश्न मला कधी आला नाही पण तुम्ही म्हणता तसे झाल्यास त्यावेळी हवे तर एका टिचकीसरशी बरहा मधून बाहेर(एक्झिट) पडा.
ह्याबाबत एखादा संगणक तज्ञच काही सांगू शकेल असे वाटते.
टास्कबारमधून तात्पुरते बरहा काढून टाका की काम होईल.
तरी देखिल असा त्रास तुम्हालाच का झाला? ह्याबद्दल मलाही कोडेच आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
हा आणखी एक युनिकोड संपादकही उपलब्ध आहे!
अत्यानंदजी, नेपाळ सरकारने आपल्याला आणखी एक देवनागरी युनिकोड संपादक उपलब्ध करून दिलेला आहे.
खालील दुव्यावरून तो उतरवून घेता येईल. वापरायलाही सोपा आहे. अक्षरसंकेत लक्षात ठेवण्याचीही गरज नाही.
http://www.chhahari.com/unicode/
शुभेच्छा!
अतिशय स्तुत्य उपक्रम, मी सामील झालोय.
मायमराठीला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा!!
(कट्टर मराठी) इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
संवादक आणि ऑर्कुट इ.
बराहा असेल,तर बराहा डायरेक्ट कार्यान्वित करून ऑर्कुट आणि संवादकांवरही देवनागरी (आणि काही निवडक भारतीय भाषा) लिखाण करता येते.
(माहीतगार)बेसनलाडू
धन्यवाद!
तात्या,इनोबा आणि चक्रपाणी धन्यवाद
मायमराठीचे सदस्य झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! तरीही एक गोष्ट सांगितल्यावाचून राहवत नाही की मायमराठी हा निव्वळ एक चर्चामंच आहे. महाजालावर मराठीचा आणि देवनागरीचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल ह्याबद्दल परस्परात विचार-विनिमय करण्याचे ते एक ठिकाण आहे. तेव्हा सदस्यांनी तिथल्या चर्चांमध्ये जातीने भाग घ्यावा. आपल्या अमूल्य सूचना तिथे मांडाव्यात जेणेकरून काही तरी ठोस काम करता येईल.
आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की कुणी तरी ओळखीचा माणूस सांगतोय म्हणून बरेचसे लोक अशा समुहाचे सदस्य होत असतात पण पुढे काय? तिथल्या चर्चेत सक्रीय सहभाग कधीच घेत नाहीत. म्हणून सांगतोय की आपले उद्दिष्ठ आहे ते मराठीचा आणि देवनागरीचा प्रत्यक्ष व्यवहारात जास्तीत जास्त वापर कसा होईल हे बघणे. नाहीतर सदस्य बनायचं आणि पूर्वीसारखेच मिंग्लीशमध्ये संभाषण सुरु ठेवायचे असे केले तर मग मूळ उद्देश कधीच सफल होणार नाही. तेव्हा लोकहो एक गोष्ट लक्षात असू द्या की
मायमराठीचे आपण सदस्य बना अथवा बनू नका पण देवनागरीतून मराठी संभाषण करणे सुरु करा. ह्याआधी जर करत असाल तर उत्तम पण ते कोणत्याही परिस्थितीत थांबवू नका आणि शेवटी महत्वाचे म्हणजे आपल्या मित्र-मंडळींनाही ह्या चळवळीत सक्रीय सामील करून घ्या.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
अवांतर!
मनात आलेला एक अवांतर विचार -
महाजालावर मराठीचा आणि देवनागरीचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल ह्याबद्दल परस्परात विचार-विनिमय करण्याचे ते एक ठिकाण आहे.
हो, परंतु याकरता खुद्द काही मराठी माणसांनीच खोडा घातला होता याचे वाईट वाटते! स्पष्टच सांगायचे झाले तर गमभनकार ओंकार जोशी यांनी मनोगताचे मालक वेलणकर यांना मनोगताच्या फॉन्ट संदर्भात अनेकदा पत्र पाठवले होते. परंतु फॉन्ट संदर्भात मनोगताच्या मालकांनी कुठलेही सहकार्य करण्यास ठाम नकार दिला!
