धर्मांतर्.....पाकिस्तान आणि बरेच काही

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
27 Jul 2012 - 2:18 pm
गाभा: 

मटा ने एक बातमी दिली आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15192839.cms
या बातमीनुसार पाकिस्तानाते एका रीअ‍ॅलिटी शो मध्ये टीव्हीवर एका हिंदु तरुणाचे धर्मांतर लाइव्ह दाखवण्यात आले.
पाकिस्तानात अल्पसंख्य सुरक्षीत नाहीत हेच खरे. तेथे हिंदु तरुणीना पळवून जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केल्याच्या बातम्या येत असतातच.
हेच जर उलट्या अर्थाने म्हणजे अल्पसंख्यांक इसमाचे हिंदु धर्मात धर्मांतर करताना नाटकात्/चित्रपटात जरी दाखवले असते तरी इथले मेणबत्ती मार्च वाले किती भडकले असते. तथाकथीत पुरोगाम्यानी त्यावर दिवसेन दिवस चर्वण केले असते.
अल्पसंख्यांकांचे प्रेमाचे उमाळे येवून संसदेत खुर्च्यांचे फेकाफेक ,वगैरे झाले असते. तमस सिरीयल मध्ये दाखवले तसे दंगलींचे लोण पसरले असते. ( अर्थात मेणबत्तीमार्च वाले दंगलीत भाग घेत नाहीत. त्यांच्यामते दंगल नेहमीच गुंडानी घडवलेली असते)
अर्थात असे हिंदु धर्मात धर्मांतर होणे हे सर्वथा अशक्य आहे ( टेक्नीकल मुद्दा : धर्मांतरीत इसमाला जात कोणती द्यायची? त्याने मागितलेली जात त्याला मिळू शकते का? उदा: कोणाला जात म्हणून कोकणस्थ किंवा सी के पी हवी असेल तर ती मिळू शकेल का? त्या जातीतील लोक त्या धर्मांतरीत इसमाशी रोटीबेटी व्यवहार करतील का? त्या धर्मांतरीत इसमास नव्या स्वीकारीत जातीनुसार राखीव जागांचा लाभ मिळू शकेल का? वगैरे वगैरे )
पण इथल्या एकाही तथाकथीत मिडीया सेलेब्रीटी ( जावेद अख्तर/राजदीप सरदेसाई) वगैरेनी मेणबत्ती मार्च वाल्यानी या घटनेचा निषेध केल्याचे अजुनतरी ऐकिवात नाही.
पाकिस्तानात घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो.

प्रतिक्रिया

२ दिवसात ३ धागे :)
आणि असंख्य जुने धागे वर आणलेले ....

विजुभाव बराच वेळ दिसतोय सध्या
तुम्ही पण बेंच वर हात का ? ऑ?

बॅटमॅन's picture

27 Jul 2012 - 2:33 pm | बॅटमॅन

मीपण निषेध करतो. हा दुटप्पीपणा काही जन्माने हिंदू असलेले लोकच जास्त करतात हे पाहून शरम, चीड, इ. सर्व येते. पण उपयोग काहीच नाही. कारण दुटप्पी सेक्युलॅरिझम ही फॅशन आहे इथली. ते चित्र कधी बदलेल काय माहिती. जे वर्तमानाबद्दल तेच इतिहासाबद्दल. मार्क्सिस्ट इतिहासकारांचा दुटप्पीपणा उघडे पाडणारे अरुण शौरीचे हे अप्रतिम पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी अवश्य वाचावे अशी शिफारस करीत आहे.

यात निषेधार्ह काय आहे?

त्याचे धर्मांतर जर त्याच्या मर्जीने असेल आणि ते जर टी व्ही वर दाखवले तर गैर काय आहे?

जे झाले ते त्याच्या मर्जीने ( फ्री विल) झाले असेल तर ठीक पण त्यामागे इतर काही अर्थकारण किंवा अन्य काही दबावघटक असू शकतात. (युसूफ योहाना या खेळाडूला त्याच्यावर इतर दबाव टाकून धर्मांतराला प्रोत्साहीत केले गेले. किंवा ह हे पहा http://in.news.yahoo.com/no-country-for-pakistani-hindus-.html?page=all
)
पण ही घटना टीव्हीवर ज्या पद्धतीने दाखवली गेली / लोकानी ज्या पद्धतीन धर्मंतरीत इसमाचे स्वागत अभिनन्दन केले गेले; ती मात्र धक्कादायकच होती. भारतात असे काही दाखवले गेल्यास किती गहजब होईल कल्पना करा.
पाकिस्तानात केवळ हिंदुच नव्हे तर इतर धर्मीय अल्पसम्ख्यांकदेखील सुरक्षीत नाहीत.

नेमके काय दाखवले? यु ट्युब आहे का?

पण ही घटना टीव्हीवर ज्या पद्धतीने दाखवली गेली / लोकानी ज्या पद्धतीन धर्मंतरीत इसमाचे स्वागत अभिनन्दन केले गेले; ती मात्र धक्कादायकच होती.

त्यात गैर काय आहे? आपल्या धर्मात कुणी आला, तर अभिनंदनच करणार ना? का तेराव्यासारखे तोंड करुन बसायचे?

माझ्यामते भारतात जे आहे ते तुलनेत फार उत्तम आहे. आपल्याइथे असं काही होत नाही आणि झालंच तर मेणबत्ती मोर्चे का होईना, निर्भयपणे निघतात याचा आनंदच आहे. नाहीतर काय पाहिजे व्हायला?
उदा. समजा भारतातही जबरदस्तीने धर्मांतर होतंय .. मुस्लिमांना हिंदू बनवलं जातंय आणि त्याचा निषेध करायला मुस्लिम रस्त्यावर उतरले आहेत, त्यांना कापायला हिंदू उतरले आहेत असं दृश्य असावं का?

शिवाय असेही काय करायचेय इतर धर्मीयांना हिंदू बनवून ? इथे काही कमी पडतेय का संख्या? म्हणून कोणी ते करायला जाणार नाही.

की मला मुद्दा समजलेला नाहीये?

पण एकूण आहे ते बरं आहे... मी भारतात जन्माला आल्याबद्दल स्वतःला नशीबवान समजतो...

अवांतर
त्यांच्या देशात ते काहीही करोत.
ओबामा अमेरीकेसाठी उपयोगी धेरण घेतो. आपल्याला आवडते का नाही ते पाहात नाही.
श्रीलंकेने नाहीका तमीळ उग्रवाद्यांची कंबर मोडली. मानवता हक्क कमिटीला गुंडाळून ठेवून.
इस्त्राईल ने पॅलेस्टाइनच्या नाकात दम आणला आहे.

आपण पकडलेल्या अजमलला फाशी देऊ शकलो तरी खूप झाले.

पाकिस्तानात काय होते आम्हाला कर्तव्य नाही. प्रॉब्लेम हा आहे की आम्ही अजून बांगलादेशच्या घुसखोरांना रेशनकार्ड वाटप करत फिरतो व आसाम मध्ये जे होते आहे ते होत राहाते.

काश्मिर मध्ये मानवता हक्कवाल्यांना दाद देतो, पण आपल्या पकडल्या गेलेल्या सैनीकाला फरफरटत नेऊन मारल्यावर आपलेच मानवता हक्क वाले मुग गिळून बसतात. तेव्हा चिड येते.

पण ह्या सगळ्या गोष्टींना आपण व फक्त आपणच जबाबदार आहोत.

पण ह्या सगळ्या गोष्टींना आपण व फक्त आपणच जबाबदार आहोत.

जो पर्यंत या देशात मतांचं राजकारण चालु आहे तो पर्यंत कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवणं योग्य नाही.
काँग्रेस जो पर्यंत...........................(संपादित) हे असेच डोक्यावर बसणार आणि अजुन लाखोच्या संख्येने घुसखोरी करणार.

