टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
माझ्या टोपण नावामागचे कारण
आपण येथे टोपण नावाने वावरतो. ते आपण स्व खुशीने घेतलेले आहे. ते नाव घेण्यापाठीमागे ऐक कारण आहे. ते कदाचीत ऐक प्रकारचे आकर्षण असु शकेल.
म्हणजे, मी लहान पणा पासुन जवळ पास पुस्तकी किडा. लहान पणी रॉबीन हुड, टारझन, अरेबियन नाईटस, रुस्तम आणि सोहराब (ह्या कथेचा शेवट वाचुन मी लहान असताना रड्लोय.), फास्टर फेणे, पुलं आणी खुप सारी पुस्तके वाचली.
रॉबीन हुड पुस्तकासाठी मित्राच्या घरी इतके हेलपाटे मारले की आजुबाजुचे लोक माझ्या हेलपाट्यामागे भलताच संशय घेउ लागले. महाविद्यालयात असताना सुदधा पुस्तकांची आवड कमी झाली नाही. शेवटी पैसे पुरत नाहीत म्हणुन रद्दीच्या दुकानातुन पुस्तके आणुन वाचली. ऐकुन काय तर मला पुस्तकांची भयंकर आवड.
पुलं चे ज्या वेळी मी सखाराम गटणे वाचले त्या वेळी मला त्या व्यक्तीरेखे बद्द्ल ऐक जाणुन घ्यायची ईच्छ्या निर्माण झाली. ऐकदरच ते पुस्तकी बोलणे आणि शेवटचा विवाहाचा प्रसंग आम्ही हसुन हसुन घालवला. आपण ऐक प्रकारे त्याचे व्यक्तीमहत्व आपल्यात किंवा आपले त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे, शिवाजी राजे सगळ्यांना (काही अपवाद सोडुन)आवडतात, पण सगळे शिवाजी राजे होत नाहीत. मग आपण आपल्या घरातल्या कोनाचे तरी नाव शिवाजी म्हणुन ठेवतो.
ह्यामुळे मी 'सखाराम गटण' हे नाव घेतले.
आपण आपले टोपण नाव का घेतले ?
II राजे II,
धमाल मुलगा,
आनंदयात्री,
पिवळा डांबिस,
विसोबा खेचर,
इनोबा म्हणे
इ.
बोला आता.
तुमचे व्यक्तीमहत्व कसे काय त्या टोपण नावाशी संबधित आहे?
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


आम्ही साधे
आम्ही साधे सरळ सज्जन आहोत , म्हणून शरद तळवलकर या नावासारखे बिन काना मात्रा आणि आकार उकार यांचे नाव घ्यायचे होते...
म्हणून आडनाव भडकमकर फिक्स केले पण नाव चार अक्षरी सुचतेय का या विचारात सतलज नाव बरे वाटले...
पण नंतर क्लासेस मुळे मास्तर म्हणू लागले बरेच लोक,मग आमचे नाव भडकमकर मास्तर असे बदलून घेतले...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अर्थ
मुक्तसुनीत चा इंग्रजी अर्थ "फ्री व्हर्स्" असा आहे. "सुनीत" हा १४ ओळींच्या सॉनेटकरताचा मराठी प्रतिशब्द आहे. जूलियन यानी तो प्रथम उपयोगात आणला. मागे कधीतरी मिस्टर शेख्-कपि-अय्यर एवॉनकर यांची सॉनेट्स वाचली आणि आवडली होती. म्हणून हे नामाभिधान.
आमचे टोपणनाव
बुद्धीबळ हा माझा आवडता खेळ (खेळण्यासाठी बुद्धी असलीच पाहिजे असं बंधन नसल्यामुळे जरा जास्तच आवडता
). त्याखेळाशी संबंधित काही नाव असावे असे डोक्यात होते पण तरीही 'बुद्धीबळ' हे टोपणनाव म्हणून कैच्याकैच वाटतं. राजा, वजीर, उंट, हत्ती, घोडा, प्यादे ह्या नावातही तशी काही खासियत नाही वाटली. थोड्या विचाराने 'चतुरंग' पक्के केले.
