अ भा म सा सं : आता बे एरियात

मंडळी, माफ करा.

सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा विषय गाजतोय. मी जरा उशीराच सदर संकेतस्थळावर हा विषय वाचला, म्हणून काहीबाही खरडावेसे वाटले. ह्या चर्चेत उशीरा सामील झाल्याबद्दल क्षमस्व. परंतु मी माझ्या इतर कामातूनही, ह्या चर्चेत सामील व्हावे असे वाटले, हे देखील लक्षात घ्यावे.

या आधी मटाच्या संस्थळावर ह्या विषयावर कुणी काहीबाही खरडलेले वाचले. तेथील आणि येथील चर्चांवरून मला महत्वाचहे वाटलेले मुद्दे असे:

१. हे साहित्य संमेलन अखिल भारतीय आहे, आणि अखिल भारतीय मध्ये सॅनफ्रॅनसिस्को बे एरिया बसत नाही.

२. ह्या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना अमेरिकेचे भाडे परवडत नाही.

३. मराठी आणि अमेरिकेत ? मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, आणि म्हणून संमेलन महाराष्ट्रातच हवे.

४. महाराष्ट्र सरकार अशा संमेलनाला २५ लाख देणगी म्हणून कसे काय देऊ शकते ?

मंडळी, ह्या सर्व मुद्द्यांचा परामर्ष आपण येथे घेणार आहोत। भावना बाजूला ठेवा, अत्यंत कोडगेपणाने विचार करा, म्हणजे कदाचित माझी भूमिका कळणे सोपे जाईल. आता माझी भूमिका मांडतो.

१. मराठी ही भाषा कुठल्याही एका भौगोलिक क्षेत्रापुरती मर्यादित नाही, नसावी. दिल्ली, कानपूर, पिलानी, न्यू यॉर्क, इलिनॉय, आणि आता कॅलिफोर्निया, ह्या अमराठी प्रदेशात गेली २० वर्षे काढल्यानंतर, मला लक्षात आलेली गोष्ट अशी, की ह्या क्षेत्रांत मराठी लोकांना जे मराठीविषयी आपलेपण वाटते, ते महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही. जिथे मराठीला आपलेपण मिळते, तो मराठीचा प्रदेश.

२. आजवर आम्हाला सदर साहित्य संमेलनात सहभागी व्हावेसे वाटत असूनही, आम्हाला केवळ भाडे परवडत नाही म्हणून आमच्या आडत्या साहित्यिकांपासून दूर राहावे लागले. ह्याचा अनुभव सर्वांना मिळावा, हीच आमची अपेक्षा.

३. मला मध्यंतरी बे एरियातील एका कार्यक्रमात सूत्रधाराची भूमिका मिळाली होती. येथेच जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांनी केलेला नाटकाचा कार्यक्रम. तेथे मी न राहवून म्हटलेले एक वाक्य: "हे संयुक्त महाराष्ट्रवाले लोक उगाच बेळगाव-निप्पाणीच्या मागे लागले आहेत. त्यांना खरेच महाराष्ट्र धर्म वाढवावा असे वाटत असेल, तर संयुक्त महाराष्ट् चळवळीचे लोक सॅन होजे-कुपर्टिनो-सॅंटा क्लॅरा सह महाराष्ट्र झालाच पाहिजे" असे घोषवाक्य स्वीकारतील.

४. संमेलनाचा खर्च कोट्यावधीत. आणि फक्त पंचवीस लाखांसाठी एवढा आवाज ? छ्या !

इनोदी चर्चा

परंतु मी माझ्या इतर कामातूनही, ह्या चर्चेत सामील व्हावे असे वाटले, हे देखील लक्षात घ्यावे.

म्हणजे तुमी काय तिथले गवर्नर हाये का? तुमच्या कामातुनही चर्चेत सामील झालात म्हणजे उपकारच की! Smile)

आजवर आम्हाला सदर साहित्य संमेलनात सहभागी व्हावेसे वाटत असूनही, आम्हाला केवळ भाडे परवडत नाही म्हणून आमच्या आडत्या साहित्यिकांपासून दूर राहावे लागले.

मग आमी सांगितलेलं अमेरिकेत जाऊन राह्यला? आणि वर्षा दोन वर्षातुन इकडे सहलीला येता तेव्हा पाण्यासारखे पैसे उडवता आणि वर शीऽ काय घाण आहे म्हणून निघून जाता तेव्हा बरं परवडतं?