साधा इथे समान नागरी कायदा लागु होत नाही..बाकीच्या गोष्टी तर सोडुनच द्या.
ही यांची पिलावळ जेव्हा पुर्ण्पणे आप्ल्या डोक्यावर मिर्‍या वाटेल तेव्हा डोळे ऊघडतील्..पण तो पर्यंत वेळ निघुन गेली असेल.
कारण तेव्हा आपणच अल्पसंखांक असु :)

अवांतर - ईथे मानवता हा एकच धर्म असल्याने धर्मांतर होऊच शकत नाही ;)

रणजित चितळे's picture

27 Jul 2012 - 3:58 pm | रणजित चितळे

सहमत

घुसखोर स्थायिक झाले, त्याला काँग्रेस कशी जबाबदार? ही कामे प्रशासनातील रेशन कार्ड, वोटर आय डीवाटणारे, सिम कार्ड, वीज कनेक्शन देणारे असे प्रशासनातील लोक करणार ना? की आमदार, खासदार करतात?

कुठलेही सरकार आले/ गेले तरी प्रशासनातील लोक तेच रहातात ना? भाजपाच्या काळात घुसखोरांची कार्डे कॅन्सल झाली का? नवी कार्डे रोखली गेली का? मग उगाच कोंग्रेसला का नावे ठेवायची?

चंबा मुतनाळ's picture

29 Jul 2012 - 10:27 pm | चंबा मुतनाळ

काँग्रेस कशाला जबाबदार आहे ते तरी ठरवा!

नाना चेंगट's picture

27 Jul 2012 - 2:57 pm | नाना चेंगट

एकदा पाकिस्तान हा पूर्णपणे वेगळा सार्वभौम देश आहे असे म्हटल्यावर तिथे काय चालते आणि काय नाही यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

अन्तु बर्वा's picture

27 Jul 2012 - 3:10 pm | अन्तु बर्वा

+ १ चेंगट

विजुभाऊ's picture

17 Aug 2012 - 12:45 pm | विजुभाऊ

एकदा पाकिस्तान हा पूर्णपणे वेगळा सार्वभौम देश आहे असे म्हटल्यावर तिथे काय चालते आणि काय नाही यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

नान्या याला म्हणायचे डोळ्यावर कातडे ओढून झोपणे.
असो.......... पाकिस्तानत हिंदुंचा छळ होतोय म्हणून ते इथे आश्रय मागताहेत. बांगला देश च्या युद्धाच्या वेळेस असेच झाले होते.
त्यांच्या देशात जे काय होते त्याचे परीणाम आपल्याला भोगावे लागतात.

उपास's picture

30 Jul 2012 - 5:11 pm | उपास

नाना.. लेका तुझ तत्वज्ञान अमिरेकेला आणि चिन्यांना कळलं आणि वळलं, तर जगात शातीच शांती.. तुझी शांततेअच्या नोबेल पुरस्कारासाठी तातडीने शिफारस करण्यात येत आहे, शुभं भवतु! :-)

रणजित चितळे's picture

27 Jul 2012 - 3:08 pm | रणजित चितळे

अवांतर
त्यांच्या देशात ते काहीही करोत.
ओबामा अमेरीकेसाठी उपयोगी धेरण घेतो. आपल्याला आवडते का नाही ते पाहात नाही.
श्रीलंकेने नाहीका तमीळ उग्रवाद्यांची कंबर मोडली. मानवता हक्क कमिटीला गुंडाळून ठेवून.
इस्त्राईल ने पॅलेस्टाइनच्या नाकात दम आणला आहे.

आपण पकडलेल्या अजमलला फाशी देऊ शकलो तरी खूप झाले.

पाकिस्तानात काय होते आम्हाला कर्तव्य नाही. प्रॉब्लेम हा आहे की आम्ही अजून बांगलादेशच्या घुसखोरांना रेशनकार्ड वाटप करत फिरतो व आसाम मध्ये जे होते आहे ते होत राहाते.

काश्मिर मध्ये मानवता हक्कवाल्यांना दाद देतो, पण आपल्या पकडल्या गेलेल्या सैनीकाला फरफरटत नेऊन मारल्यावर आपलेच मानवता हक्क वाले मुग गिळून बसतात. तेव्हा चिड येते.

पण ह्या सगळ्या गोष्टींना आपण व फक्त आपणच जबाबदार आहोत.

हिंदू धर्मात परत कोणी येते का. येथे क्रिश्चन होण्यासाठी पैसे दिले जातात. मुसलमान होण्या साठी पैसे दिले जातात (किंवा जास्त लग्न करायची असतील तर धर्मेद्र सारखी तर हा धर्म पतकरतात). हिंदू होऊन त्यांना काहीच फायदा मिळत नाही कशाला होतील हिंदू मग.

मन१'s picture

27 Jul 2012 - 5:07 pm | मन१

अर्थात असे हिंदु धर्मात धर्मांतर होणे हे सर्वथा अशक्य आहे ( टेक्नीकल मुद्दा : धर्मांतरीत इसमाला जात कोणती द्यायची?
१९३५ ते १९३७ मध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसची प्रांतिक सरकारे निवडून आलेली होती. त्यातले कित्येक जण आर्य समाजाला व त्यांच्या चळवळीला सहानुभूती ठ्वून होते. आर्य समाज त्या काळात काही शेकड्यांच्या संख्येने मुस्लिम झालेल्यांना हिंदु धर्मात पुन:प्रवेशित करुन घेइ(किंवा इतर कुठल्याही परधर्मात गेलेल्यांना). आज पाकिस्तानी कट्टरवादी टीव्हीवर जाहीरपणे म्हणतात :- "हे असे घातक उद्योग बघून नीच हिंदुंसोबत राहणे अशक्य असल्याचे मत अधिकच दृढ होत गेले. ही एक अत्यंत मह्त्वाची घटना आहे. ह्यामुळेच उग्र स्वरूप घेउन आक्रमकपणे पाकिस्तानची मागणी अधिकाधिक पुढे केली गेली.(आम्ही केली.)"
त्याकाळात तरी असे होत असावे.
http://www.misalpav.com/node/21758 इथे त्याचा पुसटसा उल्लेख मिळेल.
अर्थात आर्य समाजवाले जातीनिर्मूलन व मूर्तीपूजाविरोध करायच्या मताचे होते, त्यामुळे त्यांना तुम्ही विचारलेला प्रश्न("कुठल्या जातीत येणार " हा ) पडला नाही.

रमताराम's picture

27 Jul 2012 - 7:50 pm | रमताराम

बजाजी निंबाळकर, नेताजी पालकर ही नावे विसरले बहुतेक विजुभाऊ (... की जय!' म्हटलं की पुढचं काही पाह्यचं, उमजायचं नसतं हा समज दृढ झाला.) काही काळापूर्वी 'मी हिंदू झालो' हे पुस्तक पाहण्यात आले. (ले. बहुधा रविन थत्ते) जमल्यास, वेळ असल्यास, टैमपास म्हणून, उगाच आपलं, थोडसं, हळूच, जाताजाता.... वगैरे वाचून पहा.

या असल्या चुकीच्या कल्पनांनी नि रुढीग्रस्ततेमुळेच तर धर्मांतराचा भस्मासुर उभा राहिला आहे.

नन्दादीप's picture

8 Aug 2012 - 5:50 pm | नन्दादीप

या एकाच गोष्टीसाठी आपण कोकणातल्या नाणिज मधील "नरेंद्र महाराजांना" मानतो.

