दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या तर्‍हा

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in काथ्याकूट
31 May 2012 - 11:32 am
गाभा: 

कंपनीतील अनेक दक्षिण भारतीय सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांचे उच्चार व नावांचे स्पेलिंग वाचून आपल्या मातृभाषेची थोरवी पटते.

त्यापैकी काहींना त्यांच्या मातृभाषेचा अतिरेकी अभिमान असतो व त्यापुढे इतर भाषा तुच्छ आहे अशा आविर्भावात ते वावरत असतात.

डोळ्यात भरणारे नेहमीचे उदाहरण म्हणजे 'H' चा नको तिथे वापर किंवा अनुपस्थिती.

कविता चे स्पेलिंग Kavita असे न करता Kavitha (कविथा) असे करणे.

भास्कर चे स्पेलिंग Bhaskar असे न करता Baskar (बास्कर) असे करणे.

नावातील शेवटच्या अक्षराला उगाचच एक मात्रा जोडणे उदा महेंद्र च्या ऐवजी महेंद्रा.

एस पी बालसुब्रमण्यम एकदा मराठी सा रे ग म प मध्ये लिटिल चॅम्पस ला सा रे गा मा पा असे म्हणायचा आग्रह करत होते.

इंग्रजी शब्दांचे उच्चार मातृभाषेप्रमाणे करून अर्थच बदलून टाकणे उदा जहाजातल्या 'ज' चा उच्चार जनार्दन मधल्या 'ज' सारखा करणे. एकदा एका जणाने कॉन्फ़रन्स कॉलमध्ये Reason चा उच्चार रिझन ऐवजी रिजन (Region) धमाल उडवून टाकली होती.

काही वेळा आपल्याही लोकांना यांचा गुण नाही तर वाण लागलेला दिसतो. जसे चेपूवर गुढी पाडव्याचे स्पेलिंग गुडी (Gudi) पाडवा असे करणे.

सन्माननीय मिपाकरांनी आपलेही असे अनुभव मांडावे जेणेकरून अश्या विचित्र उच्चारांचा योग्य तो अर्थ लावण्याची क्षमता विकसीत होईल.

एवढे सारे दोष असूनही अंगभूत चिकाटी व भरपूर श्रम करण्याच्या गुणांमुळे बहुसंख्येने हे लोक सगळीकडे यशस्वी होताना दिसतात.

प्रतिक्रिया

बरोबर, म्हणूनच "डिस्कशन फोरम असेल तर कॉमन भाषा पाहिजे" अशी पुस्ती वर जोडली आहेच की. :)

आशु जोग's picture

30 Sep 2013 - 11:15 pm | आशु जोग

उधर हमारा घोडा अड्या था घोडा अडा, नया घोडा था, इतने में आ गए सवार,. रानी एक, शत्रु बहुतेरे, होने लगे वार-पर-वार। घायल होकर गिरी सिंहनी उसे वीर गति पानी थी, बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी

राही's picture

1 Oct 2013 - 5:04 pm | राही

कधीकधी इंग्लिश उच्चार फार 'हार्ड' करीत असतो. विशेषतः जोडाक्षरी उच्चारांत जर अन्त्य 'य' असेल तर हमखास मराठीतल्याप्रमाणे आधीच्या व्यंजनाचे द्वित्त करतो. उदा. प्रोड्ड्यूस, मॅन्न्युफॅक्चर, एज्जुकेशन, अ‍ॅम्म्युनिशन, अ‍ॅम्म्यूझ्मेंट इत्यादि. आपण झीरो, झीब्रा यांतल्या झेड चा उच्चार 'झनक झनक' मधल्या झ सारखा करतो आणि फ्रिज चा उच्चार मात्र फ्रीझ करतो. 'w' चा उच्चार फारच थोड्या मराठी लोकांना जमतो. आणि 'v' चा उच्चार आपण 'व्ह' का करतो तेही अनाकलनीय आहे. आपण 'इ' 'ई'' ' आणि 'उ' 'ऊ' मध्येही घोळ करतो. सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे बीच आणि बिच, लीव आणि लिव. प्रोड्यूस रेड्यूस मध्ये दीर्घ ऊ ची अपेक्ष असते. आपण तो र्‍हस्व उच्चारतो. अर्थात भारतात कोणीच निर्दोष इंग्लिश बोलत नाही, आणि ते साहजिकच आहे. शिवाय निर्दोष इंग्लिश उच्चार कोणते म्हणावे हाही प्रश्नच आहे.