बस इतका साधा अडीच घरांचा हिशोब आहे, उंटासारखा तिरका नाही!
चतुरंग
६ फूट ३ इंच
उंच आहे म्हणून
तात्यांनी वर्णन केले आहे म्हणून
साक्षात तात्यांनीच माझे वर्णन केले असेल, तर ते चुकीचे कसे म्हणता येईल? हे पहा तात्या काय म्हणतात माझ्याबद्दल -
काय मंडळी, नुसती नांवं वाचूनच कल्पना आली की नाही?! ही माणसं मात्र रव्याच्या लाडवाप्रमाणे साधी, गरीब वगैरे नाहीत बरं का! लई डेंजर जमात आहे ही. ही माणसं एकदम तल्लख बुद्धीची, आणि चाणाक्ष असतात. किंचित माथेफिरू जात आहे ही. यांच्या वाटेला कुणी जाऊ नये. यांच्या आवडीनिवडी अगदी ठराविक आणि टिपीकल असतात. अत्तर आहे म्हणून लावलं आपलं कुठलंही अत्तर, असं यांचं नाही. यांच्या आवडीचं असेल तरच लावतील. यांचं राहणीमानदेखील एकदम टिपीकल असतं. एकंदरीतच बावळटपणा यांना सहन होत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सगळं यांना लागतं!स्वभावाने अत्यंत तऱ्हेवाईक माणसं असतात ही. यांच्या मनासारखं नाही झालं तर आरडाओरडा आणि आदळाआपट करतात. एक मात्र खरं, यांची जर एखाद्यावर मर्जी झाली तर त्याच्यासाठी मात्र काय वाट्टेल ते करतील. कुठल्याही गोष्टीचा सखोल आणि दांडगा अभ्यास असतो यांचा. एखाद्या गोष्टीतली नेमकी मेख यांना पटकन कळते. १० माणसांना डोकं खाजवून जर एखाद्या गोष्टीचं उत्तर माहीत नसेल तर यांच्याकडे जावं. क्षणांत उत्तर मिळेल! पण वरती "हे काय, एवढंही माहीत नाही?" असं ऐकूनही घ्यावं लागेल एक मात्र नक्की, की चार युक्तीच्या गोष्टी जर हव्या असतील तर यांच्याकडे अगदी हमखास जावं! बेसनाच्या लाडवांचंपण असंच आहे! हा लाडू दिसतो कसा पहा! खमंग रंगाचा! चवीलाही खमंग!! अगदी पाकातला! एकदम पेशल!! नीट जमला नाही तर खाताना टाळूला चिकटतो! पाक कच्चा असेल तर ढापकन् तोंडातल्या तोंडात फुटतो!! पण जर जमला तर बेसनाचा लाडू तो बेसनाचाच लाडू हो! मग याच्यासारखा दुसरा कोण नाही!!
तात्यांचे हे संकेतस्थळ,त्यांच्या स्थळावर वावरताना त्यांनी वर्णिलेली प्रतिमा,त्यांच्यासाठी तसेच इतरांसाठी असलेली माझी (जी काही आहे ती)ओळख तशी(च) रहावी/असावी म्हणून मी 'बेसनलाडू':)
(ओळखीचा)बेसनलाडू
धन्यवाद,
बेसनलाडू आवडणार्या माणसाचे मी केलेले वर्णन इथे उद्घृत केल्याबद्दल धन्यवाद..
तात्यांचे हे संकेतस्थळ,त्यांच्या....
हे फक्त माझे संस्थळ नाही. ज्यांचं मिपावर निर्व्याज प्रेम आहे त्या सर्वांचेच हे संस्थळ आहे!
बाकी बेला,
तुझ्या, संजोपच्या आणि आजानुकर्णाच्या खरडवह्या वाचून माझी बरीच करमणूक होते!
असो..
आपला,
(माझ्याशी आणि मिपाशी भिकारचोटपणे वागणार्या लोकांना बिनधास्त फाट्यावर मारणारा!) तात्या.
