विचित्र....

स्वतन्त्र's picture
स्वतन्त्र in काथ्याकूट
11 Jun 2012 - 9:13 pm
गाभा: 

साधारण महिन्यापूर्वी भावाचा गाडी स्किड होऊन अपघात झाला.जरा मानेला मार आणि खरचटणे या पलीकडे विशेष काही झाले नाही.अचानक त्याला १० दिवसानंतर जीभ जड होऊन बोलायला त्रास होऊ लागला.
लगेच CT स्कॅन आणि MRI करण्यात आले.मानेतल्या शिरेवर दाब आल्याने जिब जड झाल्याचे निदान झाले.ह्या सर्व तपासण्यांसाठी त्याला हॉस्पिटलात Admit करावे लागले.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी हि बातमी आमच्या नातेवाईकांच्या कानावर पडलीच.
मग काय रोजच त्याला भेटण्यासाठी रीघ लागू लागली. प्राथमिक चौकश्या सुरु झाल्या.
पहिले जेमतेम १० मिनटे,भावाची विचारपूस करण्यात जात होती. मात्र बाकीचा वेळ आईचा interview घेऊन 'ह्यालाच का ?' ह्या प्रश्नाचं आपापल्यापरीने उत्तरे शोधण्यात घालवत होते.(भावाला १० महिन्यांपूर्वी पोटात जंतुसंसर्ग झाल्यामुळे Admit करण्यात आले होते.आईला देखील पाच वर्षांपूर्वी गंभीर स्वरूपाच्या अपघाताला सामोरं जायला लागलं होतं).
काही जण आईला घरातले वास्तुदोष काढून काढून सांगत होते तर काही गेल्या जन्मीची पापे.
काही जण देवधर्म आणि कर्म कांड.तर काही पूर्वजांचे शाप.अगदी नको नको ते.....
.हे लोक येतातच कशाला भेटायला?
ह्यांना नको त्याच उचापती काढण्यात रस असतो.एकाने तर अगदी माझा कुत्रा देखील सोडून देईला सांगितले.
ह्या गोष्टींवर विश्वास नसल्याने डोके घुसळले जात होते.
खरच या गोष्टींचा माणसाच्या आयुष्यावर फरक पडत असतो का ?कोणाला काही अनुभव ?

प्रतिक्रिया

शुचि's picture

11 Jun 2012 - 9:36 pm | शुचि

व्यनि केला आहे.

सुहास झेले's picture

11 Jun 2012 - 9:39 pm | सुहास झेले

नाही.... !!!

माझ्या आयुष्यात देव धर्म कर्मविपाक भविष्य आणि तत्सम गोष्टी नव्हत्या.. तेंव्हा मी सुखात होतो.. नंतर फ्यामिली प्रॉब्लेम सुरु झाले म्हणून कुंडली एकाला दाखवली. त्याने भरपूर दक्षिणा घेतली, कसले यंत्र दिले, १४ वा अध्याय वाचायला सांगितला.. तुझे सगळे भले होईल असे सांगितले.. त्यानंतर पंधरा दिवसात मला अपघात झाला आणि पाय मोडला. अजून लंगडतो आहे आणि भले व्हायची वाट पहात आहे.. :( तेंव्हापासून या सगळ्या गोष्टींचा पुन्हा नाद सोडून दिला.. कर्मकांडं करण्यापेक्षा शास्त्रीय संगीत, वादन, बागेत झाडा झुडपाला पहाणे-पाणी घालणे-बोलणे, पाळीव प्राण्याबरोबर वेळ घालवणे.... इ इ करा, कदाचित दु:ख लवकर विसराल, असे माझे मत. त्यातून जपजाप्य, नामस्मरण, पठण, यज्ञ... इ इ करायचे असेल तर तुमची मर्जी..

मायला हे कुंडलीप्रकरण माझे पण चालू आहे. पण मी काय कुणाला दाद देत नाहीये. च्यायला पैसा माझा आणि वरुन माझेच दोष दाखवून मला शांतीप्रित्यर्थ खड्ड्यात लोटणार... ;)

- पिंगू

आदिजोशी's picture

12 Jun 2012 - 12:06 pm | आदिजोशी

आणि पाय मोडला. अजून लंगडतो आहे आणि भले व्हायची वाट पहात आहे...

कदाचीत ते यंत्र असल्यामुळे आणि १४व्या अध्यायामुळे जिवावरचे संकट पायावर बेतले असेल. असे होऊ शकते की नाही?

पिंगू's picture

11 Jun 2012 - 10:30 pm | पिंगू

च्यामायला भिकार उचापती करण्यातच लोकांना रस असतो. त्यामुळे घाला चुलीत..
लोकमताला हो..