कधीकधी नाही, जवळपास नेहमीच आपले उच्चार हार्ड असतात. ट,ड,र इ. व्यंजनांचे अतिशय स्पष्ट उच्चार हे कानाला खड्यागत लागू शकतात कधीकधी ;) उदा. स्ट्रक्चर या शब्दाचा मराठी उच्चार पहा, ट्र चा अगदी लौड अँड क्लीअर उच्चार बंगाल्यांना झेपत तर नाहीच, विचित्रही वाटतो. अजून एक मराठी स्पेशॅलिटी म्हंजे एबीशीडी म्हणताना "एच आय ज़े" असे म्हणतात. इंग्रजी जे चा उच्चार पदोपदी ज़ करणे हे खास मराठी-त्यातही कोकणस्थी वैशिष्ट्य असावे. इंग्रजी झेड चा उच्चार झपाटलेला मधील झ सारखा करणे हेही खास मराठी वैशिष्ट्य. "व्ही" चा व्ह करणे याबाबत बंगालीही तसेच करतात. फक्त त्यांच्याकडे व आणि ब एकच असल्याने त्या व्ह चा भ होतो, उदा. "जाभा प्रोग्रॅमिंग", "कोभार ड्राईभ", इ. हे व्ही च्या डब्ल्यू च्या तुलनेत असलेल्या जास्त जोरकस, "व्हॉइस्ड" उच्चारामुळे होत असावे. झेड चे झ करणेही त्यामुळेच. जास्त व्हॉइसिंग असेल तर ते अ‍ॅस्पिरेशन समजून तसा उच्चार केला जातो.

बाकी अंत्य य बद्दल बोलायचे झाले तर निराघात य मराठीत असल्याने द्वित्त इतके होत नाही. तेच सौदिंडियन उच्चारांत पहा. प्रोड्ड्यूस, रिड्ड्यूस, लाड्ज, फ्रिड्ज, इ.इ. टनावारी "उधारणे" सापडतील.

बॅटमॅन's picture

1 Oct 2013 - 5:22 pm | बॅटमॅन

मराठीत "ज़" आणि एकूणच दंततालव्य उच्चार जास्त करणे हे कोकणस्थांचे वैशिष्ट्य असावे. जे़ काही, बीजे़पी, आयायटी-जे़ईई, इ. उच्चार ऐकून मी तर लोळून पडायच्याच बेतात होतो.

अन डब्ल्यूच्या उच्चाराबद्दल: तो उच्चार बंगाल्यांना पूर्ण नसला तरी त्याच्या जवळपासचा एक उच्चार जमतो-तो डब्ल्यूसारखा वाटतो. मराठीत व म्हटले की खालचा ओठ वरच्या दातांना लावला जातो. त्याऐवजी बंगाली एकतर ब तरी म्हणतात किंवा ओअ वैग्रे म्हणतात. उदा. हार्डवेअर-हार्ड ओएआर, स्वीट्स-सुईट्स, विकिपीडिया-उइकिपीडिया, इ.इ. यातील व च्या बदली वापरलेले स्वर भरभर उच्चारल्यास व सारखा फील येईल.

राही's picture

1 Oct 2013 - 6:49 pm | राही

'j'च्या उच्चाराबाबत अगदी सहमत. (ज़ नुक्त्यासहित) ज़ेज़े हॉस्पिटल हा उच्चार ऐकून खरोखर हसावे की रडावे ते कळेनासे होते. ज़ेज़े स्कूल ऑव्ह आर्ट्स तसेच.

