१० वी 'क' - भाग ४

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
20 Dec 2012 - 1:29 pm

१० वी 'क' - भाग १

१० वी 'क' - भाग २

१० वी 'क' - भाग ३

थोडंस ओशाळत आणि सगळ्या वर्गाची नजर चुकवत कुलकर्णी दुसर्‍या रांगेतल्या पहिल्या बेंचवर जाड्या साठेच्या बाजूला जावून बसली. कुलकर्णीच्या येण्याने तात्पुरता खंडीत झालेला ओळखपरेडचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. आणि मराठीच्या पुस्तकावर असलेली माझी नजर वारंवार तिच्याकडे जाऊ लागली. तीला पाहताना आत-मनात प्रचंड उलथापालथ होत होती. दिसायला एकदम गोरीपान, रेशमी झुळझुळीत केसं, गहिरे आणि काळेभोर डोळे. कुलकर्णीने शाळेच्या पहिल्याच दिवशी माझ्यावर गारूड केलं होतं, मला ती भयंकर आवडली होती. समोरच बसलेल्या ठोंबरे बाई, बाजुचा पाल्या, संपुर्ण वर्ग या सगळ्याचा मला विसर पडला होता. संपुर्ण वर्गात मला फक्त माझं नि कुलकर्णीचंच अस्तित्व जाणवत होतं. वर्गातला एकेक जण उठून नाव सांगत होता, खाली बसत होता. ठोंबरे बाईंच वर्गावर लक्ष ठेवणं चालू होतं. वर्गातली मुलं-मुली हळूहळू आवाजात कुजबूजत होती. पाल्याही मराठीचं पुस्तक वाचण्यात गुंग होता. पण मी या कशातच नव्हतो. मी माझ्या स्वत:च्याच दुनियेत हरवलो होतो. अचानक सार्‍या वर्गाच्या खिदळण्याने भानावर आलो. सारा वर्ग खदाखदा हसत होता.

चमकून पाल्याला विचारल "काय झालं?"

"तीचं आडनाव काये माहीतेय का?" समोर उभ्या असणार्‍या मुलीकडे खुणवत पाल्या म्हणाला.

"क्काये?"

"सुचिता आगलावे!"

"बोंबला तेजायला....आगलावे!!"

"ह्या ह्या ह्या.." मी हि सार्‍या वर्गाच्या खिदळण्यात सामिल झालो. आगलावेच्या चेहर्‍यावर प्रचंड राग पसरला होता. आपल्या आडनावावर सारा वर्ग हसतोय म्हणून तीचा पारा होता चढू लागला होता.

"आगलावे...म्हणजे आग लावण्याचीच कामं जास्त करत असणार" पोरांमधून कोणीतरी बोललंच. सारा वर्ग पुन्हा खळखळून हसला.

आता मात्र आगलावे चिडली आणि एकदम तोर्‍यात बोलली"हो. आहे माझं आडनाव आगलावे, तुम्हाला काही प्रॉब्लेम?"

"नाही तुम्ही लावा आग, पाणी टाकण्याचं काम आम्ही व्यवस्थित करू." पुन्हा कोणीतरी वात्रट पोरगं बोललंच. पोरं पुन्हा जोरात हसली. हसताना सहज कुलकर्णीकडे लक्ष गेलं तर ती हि तोंडावर रूमाल ठेऊन खुदूखुदू हसत होती.

उफ्फ!! पार घायळ झालो तिच्या हसण्यावर.

हसताना मध्येच चेहर्‍यावर आलेली केसाची बट ती बोटाने मागे सारण्याची तिची ती लकब. तेव्हा तर माझ्या ह्रदयातली धडधड अजूनच वाढायची. वर्गात फुल्ल धम्माल सुरू होती. पोरींची नावं सांगून झाली आणि पोरं उठून आपापली नावं सांगू लागली.

"प्रसाद लाटणे" पोरांच्या रांगेतलं पाचव्या सहाव्या बाकावरचं पोरगं उठून उभं राहीलं.