त्यांना खरेच महाराष्ट्र धर्म वाढवावा असे वाटत असेल, तर संयुक्त महाराष्ट् चळवळीचे लोक सॅन होजे-कुपर्टिनो-सॅंटा क्लॅरा सह महाराष्ट्र झालाच पाहिजे" असे घोषवाक्य स्वीकारतील.

आधी बेळगाव आणा.. मग बघुया सॅन होजे-कुपर्टिनो-सॅंटा क्लॅरा.. मजेशीरच हाय राव तुमी

संमेलनाचा खर्च कोट्यावधीत. आणि फक्त पंचवीस लाखांसाठी एवढा आवाज ? छ्या !

होय कारण ते २५ लाखात इथल्या लोकांच्या कष्टाचे आहेत. तिकडे एसीत बसुन शीऽ भारतात काय घाण अस्ते बॉ म्हणणार्‍यांचे नाहीत.

आपला,
बैलोबा.

छान

Smile :-)

वाचून खूपच गंमत वाटली.

चालू द्या.

(नुस्तं इंडियाच नाही, तर किनई, तिथले लोकही किनई, कित्ती घाण Wink चालू द्या. स्टीरियोटाईपच वाढवताय तुम्ही, तेव्हा हे तुमचं यशच म्हणायला हवं.)

- सर्किट

माझी उत्तरे..

मला लक्षात आलेली गोष्ट अशी, की ह्या क्षेत्रांत मराठी लोकांना जे मराठीविषयी आपलेपण वाटते, ते महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही.

हम्म! असतो एकेकाचा दृष्टीदोष! Smile

त्यांना खरेच महाराष्ट्र धर्म वाढवावा असे वाटत असेल, तर संयुक्त महाराष्ट् चळवळीचे लोक सॅन होजे-कुपर्टिनो-सॅंटा क्लॅरा सह महाराष्ट्र झालाच पाहिजे"

टाळ्या! Smile

संमेलनाचा खर्च कोट्यावधीत. आणि फक्त पंचवीस लाखांसाठी एवढा आवाज ? छ्या !

अहो तेच तर आम्हीही म्हणतोय. आपण आमचा मूळ चर्चाप्रस्त्वाव पाहिलात तर त्यातही आम्ही हेच म्हटलेलं आहे. संमेलन अमेरिकेत भरवण्याबाबत आमचा काहीच आक्षेप नाही. एखाद वर्ष तिकडे भरवल्याने विशेष काहीच बिघडत नाही. आमचा मुद्दा इतकाच की आमच्याकडे दमड्या मागू नका. संमेलन भरवायचं तर तुमच्या जिवावर अवश्य भरवा आणि सूत्रसंचालन करून 'पुढे पुढेही करा'! Wink

अमेरीकेतल्या संमेलनाला महाराष्ट्र सरकारने २५ लाख रुपये देऊ नयेत, ते महाराष्ट्रात राहणार्‍या जनतेचे आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा हा महाराष्ट्रात राहणार्‍या जनतेलाच मिळायला हवा! बाकी संमेलन अमेरिकेत भरवण्याबाबत आमची काहीच हरकत नाही!

आपला,
(मराठी आंतरजालीय साहित्यिक) तात्या.

चालेल

अच्छा, फक्त महाराश्ट्र सरकारकडून मिळणार्‍या पंचवीस लाखांविषयीच जर आक्षेप असेल, तर मग मी समजू शकतो.

विलासराव, ते पंचवीस लाख तात्याला द्या बघू ताबडतोब.

सर्किटचा हुकूम आहे Wink

मराठीच्या जतनासाठी मिसळपाव चालणे आवश्यक आहे. आणि हो, Wink मनोगतही..

कायतरी स्पर्धा वगैरे घ्या, आणि मिसळपावाला २५ लाख देवून टाका..

बाकी, संमेलन अमेरिकेत भरवण्याची आयडिया जबरा..

ते पंचवीस लाख आम्ही बे एरियातले लोक सहज भरून टाकू बघा..

- सर्किट

फक्त

फक्त महाराश्ट्र सरकारकडून मिळणार्‍या पंचवीस लाखांविषयीच जर आक्षेप असेल, तर

हो,निदान माझातरी फक्त तेवढाच आक्षेप आहे...

