मिसळपावची चोरी

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
16 Jun 2012 - 1:32 pm

मिसळपावची चोरी
बटाटेवड्यांची चोरी
रबडी-फलुद्याची चोरी
मनसोक्त भटकंतीची चोरी
तण्णावून झोपंतीची चोरी
मित्र-मैफिलींची चोरी
डर्टी सिनेमांची चोरी...
ह्याची चोरी
त्याची चोरी...
आता बोला,
जगावं तरी कसं,
नवरोबांनी...

.....('सहज तुझी हालचाल' लिहिणार्‍या भा. रा. तांब्यांना श्रद्धांजली)...

भयानककरुणकविता

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार

आजच्या ह्या काळात कोणीतरी रामदास स्वामींच्या विचारांचे येवढे जीव तोडून पालन करतो आहे हे बघून सदगदीत झालो.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

पक पक पक's picture

16 Jun 2012 - 10:25 pm | पक पक पक

म्हणजे दासबोधातल्या मुर्खांच्या लक्षणा बद्द्लच ना.... ? ;)

चित्रगुप्त's picture

16 Jun 2012 - 11:13 pm | चित्रगुप्त

समर्थ 'सावधान' ऐकून लग्न-मंडपातून पळाले, म्हणून 'दिसामाजि काहीतरी ते' लिहून 'दासबोध', 'भीमरूपी' इत्यादि प्रसवते झाले.
ज्यांनी नुस्तेच 'शुभमंगल' ऐकले, त्यांची गत अशीच होणार.

अवांतरः 'सदगदीत' होण्याचा 'सदगती पावण्या' शी काय संबंध आहे ?