नेत्यांना शिक्षणाची अट हवी का?

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
22 Jun 2012 - 11:18 am
गाभा: 

आपण अनेकदा ऐकतो की अशिक्षित मंत्र्यांमुळे पुढार्‍यांमुळे देशाचे कसे वाट्टोळे झाले आहे. आमदार, खासदार यांना निवडणूकीला उभे रहाण्यासाठी शिक्षणाची अट कशी आवश्यक आहे वगैरे वगैरे.
आता आपण काही आजी-माजी मंत्र्यांच्या/आमदारांचे/खासदारांचे/नेत्यांचे शिक्षण बघुया
डॉ. मनमोहन सिंग (माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, सध्या पंतप्रधान):अर्थशास्त्रात बॅचलर आनि मग मास्टर्स (संपूर्ण कारकिर्दीत प्रथम क्रमांक). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट
अटल बिहारी वाजपेयी: (माजी पंतप्रधान, माजी परराष्ट्र मंत्री): एम. ए.
शरद पवार: बी. कॉम.
सरदार वल्लभभाई पटेल: बॅरिस्टर
नरेंद्र मोदी: एम. ए.
कपिल सिब्बल: एम.ए. हिस्टरी, एल्.एल्.एम.
सुरेश कलमाडी: बी ए
पी चिदम्बरम: बीएससी एलएल्बी हार्वर्ड एम्बीए
ए राजा: बी एस्सी, बी.एल., एम्.एल.
सुखराम: बी टेक
इंदीरा गांधी: ऑक्सफर्ड ग्रॅज्युएट
मनोहर जोशी: एम ए
एच. डी. देवेगौडा: डिप्लोमा सिवील इंजिनियरिंग
प्रतिभा पाटिल: बॅचलर ऑफ लॉ

आता प्रश्नः
१. तुम्हाला एका व्यक्तीने निवडणूकीला उभे रहाण्यासाठी अ‍ॅकेडेमिक शिक्षणाची अट असावी असे वाटते का? असल्यास का? नसल्यास का?
२. अशी अट योग्य वाटत असल्यास ती कोणास असावी - आमदार /खासदार/ राज्यातील मंत्री / केंद्रिय मंत्री/नगरसेवक?
३. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास देशाची/राज्याची परिस्थिती सुधारेल असे वाटते का?
४. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास भ्रष्टाचार कमी होईल असे वाटते का?

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

22 Jun 2012 - 11:27 am | नाना चेंगट

>>>१. तुम्हाला एका व्यक्तीने निवडणूकीला उभे रहाण्यासाठी अ‍ॅकेडेमिक शिक्षणाची अट असावी असे वाटते का?

नाही.

>>>असल्यास का?

निरंक

>>>नसल्यास का?

शिक्षित व्यक्तीमुळे चोखच राजकारभार झाल्याचा पुरेसा पुरावा नाही.

>>>२. अशी अट योग्य वाटत असल्यास ती कोणास असावी - आमदार /खासदार/ राज्यातील मंत्री / केंद्रिय मंत्री/नगरसेवक

निरंक

>>>>३. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास देशाची/राज्याची परिस्थिती सुधारेल असे वाटते का?

नाही

>>>>४. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास भ्रष्टाचार कमी होईल असे वाटते का?

नाही

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jun 2012 - 11:33 am | llपुण्याचे पेशवेll

शिक्षित व्यक्तीमुळे चोखच राजकारभार झाल्याचा पुरेसा पुरावा नाही.
किंवा कदाचित भूतकाळात झाला असेल वर्तमानात बिलकुल नाही.

नितिन थत्ते's picture

22 Jun 2012 - 11:38 am | नितिन थत्ते

कधी नव्हे ते नानाशी सहमत व्हायला लागतंय.

रमताराम's picture

22 Jun 2012 - 3:37 pm | रमताराम

असेच बोल्तो. सध्याच्या पंतप्रधानांचे शिक्षण नि कामगिरी पाहता हे प्रमाण व्यस्तच असावे असा दाट संशय येतोय.