ते जबरदस्तीने धर्मांतर झालेल्याना परत हिंदू धर्मात घेतात. बास... या एकाच गोष्टीसाठी विरोधात बोलवत नाही त्यांच्या..... सगळ माफ त्यांना.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jul 2012 - 7:49 pm | परिकथेतील राजकुमार

थत्तेचाचा आणि मदनबाण ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

मदनबाण's picture

27 Jul 2012 - 8:11 pm | मदनबाण

थत्तेचाचा आणि मदनबाण ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
सन्माननिय राजकुमार यांनी केलेल्या आग्रहाच्या विनंतीची मी अवहेलना करु शकत नसल्याने... आणि टंकन खुजली मिटवण्यासाठी काही ओळी खरडतोच ! ;)

च्यामारी या पाकड्यांच्या.... स्साला एव्हढुसचा देश पण आपल्या देशाशी वैर घेउन राहिलाय ! हिंदु लोकांवर अत्याचार करणे आणि हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाया करणे हेच यांचे राष्ट्रीय धोरण आहे यात तीळ मात्र शंका नाही.
फोकलीचे चीन कडुन टेक्नोलॉजी घेतात आणि अमेरिकेकडुन पैसा आणि विमाने !
हिंदुस्थानी लोक काय करणार बिचारे ! कारण हिंदुची मारणारे हिंदु या देशात मुबलक आहेत तेव्हा इतरांची काय ती गरज ?
काल कारगिल दिवस साजरा झाला म्हणे ? पण ह्याच हलकट,कुत्तरड्या पाकड्यांनी कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना कुत्ते की मौत कशी दिली ते अख्या जगाला कळले ! काय उपटले आपण ?
प्रणवदा हिंदुस्थानचे १३ वे राष्ट्रपती झाले,त्यांच्या आधी जे राष्ट्रपती होउन गेले त्यांना त्या अफजल्याची फाईल काही हाताळायला वेळ मिळाला नाही ! इतके बिझी हे लोक... तो पाकिस्तानी सापड्या कसाब कसा हसतोय बघा आपल्यावर .... बिर्याणी खाउन खाउन तब्येत एकदम चुस्त झाली आहे त्या नराधमाची ! तरी आपण त्याला पाळतोय,पोसतोय का ?
कारण हे हिंदु राष्ट्र आहे ना !

इरसाल's picture

27 Jul 2012 - 8:21 pm | इरसाल

आज पेटलायेत जणु.... केएफसी फायरी चिकन काय ?

मदनबाण's picture

27 Jul 2012 - 8:23 pm | मदनबाण

आज पेटलायेत जणु.... केएफसी फायरी चिकन काय ?
हॅहॅहॅ... चिकन-बिकन अपुन खाता तो क्या सुंघता भी नही है मियाँ... ;)

JAGOMOHANPYARE's picture

27 Jul 2012 - 8:32 pm | JAGOMOHANPYARE

आयला गंमतच सगळी..... पाकिस्तानात कुणीतरी तिथल्याच माणसाने तिथल्याच धर्मात धर्मांतर केले ही बातमी.... आणि प्रतिसाद काय? तर कारगिल, कसाब, बिर्यानी... ????? आता बापू, ५५ कोटी इतक्यावरच लिहायचे राहिले आहे.

मदनबाण's picture

27 Jul 2012 - 8:43 pm | मदनबाण

आयला गंमतच सगळी..... पाकिस्तानात कुणीतरी तिथल्याच माणसाने तिथल्याच धर्मात धर्मांतर केले ही बातमी.... आणि प्रतिसाद काय? तर कारगिल, कसाब, बिर्यानी... ????? आता बापू, ५५ कोटी इतक्यावरच लिहायचे राहिले आहे.
मला वाटलच तुम्ही प्रतिसाद देणार, तुम्हा १००% हिंदु दिसता ! ;)
बाकी नावात जागो असले तरी सोंग झोपेचे घेतलेले आहे.... अर्थात हे देखील माहित असल्याने फक्त दुर्लक्ष करतो.
पाकड्यांनी काही केले तरी त्यांची निती आम्हाला ठाउक असल्याने आमच्या विचारात / मतात आणि लिखाणात देखील फरक पडणार नाही.

JAGOMOHANPYARE's picture

27 Jul 2012 - 8:50 pm | JAGOMOHANPYARE

आमची झोप नैसर्गिक आहे. तुमच्यासारखी धर्म नावाची अफूची गोळी घेऊन आलेली मोहनिद्रा नाही.

तुमच्यासारखी धर्म नावाची अफूची गोळी घेऊन आलेली मोहनिद्रा नाही.
आम्ही धर्म नावाची अफुची गोळी घेउ नाही तर गांजा मारु ! तुम्ही तुमची "नैसर्गिक" झोप काढा मस्त !
प्रतिक्रियेचा काही भाग संपादित.

राजो's picture

30 Jul 2012 - 10:28 am | राजो

काही लोकांपुढे कितीही शंख केला तरी काही उपयोग नसतो.. त्यांच्यासाठी "देवा.. त्यांना माफ कर.. त्यांनाच कळत नाही ते काय करत आहेत." इतकेच म्हणावे वाटते.

- मारो***सारे

रणजित चितळे's picture

28 Jul 2012 - 8:53 am | रणजित चितळे

साहेब +१

अर्धवटराव's picture

27 Jul 2012 - 8:36 pm | अर्धवटराव

मध्यंतरी तो झाकीर नाईक का कोण, त्याने पुण्यात उघड उघड असा धर्मांतराचा कार्यक्रम राबवला. इथे तर पाकिस्तान एक मुस्लीम राष्ट्रच आहे.
नागरीकांचे धार्मीक, सांस्कृतीक स्वातंत्र्य अबाधीत ठेवणारे राष्ट्र असेल (अमेरीका वगैरे) तर उत्तमच आहे. पण तसं नसलं तरी अल्पसंख्यकांवर बहुसंख्यकांची संस्कृती/धर्म लादल्या जावा हे कितीही असहिष्णु वगैरे वाटलं तरी ते एक स्वाभावीक सत्य आहे. श्रेष्ठ-कनिष्ठ पणाच्या कल्पना, राजकीय-आर्थीक शक्तींवरची मक्तेदारी... लढायला काहि तर कारण हवं ना...

राहिला भाग पाकिस्तान आणि भारतातल्या अल्पसंख्यकांच्या प्रश्नाचा... तर या दोन्ही ठिकाणी जे काहि होतय त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहि नाहि. पाकिस्तानची निर्मीतीच मुळी इस्लामीक राष्ट्र म्हणुन झाली... आणि भारतातल्या बहुसंख्यकांना जर आपली व्यवस्था नीट चालवता येत नाहि तर त्याबद्दल दुसरीकडे बोट दाखवायचा करंटेपणा देखील करु नये.

अर्धवटराव

JAGOMOHANPYARE's picture

27 Jul 2012 - 8:47 pm | JAGOMOHANPYARE

अगदी अनुमोदन. सक्तीचे धर्मांतर करायला हा काही औरंगजेबाचा काळ नाही... लोक स्वतःच्या मर्जीने जात असतील, तर दुसर्‍याना दोष का द्यायचा?

एके काळी हिंदु धर्मातल्या 'आचार्यानीही ' असे बौद्ध धर्मातून हिंदु करायचे फड रंगवले होते.

अब उनकी बारी. चार दिवस सासूचे, चार सुनेचे.

अर्धवटराव's picture

28 Jul 2012 - 10:08 am | अर्धवटराव

यस्स... मग या आचार्यांच्या अनुयायींना चार भावंडांनी (३ भाऊ, १ बहिण) चेलेंज केलं. पुढे हा संग्राम फाटे फुटुन अनेकविध झाला... पण भारत पाकिस्तान मुद्यातली एक राजकीय धारा मात्र त्यात नव्हती, बाकी सर्व सेम.

अर्धवटराव

भारतातल्या बहुसंख्यकांना जर आपली व्यवस्था नीट चालवता येत नाहि तर त्याबद्दल दुसरीकडे बोट दाखवायचा करंटेपणा देखील करु नये

शतशः सहमत. हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

---

रच्याक: बहुतांश हिंदूंना, भारत विरुद्ध पाकिस्तान असा कोणता तरी वाद / भांडण / युद्ध / लढाई चालू आहे असे वाटते, प्रत्यक्षात हा वाद इस्लाम विरुद्ध सर्व प्रकाराचे काफिर असा आहे आणि तो (काफ़िरांनी इस्लाम नष्ट केला नाही तर) जगाच्या अंतापर्यंत सतत चालू राहणार आहे.

अवांतर: तुम्हाला युद्धात रस नसला तरी युद्धाला तुमच्यात रस असू शकतो.