मराठीच्या जतनासाठी मिसळपाव चालणे आवश्यक आहे. आणि हो, मनोगतही..
कायतरी स्पर्धा वगैरे घ्या, आणि मिसळपावाला २५ लाख देवून टाका..

मलाही ते पैसे नकोत. शक्तिवेलूदेखील ते घ्यायचा नाही/घेईल असं वाटत नाही. मिपा अन् मनोगत चालवायला अनुक्रमे तात्या अन् शक्तिवेलू समर्थ आहेत! Smile

आणि त्यातूनही जर आलीच मिपा चालवण्याकरता पैशे मागायची वेळ, तर थोडाफार पैसा तर तुझ्याकडे किंवा मुक्तसुनीतकडे, किंवा रंगाकडे किंवा नंदनकडे किंवा प्रियालीकडे किंवा प्राजूकडे किंवा वरदाकडे किंवा देवकाका, बिरुटेसरांकडे मागेन!

काय सांगावं, कदाचित सुवर्णमयी, बेसनलाडू, यांच्याकडेही मागेन! Wink

ते पंचवीस लाख आम्ही बे एरियातले लोक सहज भरून टाकू बघा..

उत्तम! आता आमचं काहीच म्हणणं नाही. दणक्यात होऊ द्या संमेलन...

आमच्या अनेक शुभेच्छा! Smile

आपला,
(मराठीप्रेमी) तात्या.

अमराठी क्षेत्रे

मी : मला लक्षात आलेली गोष्ट अशी, की ह्या क्षेत्रांत मराठी लोकांना जे मराठीविषयी आपलेपण वाटते, ते महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही.

तात्या: हम्म! असतो एकेकाचा दृष्टीदोष!

तात्या,

कानपूरचे काशीनाथ बोडस आठव. त्यांच्या कानपूरच्या शिक्षित भगिनी वीणाताई आठव.

आणि मग बोल, की हा "एकेकाचा दृष्टिक्षेप आहे" म्हणून.

- सर्किट

स्पष्टीकरण

सर्किट यांनी वीणाताई सहस्त्रबुद्धे या प्रातःस्मरणीय गायिका/व्यक्तीला अनुलक्षून वरील विधान केले आहे असे मी समजतो. चूभूदेघे

होय

मुक्तसुनीत,

अगदी बरोबर.

प्रातःस्मरणीय वगैरे काहीही माहिती नाही, पण बोडस आणि वीणाताईंशी आजवर झालेल्या बोलण्यतून कानपुरात राहूनही त्यांनी मराट्।ईची घरी आणि बहेर केलेली जपणूक आणि त्यांचे मरठीविषयी प्रेम एवढे जाणून आहे.

धन्यवाद.

- सर्किट

तिसरे एक

बे एरिय, ही संकेतस्थळाची जन्मभूमी नसली तरी कर्म भूमी आहे.

येथे संमेलन झाले, तर "मराठी संकेतस्थळांसाठी मराठी साहित्यिक काय करताहेत" हा परिसंवाद घडवून आणण्याची जबाबदारी माझी.

नव्हे, ह्या साहित्य संमेलनात येथे हजर असणार्‍या साहित्यिकांसाठी "संकेतस्थळ कसे तयार करावे, आणि त्याचे महत्व" हे ट्रेनिंग सेशन मी घेणार !!!

हे महाराष्ट्रात दरवर्षी घडणार्‍या साहित्य संमेलनात कुणी आजवर का केले नाही, ह्याबद्दल कुणी सांगू शकेल का ?

- सर्किट

गोषवारा! :)

येथे संमेलन झाले, तर "मराठी संकेतस्थळांसाठी मराठी साहित्यिक काय करताहेत" हा परिसंवाद घडवून आणण्याची जबाबदारी माझी.
नव्हे, ह्या साहित्य संमेलनात येथे हजर असणार्‍या साहित्यिकांसाठी "संकेतस्थळ कसे तयार करावे, आणि त्याचे महत्व" हे ट्रेनिंग सेशन मी घेणार !!!

परिसंवाद आणि ट्रेनिंग सेशन, या दोघांचाही गोषवारा मागाहून मिपावरही येऊ द्या म्हणजे झालं! Smile

आपला,
(एक मराठी संस्थळ चालक) तात्या.