किंबहुना ह्या एकदम वर जाऊन बसलेल्या लोकांची कामगिरी पाहता शिक्षणापेक्षाही राजकारणात टप्प्याटप्प्याचे चढत जाण्याचे बंधन घातलेले अधिक चांगले असे मला वाटते. म्हणजे आमदार म्हणून एक कारकीर्द पुरी झाल्याशिवाय लोकसभेला खासदार पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहण्याची परवानगी असू नये, एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधे निवडून आल्याखेरीज आमदारपदाला लायक समजू नये.... यातून खासदार पदी येऊ पाहणारा निदान काही काळ (दहा-वीसातील एखादे वर्ष तरी) सक्रीय राजकारणातील असेल याची किमान खात्री देता येईल. राज्यसभा नि विधानपरिषद यांच्या सभासदत्वासाठी हा नियम नसावा, परंतु येथील सभासद हे सभासदच रहावेत, मंत्री अथवा सत्ताधारी असू नयेत. ही सभागृहे विशिष्ट क्षेत्रातील व्यक्तींना - जसे कलाकार, समाजसेवक, साहित्यिक वगैरे -जाणीवपूर्वक प्रातिनिधित्व देण्यासाठी असतील - यात राज्यातील निर्वाचित सदस्यांनी निवडून दिलेले लोकही धरावेत, ती अप्रत्यक्ष निवड आहे - तर त्यांना हँडिकॅप मिळालेले असल्याने त्यांना 'लोकशाही मार्गाने निवडून आलेले समजू नये', याच कारणासाठी लोकशाही व्यवस्थेत ते सत्ताधारी असू नयेत, केवळ सभासदच असावेत.

ऋषिकेश's picture

22 Jun 2012 - 4:02 pm | ऋषिकेश

असं सगळं झाल्यावर देशाला 'तरूण' नेतृत्त्व नाही म्हणून गळे काढणार्‍यांची सोयच होईल ;)
शिवाय १९९१ सारखी वेळ आली की मनमोहनसिंगांसारख्याला एंट्री कशी द्यावी असाही प्रश्न येईलच

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 11:35 am | श्रीरंग_जोशी

१. नाही - कमी शिकलेल्यांकडे प्रगल्भता, निर्णय घेण्याची क्षमता नसतेच असे काही नाही. अन कुठल्या एका विषयात भरपूर शिकले आहे म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून विविध विषयांचे काम सहजपणे करता येईल असे पण काही नाही.

२. नाही वाटत - मुळात परिस्थिती एकदम वाईट आहे या मताचा मी नाहीये. अनेक कारणांपैकी एक कारण - १९९१ पासून राबवलेल्या अनेक धोरणांचा आपल्या सर्वांना भरपूर फायदा झालेला आहे. या बाबतीत सर्वात महत्त्वाचे गुण म्हणजे राजकीय इच्छाशक्ती व घेतलेल्या निर्णयांची कठोरपणे अंमलबजावणी करणे. केवळ एखाद्या विशिष्ट विषयात उच्चशिक्षण घेतले म्हणून हे गुण येतीलच याची अजिबात शाश्वती नाही.

३. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास भ्रष्टाचार कमी होईल असे वाटते का? - हे तर मुळीच नाही. उलट भ्रष्टाचार करण्याच्या व करून मागे पुरावा न ठेवण्याच्या नव्या क्लृप्त्या अंमलात आणल्या जातील हे नक्की.

माझेच उदाहरण घ्या - संगणकशास्त्रात बऱ्यापैकी शिकलोय म्हणून माझा समाजाला / देशाला आजवर काही विशेष उपयोग झालाय का? याउलट कमी शिकलेले पण समाजाच्या भल्यासाठी समर्पित भावनेने मोठमोठी कामे करीत असतात.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

'भारतात लोकशाही हवीच का? ' हा आम्हाला पडलेला खरा प्रश्न आहे.

नाना चेंगट's picture

22 Jun 2012 - 11:54 am | नाना चेंगट

अच्छा तीन चार दिवस मातोश्रीवर होते वाटतं.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार

चंद्रपूर आणि गडचीरोली.

नाना चेंगट's picture

22 Jun 2012 - 12:22 pm | नाना चेंगट

एकटेच की मोठ्ठ्यांबरोबर?

"भारताचा अजुन साधारण किती वर्षात रशिया होइल?' हा खरा प्रश्न आहे!

नाना चेंगट's picture

22 Jun 2012 - 12:21 pm | नाना चेंगट

पेंटॅगॉनचे काय म्हणणे आहे या विषयावर?

शिक्षणाची अट हवी का त्ये बी सांगा की
(अन तुमच्या प्रश्नासाठी वेगळा काथ्या कुटा की, तो पण महत्त्वाचा प्रश्न आहे ;) )

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jun 2012 - 3:15 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे.
मूळातच भारतीय संघराज्य कशाला पाहीजे. त्यापेक्षा स्वतंत्र अशी ३२ राज्ये होऊ शकतात. आणि भारताचे संयुक्त संघराज्य स्थापन होऊ शकते. :)

मराठमोळा's picture

22 Jun 2012 - 3:28 pm | मराठमोळा

>>मूळातच भारतीय संघराज्य कशाला पाहीजे. त्यापेक्षा स्वतंत्र अशी ३२ राज्ये होऊ शकतात. आणि भारताचे संयुक्त संघराज्य स्थापन होऊ शकते.