चौकस२१२'s picture

18 Jan 2022 - 11:22 am | चौकस२१२

प्रत्यक्षात हा वाद इस्लाम विरुद्ध सर्व प्रकाराचे काफिर असा आहे
+ फक्त इस्लाम नाही तर ३ अब्राहमीक धर्म आणि इतर ( हिंदू, बुद्ध , शीख ) यांच्यातील आहे
विस्तरवाद हा ३अब्राहमीक धर्मांचा पाया आहे ( कदाचित ज्यु नचा तेवढा नसेल )
कोणी तलवारीच्या बळावर तर कोणी "शिक्षणाच्या प्रसाराच्या " नावाखाली

चौकस२१२'s picture

18 Jan 2022 - 11:22 am | चौकस२१२

प्रत्यक्षात हा वाद इस्लाम विरुद्ध सर्व प्रकाराचे काफिर असा आहे
+ फक्त इस्लाम नाही तर ३ अब्राहमीक धर्म आणि इतर ( हिंदू, बुद्ध , शीख ) यांच्यातील आहे
विस्तरवाद हा ३अब्राहमीक धर्मांचा पाया आहे ( कदाचित ज्यु नचा तेवढा नसेल )
कोणी तलवारीच्या बळावर तर कोणी "शिक्षणाच्या प्रसाराच्या " नावाखाली

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jul 2012 - 12:06 am | निनाद मुक्काम प...

बाटलेल्या हिंदू धर्मियांना हिंदू धर्मात परतण्याचे काही मार्ग आहेत का ?
ह्याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा.

अमेरिकेने पाकिस्तान पुढे सपशेल लोटांगण घातले.
त्यामुळे तेथील कट्टर धर्मपंथीय सध्या भलतेच फॉर्मात आहेत.
म्हणूनच त्यांची इथवर मजल गेली आहे.
आता आखातातून पेट्रो डॉलर ची गंगा पाकिस्तानात अवतरेल.
जगात हिरवळ पसरविण्यासाठी चालू झालेल्या पाकिस्तानी हरित क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी

मी उघड्या डोळ्याने दीडशे आदिवासी लोकांचे धर्मांतर सोहळा वा यम सी ए ( मुंबई सेन्ट्रल येथे पहिला आहे. त्यामुळे ह्या घटनेचे काहीही विशेष नाही.
भारतात टीव्ही वर अश्याच धाटणीचे सोहळे लवकरच दाखवले जातील.

अर्धवटराव's picture

29 Jul 2012 - 2:05 am | अर्धवटराव

काहि उदाहरणे ऐकण्यात आलि आहेत. नाणिज चे नरेंद्रनाथ महाराज हे कार्य करतहेत. आळंदीला सुद्धा असं काहि होतं असं ऐकुन आहे.

अर्धवटराव

मन१'s picture

29 Jul 2012 - 10:05 am | मन१

निनादभाउंनी हिरव्या रंगात प्रवेश करणार्‍यांबद्द्ल उल्लेख केलाय.
नाणिज चा तुम्ही केलेला उल्लेख हा हिरव्या रंगातून परतणार्‍यांचा आहे.
बादवे, धुळ्याला (आसपासचा आदिवासी बेल्ट टारगेट करण्यासठी) अफाट पैसा ओतून आशियातील सर्वात मोठे कार्यालय एका संस्थेने उभारलय म्हणे. ते कशाचे कुणास ठाउक आहे का?

अर्धवटराव's picture

29 Jul 2012 - 11:25 am | अर्धवटराव

"बाटलेल्या हिंदू धर्मियांना हिंदू धर्मात परतण्याचे काही मार्ग आहेत का ?"

धुळ्याचं माहित नाहि, पण मध्यंतरी चंद्रपूरच्या आदिवासी एरीयात ख्रिस्ती धर्मप्रचारावरुन भरपूर राडे झाल्याचं ऐकलं होतं...

अर्धवटराव

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Jul 2012 - 9:11 pm | निनाद मुक्काम प...

मन
मी हिरव्या रंगातून परतणाऱ्या लोकांबद्दल म्हणालो होतो.
अर्धवट राव ह्यांच्या माहिती बद्दल धन्यवाद

मन१'s picture

31 Jul 2012 - 3:27 pm | मन१

ओके

मुद्दा काय आहे.. भारतात जसे राष्ट्रप्रेमी मुसलमान आहेत तसे पाकिस्तान त्या देशाच्या चरणी निष्ठा असेलेले हिंदू असू शकतीलच ना. मग धर्माचा प्रश्न राष्ट्रापुढे दुय्यम ठरत नाही का? उगाच आपलं पित्त खवळून घेण्यात काहीच अर्थ नाही.. धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान ह्यात आधी काय हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत असे गोधळ होतच राहाणार..!

क्लिंटन's picture

30 Jul 2012 - 5:40 pm | क्लिंटन

पाकिस्तान त्या देशाच्या चरणी निष्ठा असेलेले हिंदू असू शकतीलच ना

पाकिस्तानच्या घटनासमितीचे पहिले अध्यक्ष होते जोगेन्द्रनाथ मंडल. घटनासमितीत काँग्रेस पक्षाचे नेते होते किरण शंकर रॉय (नावावरून ते पूर्व पाकिस्तानातले असावेत असे वाटते).आपल्या पंजाबचे दुसरे मुख्यमंत्री भीमसेन सच्चर (न्या.राजेन्द्रसिंह सच्चर-- सच्चर कमिटी रिपोर्ट फेम यांचे वडिल) सुध्दा पाकिस्तानच्या घटनासमितीचे सदस्य होते आणि पाकिस्तान सोडून भारतात यायची त्यांची इच्छा नव्हती. ते पाकिस्तानात होते त्या काळात त्यांची निष्ठा पाकिस्तानबद्दल असावी असे म्हणायला नक्कीच वाव आहे. हिरव्या देशातील आमच्या विद्यापीठात एक कराचीचा हिंदू मुलगा होता आणि तो पाकिस्तानबद्दल पूर्ण निष्ठा बाळगून होता. अशी इतर काही/अनेक उदाहरणेही देता येतील.

धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान ह्यात आधी काय हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत असे गोधळ होतच राहाणार..!

+१. (स्वगतः पण अनेकदा अमुक एका धर्माचे असल्यास राष्ट्राविषयी प्रेम वाटत नाही असे बाय डिफॉल्ट समजले जाते :( )

मन१'s picture

30 Jul 2012 - 6:59 pm | मन१

धाग्याला अवांतर प्रतिसादाला समांतर माहिती :-
पाकिस्तानचे पहिले राष्ट्रगीत(१९४७ते १९५२ पर्यंत वापरात असणारे) जगन्नाथ पुरी/पंडित अशा कुणातरी माणसाने खास जिन्नांच्या आग्रहावरून लिहिल्याचं मागे "द हिंदू " मध्ये आलेलं होतं.
बहुतांश पाकिस्तानी intellectuals नी नंतर ते अमान्यही केलं.
काय उलटसुलट किस्से काहेत, काहीच कळत नाही.

आणखी अवांतर आणखी समांतर :

बांगला देशाचे राष्ट्रगीत रवींद्र्नाथ टागोर यांचेच आहे.

दोन देशांचे राष्ट्रगीत लिहायचा मान मिळालेले टागोर हे जगातील एकमेव कवी आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Aug 2012 - 8:15 pm | निनाद मुक्काम प...

पाकिस्तानच्या एका टोकं शो मध्ये त्यांचे राष्ट्रगीत हे एका हिंदू कवीस जीना ह्यांनी खास आग्रह करून हे गीत लिहिण्यास सांगितल्याचे आठवते:

विजुभाऊ's picture

9 Aug 2012 - 9:59 am | विजुभाऊ

जीना हे कट्टर इस्लाम चे आग्रही नव्हत. त्याना पाकिस्तान हे सर्वधर्मीयांचे राष्ट्र हवे होते. पण त्यांच्या आजारपणामुळे पाकिस्तान निर्मिती नंतरची परीस्थिती त्यांच्या आवाक्याबाहेर गेली.