आता माझ्या नावाचा खुलासा -
पूर्वी 'विसोबा खेचर' नावाचे कुणी गृहस्थ ज्ञानेश्वरांना खूप त्रास द्यायचे असा काहीसा इतिहास आहे. मी देखील मराठी संस्थळावरच्या काही स्वयंघोषित ज्ञानेश्वरांना केवळ त्रास द्यायचं ठरवलं होतं म्हणून मला हेच नांव घेणं प्राप्त होतं! मराठी संस्थळांवर गेली दोन-तीन वर्ष माझं हे त्रास देण्याचं काम अव्याहतपणे सुरू आहे!
"दम असेल तर स्वत:चं संस्थळ काढून दाखव आणि चालवून दाखव!" असं एक ज्ञानेश्वर मला म्हणाल्याचं आठवतंय! आजकाल बिचारे इनोचा कुठल्या डिलरकडे किती साठा आहे याची माहिती गोळा करत फिरत असतात!
आपला,
(सर्व नकली ज्ञानेश्वरांना पुरून उरलेला) विसोबा खेचर.
करमणूक वगैरे
होत असेल,तर आनंदच आहे.तुमच्यामुळे,मिपामुळे,मिपाकरांमुळे माझीही घटकाभर छान करमणूक होते.असो.
(माझ्याशी भिकारचोटपणे वागणार्यांना आणि मला चुत्त्यात काढणार्या वेडझव्यांना पुरून उरलेला )बेसनलाडू
भिकारचोटपणा
>>आनंदच आहे.तुमच्यामुळे,मिपामुळे,मिपाकरांमुळे माझीही घटकाभर छान करमणूक
अहो तुमची असतील वैयक्तिक भांडणे .. आम्हाला का करमणुकीचा आयटम म्हणुन हिणवताय ?
प्रश्नच कुठे येतो?
अहो इथले मिपाकरांचे लेखन वाचणे व प्रतिक्रिया देणे,उखाळ्यापाखाळ्या काढणे,मिपाकरांशी खरडींमधून गप्पा मारणे ही करमणूकच नाही काय?मग असे असताना मिपाकरांमुळे करमणूक होते म्हटल्यास काय चूक?उगाच प्रतिक्रियेला फाटे फोडून अर्थाचा अनर्थ न करण्याची/व्हायची काळजी घ्यावी,ही नम्र विनंती.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
पुन्हा...
तसं आमचं टोपण नाव वगैरे नाहिये... सतिश गावडे हेच आमचे नाव आहे... पण हे पुन्हा आमच्या नावापुढे कसं चिकटलं...
आमच्या आधीच्या "सतिश गावडे" या खातेनावाचा परवलीचा शब्द आम्ही विसरलो... मिपाला खुप वेळा इपत्र पाठवूनही आम्हाला परवलीचा शब्द माहिती झाला नाही...
मग आम्ही "पुन्हा" सतिश गावडे नावाचे खाते उघडले...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
एक - एक
एक - एक भन्नात नाव...
आणी त्यामागे काही ना काही मिश्किल पण मनाचा ध्यास घेणारी कहाणी...
बाकी आपला अगदी साधा सुधा हिशोब आहे.....
लहान पणा पासुन च मला " आन्या " हे नाव पडल...
अगदी कॉलेजात असताना ( खास ) मैत्रीण सुद्धा आन्या नावाने च हाक मारायची....
आणी आपल पहिल्या पासुन तत्व आहे,
" टेन्शन लेने का नही, देनेका..... "
त्यामुळे सान्गेल तीतक आणी तेवढच करायच....
म्हनुन मला आपोआप " बैल " हे टोपण नाव पडल......
आता ज्यावेळी मिपा वर खाते उघडायची वेळ आली..
तेव्हा विचार केला इथल्या दर्दी लोका समोर आपल आगळ वेगळ इम्प्रेशन असाव...
परत विचार केला की इथे ही चाणाक्ष मन्डळी लगेच ओळखतील्ल की मी कित्ती मोठा (?) हा आहे ते...