सहमती आहे परंतु ३२ चे ६४, ६४ चे १२८ आणि मग १२८ चे अजुन विभाजन व्हायला वेळ लागणार नाही भारतात. ;)

निखिल देशपांडे's picture

22 Jun 2012 - 12:16 pm | निखिल देशपांडे

मिपा वर सद्स्यत्व घेण्यासाठी शिक्षणाची अट हवी का? असे विडंबन येउ शकते.

All in all, it's just a
Nother brick in the wall

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 12:19 pm | श्रीरंग_जोशी

इथले सदस्य अशिक्षित अथवा कमी शिकलेले असावेत अशी शंका आपणास आली आहे का?

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 12:25 pm | परिकथेतील राजकुमार

बरेचदा 'इथले सदस्य साक्षर आहेत, पण सुशिक्षित आहेत काय?' असा प्रश्न पडतो.

नाना चेंगट's picture

22 Jun 2012 - 12:20 pm | नाना चेंगट

तुम्हाला टाकण्यापासून कुणी अडवले होते का निखिलण्णा ?? टाका की, देऊ आम्ही प्रतिसाद.

निखिल देशपांडे's picture

22 Jun 2012 - 12:25 pm | निखिल देशपांडे

नाना गेले हो आमचे दिवस धागे काढुन प्रतिसाद मिळवायचे.
आता आमच्या धाग्याला गेलाबाजार हक्काच्या चार दोन प्रतिक्रिया मिळाल्या म्हण्जे झाले.

@जोशीसाहेब तुम्ही जरा उत्खनन करा, डोक्यावर हात मारुन घ्यायची वेळ येईल.

@ ॠ: चांगला चर्चाविषय तुझे मत लिहित जा ना राव

नाना चेंगट's picture

22 Jun 2012 - 12:27 pm | नाना चेंगट

लग्न झाल्यावर माणुस ढेपाळतो, निराश होतो असे खरेच असावे की काय अशी शंका मनात आली
आणि बरे झाले मी लग्न नाही केले याबद्दल स्वतःच स्वतःची पाठ थोपटली.

निखिल्लण्णा !
असे निराश होऊई नका !
तुम्ही आम्हाला हवे आहात.
लिहा ! लिहा !! पाच प्रतिसाद मी देतो.
हक्काचे चार गुनिले पाच विस प्रतिसाद येतील हो !
लिहा तुम्ही !!

@निदे: माझ्यामते अ‍ॅकेडमिक शिक्षणाची अट नसावी.

हे काय ऋ अर्ध्या वाक्यात बोळवण? ;)
जरा डीट्टेल लिही की. :)

श्रावण मोडक's picture

22 Jun 2012 - 12:25 pm | श्रावण मोडक

आमच्या एका इंजिनियर मित्राला आम्ही आत्ताच विचारलं, "अरे, तो शिक्षणाविषयीचा काही कोट आहे, मी शिकलो आणि वाट लागली, असा काही तरी? कोणाचा?" त्याला ते काही सांगता आलं नाही, पण त्यानं बरोबर 'एज्युकेशन रूईन्ड मी' असं सांगितलं. आमच्या सातवी पास वसंतदादांनी विनाअनुदान या नावाखाली शिक्षणातील खासगीकरणाची वाट पहिल्यांदा चोखाळली त्यातून स्थापन झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून हा मित्र इंजिनियर झाला आहे. त्यानं उल्लेख केले ते उद्धृत वास्तवात अल्बर्ट आईनस्टाईनच्या "the only thing interfering with my learning is my education" या वाक्यावरून तयार झाले आहे, असे म्हणतात: "I was born intelligent, but education ruined me''. :-)
ऋषिकेश यांच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा आमचा अल्प प्रयत्न. ज्यानं त्यानं आपापल्या पद्धतीनं गोड मानून घ्यावा. कुणाला गुळाचा गोडवा चालतो, कुणाला नाही... ;-)

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jun 2012 - 3:17 pm | llपुण्याचे पेशवेll

i was born genius but education spoiled me

रमताराम's picture

22 Jun 2012 - 3:51 pm | रमताराम

आलं या म्हातार्‍याचं क्रिप्टिक. मास्तर याच्याकडे ब्याटन देऊन गेलेले दिसतात. छ्या, हे समजण्याआधी मला 'अंतिम सत्य' गवसेल.

बाळ सप्रे's picture

22 Jun 2012 - 12:42 pm | बाळ सप्रे

अशिक्षित नेते चालतील.. मग जनतेला तरी कशाला शिक्षण हवय ?
सध्याची शिक्षणपद्धती परीपूर्ण नाही मान्य आहे. पण टाकाउसुद्धा नाहिये..