"हो क्का? मग पोळपाट कुठंय??" आगलावेने आपली आग दाखवायला सुरूवात केली आणि पुढील वर्षभरात काय घडेल याची छोटीशी चुणूकच दाखवून दिली. ओळखपरेड संपली आणि बाईंनी पिरेडचं टाईमटेबल लिहून दिलं. टोल पडले तरीही ठोंबरे बाई थांबल्या होत्या कारण पुढचा पिरेड ना.शाचा होता आणि ना.शाला असलेले आमच्या शाळेचे मुख्यधापक जाधव सर आज शिकवायला येणार नव्हते. हजेरी संपवली नि मराठीचं पुस्तक काढून ठोंबरे बाईंनी शिकवायला सुरूवात केली. सारा वर्ग आता शांतपणे ऐकू लागला होता. शिकवण्याकडे माझंही तसं लक्ष होतंच पण नजर अधून मधून कुलकर्णीकडे जात होतीच. शिकवणं झाल्यानंतर बाईंनी प्रत्येकाला धडा मनात वाचायला सांगितला. एवढं होईतो टोल पडले आणि तास संपला. एका हातात हजेरीचं रजिस्टर आणि पुस्तकं घेतं आणि दुसर्‍या हाताने चष्मा नीटनेटका करत ठोंबरे बाई निघून गेल्या. पुढचा पिरेड संस्कृतचा होता. कोणी आलं नव्हतं म्हणून मग सगळ्या वर्गाच्या गप्पांना ऊत आला. तसं दरवाजाकडे लक्ष होतंच. पाच-दहा मिनिटांनी प्रसन्न हसत महाजन बाईंनी वर्गात प्रवेश केला. बाई आम्हाला संस्कृताला आल्या होत्या.

'येस्स', 'स्सही', 'भारीच'. संपुर्ण वर्गात आनंद पसरला आणि प्रत्येकाच्या तोंडून असे शब्द बाहेर पडत होते. मनमोकळ्या स्वभावाच्या आणि मुलांना समजून घेणार्‍या महाजन बाई शाळेतल्या प्रत्येकाला आवडायच्या. त्यामुळेच कि काय त्यांच आमच्या वर्गाला संस्कृताला येणं हि खुप आनंदाची गोष्ट होती. महाजनबाई आहेत म्हटल्यावर आता संस्कृताचं काही टेशंनच नव्हतं. "ठोंबरे बाई का वर्गशिक्षक?" महाजन बाईंनी आल्या आल्या विचारलं. मग थोडा वेळ शांत बसून त्यांनी सुभाषितं शिकवायला सुरूवात केली.

१० वी च्या वर्षातलं पहिल्या दिवसाचं शिकवणं एवढंच झालं. शाळा त्यादिवशी लवकर सुटली. पाल्या नि मी घरी निघालो तसा आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आणि बघता बघता पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. आषाढातला तो पाऊस तहानलेल्या भुमीवर वर्षाव करत तिला ओलचिंब करून तीचं मन तृप्त करत होता. आणि इकडे माझ्या मनात कुलकर्णीच्या आठवणींचे तुषार उसळून माझ्या अंतर्मनाला तृप्त करत होते. छत्री, रेनकोट काहीच नसल्याने भिजतच आम्ही घरी पोहचलो. अंतर्मनात काहीतरी मोठ्ठं खळबळजनक घडत असलं तरी गोडं वाटत होतं आणि म्हणूनच बाह्यरंगी मी थोडासा आनंदातच होतो.

शाळेचा पहिलाच दिवस चुकवला नाही म्हणून आईसाहेब खुष झाल्या होत्या. गेल्या गेल्या तीला इंगळेबाईंचा किस्सा सांगितला आणि मोठमोठ्याने हसायला लागलो. "ह्या वर्षी शाळेला एकही दांडी मारणार नाही" रात्री सगळे एकत्र जमल्यानंतर मी डिक्लेरच केलं.

"अर्रे व्वा! अभ्यासाचं महत्व शाळेच्या पहिल्याच दिवशी कळालं वाटतं कि आणखी काही भानगड आहे?" बंधुराजांनी खोचटपणा चालू केलाच. पण अण्णांनी नि आईसाहेबांनी माझ्या निर्णयाचं कौतूक केलं.

"सच्चू, या वर्षी रिझल्टनंतर तुला माझ्याकडचं 'एच.एम.टी'चं घड्याळ बक्षीस मिळणार आहे." बांबानी मी खुप अभ्यास करून पास व्हावंच म्हणून चावी द्यायला सुरूवात केली. त्याचं कारण म्हणजे फक्त चावीवर चालणारं ते घड्याळ मला खुप आवडायचं. आता हे शिवधनुष्य पेलायचंच हा निर्धार मनाशी पक्का केला.