देवकाका,
"महाजालावर मराठीचा आणि देवनागरीचा प्रचार आणि प्रसार कसा करता येई"" असे आपण कळकळीने म्हणताय खरे, परंतु या संदर्भात, गमभनकार ओंकार जोशींसारखी माणसे जेव्हा काही काम करू पाहतात, काही मदत मागतात, तेव्हा एका सोकॉल्ड बलाढ्य व प्रतिष्ठित समजल्या जाणार्या मराठी संकेतस्थळांच्या मालकांकडूनच त्यांना कुठलिही मदत न मिळता संपूर्ण असहकार्य मिळाले होते हा इतिहास आहे! मराठी माणसाच्या, मराठी माणसांच्याच बाबतीतल्या ह्या कूपमंडूक वृत्तीचे वाईट वाटते!
परंतु ओंकार जोशींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण त्यांनी हिम्मत न हारता, अविरत मेहनत करून गमभन ही प्रणाली शोधून काढली, एवढेच नव्हे तर डबक्यातल्या कूपमंडूक वृत्तीने ती स्वत:ची काही खाजगी जहागीर आहे असा कुठलाही अविर्भाव न ठेवता आंतरजालावर मुक्तस्त्रोतात सर्वांकरता उपलब्धही करून दिली! आणि आज गमभन या मुक्तप्रणीलीमुळेच मिसळपाव, उपक्रम यांसारखी संकेतस्थळे उभी राहू शकली!
मिसळपाव हे संकेतस्थळ बलाढ्य बनेल किंवा नाही हे माहिती नाही परंतु ते गमभनचे मात्र नेहमीच ऋणी राहील!
तात्या.
शत प्रतिशत सहमत!
ओंकार जोशी आणि त्याच्या सारखी पडद्याआड शांतपणे कार्यरत असणारी माणसे जोवर ह्या महाराष्ट्रात आहेत तोवर निदान महाजालावरील मराठी भाषेला मरण नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माझ्यासारख्या सामान्य माणसाला जे भावले ते मी आपल्या लोकांसमोर मांडतोय. त्यामुळे निदान काही जण जरी देवनागरीकडे वळले तरी भरपुर होईल , कारण कोणतीही सुधारणा सहजासहजी होत नसते. त्याबद्दल मनात नानाविध शंका-कुशंका असतात. त्या शंकांचे जमेल तितके निवारण करत आपण आपले काम इमाने इतबारे करणे इतकेच आपल्या हातात आहे. ओंकार जोशी आणि त्याच्याच सारख्या इतर बुद्धिमान व्यक्ती आपल्या समाजात आहेत म्हणून निदान आपल्याला देवनागरी टंकलेखनाची सुविधा प्राप्त झालेली आहे. तिचा पुरेपुर वापर केला तरच त्यांच्या श्रमाचे सार्थक होईल. अन्यथा "हेचि फल काय मम तपाला" असे म्हणण्याची त्यांच्यावर पाळी येईल. तसे होऊन चाणार नाही.
गुण-अवगुण प्रत्येकाच्यात असतात आणि व्यक्तीचा समूह मिळूनच समाज बनतो. तेव्हा समाजातही गुणावगुण असणारच. आपण फक्त गुणांचे गायन करून अवगुणांना थारा देऊ नये असे वाटते. तेव्हा सद्या आपण जिथे आणि जसे जमेल तसे फक्त देवनागरीत टंकलेखन करण्याबाबत आपल्या सर्व मराठी बांधवांना आवाहन करू या,
तात्या तुझ्या प्रतिसादाशी मी शत प्रतिशत सहमत आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
प्रतिक्रिया
एक सुचोवणी
महाजालावर मराठीचा आणि देवनागरीचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल
एक सुचोवणी
मराठीच्या प्रसाराच्या कृतिशील उपक्रमबद्दल देव साहेबांचे अभिनन्दन.
देवनागरी सोबत आपण मराठीचे एक अंगभुत ओळख आपण विसरतो आहोत असे वाटते.
ही म्हणजे "मोडी" लिपी.
कचेरी तला आमच्या सहकारी माझ्या cube मधे टांगलेल्या कवितेला "हिन्दी जैसा लगताहै लेकीन समज़ नही आता"
असे उद्गार ऐकल्यावर मराठीला नसलेली स्वतंत्र ओळख प्रकर्षाने जाणवली
मोडी!