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |
:)

पक पक पक's picture

11 Jun 2012 - 11:15 pm | पक पक पक

शेर आवड्ला आहे... :)
(अनुभव घेतलेला प्रामाणिक...)

जे.पी.मॉर्गन's picture

12 Jun 2012 - 10:27 am | जे.पी.मॉर्गन

आवडण्यात आलेल्या आहे.

जे पी

स्वतन्त्र's picture

12 Jun 2012 - 8:40 pm | स्वतन्त्र

असेच म्हणतो !

अशोक पतिल's picture

11 Jun 2012 - 11:13 pm | अशोक पतिल

तुम्हाला काही समस्या असेल / नसेल पण तुम्ही एखाद्या ज्योतिषाला किंवा डाक्टरना दाखविले , तर " तुम्हाला काहीही त्रास नाही , काहीही करण्याची आवश्यकता नाही " असे उत्तर मिळेल तो सुदिन .

पक पक पक's picture

11 Jun 2012 - 11:20 pm | पक पक पक

खरच या गोष्टींचा माणसाच्या आयुष्यावर फरक पडत असतो का ?कोणाला काही अनुभव ?

खर तर काहीच कारण नाही.पण एक गोष्ट नक्की तुमचे या जन्मीचे चांगले वा वाइट कर्म तुम्हाला याच जन्मात फळ देते ....

तिमा's picture

12 Jun 2012 - 7:07 pm | तिमा

याच जन्मात फळ मिळाले असते, तर गेली सहा दशके आपल्याला नेते लुबाडू शकले नसते!

अर्धवटराव's picture

12 Jun 2012 - 1:24 am | अर्धवटराव

तुमच्या दु:खाच्या क्षणी कोणिही येऊन तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना चित्रविचीत्र बोलुन त्रास देतात आणि तुम्ही ते ऐकुन ध्याग्यावर "हे लोक असं का करतात" असा कौल मागता... मला तुमचं वागणं जास्त विचित्र वाटतं. "शट अप अ‍ॅण्ड गेट लॉस्ट" इतकं स्वच्छ आणि सिंपल उत्तर त्यापैकी एकाला दिलं असतं तर कुणिही परत असा प्रयत्न केला नसता. तुम्हाला हे सगळं ऐकावं लागतं कारण तुम्ही ते त्यांना बोलु देता.

अर्धवटराव

उदय के'सागर's picture

12 Jun 2012 - 11:23 am | उदय के'सागर

अगदी पटलं....ह्या वरुन एक 'ईग्रंजी' म्हण आठवली...

"No one can make you feel inferior without your consent " As simple as it is :)

स्वतन्त्र's picture

12 Jun 2012 - 8:41 pm | स्वतन्त्र

जवळचे नातेवाईक असल्याकारणाने म्हणू नाही शकलो असे !

अर्धवटराव's picture

12 Jun 2012 - 10:23 pm | अर्धवटराव

अहो संदेश एकच असला तरी व्यक्तीपरत्वे तो पोचवण्याच्या तर्‍हा वेगवेगळ्या असतात ना...

अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

12 Jun 2012 - 3:27 am | प्रभाकर पेठकर

नळी फुंकीली सोनारे, इकडून-तिकडून गेले वारे.
एका कानाने ऐकून दूसर्‍या कानाने सोडून द्या आणि भावाच्या औषधोपचारावर तन, मन आणि धन एकाग्र करा.

मृत्युन्जय's picture

12 Jun 2012 - 10:52 am | मृत्युन्जय

मी तुमची चिडचिड समजु शकतो. लोक खरेच भान सोडुन बोलतात.

मध्ये एकदा आईचे पायाचे दुखणे चालु होते तेव्हा लोक मुर्खासारखे येउन अश्या आजारात पाय गमावलेल्या किंवा अपंग होउन राहिलेल्या लोकांची उदाहरणे देत बसायचे. आईचा पाय आता मजेत आहे. अधुन्मधुन थोड्याफार तक्रारी असतात पण कायमस्वरुपी काही नाही. त्यावेळेस त्या अतिमंद लोकांचा खुप राग यायचा.

आजारी माणसाशी आणी त्याच्या नातेवाईकांशी कसे बोलावे ते कळत नसेल तर उगाच भेटायला जाउ नये असे माझे स्पष्ट मत आहे.

असो. तुम्ही इग्नोर - डिलिट मारा.

