"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके"
स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला.
अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता.
गायधनी दोशी: "ह्यालो...?"
पलीकडचा आवाज:
"गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. "
क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.)
मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं... आजकाल सगळेच माझा कॉल कट करायला लागलेत!!"
आणि एका वडापाव वॉर ला सुरूवात झाली...
एका बाजूला होते मोहित वडेवाले: पर्वतीमधे मुख्य शाखा असलेलं पुण्याचं एक नंबरचे वडापाव विकणारं उपहारग्रूह. मालक तुळजापुरचा आणी उपहारग्रूहात काम करणारी सगळी मुले तुळजापुरची असल्यामुळे तुळजापुरात एकही शाखा नसताना 'तुळजापुरी' असा शिक्का बसलेलं पुणेरी उपहारग्रूह.
दुसरीकडे होते दोशी वडेवाले: सदाशिव पेठेत मुख्य शाखा असलेलं पुण्याचं दोन नंबरचं वडापाव विकणारं उपहारग्रूह. पुण्यात अधिकाधिक रोजगार निर्माण करणारं उपहारग्रूह. पुण्याच्या बर्याच्श्या विद्यार्थ्यांचे पोटाचे निर्णय वडापाव वर पर्यायाने दोशी वडेवाल्यांवर अवलंबुन होते.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
24 Jul 2012 - 10:25 pm | क्लिंटन
उत्तम. माझ्या आवडीच्या विषयावरील लेखाचा पहिला भाग आवडला. पुढील भागांची वाट बघत आहे. :)
(इथेही इन्व्हेस्टमेन्ट बँकर्स कसे कामाला आले हे लिहायला विसरू नका बरं का)
24 Jul 2012 - 10:44 pm | शिल्पा ब
:)
24 Jul 2012 - 10:54 pm | तर्री
पु. भा. प्र.
24 Jul 2012 - 11:05 pm | चिगो
:-) महाराष्ट्राच्या खाद्य-इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेल्या ह्या घडामोडीबाबत वाचायला उत्सुक.. ;-)
24 Jul 2012 - 11:53 pm | मोदक
:-D
पुढचे भाग टाकायला कंटाळा करणार असाल तर उगाच अपेक्षा वाढवु नका.
:-D
25 Jul 2012 - 3:52 am | किसन शिंदे
पहिली ३-४ वाक्ये वाचून म्हटलं, चला!! आता मस्तपैकी खुसखुशीत असं वाचायला मिळेलं पण इथे तर अपेक्षाभंग झाला ना राव.(कारण एकच -खुप कमी लिहलंय म्हणून) :(
25 Jul 2012 - 4:20 am | जयनीत
टायपा की भरभर.
मिसळपाव वर होउन जाउ द्या एकदाचं वडापावच बर्गर.
लिहा एकदम खुसखुशीत.
25 Jul 2012 - 6:54 am | चौकटराजा
ह्या धाग्याचं नाव महाराष्ट्रीय बर्गर चा मर्जर असे असावयास हवे. विडम्बना इतकी बटाट्याची भाजी, तेल व डाळीचे पीठ शिल्लक असेल अशी आस लावून बसलोय !
25 Jul 2012 - 8:10 am | मंदार दिलीप जोशी
काहीही वाटलं
25 Jul 2012 - 8:09 am | ५० फक्त
उत्तम धागा, या मरजर मध्ये ब-याच वरच्या पातळीच्या आंतरराष्टॄइय व आंतरजालीय घडामोडी झाल्या त्याबद्दल पण लिहा,
25 Jul 2012 - 8:31 am | मन१
पर्वतीपायथ्याशी उप्लबध(उपलब्ध = एक) गाड्यांपैकी सर्वात मोठ्या गाड्याच्या मर्जरबद्दल वाचायला उत्सुक. ;)
25 Jul 2012 - 10:31 am | Madhavi_Bhave
पहिल्यांदा वाटले कि काहीतरी मस्त पण गंभीर असे वाचायला मिळणार आणि जेव्हा खालील वाक्य वाचले -
"क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.)
मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं... आजकाल सगळेच माझा कॉल कट करायला लागलेत!!"
तेव्हा एकदम tube पेटली आणि अर्सिलर - मित्तल मेर्जेर ह्या धाग्याची सुरवात आठवली आणि तुमच्या ह्या नवीन धाग्याचा रोख लक्षात येवून एकदम खुदकन हसू आले.
पुढचा भाग लवकर पाठवा.
माधवी भावे
25 Jul 2012 - 11:34 am | sagarpdy
हम्म. पुढील घडामोडी बद्दल जाणण्यास उत्सुक. ;-)
25 Jul 2012 - 11:45 am | पैसा
रोचक आणि थरारक! ;) पुढचा भाग लवकर येऊ द्या!
25 Jul 2012 - 11:53 am | मी_आहे_ना
पावसाळी हवेत खुसखुशीत वड्याची आठवण काढल्याबद्दल 'धन्स्'. 'मर्जर' होवो नं होवो...वडापाव मिळत राहो.
पु.भा.प्र. :)
25 Jul 2012 - 1:04 pm | प्यारे१
जल्ला हा अन्तु बर्वा मरणाचा चिकट.... शब्द पण कमीच वापरल्यान मेल्यानं.
'तूर्तास शब्द खुडूक झाले काय रे' असा प्रश्न विचारण्याचा मोह होत आहे.
चुरचुरीत लेख.
बाकी कॉपी राईटचा प्रश्न नाही यायचा इथं..... कोकणी बाणा बाजूस सारुन लिही हो म्हातार्या! ;)
25 Jul 2012 - 2:16 pm | विजुभाऊ
अन्तुजी थोडासा अभ्यास कमी पडतोय हो.
दोशी या आडनावाचा इसम स्वारगेटच्या आसपास घरे ब्लॉक भाड्याने देत बसेल
तो स्ट्यांडवर वडापावची गाडी वगैरे चालवणार नाही . फारतर एकदोघाना गाड्या भाड्याने देईल्.प्ण स्वतःटाकणार नाही.
26 Jul 2012 - 4:36 pm | अन्तु बर्वा
सगळ्यांना धन्यवाद! :)
26 Jul 2012 - 7:27 pm | परिकथेतील राजकुमार
'मी दोशी मोहित मर्डर... (भाग १)' असे वाचून धागा उघडला.
असो...