शिल्पा ब's picture

9 Aug 2012 - 10:59 am | शिल्पा ब

पण मग त्यासाठी अखंड भारताचे तुकडे का करायला लावले?

विजुभाऊ's picture

9 Aug 2012 - 11:29 am | विजुभाऊ

जीनानी अखम्ड भारताचे तुकडे करायल लावले याचे कारण वेगळेच होते. १९३० साली मुहम्मद इक्बाल ( तोच तो सारे जहांसे अच्छा लिहीणारा) यानी भारतात मुस्लीमाना स्वतन्त्र विभाग असावेत असा प्रस्ताव सुचवला.
जीनानी त्यातूनच २ नेशन थेअरी मांडली. या नुसार एकाच भारतात हिंदुंबहुल आनि मुस्लीम बहुल असे वेगवेगळे विभाग असावेत.
१९४१ साली मात्र जिना यानी पाकिस्तान हा शब्द निर्मान केला. त्यांच्या मते भारातात हिंदु आणि मुस्लीम हे एकत्र नांदु शकणार नाहीत.

शिल्पा ब's picture

9 Aug 2012 - 11:37 am | शिल्पा ब

तुमचा हा प्रतिसाद अन वरचा कॉन्ट्राडिक्टरी आहेत असं वाटतंय.

हिंदु मुस्लीम एकत्र राहु शकत नाहीत असं वाटंत होतं तर मग सर्वधर्मसमभाववालं पाकीस्तान कशाला हवं? ते फक्त मुस्लीमांसाठीच. नाही का? का माझा गोंधळ होतोय?

विजुभाऊ's picture

9 Aug 2012 - 11:45 am | विजुभाऊ

कोंट्रॅडिक्टरीच आहे ते.
जिन्नाना सुन्नीबहुल पाकिस्तानात काय होणार आहे ते माहीत होते.
फाळणीनंतरच्या हिंसाचारात पाकिस्थानातील अल्पसंख्यांक हिंदुचे रक्षण करण्यात त्यानी पुढाकार घेतला होता.
त्याना हिंदूबहूल राष्ट्रात मुस्लीम हे अल्पसंख्यांक ठरतील या मुद्द्यावरून वेगळ्या विभागाची मागणी झाली होती. हे मत मूलतः इक्बाल यांचे होते. हिंदू बहुल काँग्रेसच्या वर्चस्वाला उत्तर म्हणून लीग ने ही मागणी पुढे रेटली होती.
( जसे विहींप च्या रामजन्मभूमी आंदोलनाला मागे टाकण्यासाठी व्हीपी सिंगानी मंडल आयोगाचे अस्त्र पुढे आणले.त्यामुळे भारतीय राजकारणच बदलले)

क्लिंटन's picture

9 Aug 2012 - 1:08 pm | क्लिंटन

फाळणीनंतरच्या हिंसाचारात पाकिस्थानातील अल्पसंख्यांक हिंदुचे रक्षण करण्यात त्यानी पुढाकार घेतला होता.

जीनांनी यासाठी नक्की काय केले होते याविषयी लिहू शकाल का? अखंड भारतात आपण अल्पसंख्यांक मुसलमानांचे चॅम्पिअन होतो त्याप्रमाणे पाकिस्तानातही आपण अल्पसंख्यांक हिंदूंचे चॅम्पिअन म्हणून राहावे असे जीनांना वाटत होते असे अडवाणींच्या पुस्तकात म्हटले आहे. पण त्यासाठी त्यांनी नक्की काय केले हे शोधायचा माझाही प्रयत्न आहे. त्याविषयी अधिक लिहिल्यास चांगले होईल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

10 Aug 2012 - 11:41 am | पुण्याचे वटवाघूळ

१९४१ साली मात्र जिना यानी पाकिस्तान हा शब्द निर्मान केला.

मला वातते पाकिस्तान हा शब्द केंब्रिज युनिवर्सिटीतील रहमत अली चौधरी या विद्यार्थ्याने १८९० च्या सुमारास पहिल्यांदा वापरला होता. त्यात P म्हणजे पंजाब, A म्हणजे अफगाणिस्तान, K म्हणजे काश्मीर, I म्हणजे इराण, S म्हणजे सिंध आणि पख्तुनिस्तान (वायव्य सरहद्द प्रांत) मधील TAN हे शब्द होते. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी ही विनंती.

क्लिंटन's picture

9 Aug 2012 - 1:02 pm | क्लिंटन

जीना हे कट्टर इस्लाम चे आग्रही नव्हत. त्याना पाकिस्तान हे सर्वधर्मीयांचे राष्ट्र हवे होते.

जीना हे कट्टर मुसलमान नक्कीच नव्हते. दारू-सिगरेट या इस्लामला मंजूर नसलेल्या गोष्टींचे ते सेवन करत असत. तसेच कुराणचे नियमित वाचन ते करत नसत. (याउलट ज्या महात्मा गांधींबरोबर त्यांची चर्चा चालू होती त्यांना कुराणमधील संदर्भ अधिक चांगल्या पध्दतीने अवगत होते)--- संदर्भः फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट हे डोमिनिक लापिएरे आणि लॅरी कॉलिन्स यांचे पुस्तक. इतरही काही ठिकाणी हे संदर्भ मी वाचले आहेत. तरीही जीनांना पाकिस्तान हे खरोखरच सेक्युलर राष्ट्र हवे होते का याविषयी थोडे मतभेद असू शकतात.

ऑगस्ट १९४७ मध्ये जीना दिल्ली विमानतळावरून विमानाने कराचीला गेले. आपले जीवनध्येय साकार झाले असताना अपेक्षित असलेला आनंद त्यावेळी जीनांच्या चेहर्यावर नव्हता. तसेच विमान उडल्यानंतरही ते मागे वळून वळून खाली दिसत असलेल्या दिल्ली शहराकडे बघत होते आणि दिल्ली शहर आपल्याला परत बघायला मिळणार नाही अशा स्वरूपाचे उद्गार त्यांनी काड्।अले होते. (संदर्भः वि.स.वाळिंबे यांच्या १९४७/फाळणीवरील पुस्तकात हा उल्लेख होता. पुस्तक वाचून बरीच वर्षे झाली आहेत. पुस्तकाचे नाव बहुदा सत्तांतर १९४७ अशा स्वरूपाचे होते.) अडवाणींच्या आत्मचरित्रात जीनांच्या विविध लेखकांनी लिहिलेल्या चरित्रांचा उल्लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की पाकिस्तान मिळाल्यानंतर जीना हताश झाले होते. एक वेळ अशी आली होती की आपण दिल्लीला जाऊन नेहरूंना भेटून "झालेगेले विसरून जाऊ आणि परत आपण एकत्र येऊ" असे सांगावे असेही जीनांना वाटू लागले होते. पण जीनांना लियाकत अली खान आणि मुस्लिम लीगच्या इतर नेत्यांनी गुंङाळून ठेवले आणि त्यांचे फारसे चालत नव्हते. तसेच कराचीमध्ये बोटीतून भारतात जाण्यासाठी हिंदू निर्वासित कराचीच्या स्वामीनारायण मंदिरात एकत्र आले होते तिथे जीना त्यांना भेटायला गेले आणि शुभेच्छा दिल्या अशा स्वरूपाचेही उल्लेख वाचले आहेत.

जीनांच्या पाकिस्तानच्या कन्सेप्टविषयी हा आणि व्हिजनविषयी हा असे ए.जी. नुरानींचे दोन लेख उपयुक्त ठरावेत. (केवळ ए.जी.नुरानींच्या लेखांसाठी फ्रंटलाईन मासिक विकत घ्यावेसे वाटते).