बादवे कितीही मानसिक कडकड चालु असेल तरी अश्या गोष्टींसाठी मिपावर धागा काढणे काही फारसे बरोबर नाही असे मला वाटते. त्यातुन फारसे काही निष्पन्न होत नाही पण माझ्यासारख्या लोकांना चेष्टा करायला एक विषय मिळतो. (आत्ता मी सौजन्याच्या मोड मध्ये असल्याकारणाने गांभीर्याने प्रतिसाद देत आहे :) )

रानी १३'s picture

12 Jun 2012 - 10:56 am | रानी १३

+++१ टु अर्धवटराव

स्वतन्त्र साहेब, घडायच्या गोष्टी घडतच राहणार.
तुमची श्रध्दा मजबुत राहुद्या. तुमच शांत होउन मनही शांत ठेवायचा प्रयत्न करा. कारण आपण गोंधळलेले असलो कि अडचणीतुन बाहेर पडायचा उपाय समोर दिसत असुनही आपण गोंधळलेल्या मनाने तो करु शकत नाही.

घडायच्या गोष्टी ह्या घडतच राहणार. घडल्यानंतरमग आपण विचार करत राहतो त्या का घडल्या म्हणुन पण त्या घडणारच असतात त्या घडतातच.

तुमची श्रध्दा मजबुत राहु द्या. त्यातच खरी शक्ती आहे. हे जरुर लक्षात ठेवा की माणसाची श्रध्दा च दगडाचा देव बनवते, मोठ मोठ्या असाध्य आजारातुन त्याना बर करते.

तुम्हाला एक कथा सांगतो शिवाजी महाराजांची.
राजाराम महाराजांचा जन्म झाला तेव्हा ते पालथे जन्माले आले. लोक म्हणु लागले अपशकुन झाला. ही गोष्ट शिवाजी महाराजाना कळली तेव्हा ते म्हणाले की हा अपशकुन नाही तर चांगलाच शकुन आहे. आमचे बाळराजे समस्त स्वराज्याच्या शत्रुना पालथे पाडतील. त्यांचा पराभव करतील.
म्हणुन सांगतो तुमची श्रध्दा मजबुत राहु द्या. सगळ चांगलच होईल.

अमोल केळकर's picture

12 Jun 2012 - 3:14 pm | अमोल केळकर

प्रतिसाद आवडला

अमोल केळकर

स्वतन्त्र's picture

12 Jun 2012 - 8:44 pm | स्वतन्त्र

प्रतिसाद आवडला आणि खूप धीर दिला !

कल्पना नाही उपयोग किती ते. पण तरिही सांगायची खाज स्वस्थ बसू देत नाही..

१. ह्या गोष्टींवर विश्वास नसल्याने डोके घुसळले जात होते.
खरच या गोष्टींचा माणसाच्या आयुष्यावर फरक पडत असतो का ?

अशा गोष्टी ऐकून तुमच्या मनात जरासुद्धा शंका येत असेल तर तुम्हाला फरक पडतो असे दिसून येईल. ज्यांना अशी शंकासुद्धा येत नसेल, त्यांना पडणार नाही. येथे मनानं कणखर असण्याचा संबंध नाही, तर तुमचा तुमच्या विचारांवर किती विश्वास आहे याचा संबंध आहे.

२. हे लोक येतातच कशाला भेटायला?
कुणी भेटायला यावं यात वावगं नाही, तर ज्या गोष्टींचा कीस पाडून उपयोग नाही त्यांची चर्चा अस्थानी केल्याचं वावगं आहे.
बेधडकपणे लोकांना अंगावर घ्यायची ताकद असेल तर, कुणाच्याही वयाचा-नात्याचा मुलाहिजा न बाळगता, सगळ्यांसमोर हे वाक्य टाकावं - "या गोष्टी इथं बोलण्याचं कारण नाही. कुणाला पटो अथवा न पटो, पण आपण येथे कशासाठी आलोत हे बघून, स्थळ-काळ-वेळ समजून बोलावं. कुणाचा अपमान करण्याचा हेतू नाही, पण तसे होत असल्यास नाईलाज आहे. ध्यानात घ्यावं." आणि कुणी तिथं कितीही बोललं तरी आपण भांडण करू नये. फरक पडेल.
जर असं करण्याची इच्छा वा ताकद नसेल तर मग निदान त्रागा तरी करून घेऊ नये.

राघव

स्वतन्त्र's picture

12 Jun 2012 - 8:38 pm | स्वतन्त्र

१०० % पटलय !

पहील भविष्य, ज्योतीष शास्त्र काय आहे हे समजुन घ्या मग हव तर खुशाल टिका करा.....

ज्यातल कळत नाही.... त्यावर कशाला टिका करताय राव.....