शाळा सुरू होऊन आठवडा होत आला होता. मी आणि पाल्या रोजच्या रोज शाळेत जात होतो. त्यातल्या त्यात मी कुलकर्णीच्या अनामिक ओढीने रोजच्या रोज शाळेकडे ओढला जात होतो. पण या साल्या बापलेकरचा अजूनही पत्ता नव्हता. त्याने कदाचित शाळा सोडून दिली असल्याची किंवा बदलली असल्याची शक्यता मी पाल्याला बोलून दाखवली आणि त्याने ती लगेचच खोडूनही काढली. आणि एक दिवस शाळेच्या गणवेशात पाठीवर दप्तर टाकलेला बापलेकर एका नव्या कोर्‍या रेंजर सायकलसह आमच्या ठरलेल्या ठिकाणी माझी नि पाल्याची वाट पाहत उभा असलेला आम्हाला दिसला.

क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Dec 2012 - 1:43 pm | श्री गावसेना प्रमुख

तीला पाहताना आत-मनात प्रचंड उलथापालथ होत होती. दिसायला एकदम गोरीपान, रेशमी झुळझुळीत केसं, गहिरे आणि काळेभोर डोळे. कुलकर्णीने शाळेच्या पहिल्याच दिवशी माझ्यावर गारूड केलं होतं, मला ती भयंकर आवडली होती.

1आयला अश्या पोरीच्या पेर्मात कोनीबी पडायच

पैसा's picture

20 Dec 2012 - 3:26 pm | पैसा

वाचतेय, यावेळी उशीर झाला बर्का. पुढचा भाग पटापट लिही.

कौस्तुभ खैरनार's picture

20 Dec 2012 - 3:37 pm | कौस्तुभ खैरनार

कृपया आधीच्या भागांचे धागे द्यावे.

कवितानागेश's picture

20 Dec 2012 - 3:54 pm | कवितानागेश

http://www.misalpav.com/user/14416/authored
इथी या लेखकाचे सर्व लेखन सापडेल. :)

इष्टुर फाकडा's picture

20 Dec 2012 - 4:05 pm | इष्टुर फाकडा

वो किसनद्येवा आधीचं भाग दिसंना झाल्यात व्हो. ते आधी द्येवा.
आम्हीबी १० वी क मध्येच हुतो. पर शेन्ट भावेज मधी हुतो. समदी गडी मानसं. म्हनुन्श्यान ह्ये वाचाया ग्वाड वाटतया. येउंद्या फूडला भाग लगीच !

धुमकेतू's picture

20 Dec 2012 - 4:29 pm | धुमकेतू

>>>>>>आम्हीबी १० वी क मध्येच हुतो. पर शेन्ट भावेज मधी हुतो. समदी गडी मानसं. म्हनुन्श्यान ह्ये वाचाया ग्वाड वाटतया. एक नंबर !!!

धुमकेतू's picture

20 Dec 2012 - 4:27 pm | धुमकेतू

हे सगळे मला "शाळा " ह्या पुस्तकासारखे का वाटत आहे ?

म्हणजे "३ idiot " हा अमीर खान चा सिनेमा आणि "5 point someone" हे चेतन चे पुस्तक यात जसे थीम एक असून सुध्दा फरक आहे , ( ज्यांनी तो सिनेमा आणि ते पुस्तक वाचलेले आहे त्यांना लगेच कळेल ) आणि दोन्ही छान आहे , तसेच जर "शाळा " पुस्तक आणि किसन ची "१० वी क " असेल तर सरस होईन !!!!

अनिल तापकीर's picture

20 Dec 2012 - 5:14 pm | अनिल तापकीर

आयला लयच भारी लिवलया सगळं जुनं दिस आठवायला लागलं बुवा आनि सारं भाग एकत्र दिसतिल असंकाय तरी करा देवा, बाकी शैली एकदम फक्कड हाय बरकां

अभ्या..'s picture

20 Dec 2012 - 5:17 pm | अभ्या..

जाउ द्या ओ, एकतर ती कुलकर्णी का शिरोडकर ते विसरायला झाले होते. आता आलीय ना एकदाची.
बघू आता सचिन्राव काय काय करतेत.
देवा तुम्ही मात्र एवढा गॅप मारू नका.