थोडी शिक्षणाची अट ठेवली तर.. निवडणूकीला उभ राहण्यासाठी घरी संडास असला पाहीजे अशा अटी ठेवाव्या लागणार नाहीत असं वाटतं..

मराठमोळा's picture

22 Jun 2012 - 1:12 pm | मराठमोळा

शिक्षणाची अट खरं तर गरीब आणि मध्यमवर्गीय यांनाच जास्त आहे सध्या (अपवाद सोडून), शिक्षणच त्यांना बर्‍या दर्जाचं आयुष्यभरांचं अन्न, वस्त्र निवारा देऊ शकतं असं माझं मत आहे.
मंत्र्यांच म्हणाल तर तिथे शिक्षणापेक्षा चारित्र्यशीलता आणि दूरदृष्टीता यांच्या कसोटीवर पारखले पाहिजे. केवळ शिक्षण घेऊन सगळे गुण जोपासले जातीलच असे नाही.

शिक्षण घेतल्यावर त्याचा खर्‍या आयुष्यात कितपत फायदा होईल हा शिक्षण कसे वापरले जाते यावरुन ठरेल कदाचित, पण शिक्षण घेतल्या जाण्यार्‍या निर्णयांना एक दिशा किंवा एक वेगळा विचार करण्याचं सामर्थ्य नक्कीच देऊ शकतं

अवांतरः
यावरून एक सेमीनार आठवला. एक उद्योगपती कॉलेजात भाषण द्यायला आले होते. प्रश्नोत्तराच्या काळात एका विध्यार्थ्याने विचारले की "बिल गेट्स, धिरुभाई अंबानी यांनी कुठे उच्च शिक्षण घेतले होते, तरीपण ते इतके मोठे उद्योजक झाले, मग आम्ही का शिकतोय?" यावर चांगलाच हशा पिकला.
उद्योजकांनी दिलेले उत्तर "धिरुभाई स्वतः नसले तरी मग त्यांनी स्वतःच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी का पाठवले? कारण त्यांनी काळाची गरज ओळखली होती आणि शिक्षणाची महती त्यांना कळाली होती म्हणूनच"

योगप्रभू's picture

22 Jun 2012 - 1:50 pm | योगप्रभू

स्त्रीभ्रूणहत्या करणारा डॉक्टर उच्चशिक्षित आहे.
आत्महत्या करणारा शेतकरी मात्र अल्पशिक्षित आहे.

देशाचा कारभार चालवणारे नेते परदेशात शिकतात
अशिक्षित लोक मात्र इथे पोटच्या पोरांनाही विकतात

खर्चावरुन भांडून मुले आईला चितेवर तशीच ठेवतात
आईबापांना वृद्धाश्रमात टाकून घरी सुखाने जेवतात

उच्चशिक्षण घेणारी पोरे 'वेलकम रेव्ह' पार्टी करतात
आदिवासींची मुले तिकडे कुपोषणाने मरतात

अंधार पसरलाय फार, कसा लावायचा दिवा
तेलाचा थेंबही नाही, आता तूच रक्षण कर देवा!

बाळ सप्रे's picture

22 Jun 2012 - 2:02 pm | बाळ सप्रे

शिक्षणाचे एवढे तोटे आहेत .. :-(
मुलांना शाळेत घालू नका .. स्त्रीभ्रूणहत्या करण्यापासून, तुम्हाला वृध्दाश्रमात घालणयापासून, रेव्ह पार्ट्यांपासून त्यांना वाचवा !!!

शाहरुख's picture

22 Jun 2012 - 2:04 pm | शाहरुख

१. तुम्हाला एका व्यक्तीने निवडणूकीला उभे रहाण्यासाठी अ‍ॅकेडेमिक शिक्षणाची अट असावी असे वाटते का? असल्यास का? नसल्यास का?

शिक्षणाचे महत्व पटले असल्याने अशी अट असावी असे वाटते.."कशाला पाहिजे शिक्षण..चौथी/सातवी पास अमुक तमुक ने राज्य/देश चालवलाच की" सारखे युक्तिवाद हास्यास्पद वाटतात.

२. अशी अट योग्य वाटत असल्यास ती कोणास असावी - आमदार /खासदार/ राज्यातील मंत्री / केंद्रिय मंत्री/नगरसेवक?

सगळ्यांना.

३. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास देशाची/राज्याची परिस्थिती सुधारेल असे वाटते का?

आशा आहे.

४. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास भ्रष्टाचार कमी होईल असे वाटते का?