जीना खरोखरच सेक्युलर होते तर फाळणीच्या वेळी झालेल्या रक्तपाताविषयी त्यांची भूमिका काय होती, त्यांनी १६ ऑगस्ट १९४६ रोजीच्या कलकत्त्यातील प्रत्यक्ष कृतीदिनापासून सुरू झालेल्या दंगलींचा निषेध केला का, त्या थांबविण्यासाठी त्यांनी काय केले इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांचे सेक्युलॅरिझम म्हणजे तोंडपाटिलकी झाली.

ए.जी.नुरानींच्या लेखांत म्हटले आहे की जीनांची पाकिस्तानविषयीचे व्हिजन पूर्णपणे स्पष्ट होते (सेक्युलर पाकिस्तान) पण त्यांची पाकिस्तानविषयीची कन्सेप्ट (नक्की कोणता भाग पाकिस्तानात जाणार) ही मात्र तितकीशी स्पष्ट नव्हती. हे लेख वाचल्यापासून मला जीनांच्या दिल्ली प्रेमाविषयी एक प्रश्न पडला आहे. या लेखातच बेगम इक्रामुल्ला या पाकिस्तान चळवळीच्या महिला गटाच्या नेत्याच्या पुस्तकाचा हवाला देऊन म्हटले आहे: "“East Punjab and west Bengal were to be incorporated in the Indian Union. Muslims were shocked and disturbed at this turn of events. The borders of Pakistan had never been clearly defined. Many in the rank and file of the Muslim League had continued to hope that some last minute agreement would ensure for them a position in an independent India without partition, and if partition came it should certainly mean the whole of Bengal and Punjab, and that in the Punjab, the line would be drawn just below Delhi where there was a 52 per cent overall majority of Muslims. For millions of persons like myself to whom Delhi was synonymous with Muslim culture, a Pakistan without Delhi was a body without a heart, and yet this is what was going to happen. In Bengal, Calcutta, the main port and the lifeline for East Pakistan, was also to be lost, and there was no time to do anything about it. Events had got out of control and there was a Kafka-like atmosphere about the whole thing." जीनांनी दिल्लीकडे बघून काढलेले उद्गार हे दिल्ली पाकिस्तानात सामील झाली नाही या दु:खातून कशावरून नसतील? कशावरून हे जीनांचे नक्राश्रू नसतील?

अन्या दातार's picture

10 Aug 2012 - 3:55 pm | अन्या दातार

जीना कट्टर मुसलमान जरी नसले तरी पाकिस्तान हे राष्ट्र त्यांना "इस्लामी"च हवे होते. एक प्रगत, स्वावलंबी "इस्लामी" राष्ट्र हे त्यांचे व्हिजन होते. पण जरी इस्लामी राष्ट्र असले तरी तिथे इतर धर्मीय लोकांनी निर्भयपणे राहिले पाहिजे अशीही त्यांची इच्छा होती.
मुळात पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून कसे असावे याबाबत अनेक मतप्रवाह होते (अर्थातच त्यात एकमत नव्हते). हे मतप्रवाह अल्लामा इक्बाल यांच्यापासून विविध मुस्लिम नेत्यांचे होते. पाकिस्तान मूर्त स्वरुपात आणण्याचे काम मात्र जीनांनी मुस्लीम लीगमार्फत केले.
जीनांच्या मृत्युनंतर पंजाब प्रांतातील सरंजामदारांनी (आर्थिक व लष्करी बळाने) सत्ता ठरावीक लोकांपुरती केंद्रित राहील यादृष्टीने प्रयत्न केले. (एस्टॅब्लिशमेंट). या एस्टॅब्लिशमेंटला धर्मांध लोकांची जोड मिळाल्यामुळे तिथले सत्ताकेंद्र नेहमीच अस्थिर राहिले.
(संदर्भः Idea of Pakistan, Stephen Cohen)

जीना खरोखरच सेक्युलर होते तर फाळणीच्या वेळी झालेल्या रक्तपाताविषयी त्यांची भूमिका काय होती, त्यांनी १६ ऑगस्ट १९४६ रोजीच्या कलकत्त्यातील प्रत्यक्ष कृतीदिनापासून सुरू झालेल्या दंगलींचा निषेध केला का, त्या थांबविण्यासाठी त्यांनी काय केले इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांचे सेक्युलॅरिझम म्हणजे तोंडपाटिलकी झाली.

सेक्युलॅरिझमबद्दल काय बोलावे? जगात कुठेही बघितले तर सेक्युलॅरिझम म्हणजे फक्त तोंडपाटीलकीच असते.

अमोल खरे's picture

11 Aug 2012 - 7:18 pm | अमोल खरे

माझ्या आजोबांनी सांगितली होती. त्यांच्या ओळखीचे खरे आडनावाचे एक गृहस्थ जीनाचे ( ह्या जीनाचा मी आदरार्थी उल्लेख करु शकत नाही) पीए का स्टेनो असे काहितरी होते. जेव्हा फाळणी झाली तेव्हा खरेंनी पण आपल्याबरोबर यावे म्हणुन जीना आग्रही होता. तुम्हाला तिकडे सर्वात मोठा दर्जा देतो, मोठा बंगला देतो अशी अनेक आर्जवे केली, पण आपण एकत्र काम केले ते इथवरच, ह्यापुढे नाही असे खरेंनी स्पष्ट सांगितले. (तो निर्णय इतका बरोबर असेल हे खरेंना तरी तेव्हा माहित असेल का याचा अंदाज नाही. :) )

अवांतर- काही वर्षांपुर्वी गोल्डन टेंपल मेल मधुन येत होतो, तेव्हा समोर एक हिंदी आंटी बसल्या होत्या. त्यांचा अख्खा ग्रुप पाकिस्तानात काय शांतताप्रसार का काहितरी करायला गेला होता. त्या आपुलकीने मला काय करतोस, काय शिक्षण आहे वगैरे विचारत होत्या. मी पण त्यांना तुम्ही कुठपासुन आला आहात ते विचारलं तेव्हा म्हणाल्या की आम्ही सर्वजण अमृतसरपासुन येतोय वगैरे. मी थोड्या वेळानंतर त्यांना सरळ विचारलं की काय हो, तुम्ही पाकिस्तानात गेलात, त्याने काही फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला तर नुसत्या हसल्या, मी विचारलं की तुमच्यावर पाकिस्तानात पाळत असायची का तर हळु आवाजात म्हणाल्या की हो, जेव्हा आम्ही लोकांना भेटायचो तेव्हा ते सांगायचे की आमच्याशी जास्त बोलु नका, तो जो माणुस तिथे आहे तो लष्करातील आहे वगैरे. ( आता त्या बिचा-या बाई भारतात हे इतक्या हळु आवाजात का सांगत होत्या ते कळलं नाही :) पण असते अशी काहीजणांना पाकिस्तानात जायची हौस असे म्हणत गप्प बसलो.) पण त्यावेळी सुद्धा एक आठवण व्यवस्थित लक्षात होती, खुप वर्षापुर्वी स्वराज एक्स्प्रेस ने दिल्लीस जात होतो, तेव्हा एक म्हातारे आजी आजोबा, त्यांची सुन आणि छोटी २-३ वर्षांची नात असे समोरच्या सीटवर बसले होते, कुठे जाता आहात असे विचारल्यावर आमचा मुलगा गेल्या आठवड्यात काश्मीर मध्ये शहिद झाला, त्याची बॉडी गावाला येणार आहे, तिथे जात आहोत असे त्या आजोबांनी शांतपणे सांगितले, बाजुला बर्थवर खेळणा-या त्या छोट्या मुलीला काय चाललाय ह्याची कल्पनाही नसावी. तेव्हापासुन जे कोणी पाकिस्तानाबरोबर शांती ठेवा रे, ते वाईट नाहीयेत रे, तिकडे गेल्यावर हॉटेलात आमच्याकडुन पैसे पण घेतले नाहीत म्हणजे ते कित्ती कित्ती छान, परदेशात इतके चांगले बोलतात म्हणजे कित्ती कित्ती छान असे म्हणतात तेव्हा खरोखरच डोक्यात जातात. आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता, त्याचा चुलत भाऊ सैन्यात होता काश्मीरला, तेव्हा तो सांगत होता कि त्याचा भाऊ आणि त्याच्या युनिटचे लोक कुठेतरी गस्त घालत होते तर त्यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळेस ह्याच्या भावाने काहितरी १५-२० फुटांवरुन खाली उडी घेतली कारण दुसरा मार्गच नव्हता, मरता मरता वाचला म्हणे. ते बिचारे सैनिक इतकी रिस्क घेऊन काम करतात आणि इथे लोकं जीना कसा चांगला होता, काश्मिरमधले लोकं कसे देशभक्त आहेत असे सांगत बसतात. लोकल सपोर्ट शिवाय दहशतवाद फोफावत नाही. काश्मीर मधली लोकं दहशतवाद्यांविषयी पुर्ण सहानुभुती बाळगुन आहेत हे लोकं का स्विकारत नाहीत ? वर आपण ज्यांना दहशतवादी म्हणतो त्यांना ते क्रांतिकारक म्हणतील अशा वाद का घालत बसतात ? आपण ते काय म्हणतील ह्याचा विचार का करतो ? आपल्यासाठी तो दहशतवादी आहे ना, मग विषय संपला असे का होत नाही. आणि हे मिपावरच नाही तर आम पब्लिक मधे ही आहे, म्हणुनच काँग्रेस आणि भाजपा ( पाकिस्तानशी बस सुरु केली ह्यांनी) निवडुन येतात. जो देश कन्सिस्टन्टली भारताच्या वाईटावर टपलेला आहे त्याचे संस्थापक कसे चांगले होते वगैरे विषय हे कधीही चर्चेचे विषय होऊ नयेत असे वाटते. कैच्याकै अवांतर झाले पण बोलावेसे वाटले बॉस म्हणुन बोललो इतकेच.