विरोधाचे मुद्दे

माझा व्यक्तिगत विरोध केवळ दोन मुद्द्यांवर आहे -
१.भारतीय करदात्यांच्या पैशातून २५ लाखांचे अनुदान मिळून होणारे संमेलन आमच्या सॅन फ्रान्सिस्को बे एरियात नको.
२. संमेलनाची जी उद्दिष्टे साहित्य परिषदेकडून छातीठोकपणे सांगितली जात आहेत,त्यात कितपत तथ्य आहे,याचा सारासार विचार व्हावा.
याव्यतिरिक्त सर्कीटकाकांचे मराठीप्रेम,भौगोलिक सीमांचा गैरलागूपणा,संवर्धन इ. बाबतचे अनुभव नि मुद्दे पटण्यासारखे वाटले.
कितीही विरोध असला आणि संमेलन सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घेतले गेले तर/की मी त्यात जातीने सहभागी होणार,वेळ असल्यास/पडल्यास व संधी मिळाल्यास स्वयंसेवक म्हणूनही काम करणार,हे मात्र नक्की.
(मराठी)बेसनलाडू

:)

वेळ असल्यास/पडल्यास व संधी मिळाल्यास स्वयंसेवक म्हणूनही काम करणार,हे मात्र नक्की.

सूत्रसंचालन करून 'पुढे पुढे' केलंस तरी चालेल! Wink
( ह घ्या )

:-) :-)

पुढे पुढे करण्यास आधी खुर्च्या उचलण्यची सवय करवी लागते तात्याराव Wink

किमान, साहित्य/कला/नाट्य क्षेत्रात एक जाणकार म्हणून आधी आपला ठसा जमवाव लागत Wink

बघा, येताय का ?

काल श्रीधरजींचा नीटस कार्यक्रम झाला. ते परत येतील मुंबईला तेव्हा विचारा त्यांना येथील रसिकांविषयी.

आपल्या मनातले सगळे मळभ दूर होतील.

(अहो, सगळे अमेरिकेतले मराठी नॉर्थ क्यारोलिनात नसतात Wink

- सर्किट

बरं बरं!

किमान, साहित्य/कला/नाट्य क्षेत्रात एक जाणकार म्हणून आधी आपला ठसा जमवाव लागत

असं का? बरं बरं! आम्हाला याची कल्पना नव्हती कारण आम्हाला कलेची जाण वगैरे कशाशी खातात हे अजूनही नीटसं माहीत नाही!

आपला,
(अजाण) तात्या.

आपल्या मनातले सगळे मळभ दूर होतील.

आमच्या मनात काहीच मळभ नाहीत. पुढे पुढे करणे हा वाक्प्रचार आम्ही मज्जेने आणि ह घ्या या सदरात वापरला होता! Smile

आपला,
(हलका आणि मजेशीर) तात्या.

:)

सूत्रसंचालन करून 'पुढे पुढे' केलंस तरी चालेल!
त्यासाठी इकडे बरेच अनुभवी आहेत;माझी गरज नाही Wink अमेरिकेतले सगळेच 'मागे मागे' घो(टा)ळणारे मराठी कॅलिफोर्नियात असतात Smile
(ह घ्या)
('हलका'ट)बेसनलाडू

स्वयंसेवकांचीच नितांत गरज आहे

सदर संमेलन बे एरियात होणार आहे, आणि येथील मराठी लोकांशी गेली अनेक वर्शे संबंधात असलने, येथे पैशांची फारशी गरज नसून स्वयंसेवकांची नितांत गरज आहे, असे मुद्दाम सांगावेसे वाटते.

बेसनलाडू, महाराश्ट्र मंडलात स्वयंसेवक म्हणून सामील होण्यासाठी निवडणुकि नसतात.

उद्यापासून खुर्च्या उचलायला येत जा.

- सर्किट

सोप्पे आहे

सदर संमेलन बे एरियात होणार आहे, आणि येथील मराठी लोकांशी गेली अनेक वर्शे संबंधात असलने, येथे पैशांची फारशी गरज नसून स्वयंसेवकांची नितांत गरज आहे, असे मुद्दाम सांगावेसे वाटते.