अरुण मनोहर's picture

20 Dec 2012 - 6:33 pm | अरुण मनोहर

वाचतोय. वाचनीय आहे.

अनन्न्या's picture

20 Dec 2012 - 7:27 pm | अनन्न्या

पहिले भाग वाचायचे आहेत पण हा भाग आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2012 - 7:54 pm | अत्रुप्त आत्मा

किसनद्येवांची "साळा" अवडली. ;-)

५० फक्त's picture

20 Dec 2012 - 10:39 pm | ५० फक्त

एवढा मोठा गॅप का हो, शाळेचं बांधकाम काढलं होतं काय ट्रस्टिन??

प्यारे१'s picture

20 Dec 2012 - 11:09 pm | प्यारे१

शाळेत काय अनुत्तीर्ण वगैरे झाला होतात काय आमच्यासारखे ? गॅप लय पडलाय म्हणून हो!

पुढचा भाग बी लैकर लिव्हा की.

पुढच्या भागात लेकरं लिव्हा.. असं वाचलं

इनिगोय's picture

21 Dec 2012 - 10:09 am | इनिगोय

मस्तच हो बोकिल :)

आगलावे भारीच खटकेबाज दिसतेय!

आणि हो, आधीचे धागे दिसते केल्याबद्दल आभार.

आधीच्या अनुभवावरून शेवटच्या भागाखेरीज प्रतिसाद देणारच नाही ;)

हा प्रतिसाद मोजण्यात येऊ :D

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2012 - 2:01 am | निनाद मुक्काम प...

किसन देव आम्हाला पावले व आम्ही भरून पावलो
पुढचा भाग
लवकर येऊ दे .

उशीरा का असेना लिहिलास याचा आनंद आहे, शिवाय कथे मुळे स्मृती रंजन होते आहे ;)

सूड's picture

26 Dec 2012 - 11:03 am | सूड

पुभाप्र !!

शुचि's picture

26 Dec 2012 - 11:11 am | शुचि

हा भागही आवडला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Dec 2012 - 10:07 am | ज्ञानोबाचे पैजार

लै झकास चालली आहे गोष्ट. इटरेस्टींग, पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे.
तेवढे ते पोरीचे अडनाव मात्र बदला. आडनाव आणि तीचे वर्णन यात प्रचंड विसंगती आहे.
तीचे अडनाव पोंक्षे, लेले, गोखले असे एकारांती असते तर गोष्ट खरी वाटली असती.
बाकी प्रेमात पडल्यावर माणुस आपली विवेक बुध्दी गमावतो हेही खरे आहे म्हणा. याच विचाराने हे वर्णन असले तर ठीक आहे. पण तसा खुलासा करा बुवा,
पैजारबुवा,

अनिल तापकीर's picture

5 Jan 2013 - 3:46 pm | अनिल तापकीर

हा पण जाम आवडला आता पुढचा तेवढा लवकर येउद्या

भुमन्यु's picture

7 Jan 2013 - 4:30 pm | भुमन्यु

पु भा प्र

-------------
आयुश्य खुप सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर बनवणार आहे.

आदूबाळ's picture

7 Jan 2013 - 11:38 pm | आदूबाळ

फुडलं कदी येनार?

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Aug 2017 - 4:00 pm | माम्लेदारचा पन्खा

पुढचा भाग कधी येणार ?

अभ्या..'s picture

19 Aug 2017 - 5:52 pm | अभ्या..

कैच्याकै,
उद्या मोहेंजोदारो परत उकरशील आणि म्हनशील नर्तिका कुठाय?

गामा पैलवान's picture

19 Aug 2017 - 8:14 pm | गामा पैलवान

हाहाहा ! खोखोखो !! फिदीफिदीफिदी !!!

-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2022 - 6:07 pm | चौथा कोनाडा

झकास .... आमचे बी दिवस आठवले :-)

हे सगळे लेखक असे का? कथेची उत्कंठा वाढवून गायब होतात. निदान लगेचच शेवटचा भाग टाकून पूर्ण करून तरी गायबवा ना स्वताःला. 2012 नंतर अजूनही शेवट नाहीच , ऊत्सुकता वाढली खहे आता तरी लेखक महाशयांनी शेवट टाकावा ही नम्र विनंती