मग हेच टोपण नाव घेत्ले....." आन्या नावाचा बैल..."
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
असेच
ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
बैलाच्या ही आता शाखा निघत आहे,
मिपा मला माझ्या घरासारखे वाटते
आमच्या डोक्यावरच्या केसांचे टोपण उडत चाललय.....तेंव्हा विचार केला की जर डोक्यावरचे टोपण जायच्या बेतात आहे तर .......मग नावाला टोपण कशाला?
एकत्र कुटुंबात वाढलेलो मी....मिपा मला माझ्या घरासारखे वाटते. घरात धाकटी भावंडे ज्या नावाने हाक मारतात तेच नाव इथे वापरतो.......
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
राजे हे
राजे हे नाव आम्ही का घेतले ??
सर्व प्रथम माझे नाव राज आहे... हे एक कारण !

दुसरा आम्ही मनाने राजे प्रमाणेच वागतो (दिल का राजा )
तिसरे कारण "राजे" ह्या मध्ये मला अभिप्रेत असलेला माझा स्वाभिमान व्यवस्थीत झळकतो !!
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
ध्रुव
नावच आहे माझं व मी म्हणतो वागतो तेही असेच... नावप्रमाणे अढळ
--
ध्रुव
धमाल मुलगा..
आता ह्या टोपण नावामागचं कारण देणं खरंच गरजेचं आहे का बॉ?
तुम्ही सगळे पाहताच की मला धमाल करायला आवडतं. दंगा-धुडगुस हा हक्काचा प्रांत माझा.
उगाच नावाप्रमाणे 'कैवल्य' किंवा 'कैवल्यराज' किंवा 'कैवल्यानंद' असं काहीसं भारदस्त नाव घ्यायचं आणि भोंदुबाबासारखं नसत्या उचापत्या करत फिरायचं...
'नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा' कोणि सांगितलंय हात दाखवून अवलक्षण करुन घ्यायला?
म्हणून मग धमाल करायला आवडणारा मुलगा म्हणून हे टोपणनाव.
तसं बर्याच वर्षांपुर्वी इ-सकाळवर चालू असलेल्या चॅटसाठीही माझं हेच टोपण नाव होतं.
- धमाल कैवल्य
हॅलो, हू इज इट ??? ..... डॉन , छोटा डॉन !!!
मी छोटा डॉन नाव का घेतले ?
कारण मी "छोटा" असल्यापासुनच माझे टोपणनाव "डॉन" आहे. त्याची सरमिसळ केली ...
मिपा सोडून इतर कालीजातली, हापीसातली व इतर दोस्तदार मला "डॉन"च म्हणतात, मग कशाला बदला ?
तशी लहानपणापासनच हे "डॉन, गँग, भाई, कट्टा, राडा, खर्चापानी, खोपचा" असल्या गोष्टीची लै आवड. त्यामुळे जमुन गेले.
त्यात महान कादंबरी "गॉडफादर" वाचल्यानंतर त्त्यातला "डॉन मायकल" एकदम डोक्यात बसला ...
आधी खर्या नावाने लिहून बघितले पण त्यामुळे झाले काय की मंडळी वागताना व प्रतिसाद देताना एकदम अहो - जाहो करुन डायरेक्ट "नमोगताच्या भाषेत व पद्धतीप्रमाणे" बोलायला लगली. हे काय ग्वाड लागेना ...
मग घेतला पुनर्जन्म "डॉन" बनुन .... त्यासाठी प्लास्टीक सर्जरे वगैरे काही केली नही.
बाकी धम्या म्हटल्याप्रमाणे "काहीसं भारदस्त नाव घ्यायचं आणि भोंदुबाबासारखं नसत्या उचापत्या करत फिरायचं...
'नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा' कोणि सांगितलंय हात दाखवून अवलक्षण करुन घ्यायला?" हे बरोबरच ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
हम्म्म..
अता अमचा धंदाच पडला विडंबनाचा .. आणि आद्य विडंबनकार केशवकुमार हे आमचे दैवत..