मोडी लिपी हौस म्हणून शिकायला काहीच हरकत नाही पण ती केव्हाच व्यवहारातून हद्दपार झालेली आहे. माझ्या बालपणीही मोडी शिकवत नव्हते. सद्याच्या पिढीला संगणकावर लिहिताना देवनागरी देखिल कठीण जातेय तिथे मोडीसाठी कोण मेहनत घेणार आहे? मी आज छपन्न वर्षांचा आहे तेव्हा लक्षात घ्या की जिथे माझ्या पिढीने मोडी गिरवली नाही तिथे आताची पिढी गिरवेल असे मुळीच वाटत नाहीये. म्हणून निदान सद्या हयात असलेली देवनागरी तरी टिकून राहावी म्हणून मी हा प्रयत्न तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने करू इच्छितोय. नाहीतर उद्या देवनागरीची देखिल मोडीसारखीच परिस्थिती होईल.
अहो आज काय परिस्थिती आहे पाहा... जे सहजपणाने व्हायला हवे आहे ते होत नाही म्हणून लोकांना देवनागरीत लिहा असे आवाहन करावे लागत आहे. ह्यावरूनच काय ते समजा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
देवनागरी आणि मोडी
व्यवहारातून झालेल्या हद्दपारीबद्दल बोलायचे तर खुद्द मराठी भाषा ही या वर्गात मोडते. ( उदा मुम्बई)
देवनागरीचा वापर कमी झालाय याचे मुख्य कारण देवनागरी टंकण्यातला
अवघडपणा व वेळखाऊपणा.
या साठी सोपा पर्याय निर्माण झाला तर लोक आपोआप नागरीकडे वळतील.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एक गोष्ट जाणवली होती.
ब-याच लोकांच्या मोबाईल फ़ोनची भाषा मराठी असते पण कॉन्टक्ट बॉक्स धेडगुज-या इन्ग्लिश मधे असतो .
कारण वरचेच. (हे लोक स. म. स. क्वचित वापरतात आणि का वापरत नसतील याचे कारण आता उघड आहे)
देवनागरी वा मराठी साठीची धडपड ही पुनरुत्थानाचीच चळवळ आहे.
मग याच्या सोबतीने मोडीचा समावेश म्हटला तर चुकते कुठे ?
ही पुढची वा लांबची गोष्ट असेल हे मला मान्य आहे. पण "मायमराठी" नाव असणा-या मंचासाठी परकी/बहिष्कृत आहे असे मला वाटत नाही
मायमराठीसाठी बहिष्कृत नव्हे!
मग याच्या सोबतीने मोडीचा समावेश म्हटला तर चुकते कुठे ?
ही पुढची वा लांबची गोष्ट असेल हे मला मान्य आहे. पण "मायमराठी" नाव असणा-या मंचासाठी परकी/बहिष्कृत आहे असे मला वाटत नाही
मोडी बहिष्कृत झालेय असे मी म्हटले कारण जर आजपर्यंत ती कुणी शिकलेलीच नसेल तर ह्या घटकेला कुणी(अपवाद वगळता) मुद्दामहून ती शिकेल असे वाटत नाही. देवनागरीचा आग्रह इतक्याच साठी की आपण मराठी ,हिंदी आणि संस्कृत ह्या भाषा ह्याच लिपींच्या द्वारे अभ्यासलेल्या आहेत. देवनागरी आपल्या चांगल्या ओळखीची देखिल आहे. आता संगणकावर टंकलेखन करताना ती थोडी वेळखाऊ वाटते म्हणून लोक सहजप्रवृत्तीने रोमन लिपीकडे वळतात. हेच लक्षात घेऊन, त्याबाबतची भिती दूर करून आपल्या लोकांना आपली भाषा आपल्या ओळखीच्या आणि सरावाच्या लिपीतून लिहीता येईल असे वाटते म्हणून हा प्रपंच आहे. तसे पाहिले तर मराठी भाषा टिकवणे हे एखाद्या व्यक्तीच्या अथवा छोट्या समुहाच्या हातात नाहीये. पण ही छोटीशी ज्योत पेटवलेय. ह्या ज्योतीने असंख्य ज्योती पेटाव्यात अशी इच्छा आहे. बघू पुढे काय होते ते.