बॅटमॅन's picture

1 Oct 2013 - 6:59 pm | बॅटमॅन

अन जे़एम रोडही तसेच ;)

एक कन्फेशन द्यायला हरकत नाही. मी जे़जे़ वैग्रे उच्चार कधी केले नसले तरी शिकताना आयजे़के असे उच्चारच ऐकले आहेत.

पिशी अबोली's picture

1 Oct 2013 - 6:52 pm | पिशी अबोली

'य' च्या आधी द्वित्त करणे ही आपल्या भाषांची टेंडन्सी आहे. म्हणून कदाचित असे उच्चार होत असावेत.
उदा. 'शल्ल्य', 'अब्भ्यास' असे उच्चार करतो आपण.

य' च्या आधी द्वित्त करणे ही आपल्या भाषांची टेंडन्सी आहे.

संयोगाने गुरुत्त्व ते हेच बहुतेक. पण इंट्रेष्टिंगलि, सह्याद्री या शब्दाचा उच्चार मात्र सय्हाद्री असा केला जातो. अर्जुनवाडकरांच्या पुस्तकात हा शब्द असा लिहिलेला पाहिल्यावर मग माझी ट्यूब पेटली.

पिशी अबोली's picture

1 Oct 2013 - 7:02 pm | पिशी अबोली

तो लोकमान्य असा एक चुकीचा उच्चार असावा फक्त. 'ब्राह्मण'चे 'ब्राम्हण' सारखा...
आणि 'ह'या व्यंजनाच्या एकूण संदिग्धतेमुळेही होत असेल हे कदाचित.

माझ्या बाबतीत या उच्चाराची गंमत अशी, की मराठीत संदर्भ आल्यास 'सय्हाद्री' आणि संस्कृतमधे आल्यास 'सह्याद्री' असा आपोआप फरक होतो... :)

बॅटमॅन's picture

1 Oct 2013 - 7:08 pm | बॅटमॅन

सहमत! मराठीला जोडाक्षरे "स्पष्ट"पणे उच्चारायला आवडतात. चिह्न, ब्राह्मण, इ. शब्द बघायला जास्त चांगले वाटले तरी उच्चारायला अंमळ गैरसोयीचेच आहेत. चिन्ह, ब्राम्हण, हे कसे ठसठशीत वाटतात =)) मी बव्हंशी (हाही शब्द खरे तर बह्वंशी असा पाहिजे ;) ) मराठी उच्चारच करतो. खरे संस्कृत उच्चार करायचे म्हटले तर अंमळ त्रासदायकच होते या काही केसेसमध्ये :)

पैसा's picture

1 Oct 2013 - 8:12 pm | पैसा

पाप आणि पुण्य मधल्या "पुण्याला" षष्ठीचा प्रत्यय लागतो तेव्हा आपण म्हणतो "पुण्ण्याचा" पण लिहितो "पुण्याचा" पुण्याचा आणि पुण्याचा दूर दूर तक काय संबंध नै. बादवे या षष्ठीतल्या "ष" चा बरोबर उच्चार फक्त सुधीर फडके करत असत.

निराघात आणि साघात यकारान्त जोडाक्षरे हे मराठी सोडून अन्य भारतीय भाषांत असल्याचे माहिती नाही. आपली लिपी अंमळ गंडकी आहे हे अर्थातच मान्य.

पिशी अबोली's picture

7 Oct 2013 - 6:56 pm | पिशी अबोली

देवनागरी लिपीचा विकास गंडकी नदीच्या काठी झाला असावा काय? ;)

बॅटमॅन's picture

7 Oct 2013 - 6:58 pm | बॅटमॅन

पु ना ओकानंतर एक पि.शी. अबोलीच =)) =))

पिशी अबोली's picture

7 Oct 2013 - 6:54 pm | पिशी अबोली

पुण्याचा आणि पुण्याचा दूर दूर तक काय संबंध नै

=))

यसवायजी's picture

1 Oct 2013 - 7:49 pm | यसवायजी

@व आणि ब एकच असल्याने >>
१ भन्नाट किस्सा आमच्या ऑफिसात घडला होता. एका बंगाल्याला विचारले की तुला यायला उशीर का झाला बाबा?
त्याला म्हणायचे होते I got my walls painted today. (अर्थातच घरच्या भिंती)
फक्त व चा ब केला त्याने. :))
;)