ह्यावर एकदम सोप्पा आणि आपल्याला माहीत असलेला उपाय आहे: आउटसोअर्सिंग करा! Smile)

बाकी साहीत्य संमेलन अवश्य करा, त्याला विरोध करण्याचा प्रश्न नाही पण अ.भा.च्या नावाखाली करणे हे कायद्याच्या दृष्टिनेअयोग्य आहे - संस्थेच्या घटनेच्या आणि उद्दीष्टांच्या दृष्टीनेपण ते अयोग्य आहे मी आधीपण लिहीले आणि तेच परत लिहीतो!

(अमेरीकेतील न्यू इंग्लंड मराठी मंडळांचा कधी काळचा अध्यक्ष आणि बिएमएम बॉस्टनचा सक्रीय स्वयंसेवक/समितीसदस्य) विकास

पळवाट

बाकी साहीत्य संमेलन अवश्य करा, त्याला विरोध करण्याचा प्रश्न नाही पण अ.भा.च्या नावाखाली करणे हे कायद्याच्या दृष्टिनेअयोग्य आहे

पण ती पळवाट कधीच सापडली आहे. साहित्य संमेलनाच्या घटनेत जेथे मराठी भाषक आहेत तेथे साहित्य संमेलन घेता येते असे म्हटले आहे. भारतात किंवा भारताबाहेर असा उल्लेखच नाही Wink

माझा आक्षेप आहे तो हा की सर्वसामान्य मराठी जनतेला जी आजवर महाराष्ट्रातील संमेलनांना उपस्थित होती तिला अमेरिकेत येणे जितके दुष्कर आहे तितके एखाद्या अमेरिकन भारतीयाला भारतात जाणे (अशक्य) नाही. पुस्तक प्रकाशक, लहान मोठे व्यावसायिक ज्यांना या निमित्ताने उद्योग मिळतो त्यांचे नुकसान दिसते.

यापेक्षा एखादे समांतर संमेलन ठेवावे. त्याला जागतिक मराठी संमेलन म्हणावे - नाहीतरी काऊंटीत पराक्रम केला की आपण जगज्जेते म्हणण्याची अमेरिकनांना सवय आहेच. Wink

अ भा

पण ती पळवाट कधीच सापडली आहे. साहित्य संमेलनाच्या घटनेत जेथे मराठी भाषक आहेत तेथे साहित्य संमेलन घेता येते असे म्हटले आहे.

ती पळवाट कायद्यासमोर टिकणार नाही - जर कोणी कायदेशीर त्याचा पाठपुरावा केला तर. नाहीतर सरकारि अधिकारी डोळेझाक करून बसतील...

माझा आक्षेप आहे तो हा की सर्वसामान्य मराठी जनतेला जी आजवर महाराष्ट्रातील संमेलनांना उपस्थित होती तिला अमेरिकेत येणे जितके दुष्कर आहे तितके एखाद्या अमेरिकन भारतीयाला भारतात जाणे अशक्य नाही. पुस्तक प्रकाशक, लहान मोठे व्यावसायिक ज्यांना या निमित्ताने उद्योग मिळतो त्यांचे नुकसान दिसते.

हे मुद्दे अर्थातच बरोबर आणि मान्य आहेत आणि त्या अर्थी मी तात्यांच्या चर्चेत म्हणले देखील आहे.

यापेक्षा एखादे समांतर संमेलन ठेवावे. त्याला जागतिक मराठी संमेलन म्हणावे - नाहीतरी काऊंटीत पराक्रम केला की आपण जगज्जेते म्हणण्याची अमेरिकनांना सवय आहेच.

म्हणूनच मी आधी देखील विचारले की "जागतीक मराठी परीषद कुठे गेली?" (कुठेतरी वाचल्याचे आठवले: आगतीक मराठीची जागतिक परीषद!)

एक मिनीट मंडळी...

तूमच्या भांडणाने निर्णय घेणारे बदलणार आहेत का?? किंवा २५ लाख न दिल्याने महाराष्ट्र स्वच्छ होणार आहे का? किंवा तेच २५ लाख तुम्हा आम्हा सर्वसामान्य जनतेसाठी वापरले जाणार आहेत का किंवा एखाद्या पुढार्‍याच्या घशाखाली जायचे थांबणार आहेत का?

एक किस्सा जाता जाता सांगतो...