केलस मेल्या)
बर, आम्ही करणार अतिशय सुमार विडंबने
म्हणून आम्ही केशवसुमार
केशवसुमार
(स्वगतः त्या महान केशवकुमारांच्या नावाच पण विडंबन
पुढे मागे
विडंबनात इंटरेस्ट पैदा करुन केशवटुकार नावाने लिहण्याचा विचार आहे
.. अर्थात तुम्हाला गुरुस्थानी ठेवुनच !
हाघ्या
कथलाचा वाळा
च्यामारी डानरावानी अन धम्याने 'नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा' ही म्हण टाकुन आमची अंमळ गोचीच करुन ठेवलीये
.. आम्ही नाव घेतले न भारदस्त सारखे पण उचापत्या सोडुन येतय काय ? .. असो आम्ही पाडगावकरांच्या कवितेवरुन हे नाव घेतले .. तसे बनण्याची इच्छा म्हणा हवे तर ..
बाकी आम्ही आमची आयडेंटीटी मराठी आंतरजालावरच्या वावराच्या सुरुवाती पासुन हीच ठेवलिये अन जपलिये.
आपलाच,
(हाती कथलाचा वाळा असलेला) मिपायात्री
हम्म्म्म्म्!
आमच्या टोपणनावामागे कोणतेही कारण नाही!
किंबहुना जे सुचिले तेच टंकिले!
कोई शक या सवाल?
असो,
आपला,
(विनाकारण) टिंग्या
आम्हाला
आम्हाला वाटले होते की छोटी टिंगी म्हणजे छोटी फेक (पुडी सोडणे या अर्थाने).
काळजी घे रे बाबा
टिंग्या हे मान्य कर ना की तुला लोक माझ्याशी मैत्री कराल ? असे विचारतात ते तुझ्या टोपण नावामुळेच ना...
काळजी घे रे बाबा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
काळजी घे रे बाबा
>>> तुला लोक माझ्याशी मैत्री कराल ?...
अरे त्याला हो सांगायचेस आणि एका कट्ट्याला बोलावायचेस.....
हा हा
हो ना मजा आली असती.....
कसला पकाऊ प्रकार होता तो....
नावात काय आहे???????
मीहि प्रवेश करताना हाच विचार करत होतो की आपले टोपण नाव काय ठेवावे?
शेवटी मला "डिझाईनर_संदीप" हे पसंद पडले
माझी थोड्क्यात पुर्ण ओळख देवु शकतो.
मी संदीप,एक वाचक
अरे वा!
तुम्ही पण डिझाईनर का?
राजमुद्रा
भिरभिर्या
सुंदर आणि अनेकानेक स्थळे पाहायची आम्हाला फार आवड ! ( उगा भलते अर्थ घेउ नका ..
)
म्हणजे मुळचा मी इकडे तिकडे भिरभिरणारा भिरभिर्या .. पण आता बरेच दिवस झाले कुठे जाणे झाले नाहीये म्हणुन आताचा अभिरत ..
किंवा अभि काम मे रत म्हणुन अभिरत ( ही व्याख्या आमालाबी अत्ताच सुचली <
)
(भिरभिर्या) अभिरत
कमाल आहे!
अभि काम मे रत

म्हणजे काय?
इतके उघड उघड सांगताय? कमालच आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
बोंबला ...
बोंबला ...
डब्बल मिनींग चा आपुण इचार बी केला नव्हता ...
आवो कार्यान मग्न (मराठीत बिजि ) असे म्हणायचे होते ...
इरोधकांनी केलेल्या अनर्थाचा जाहीर निषेध !!!
------
बाप्पु .. पब्लिक लई वस्ताद हाये, धादा इचार करुन बोलत जा
बाप्पु ..
बाप्पु .. पब्लिक लई वस्ताद हाये, धादा इचार करुन बोलत जा
_____________________________
_
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
(विषय दिलेला नाही)
आपली प्रेरणा..
म्हणजे माझा अत्यंत आवडीचा पिक्चर : मेट्रीक्स.
त्यातल्या "द वन" यावरून मी माझं टोपण नाव घेतलं.