सांगता येत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 2:22 pm | परिकथेतील राजकुमार

१. तुम्हाला एका व्यक्तीने निवडणूकीला उभे रहाण्यासाठी अ‍ॅकेडेमिक शिक्षणाची अट असावी असे वाटते का? असल्यास का? नसल्यास का?
२. अशी अट योग्य वाटत असल्यास ती कोणास असावी - आमदार /खासदार/ राज्यातील मंत्री / केंद्रिय मंत्री/नगरसेवक?

ह्या पेक्षा प्रत्येक मतदाराला किमान शिक्षणाची अट असावी.

३. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास देशाची/राज्याची परिस्थिती सुधारेल असे वाटते का?
४. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास भ्रष्टाचार कमी होईल असे वाटते का?

ह्यापुढे भ्रष्टाचार, महागाई, कर, सामान्यांची पिळवणू़क कमी वैग्रे होईल अशी अपेक्षा ठेवणेच मुर्खपणाचे आहे. निदान ती आहे तिथेच तरंगावी येवढी माफक अपेक्षा आहे.

ह्या पेक्षा प्रत्येक मतदाराला किमान शिक्षणाची अट असावी.

शिकलेले किती जण मतदान करतात याचा काही विदा आहे काय रे? :)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 3:08 pm | परिकथेतील राजकुमार

मतदानच होऊ नये ह्यासाठीचे माझे प्रयत्न आहेत ते. ;)

गोंधळी's picture

22 Jun 2012 - 3:14 pm | गोंधळी

नेत्यांना शिक्षणाची अट हवी का ?
मला वाटते जनतेलाच शीक्षणाची गरज आहे.
जनता जागरुक असेल तर असे चु** नेते तयारच होनार नाहीत,निवडुन येणार नाहीत.

मुक्त विहारि's picture

22 Jun 2012 - 4:30 pm | मुक्त विहारि

गेले एक शतक हा वाद चालू आहे...

लो.टिळक ह्यांचा स्वराज्य आणण्यावर भर होता.लोक शिकोत का न-शिकोत, स्वराज्य प्रथम.(म्हणजेच लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट नसावी असा गर्भितार्थ पण निघू शकतो.)
तर
आगरकर ह्यांचा शिक्षणावर भर होता.लोक शिकले तर स्वराज्य आणायला सोपे जाईल असे ह्यांना वाटायचे.(परखड मत.शिकलेले उमेदवार आणि शिकलेले मतदार.)

बाकी चालू द्या.

आपल्या ह्या चर्चेचा , भारतीय लोकशाहीवर काहीही परीणाम होणार नाही.

शिकलेले लोक , निवडणूकीला उभे रहायचे तर सोडूनच द्या, पण, मतदान पण करत नाहीत.. ही वस्तूस्थिती आहे.

बाळ सप्रे's picture

22 Jun 2012 - 4:51 pm | बाळ सप्रे

स्वराज्य प्रथम.(म्हणजेच लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट नसावी असा गर्भितार्थ पण निघू शकतो.)

कै च्या कै...
स्वराज्य हा मूलभूत अधिकार आहे म्हणून प्रथम असा त्यांचा दृष्टीकोन होता..
ते समाजसुधारणेच्याविरोधात नव्हते.. फक्त प्राथमिकता आगरकरांहून निराळी होती एवढेच..

असा त्यांचा दृष्टीकोन होता....

मग सध्या तरी वेगळे काय आहे.स्वराज्य काढून "सत्ता" असे टाका.बाकी सध्याच्या राजकारणाला, जर तूम्ही स्वराज्य असे म्हणत असाल , तर आमचे काही म्हणणे नाही.

बाळ सप्रे's picture

22 Jun 2012 - 5:21 pm | बाळ सप्रे

सुराज्य नसेल पण स्वरज्य नक्कीच आहे.. कितीही वाईट प्रकार चालत असले तरी ते आपल्यातूनच निवडून गेलेले आहेत..
कोणी परकीय नव्हेत.. (आता इथे सोनिया गांधींचा मुद्दा काढू नका :-) )

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 5:40 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावरती स्वराज्य आहे, का सुराज्य आहे ?

बाळ सप्रे's picture

22 Jun 2012 - 6:01 pm | बाळ सप्रे

ह्यासाठी वेगळा धागा काढा :-)

मुक्त विहारि's picture

22 Jun 2012 - 6:29 pm | मुक्त विहारि

कारण

मतस्वातंत्र्य हा स्वराज्याचा महत्वाचा घटक.

तर व्यक्तीगत टीका न होता, मतावर टीका करणे आणि "वादे वादे जायती संवादः" ह्या उक्ती प्रमाणे संवाद साधल्याजाणे, हा सुराज्याचा अजून एक घटक.फार क्वचित , इथे व्यक्तीगत टीका होते.आणि कधी झालीच तर ते मनावर कूणीच घेत नाही.