इथे एक मित्र आहे ज्याची सांगली जिल्ह्यात शेती आहे. वडिल आणि भाउ मिळून शेती करतात. शेती शिवाय काहीच दुसरं उत्पन्न नाही. आज शेतकर्‍यांची काय अवस्था आहे तुम्हाला माहीत आहेच. त्याला ह्या विषयाबद्दल प्रतिक्रिया विचारता हसुन म्हणाला..."अरे त्याने काय फरक पडतो, आमच्या शेतीला २५ लाख देऊन पुढील ५ वर्षे सुद्धा पाणी मिळणार नाही...मग कशाला विचार करायचा की कुठे पैसे देतात ही लोकं" ..

आता सांगा की तूमच्या भांडणाला किती अर्थ आहे??

मुकुल

तसं म्हणाल तर...

मूळ चर्चेला थोडा अवांतर प्रतिसाद म्हणून क्षमस्व पण वरील मुद्यासंदर्भात दिला आहे इतकेच..

आता सांगा की तूमच्या भांडणाला किती अर्थ आहे??

तसं म्हणाल तर येथे कसलीच चर्चा नको. कारण त्याने जगातील कुठलेच प्रश्न सुटणार नसतात. पण तरी देखील असे (सभ्यतेच्या मर्यादा न सोडता) वादविवाद होणे महत्वाचे वाटते. आज जी काही राजकीय परीस्थिती आहे आणि सामाजीक वस्तुस्थिती आहे त्याला मूळ कारण हे, "याने काय फरक पडणार?" ही सामाजीक वृत्ती आहे (कृपया हे विधान वैयक्तिक घेऊ नका).

पूर्विच्या काळात "राजा कालस्य कारणम" म्हणायचे कारण राजेशाही होती. आज लोकशाहीत जेंव्हा जनताच प्रतिनिधी ठरवते तेंव्हा "काळाला कारण असलेला राजा ही वास्तवीक तुमच्या माझ्यासारखी प्रजाच असते".

कुठलीच सामाजीक गोष्ट बदलायला काही काळ द्यावा लागतो. २५ लाख देऊन शेतीला ५ वर्षात पाणी मिळणार नाही कारण गेली ५० वर्षे नियोजन न करता पाणी वापरले आणि सांडपाणी (विशेषतः सांगलीमधे) कसेही कृष्णेमधे जाउन दिले. ते एकदम कसे बदलणार? म्हणून हातावर हात ठेवून बसलो तर कधीच बदलणार नाही पण लोकशिक्षण, नियोजन आणि स्थानीक प्रश्नांमधे सक्रीय सहभाग घेतला तर हळू हळू गोष्टी बदलतील.

बाकी २५ लाख एखाद्या पुढार्‍याच्या घशाखाली जायचे जरी आज थांबवू शकलो नाही तरी त्यांना आत्ता हवे ते करण्यापासून लोकदबावामुळे परावृत्त करता आले तर त्यातून मिळणारा धडा हा मोठा असेल असे वाटते.

पण तरी देखील ...

"पण तरी देखील असे (सभ्यतेच्या मर्यादा न सोडता) वादविवाद होणे महत्वाचे वाटते" तेच तर. नंतर नंतर हीच चर्चा व्यक्तिगत टिका आणि टोमणे यांवर येते, सभ्यतेच्या चौकटीत ते बहुतेक बसत नसावे...बाकी चालु द्या...

२५ लाख नकोच..

बे एरिया महाराष्ट्र मंडळात गेल्या २-३ वर्षात झालेल्या अनेक भांडणाचा मी साक्षीदार आहे. आणि काही काही मराठी मंडळी कुठल्या थराला जातात हे देखील बघितलं आहे.
त्यामुळे २५ लाख मिळाले तर इथे काय महाभारत घडेल याची कल्पना करवत नाही.

बाकी काही प्रश्न विचारावेसे वाटतात..
संमेलनाने नक्की हेतू काय साध्य होतो?
आत्ता पर्यंत झालेल्या संमेलनांमधे जे ठराव पास झाले त्याचे काही रिझल्टस दिसतात का?
"बे एरियात संमेलन होणार आणि आम्हाला ते परवडणार नाही" अशी जी लोकं म्हणतात, त्यातील किती लोकांनी आत्तापर्यंत झालेल्या संमेलनांना हजेरी लावली?

