टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
थोरांची टोपण नावे.
प्रेषक मी ( गुरू, 06/26/2008 - 12:21) .
सखाराम_गटणेंच्या लेखावरून मला ही चर्चा सुचली. बर्याच थोरामोठ्यांना लोक टोपण नावाने ओळखतात. पण एकच टोपण नाव अनेकांना मिळाल्याचे दिसते. म्हणजे बघा
तात्या
तात्याराव सावरकर
तात्या टोपे
सेनापती बापट
नाना
क्रांतीसींह नाना पाटील.
नाना फडणवीस
नानासाहेब पेशवे.
बाबा
बाबा आमटे
बाबाराव सावरकर
भालजी पेंढारकर
तुम्हीही यात थोडी भर घाला.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


नाना
नाना पाटेकर
बाबा आढाव
पंचमदा - आर. डी बर्मन
दादामुनी - अशोककुमार
आबा
आबा
आर.आर. पाटील ( आता हे थोर / मोठे आहेत की माहित नाही)
पंत
मा. मनोहर जोशी
भर ...
दादा आणि अण्णा नाव असणारेही बरेच थोर होऊन गेले
हो...
स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करणारे, अण्णासाहेब कर्वे आठवले (धोंडो केशव ना नाव?)..
बाकी आण्णा हजारे देखील आठवले...
दादा म्हटल्यावर दादाभाई नौरोजीच आठवताय्त.. अजुन कोण दादा आणि आण्णा आहेत?
ह्म्म तात्यांचे आणि समस्त संगीतप्रेमींचे अण्णा आहेत म्हणा..
http://bhagyashreee.blogspot.com/
अजुन दादा आणि आण्णा
दादा
दादा साहेब फाळके
आमादेर सौरभ दादा
आण्णा
सी एन अण्णादुराई
कानडी अभिनेते "आण्णावरु " राजकुमार
झालेच तर आमची Anna Kournikova
अण्णा
अण्णा !!!
कर्मवीर भाउराव पाटील....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
तात्या
तात्या
विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर
दादा...
दादा कोंडके
बापू
बापू:
सखारामबापू बोकील
बापू गोखले
म. गांधी
बाळः
बाळ ठाकरे
लो.टिळक
पुण्याचे पेशवे
बाळ
बाळ ठाकरे
लो.टिळक
मला वाटते दोघांची खरी नावे बाळ आहेत...टोपण नावे नाहीत...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
हो खरे आहे.
बाळ ठाकरे यांच्या नावाबद्द्ल हे खरे आह पण लोकमान्यांचे नाव बळवंतराव असे ऐकल्याचे आठवते. चूक असेल तर सुधारणा सुचवावी तेवढीच आमच्या ज्ञानात भर.
पुण्याचे पेशवे
आमचे दोन
आमचे दोन फेवरेट बाळासाहेब
बाळासाहेब देवरस (संघवाले)
बाळासाहेब ठाकरे ( जय महाराष्ट्रवाले)
समर्थ
समर्थ रामदास - मूळ नाव : नारायण ठोसर.
ओशो - आचार्य रजनीश (मूळ नावः रजनीश चंद्र मोहन जैन)
दीदी - लता मंगेशकर
भाई -पु.ल. देशपांडे
साधना सरगम - साधना घाणेकर
विनू मंकड - मूळवंतराय हिम्मतलाल मंकड
विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर
ईश्वरी
बाबूजी -
बाबूजी - सुधीर फडके
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
तात्या
हरीपंत उर्फ हरीतात्या फडके
पुण्याचे पेशवे