(निदान मला तरी असाच अनुभव आला..."झाले गेले गंगेला मिळाले" असे समजून जर इथे आला असाल, तर मिपा आपलेच आहे.... "मदत मांगनेवाले को हॉगवर्ट्स हमेशा मदत करता है." हे हॅरीवाक्य आणि "मिपा सदस्यांना इतर मिपाकर मदत करतील" हा संस्थापकांचा हेतू हेच ब्रह्मवाक्य..(इथे भ्रमवाक्य म्हणू नये... हा भ्रम नसून वस्तूस्थिती आहे)

मुक्त विहारि's picture

22 Jun 2012 - 6:16 pm | मुक्त विहारि

जर इथले , अर्थकारण बदलू शकत असतील तर ते स्वराज्य कसले हो?

(शिवाय कितीही नाही म्हटले तरी पण सोनिया गांधी आहेतच.कारण आले तिच्या मना, तिथे कोणाचेही चालेना.. .. हे वाक्य मुद्दामच कंसात टाकले आहे.. हे वाक्य प्रतिसादाला, प्रतिसाद नाही...)

स्वराज्य म्हणजे... केवळ. स्वतःचे नेते स्वतः निवडता येणे , म्हणजे स्वराज्य नाही , तर त्याचबरोबर, स्वतःच्या राज्यातील लोकांना लागणार्‍या , रोजच्या वापरातील वस्तू, सर्वांना पुरून दुसर्‍या वर्षासाठी देखील उरतील इतक्या, स्वतःच्या राज्यातच निर्माण करता येणे, म्हणजे स्वराज्य.(मूलतः अन्न, वस्त्र आणि निवारा...आणि सध्याच्या काळातील... वीज,इंटरनेट, इंधन,दळणवळण हे पण जोडावे लागेल) बाबांचा स्वदेशीचा आग्रह , स्वराज्याकडे घेवून जाणाराच होता.किंबहूना स्वदेशी म्हणजेच स्वराज्य.

आणि

सुराज्य म्हणजे... त्या वस्तू योग्य त्या भावात आणि वेळेवर सर्व लोकांना उपलब्ध व्हाव्यात आणि कायदा व न्याय यांची कठोर , वेळेवर , कूणाचाही मूलाहिजा न बाळगता केलेली अंमलबजावणी म्हणजे , सुराज्य.

रमताराम's picture

22 Jun 2012 - 7:00 pm | रमताराम

अतिशय समर्पक प्रतिसाद. याबद्दल मुक्तविहारि यांना आमच्याकडून त्यांच्या पसंतीची एक क्वार्टर, ते 'यातले' नसतील तर त्यांच्या आवडीचे मॉकटेल देण्याचे जाहीर करतो आहे.

कसलं डोंबलाचं स्वराज्य हो. तिकडे ग्रीससारख्या पिटकुल्या देशाची आर्थिक स्थिती बिघडली की आमच्या अर्थव्यवस्थेला ऊर्ध्व लागतो. ढेकूण मेला की सिंह पण मरतो आणि ही म्हणे आदर्श व्यवस्था.

जाताजाता 'स्वदेशी म्हणजे स्वराज्य' या विधानाशी मात्र श्ट्रांग असहमती नोंदवून ठेवतो. सध्या मेगाबायटी प्रतिसाद टाकायचा मूड नसल्याने अधिक काही लिहीत नाही.

सौदी शँपेन ते इंडीयन शँपेन काहीही चालते. स्वदेशीचा खंदा पूरस्कर्ता असलो तरी "देशी"चा वास सहन करता येत नाही...(आणि तसाही मी मागील जन्मी मल्ल्या साहेबांचे देणे लागत होतो.अद्याप ते कर्ज फिटलेले नाही.)

आणि तूमची शाबासकी मिळाली ह्यातच सगळे आले.

स्वदेशी म्हणजेच स्वराज्य, किंवा स्वदेशी ही स्वराज्याकडे नेणारी पायरी आहे, ह्यावर वाद घालायला आवडेल...(त्या वादाला , संवादाकडे न्यायची जबाबदारी माझी.)

विनीत संखे's picture

22 Jun 2012 - 4:46 pm | विनीत संखे

नेत्यांपेक्षा लोकं जास्त फॅन आणि फॉलो करणार्‍या बॉलिवूडच्या अभिनेत्यां(त्रीं)च्या शिक्षणाचा लेखाजोखाही वाचायला आवडेल... सध्याच्या गोतावळ्यात मला वाटते विद्या बालन एकमेव उच्चशिक्षित असावी.