:)

बे एरिया महाराष्ट्र मंडळात गेल्या २-३ वर्षात झालेल्या अनेक भांडणाचा मी साक्षीदार आहे. आणि काही काही मराठी मंडळी कुठल्या थराला जातात हे देखील बघितलं आहे.

हा हा हा! हे बाकी मस्तच! Wink

एकराव, ही वस्तुस्थिती सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद. बे भागातील काही लोकं बकरीसारखं सतत 'बॅ.. बॅ..' करत असतात असं माझ्या पाहण्यात आहे! Smile

आपला,
(मराठी संस्थळांवरचा एक माजुरडा बोकड) तात्या.
Smile

एक प्रश्न

गेल्या वेळच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सिऍटलच्या आधिवेशनात मराठी जनतेचे प्रेम पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख गहीवरले आणि त्यांनी बीएमएमला काही लाख का कोटी मुख्यमंत्री निधीतून जाहीर केले. या संदर्भात कुणाला येथे आठवण आहे का? आणि तसे पैसे बीएमएमला मिळाले का?

बाकी अवांतरः - www.bmmonline.org या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संकेतस्थळावर अधिक माहीती शोधायला गेलो तर आधीच्या अधिवेशनामधे गेल्या वेळच्या सिऍटलच्या आधिवेशनाचे फोटो दिसले आणि http://www.bmm2007seattle.org/ हा दुवा दिसला. त्या दुव्यावर अधिक माहीतीसाठी टिचकी मारली तर समजले की हे पान/संकेतस्थळ एकावर्षाच्या आत बंद पण करून टाकले...

५० लाख

माझ्या आठवणीप्रमाणे ५० लाखांची देणगी दिली होती. जालावर शोधल्यावर हा दुवा मिळाला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

बरोबर आहे!

माझ्या आठवणीप्रमाणे ५० लाखांची देणगी दिली होती.

धन्यवाद! असेच काहीसे होते.

जागतिक मराठी परिषद

दरवर्षी जागतिक मराठी परिषद भरवतात ना . ती घ्या ना बे एरियात.
साहित्य संमेलन कशाला हवे?
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक भेटतात, पुस्तके खरेदी होते, ती कशी होणार आता?
आमच्या रत्नागिरीच्या राम आळीत काय सगळी पुस्तके मिळत नाहीत. या निमिताने मिळाली असती.

आपला परतवण्याचा
अनिकेत केदारी

आमच्या

आमच्या सारख्या सर्वसामान्य रसिकांचे मस्त मनोरंजन चालले आहे.
आता एक - दोन महिने संमेलन स्थळ या विषयी बरीच उलटी , सुलटी चर्चा रंगेल, समांतर संमेलनाबाबद वाद विवाद होतील , पेपर वाले विशेष पुरवण्या काढतील , चॅनलवाले सुसंवाद घडवुन आणतील (कौतिकराव ठाले- पाटील मात्र आपल्या निर्णयावर ठाम असतील /नाही आहेत -
एक संमेलन परदेशात घेतले तर काही आकाश कोसळणार नाही. गाडीने रुळ बदलले, की खडखडाट होणारच. अपघात होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ
इति कौतिकराव )

उत्तरार्ध जास्त मनोरंजक असणार यात शंका नाही. :>

संमेलनाचे अध्यक्षपद यावर 'न भुतो न भविष्यती' असे रणकंद माजेल.( आठवा ८१ वे सांगलीचे संमेलन). शेवटी साता समुद्रापलिकडे जाण्याचा सवाल आहे भौ . जसे मागिल वर्षी म. द. हातकणंगले सरांना मान मिळाला तसे या वेळेला बे-एरियातीलच साहित्तीक अध्यक्ष झाला पाहिजे अशी मागणी पुढे येईल.
काय बे- काय चाललय , कुणी समजवाल का ?

:)

काय बे- काय चाललय , कुणी समजवाल का ?

आजकाल अ भा म सा सं म्हणजे बरीचशी वेडझवेगिरी अन् भिकारचोटगिरी असते!

पण करमणूकही बरीच होते! Smile

आपला,
(मराठी आंतरजालीय साहित्यिक) तात्या ठाले पाटील.

उत्तरार्ध

उत्तरार्ध जास्त मनोरंजक असणार यात शंका नाही. :>
अमोल... हे बाकी एकदम खरे... १०० % सहमत Smile
यह तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या.... Smile
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/