बघू या जन्मात त्या "द वन" सारखं या मायेतून (मेट्रीक्स) मधून मुक्त होता येत का ते
मुक्त होवून बाकी काही करायचं नसलं तरी सुपरमॅन सारख उडायचं आहे
अरे मीच तो ... अरे मीच तो... जल्ला कोण मी ...
लहाणपणी एक "पछाडलेला" नावाचा सिनेमा पाहीला. त्यातल हे बिरुद.. तेन्व्हा फार घाबरलो त्याला बघुन .. आणि अता शरिरयष्टी जब्बरी वाढल्या मुळे लोक मला घाबरतात. आहार थोडा जास्त असल्यामूळे(काही नाही , नाष्ट्याला ५ आन्ड्याची भाकर,५-६ चपात्या .. बाकी वेगळे ) आजी प्रेमाने खविस म्हणत असे.
आम्ही .....
कुबड्या खविस
http://picasaweb.google.com/prashants.space
संदर्भांची गल्लत
कुबड्या खवीस हे पात्र महेश कोठारेच्या 'धडाकेबाज' मध्ये कवट्या महाकाळ या खलनायकाचा हस्तक होते,असे वाटते.'पछाडलेला'हा चित्रपट त्यामानाने बराच नवा आहे. चू भू द्या घ्या
(सुधारक)बेसनलाडू
धडाकेबाज कि झपाटलेला?
मला वाटतं झपाटलेला मधे कुबड्या खवीस होता...तात्या विंचुचा हस्तक!
बरोबर - झपाटलेलाच!
पछाडलेला नक्कीच नाही. सगळे नामसाधर्म्य असलेले शिनेमे काढले,तर गोंधळ व्हायचाच
(गोंधळलेला)बेसनलाडू
क्षमस्व
बरोबरंच .... झपाट्लेला..... त्यातलंच हे कॅरेक्टर
चूकून चूक झाली आहे..पण भावना पोहोचने महत्वाचं .. काय ?
आणि सरसकट सारखेच सिनेमे असल्यानेच हा गोंधळ ऊडाला ...
लाडूंची बद्धी तल्लख आहे ...
झपाट्लेला
कुबड्या खवीस
http://picasaweb.google.com/prashants.space
ह्म्म
आता आमच्या नावाबद्दल आम्ही काय सांगावे...?
आम्ही मिपावर आलो तेव्हा विनायक अनिवसे असे मूळ नाव धारण करुन आलो होतो, पण डॉन्या,धम्या,आंद्या आणि टिंग्या सारख्या आमच्या जिवलग मित्रांनी आमचा इनायक भौ करुन टाकला. काही दिवसांनी इनायक भौ चा इन्या झाला,आणि मग आम्हीच इनोबा हे नाव धारण केले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
टोपणनाव
बुड जागेवर स्थिर नसलेला, जन्मभर भटकणारा म्हणून भ्रमरि नाव घेतले!
आधी बोटीवरची नोकरी आणि आता त्याच फील्ड मध्ये देशाबाहेर भटकंती नशीबी आल्यामुळे (तपासनीस म्हणून)..
(तसे दोस्तलोक्स मला चंबा मुतनाळ म्हणतात!!)
च्यायला!!
(तसे दोस्तलोक्स मला चंबा मुतनाळ म्हणतात!!)
)
मग तेच नांव घ्यायचं नाय!!
भ्रमरि पेक्षा ते किती मस्त आहे!!!!
आंगआश्शी!!
टोपणनाव
प्रेषक चंबा मुतनाळ ( गुरू, 06/26/2008 - 08:03) .
शाबास, आता कसं झकास झालं.....
या, आखाड्यात तुमचं स्वागत आहे, चंबादादा!!
ओळखा पाहू !
आम्ही गांधीगिरी सुरू केली तेव्हा "सर्किट" शिवाय दुसरे चांगले टोपण नाव आम्हाला सुचलेच नाही.
- सर्किट
भाईगिरी
मुन्नाभाईचा सर्किट आणि "काय सर्किट* मनुष्य आहे" मधला सर्किट अशा दोन्ही अर्थाने सार्थ नाव. कधी बदलू नका! यापेक्षा चपखल नाव शोधून सापडणार नाही.