नेत्यांना (किंवा इतरांनाही) आपापल्या क्षेत्रातल्या शिक्षणाची अट हवी असे वाटते.
अल्पशिक्षित किंवा अंगठेबहाद्दर मनुष्य 'चांगला' नेता बनू शकतो तसा उच्चशिक्षितही मनुष्यही चांगला नेता बनू शकतो. त्या दोन्हीतले चांगले काय? वर दिलेली नावे आणि शिक्षण यांचे उदाहरण फारसे पटले नाही. शिक्षण घेताना किंवा बक्षिसे, पुरस्कार मिळवताना आपण उद्या अमूक एक मिनिस्टर बनणार असे कोण छातीठोकपणे सांगू शकेल? अगदी मंत्र्यांची अपत्ये असली तरी त्यांना 'रंपाट' मेहनत चुकलेली नाही. वेगवेगळी राजकारणे, खेळ्या करून त्यांना आपली 'पात्रता (?)' सिद्ध करावीच लागते. ;) त्याची कसर नंतर ते भरून काढतात ही गोष्ट वेगळी.
शिक्षणाने भ्रष्टाचार कमी होईल ही फक्त आशा आहे. :(
खरंतर त्या मनुष्याची इच्छा काय आहे हेही महत्वाचे. कोणत्या मिषाने एखादा व्यवसाय, वाट निवडली जाते त्यावर अवलंबून आहे.

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 10:10 pm | अर्धवटराव

पण शिक्षणप्रणालीत एक अत्यावश्यक बदल हवा.
अगदी प्रथम इयत्तेपासुन बॅचलर डिग्री पर्यंत नागरीकशास्त्र विषय चढत्या परिपक्वतेने अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायला हवा. अगदी मेडिकल, इंजीनियरींग ची डिग्री असो वा संगीत, नाट्य, वाणिज्य... झाडुन सगळ्यांना नागरीकशास्त्र अत्यंत प्रगल्भ रितीने कळायला हवे. आपली नोकरशाही, राज्यप्रशासन, न्यायव्यवस्था, मंत्रीमंडळ, जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती... जे काहि म्हणुन भारतीय नागरीकच्या जगण्यावर प्रभाव पाडते त्या सर्व संस्थांची कार्यपद्धती अगदी व्यवस्थीत डिटेलमध्ये लोकांच्या नर्व्हस सिस्टीममध्ये उतरायला हवी.
राजकारणी पक्षांचे सदस्यत्व मिळाल्यानंतर सर्वप्रथम वर उल्लेख केलेले नागरीकशास्त्र ज्ञान त्या सदस्याला आहे कि नाहि याची तपासणी व्हावी आणि ते नसल्यास तत्संबंधी आवश्यक ते २-३ वर्षीय कोर्सेस घेणे त्याला कंपल्सरी करावे. पक्षाच्या घटनेत असे बदल करणे कायद्याने कंपल्सरी करावे आणि प्रत्येक पक्षात एक डेडीकेटेड सेल यासंबंधी कार्यरत असावे. त्यात रिटायर्ड नोकरशाहा, न्यायव्यवस्थेतील मंडळी असावी. अपक्ष उमेदवार देखील अशी पात्रता दाखवल्याबिगर निवडणुकीला अपात्र ठरावा. ज्याप्रमाणे सरकारी रुग्णालये वैद्यकीय सेवा देतात त्याप्रमाणे केवळ परिपक्व नागरेकशास्त्राचे शिक्षण देणारे एक जाळे सरकारी पातळीवरुन राबवावे.

हे सर्व भ्रष्टाचार रोखायला वगैरे मदत करणार नाहि. याचा एकच उपयोग, तो म्हणजे राजकारणी आणि जनता एका कॉमन प्रोटोकॉलने संवाद साधेल आणि लोकांना राजकारण्याचे व्हेल्युएशन करताना एक कॉमन प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. राजकारणी आलतुफालतु वचननामे जाहीर करु शकणार नाहि. आणि दिलेल्या वचनाची सार्थता एक नागरीक म्हणुन आपल्या चटकन ध्यानात येईल.

अर्धवटराव

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 10:19 pm | श्रीरंग_जोशी

नागरिकशास्त्राच्या शिक्षणाचे महत्त्व परिणामकारक रित्या समजावून सांगितलेत, अर्धवटराव.

मी देखील चेपू वरील लोकांच्या राजकारणाबद्दल टोकाच्या नकारात्मक प्रतिक्रिया वाचून त्यावर शालेय अभ्यासक्रमातील नागरिकशास्त्राच्या शिक्षणाचा शून्य उपयोग झाल्याचे लिहितो.

माझ्या मते, महाविद्यालयीन शिक्षणात तर राज्यशास्त्र हा विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट केला जावा. कारण आजच्या पिढीची याबाबतीतली प्रगल्भता नसल्यातच जमा आहे.