शिल्पा ब's picture

11 Aug 2012 - 10:39 pm | शिल्पा ब

<<लोकल सपोर्ट शिवाय दहशतवाद फोफावत नाही. काश्मीर मधली लोकं दहशतवाद्यांविषयी पुर्ण सहानुभुती बाळगुन आहेत हे लोकं का स्विकारत नाहीत ?

<<<आपण ते काय म्हणतील ह्याचा विचार का करतो ? आपल्यासाठी तो दहशतवादी आहे ना, मग विषय संपला असे का होत नाही. आणि हे मिपावरच नाही तर आम पब्लिक मधे ही आहे, म्हणुनच काँग्रेस आणि भाजपा ( पाकिस्तानशी बस सुरु केली ह्यांनी) निवडुन येतात.

<<<जो देश कन्सिस्टन्टली भारताच्या वाईटावर टपलेला आहे त्याचे संस्थापक कसे चांगले होते वगैरे विषय हे कधीही चर्चेचे विषय होऊ नयेत असे वाटते

+ १००%

पुष्करिणी's picture

14 Aug 2012 - 1:37 am | पुष्करिणी

जो आपला शत्रु आहे त्याच्या दर सहा महिन्यांनी गळी पडून ' अमन की आशा' 'पिपल टू पिपल काँटॅक्ट' असली थेरं कशाला करायची कोणास ठाउक. आता काय म्हणे क्रिकेटच खेळा मग काय तर गाणीच गा ....इतक्य वेळा त्यांनी हाड हाड करून झालय, रस्त्यावरच कुत्रंसुद्धा २-४ वेळेस हाड केलं की परत येत नाही. स्वतःची किंमत ठेउन घेता आली नाही की होणारच असं.

का कोण जाणे पण उतररेंतील लोकांना पाकिस्तान बद्दल जास्त उत्सुकता आहे असे वाटते ( चुकीचे असेल हे निरीक्षण पण वाटते खरे )
अटारी सीमेवरून पाकिस्तान चे जे काही दर्शन झाले त्यावरून "पाकिस्तान बघण्याची " हौस फिटली + भारताला त्रासच देणाऱ्या देशाच्या अर्थकारणाला हातभार लागेल असे काही करण्याचे टाळतो ( येथे दोन्ही देशातील किराणा मिळतो )
भारतीय भाग = बहुरंगी , सेनेच्या ताफ्यात पुढे २महिला आणि प्रेक्षकात महिलांना तिरंगा घेऊन पुढे मिरवणूक काढायला प्राधान्य
पाकिस्तान = एकच रंग, एक युद्धात पाय मोडलेले सैनिक स्वतःभोवतीच तासापेक्षा जास्त वेळ गिरक्याघेतोय .. गोल गोल गोल वेडाने भारावून गेलेल्या सतत तेच तेच करणाऱ्या माणसासारखे
या दोन चित्रातूनच दोन देशांची मानसिकता जाणवली .. त्यामुळे नो सिम्पथी .. मानवतावाद वैगरे गेला चुलीत

अर्धवटराव's picture

30 Jul 2012 - 10:11 pm | अर्धवटराव

>>धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान ह्यात आधी काय हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत असे गोधळ होतच राहाणार..!
पर्फेक्ट.
यात सर्व गोंधळातला एक एक नॉईस फॅक्टर ढोबळ मानाने असा वेगळा काढता येईल.
१) हिंदु - धर्मकारण राजकारणपासुन मुळतः भिन्न. या एकत्रीकरणाची प्रक्रिया तुटकपणे रायगड राज्य निर्मीतीच्या वेळी झाली... पण तिचा प्रथम उद्देश धर्मस्थापना नसुन राज्यस्थापनाच होता... २० व्या शतकाच्या अधेमधे धर्मकारणाला राजकारणाशी जोडण्याला फॉर्मली सुरुवात. सद्यस्थिती जैसे थे. अर्थकारण धर्मकारणापासुन भिन्न. संख्येच्या बाबतीत नगण्य नाहि. पण जागतीक राजकारणावर धर्मप्रभाव नगण्य.
२) मुस्लीम - धर्मकारण आंणि राजकारण फार एकजीव. अगदी पोथीनिष्ठ धर्म राजकारणामार्फत रुजविण्याचा आजही प्रयत्न. धर्माला राजकारणापासुन वेगळं करायचे अनेक प्रयत्न झालेत, होताहेत. पण मूळ धर्मसंहीताच राजकारणाला अगदी स्वच्छपणे वाहिलेली. अर्थकारणावर देखील धर्माचा प्रभाव. संख्येने प्रचंड. आंतरराष्ट्रीय राजकारणावर जबरदस्त पकड.
३) ख्रिस्ती - आधुनीक काळात धर्म आणि राजकारण फॉर्मली भिन्न. पण धर्माचा राजकारणावर प्रभाव. आंतरराष्ट्रीय राजकारणात धर्माचा पुरेपूर वापर. अर्थकारण धर्मापासुन भिन्न... पण अर्थकारणाचा धर्माला भक्कम आधार. संखेने प्रचंड आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर मजबूत पकड.
४) ज्यु - राजकारण, अर्थकारण धर्माच्या (धर्मबांधवांच्या) रक्षणाला बांधील पण त्यात धर्मग्रंथांची लुडबुड नाहि. संख्येने अत्यल्प, पण आंतरराष्ट्रीय राजकारणावर दखल घेण्याजोगा प्रभाव.
५) बौद्ध - जवळपास हिंदु धर्माप्रमाणेच. स्वतंत्र भारतात धर्माचा राजकारणावर प्रभाव, पण तो धर्मरक्षणा-संवर्धनासाठी नाहि. मूळ धर्मतत्वे राजकारण-अर्थकारणाच्या बाबतीत फारसे आग्रही नाहि, किंबहुना उदासीन. संख्येने विपुल. आंतरराष्ट्रीय राजकारणात धर्मप्रभाव नगण्य.

धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान ह्यात आधी काय याचं एक सर्वमान्य उत्तर नसल्यामुळे हा गोंधळ लवकर शमण्याची शक्यता नाहि.(मूळात मानवाला गोंधळ घालायला काहितरी मुद्दा हवा असतो, ति त्याची हौस आहे. त्यामुळे काहिही झालं तरी हा गोंधळ कधी शमणार नाहि याची खात्री आहे)

अर्धवटराव

गणामास्तर's picture

30 Jul 2012 - 10:17 pm | गणामास्तर

>>>>धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान ह्यात आधी काय याचं एक सर्वमान्य उत्तर नसल्यामुळे हा गोंधळ लवकर शमण्याची शक्यता नाहि.(मूळात मानवाला गोंधळ घालायला काहितरी मुद्दा हवा असतो, ति त्याची हौस आहे. त्यामुळे काहिही झालं तरी हा गोंधळ कधी शमणार नाहि याची खात्री आहे)

१०० % सहमत.

चौकस२१२'s picture

18 Jan 2022 - 11:43 am | चौकस२१२

छान विश्लेषण

कलंत्री's picture

30 Jul 2012 - 9:38 pm | कलंत्री

हिंदु लोकांसाठी ऐहिक जीवन ही महत्त्वाची गोष्ट नाही. त्यांच्या दृष्टीने पारमार्थिक जीवन हेच महत्त्वाचे आहे.

मुस्लिमलोकांच्या धर्मांतराला आळा म्हणून आर्यसमाजाची निर्मिती झाली होती, दुर्देवाने त्यांनी मुस्लिमासारखेच हिंदुधर्मावर मुर्तीपुजेविरुद्ध प्रहार केले आणि कळत नकळतच ते आपली सहानुभुती गमावुन बसले.

आजपरत (डोळस) आर्यसमाजाची स्थापना करण्याची गरज आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jul 2012 - 1:05 pm | llपुण्याचे पेशवेll

हिंदुधर्मावर मुर्तीपुजेविरुद्ध प्रहार केले आणि कळत नकळतच ते आपली सहानुभुती गमावुन बसले.
हज्जारदा सहमत.

येथे काही गाण्याच्या कार्यक्रमासंदर्भात पूर्वी आर्यसमाजतील लोकशी संबंध आला ... त्यांचे रविवारी हवन वैगरे असते ,,,
नंतर सूक्ष्म बदल जाणवला. माझा नेह्मीचचाच प्रश्न .. तुम्ही नक्की हिंदू आहात कि नाही ? उगा गोंधळ का घालताय ,, सरळ म्हणा कि आहोत म्हणून दिसत तर तसेच, वागत तर तसेच ,, ( आर्य तर हे सर्व स्वामीनारायण , हरे राम हरे कृष्ण वाले पण )

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Aug 2012 - 12:54 pm | पुण्याचे वटवाघूळ

आजच वाचले की पाकिस्तानात एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून सक्तीचे लग्न करायच्या प्रकाराबद्दल पाकिस्तानी कोर्टाने एका मुस्लिमाला शिक्षा दिली आहे. ही एक चांगली बातमी आहे.

वाचा: http://ibnlive.in.com/news/pakistani-arrested-for-forcing-hindu-girl-to-...

आशु जोग's picture

6 Apr 2013 - 10:34 pm | आशु जोग

> दुर्देवाने त्यांनी मुस्लिमासारखेच हिंदुधर्मावर मुर्तीपुजेविरुद्ध प्रहार केले आणि कळत नकळतच ते आपली सहानुभुती गमावुन बसले.

जरा खोलून सांगा की
नेमके कुठे चुकले दयानंद सरस्वती यांचे

गोडवा's picture

7 Apr 2013 - 7:32 pm | गोडवा

मला मुसलमान व्हायचे आहे किती छान धर्म आहे नाही? जात नाही त्या धर्मात. कुठला होउ सल्ला हवा आहे. शिया सुन्नी? का सुफी? मग पाकीस्तानात जाउ का बान्ग्लादेशात. कारण सौदी अरेबिया तर फक्त लोकांनाच मुसनमान मानते. बाकी सगळे अशेच. ईकडचे ना तीकडचे. ती तर पाकीस्तान्याशी ही रोटी बेटी व्यवहार करत नाही व बान्ग्ला देशी सोबतही वा अफगान्यासोबतही. बरं मग शिया तर शियाच का व सुन्नी तर सुन्नीच का? मला फार छान माहीत आहे हिन्दू धर्मच जगात सगळ्यात छान धर्म आहे. म्हनुन तर फोर्ड कम्पनीचा मालक "फोर्ड" हिन्दू झाला.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2013 - 7:44 pm | अत्रुप्त आत्मा

!@ मला फार छान माहीत आहे हिन्दू धर्मच जगात सगळ्यात छान धर्म आहे. म्हनुन तर फोर्ड कम्पनीचा मालक "फोर्ड" हिन्दू झाला. >>> जगात कुठलाच धर्म ऐक्यवादी नाही. हिन्दूत सुद्धा भरपुर जातित अगदी मुडदे पाडेपर्यंत कडक बेटिबंदी आजही अस्तित्वात आहे. अंतरजातीय विवाह होताना दिसतात,ते ज्यांना आर्थिक दृष्टा जातिची गरज राहिली नाही त्यांच्यात व काहि तुरळक खरोखरच जात मानत नाहित त्यांच्यात... हे हिंदुतलं वास्तव तुंम्ही नाकारता काय?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Apr 2013 - 4:41 am | निनाद मुक्काम प...

ज्युलिया रोबेर्ट सुद्धा हिंदू झाली आहे.

आशु जोग's picture

7 Apr 2013 - 11:01 pm | आशु जोग

आत्ताच हाती आलेली गोड बातमी

अँजेलिना जोली आणि 'गोडवा' साहेब दोघेही हिंदू आहेत

चिरोटा's picture

8 Apr 2013 - 7:53 am | चिरोटा

पुढची गोड बातमी कधी?

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 8:59 am | नाना चेंगट

प्रयत्न चालू आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2013 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा

@पुढची गोड बातमी कधी?>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing014.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing014.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing014.gif

आशु जोग's picture

8 Apr 2013 - 12:45 pm | आशु जोग

प्रयत्नांती गोड बातमी !
अशी एक म्हण आहे म्हणे ...

कोणी सिंधु झाले म्हणूण नक्की काय फरक पडला.

पिवळा डांबिस's picture

13 Apr 2013 - 3:48 am | पिवळा डांबिस

त्यामुळे तर 'एकच प्याला' गाजला!!!
;)

जुन्या चर्चा वाचुन मज्जा आली. आपल्या अडचणीपण त्याच आणि प्रतिसादही तेच, फक्त प्रतिसादकर्ते बदललेत.

सर टोबी's picture

18 Jan 2022 - 2:27 pm | सर टोबी

सुमारे नऊ वर्षापूर्वीचा हा लेख आहे. हिंदू प्रेमिंचा वेडा धर्म आविष्कार जास्तच उथळ झालेला आहे गेल्या काही वर्षात. या लेखातील भावनेचा एक दोन प्रतिसादकांनी त्यावेळेस खणखणीत समाचार घेतलेला आहे. आत्ताच्या काळात असे प्रतिवाद होणे निव्वळ दुरापास्त.

Trump's picture

18 Jan 2022 - 3:58 pm | Trump

किंचित सहमत

हिंदू प्रेमिंचा वेडा धर्म आविष्कार जास्तच उथळ झालेला आहे गेल्या काही वर्षात.

उथळ म्हणण्यापेक्षा, हिंदु इतर अब्राहमिक रिलिजन कडुन शिकु लागले आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेत उत्तरे देउ लागले आहेत; असे म्हणणे योग्य ठरेल.

कॉमी's picture

18 Jan 2022 - 7:30 pm | कॉमी

.

Trump's picture

18 Jan 2022 - 3:57 pm | Trump

किंचित सहमत

हिंदू प्रेमिंचा वेडा धर्म आविष्कार जास्तच उथळ झालेला आहे गेल्या काही वर्षात.

उथळ म्हणण्यापेक्षा, हिंदु इतर अब्राहमिक रिलिजन कडुन शिकु लागले आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेत उत्तरे देउ लागले आहेत; असे म्हणणे योग्य ठरेल.