मोडी शिकवणारे आणि शिकणारे दोन्ही प्रकारचे लोक मायमराठीत येऊ शकतात. त्याबद्दल इथे आपली मते मांडू शकतात. त्यावर चर्चा करू शकतात. अशा गोष्टींना प्रतिबंध मुळीच नाही. पण मी वैयक्तिक रित्या त्या बाबत अनभिज्ञ असल्यामुळे त्यात पुढाकार घेऊ शकत नाही. ज्या लोकांना मोडीबाबत माहिती आहे.त्यात गती आहे त्यांनी जरूर इथे मार्गदर्शन करावे.
मायमराठीत मराठी भाषेबाबत सर्वांगीण चर्चा व्हावी अशी इच्छा आहे पण त्यात लोकांनी सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय ते शक्य नाहीये. देवनागरीतून लेखन हे ह्याबाबतीतले एक प्राथमिक पाऊल आहे. पुढचा पल्ला खूप दूरचा आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
आम्ही पण वाटसरु
मायमराठीत मराठी भाषेबाबत सर्वांगीण चर्चा व्हावी अशी इच्छा आहे पण त्यात लोकांनी सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय ते शक्य नाहीये. देवनागरीतून लेखन हे ह्याबाबतीतले एक प्राथमिक पाऊल आहे. पुढचा पल्ला खूप दूरचा आहे.

या प्रवासात आम्ही पण वाटसरु असु
गाणी, लिपी, भाषा, साहित्य वगैरे माध्यमतून मराठी हि cool thing आहे हे माझ्या पिढीपर्यन्त पोहचायची गरज आहे.
माझ्या वयाची दोन मुले जेव्हा हिन्दीत बोलतात तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते
खर तर
खर तर देवनागरी ऍवजी मोडी हि लिपी असती तर कदाचीत मराठीची अवस्था आज बरी असती.
सहमत
शैलेन्द्र यांच्या मताशी सहमत.
मराठी ची स्वतंत्र ओळख आत जरी नसली तरीही कालचक्र उलटे फ़िरवणे अवघड वाटते.
आस्ते आस्ते मोडी ची ओळख वा अभ्यासक्रमात समावेश कदाचित पर्याय असेल.
अर्थात आधीच मुलांच्या माथी किती ओझे देणार हा ही प्रश्न आहेच
सभासद झालो :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
मोडीची आता सक्ती नको
एखादी भाषा किंवा लिपी वापरात रहात नाही हे दुर्दैवी आहे. मोडी असती तर मराठीला वेगळे, स्वतंत्र अस्तित्व असते का नसते हे महत्त्वाचं नाही. आता आहे ते कसं टिकवता येईल याचा विचार झाला पाहिजे. "डावा म्हणजे काय" किंवा "सत्त्याऐशी म्हणजे किती" असे प्रश्न आज मुंबई-पुण्यातले पंचविशीतले मराठी लोक विचारतात. किमान असे प्रश्न कमी झाले तर मोडी शाळेत शिकवण्याचा विचार करता येईल.
आणि मला स्वतःला बरहा आवडत नाही, कारण अजूनपर्यंत मला ते लिनक्स वर चालवता आलेलं नाही आहे. गमभन बेश्ट आहे.
एक जाहीर प्रश्न!
मायमराठी समुहाचे सदस्यत्व स्वीकारलेल्या सर्व मिपाकरांना एक जाहीर प्रश्न?
किती जणांनी आपापसात मिंग्लीश ऐवजी देवनागरीतून मराठीत संवाद साधायला आवर्जून सुरुवात केली आहे?
केली नसल्यास, का?कारण कळेल काय?