ह. घ्यालच.
आपली -ली खानदानातील
प्रियाली
* महाचक्रम
फुलवा
हे किंवा कुठलेच टोपणनाव मी या पुर्वी घेतले नव्ह्ते.. पण येथील एकुण टोपणनावांचा वावर पाहुन मी पण म्हटलं.. चला, घेवुन तर पाहु टोपणनाव.
. आता मात्र हेच ठेवणार..
फुलवा म्हणजे फुलासारखी..
मला स्वतःला फुले फार अवडतात.. अगदी रान्फुले, वासाची बिन वासाची सर्व फुले..
जवळ २ पैसे अस्तील तर त्यातील १ पैशाची भाकर नि १ पैशाचे फुल घेणार्यांपैकी मी.. फुल मला स्वतःची खुण , माझ्या स्वभावाची खुण वाटते..
मात्र इथे आल्यावर काहीवेळा मला 'साहेब' कि 'ताई' असे विचारले गेले आणि वैतागुन मी खरे नाव घेतले(एकच दिवस).. लगेच दुसर्या दिवशी बदलले पण..
अवांतर- इथे टोपणनाव घेतलेले स्त्री सदस्य नाहीतच का? की कमी आहेत? काय कारण असेल ???
फुलवात!
आम्हाला मात्र तुमचं फुलवा नांव पहिलं की फुलवात आठवते!
तुपाच्या निरांजनात देवापुढे लावलेली!!
शांत, स्निग्ध, सौम्य, आनंददायक!!!
असो.
इथे टोपणनाव घेतलेले स्त्री सदस्य नाहीतच का? की कमी आहेत?
)
अहो कोणी सांगितलं तुम्हाला? गैरसमज आहे तुमचा काहीतरी!!
वरदा, यशोधरा, शितल, ऋचा ही टोपणनांवं नाहियेत तर कोण आहेत मग!!
त्यांची खरी नांवं अनुक्रमे गुणवती, सगुणा, फूलवती आणि यमुनाबाई अशी आहेत.
आवलीबाई सध्या इंडियात आहे, परतली की ओळख करून देईन...
(स्वगतः डांबिसकाका, आता मात्र मेलास रे तू!! तू कुत्तेकी मौत मरेगा, साले!! ए, वरील तायांनो, हात जोडतो, ह. घ्या हां!! नायतर ब्रम्हहत्येचं पातक लागेल!!!
हो क्का?
छान च की मग..

बर्याच साळ्काया-माळ्काया आहेत म्हणायच की...
स्त्री सदस्य आहेत ना...
मी आहे... माझे नाव गायत्री आहे.
फुलपाखरु हे टोपण नाव ठेवायचे कारण खूप काही खास नाही...बस् फुलपाखरु खूप आवडते
मी नवीन सभासद आहे मिपाची. खाते उघडताना टोपण नावाचा विचार करत होते आणि जे पहिले नाव
मनात आले ते वापरले.
स्त्री सदस्य आहेत ना...
मी आहे... माझे नाव गायत्री आहे.
फुलपाखरु हे टोपण नाव ठेवायचे कारण खूप काही खास नाही...बस् फुलपाखरु खूप आवडते
मी नवीन सभासद आहे मिपाची. खाते उघडताना टोपण नावाचा विचार करत होते आणि जे पहिले नाव
मनात आले ते वापरले.
पिवळा डांबिस
आम्ही हे नांव का घेतलं?

खरंतर "गुरुदेव टागोर" हे नांव घेणार होतो, पण चेहर्यावर एकदम मोठ्ठी पांढरी दाढी उगवल्यासारखं वाटलं!!
आणि ते नांव धारण करून वात्रट लिहायलासुद्धा बरं वाटलं नसतं....
म्हणून पिवळा डांबिस नांव घेतलं झालं.......
झालं गटण्या, तुझं समाधान आता?
)
तुझा जीव केव्हढा! आणि चौकशा किती!!