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 10:35 pm | अर्धवटराव

>>माझ्या मते, महाविद्यालयीन शिक्षणात तर राज्यशास्त्र हा विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट केला जावा. कारण आजच्या पिढीची याबाबतीतली प्रगल्भता नसल्यातच जमा आहे
-- हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. कुणाला ताप यावा आणि त्याकरता आमचे शेजारी गॅस शेगडी फार वेळ जाळतात म्हणुन दोष द्यावा... वर अश्या शेजार्‍यांना कसा धडा शिकवला पाहिजे यावर उपाय शोधावे.. असले काहि युक्तीवाद शिकली सवरली मंडळी करतात तेंव्हा कपाळाला हात लावतो.

अर्धवटराव

दादा कोंडके's picture

22 Jun 2012 - 11:29 pm | दादा कोंडके

दुर्दैवाने सहमत व्हावं लागत आहे. परवाचाच अनुभव.

एका सहकार्‍याचं काही फारीन लोकांसमोर प्रेजेंटेशन होतं. वेळेच्या आधी अर्धातास तो काँप्युटर समोर बसून काहितरी करत वाचत होता. मी त्याला विचारलं की पीपीटी अजून तयार झाली नाही का? तसा तो म्हणाला, "अरे ये तो कल ही तय्यार किया था. लेकीन उसके बाद ये भेंचोद गोरे लोक लंचके टाइम कुछ भी बकवास पुछते है, इंडियामे कितने स्टेट है, वहा इलेक्शन वगैरे कैसा होता है. इसलिये विकिपिडीयापे यही पढ रहा था."

आणि हे उदाहरण एकाचं नाहिये, माझ्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या शे-दिडशे लोकांपैकी पाच-दहा वगळता एकालाही लोकसभा आणि विधानसभा यातला फरक सांगता येणार नाही हे मी छातीठोकपणे सांगू शकतो!

गणामास्तर's picture

22 Jun 2012 - 11:53 pm | गणामास्तर

>>>आणि हे उदाहरण एकाचं नाहिये, माझ्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या शे-दिडशे लोकांपैकी पाच-दहा वगळता एकालाही लोकसभा आणि विधानसभा यातला फरक सांगता येणार नाही हे मी छातीठोकपणे सांगू शकतो!

अगदी अगदी ! माझ्या हापिसातल्या एका सहकार्याच्या मते जगातील सर्व ज्ञानाचे सार हे
"द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग" या एका पुस्तकातच सामावले आहे कारण उभ्या आयुष्यात त्याने तेवढे एकचं पुस्तक
वाचलेले आहे. त्यामुळे त्याच्या समोर कुणी काहीही विषय काढला तरी त्याचे आपले तेवढे एकचं पुराण चालू होते. :)

मूळ धागा विषय पहाता 'नाही 'असे म्हणावे लागेल. त्यापेक्षा मतदारांनाच शिक्षणाची अट असावी.
सध्याची लोकशाही पहाता 'लोकांनी निवडून दिलेला' याला महत्व आहे आणि लोक मेंढरे कशी राहातील यावर नेत्यांचे पोस्ट डॉक् संशोधन चालू आहे.
त्यामुळे दोन उच्च शिक्षित किंवा अर्धशिक्षित कसेही उमेदवार असतील तरी कुणाला निवडायचे हे कळणारी जनता हवी. बाकी शिकलेले अधिकारी त्यांच्या पदरी सेवेत असतातच.

शिवाय शिक्षणाने विचार करायची क्षमता येतेच असे पण नाहीये. तो विषय अजून वेगळाच..

सुनील's picture

23 Jun 2012 - 12:47 am | सुनील

एखादा उत्तम कथा-कादंबरीकार किंवा कवी हा भाषा विषयात एम ए, पिएचडी केलेला असतो का? की असा भाषा विषयातील उच्चशिक्षित उत्तम लेखक होऊ शकतो?

आपण अनेकदा ऐकतो की अशिक्षित मंत्र्यांमुळे पुढार्‍यांमुळे देशाचे कसे वाट्टोळे झाले आहे.
मूळात ह्या वाक्याशीच असहमत, त्यामुळे पुढार्‍यांना किमान शिक्षणाचे अट असावी ह्याच्याशीदेखिल असहमत.

अर्थात, देशाचे अगदीच उत्तम चालले आहे असे नाही. सुधारणेला अजूनही पुषकळ वाव आहे. पण अगदीच वाट्टोळं झालय, असेही नाही. आणि ते केवळ अशिक्षित मंत्री-पुढार्‍यांमुळे झालय, असे तर अजिबातच नाही.