जर आपण देवनागरीचा वापर करणार नसाल तर मग ह्या समुहाचे सदस्यत्व घेण्यामागचा हेतु काय? निव्वळ प्रमोदकाकांना वाईट वाटू नये म्हणून? तसे असेल तर मात्र मला खरेच वाईट वाटेल.कारण निव्वळ माझ्यासाठी जर असे कुणी करत असेल तर...कृपा करून असे काही करू नका. ज्यांना आपल्या मातृभाषेबद्दल खरे प्रेम असेल त्यांनीच सभासद व्हा आणि देवनागरीचा उपयोग त्वरीत सुरु करा.अर्थात..देवनागरीचा वापर सुरु करण्यासाठी मायमराठीचे सदस्यत्व स्वीकारलेच पाहिजे असे तरी कुठे आहे? तुम्ही स्वत:हून केव्हाही सुरुवात करू शकता. मग हा समूह का स्थापन करावासा वाटला?
समूह स्थापन करण्याचा उद्देश अतिशय मर्यादित आहे. ज्या लोकांना देवनागरीतून टंकलेखन करण्याबाबत ज्या काही अडचणी येतात त्या उघडपणे मांडता याव्यात म्हणून हे एक व्यासपीठ आहे. तुमच्या शंका इथे विचारा म्हणजे इथलेच जाणकार सदस्य तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
माय मराठी.
प्रमोदकाकांना वाईट वाटू नये म्हणून?
प्रिय,
देव साहेब,
खरे बोलण्यास वाईट वाटते की, आम्ही केवळ देवसाहेबांना वाईट वाटू नये म्हणुनच मायमराठीचे सदस्य झालो, अर्थात माय मराठीवर मित्र मैत्रिणी मिळतील अनुभवांचे शेअरींग होईल या उद्देशाने तो कट्टा आम्हाला आवडत आहेच. पण काही दिवसापासून आम्हाला वाटतंय, की आपली भुमिका ही सर्वच जालावर वावरणा-या किमान ओळखीच्या मित्रपरिवाराने तरी देवनागरिचा वापर करावा अशी दिसत आहे, पण ते होत नाही याचे कारण लोकांची स्वच्छंदी वृत्ती. इतर ठिकाणी मराठी लिहितो आणि कधी कधी लिहिण्याचाही प्रयत्न करतो तेव्हा त्यासाठी एखाद्या समुहाकडून देवनागरिचा कायदा व्हावाच असे अपेक्षीत धरु नये असे वाटते. खरं तर माय मराठीवर प्रेम करणारे एकत्र यावेत त्यांची मैत्री व्हावी, आणि त्यांनी देवनागरितून विचारांची आदान-प्रदान करावी केवळ याच उद्देशाने एक उज्जवल भवितव्य आपल्या कट्ट्याला असू शकेल. समजा आम्ही जरी मराठी भाषेबद्द्ल तिथे काही लिहु असे ग्रहित धरले तरी येणा-या सदस्यांत माय मराठीबद्दल प्रेम वाढून ते त्या क्षणापासून देवनागरि लिहायला सुरुवात करतील अशी अपेक्षा ठेवने कदाचित वेडेपणाचे ठरेल. पण आपण जरा कायदाच करु इच्छित असाल तर त्यातून काही निष्पन्न होईल यावर माझा विश्वास नाही. ऒर्कुटवर माय मराठीचे किती तरी कट्टे आहेत. इथे केवळ परिचयातील मित्र मैत्रिणी आहेत, आणि त्यांचे माय मराठीवर प्रेम आहे, सध्या तरी आपण हा उद्देश ध्यानात घ्यावा असे वाट्ते. तर आपला कट्टा यशस्वी होइल. आपला कट्टा केवळ लिहिण्याचा आत्मविश्वास वाढवेल पण त्याच्या आयुष्यात देवनागरिने वस्ती केली असे म्हणून नये किंवा आपल्या कट्ट्याने फार मोठी चळवळ उभी केली असेही आपण समजू नका. अर्थात आपण सुरुवात केली आहे. हळू हळू लिहिणारे, बोलणारे, भाषेबद्दल तळमळ वाटणारे, लिहितीलही....कदाचित आपला मायमराठीचा कट्टा वेग घेईलही. पण नुकत्याच जन्मलेल्या गरुडाच्या पिलाकडून आकाशात मुक्त भरारी घेण्याची अपेक्षा करु नये इतकेच सांगणे आहे.
-दिलीप बिरुटे
(आपला
मायमराठीचा कार्यकर्ता)