बॅटमॅन's picture

1 Oct 2013 - 9:50 pm | बॅटमॅन

जबरीच किस्सा =)) आता स-श एक असल्याने एका ओडिया पोराची झालेली गंमत ऐका. कंपनीत कसल्याशा राखेच्या सँपलवर प्रयोग करायचा होता. प्रयोग केल्यावर राख काळ्याची करडी झाली असे सांगायचे होते. अ‍ॅश मधे श च्या जागी स घातले आणि म्हणतो कसा, "माय अ‍ॅ* वॉज ब्लॅक फर्स्ट, देन इट बिकेम ब्राऊन". सगळी पोरे हास्यसमुद्रात बुडाली, त्याला वाटले की पोरांना वाटतेय की आपण मजा करतोय, म्हणून परत म्हणाला "नो नो, इट रिअली हॅपन्ड" =)) =)) =)) =))

पोरे हसूनहसून ऊर्ध्व लागायची पाळी =))

बॅटमॅन's picture

1 Oct 2013 - 5:28 pm | बॅटमॅन

अजून एक शेवटचे निरीक्षणः मराठी लोक स्वरांच्या र्‍हस्वदीर्घाबद्दल तितकेसे बोलताना जागरूक नसतात, बर्‍याच वेळेस र्‍हस्व उच्चाराकडे कल असतो. तुलनेने हिंदी लोक र्‍हस्वदीर्घ उच्चारांबद्दल जास्त काटेकोर असतात. अर्थात यामागे हिंदीला असलेला एक स्ट्रेस अ‍ॅक्सेंटही कारणीभूत आहे. मराठीत तसा स्ट्रेस अ‍ॅक्सेंट माझ्या मते तरी नाही. असला तरी क्वचित्प्रसंगीच दिसतो, पण हिंदीत लै ठिकाणी दिसतो.

पण शब्दांतीच्या स्वरोच्चारणाबद्दल मराठी लोक एकदम काटेकोर असतात-जोडाक्षर असेल तर. उदा. कल्चर्ड आणि ब्याकवर्ड मधले दोन्हीही ड शुद्ध मराठी उच्चारात पूर्ण असतात ;) (संदर्भः पुल. कुत्र्यासंबंधीचा कुठलातरी लेख होता, आता नाव विसरलो.)
हिंदीत शब्दांतीचे सर्व काही खाल्ल्या जाते, उदा. धर्म्, पूर्ण्, इ. उच्चार कसेतरीच खटकतात. तेच सौथमध्ये श्रीनिवासाऽ, गोविंदाऽ,इ. आ लांबवलेलेही खुपतात. तुलनेने मराठी मध्यममार्ग चांगला वाटतो.

अतिअवांतरः अनुस्वाराचा खास मराठी उच्चार हा संस्कृतमधल्या उच्चाराच्या सर्वांत जवळ आहे असे कुठेतरी वाचले आहे.

पिशी अबोली's picture

1 Oct 2013 - 6:58 pm | पिशी अबोली

तुलनेने मराठी मध्यममार्ग चांगला वाटतो.

मराठी मध्यममार्ग 'आपल्या मराठी कानांना' चांगला वाटतो. ;)
मराठी ही मुळात इंडो-आर्यन आणि द्रविडियन या दोन फॅमिलीज मध्ये लटकणारी भाषा असल्यामुळे हे साहजिकच आहे. व्यंजनाने शब्द संपवण्याला द्रविडियन मान्यता नाही आणि इंआ आहे, अशा परिस्थितीत काढलेला एक पर्याय असावा हा फक्त.

बॅटमॅन's picture

8 Oct 2013 - 12:17 am | बॅटमॅन

हाहा, ते आहेच म्हणा-मराठी कानांना चांगला वाटतो. दोन्ही फ्यामिलीच्या मध्येच लटकणारी भाषा असल्याने उचलाउचलीला दोन्हीकडून वाव आहे. नैतर सिंहली...नुस्ती ऐकली तर तमिऴच वाटते =))

व्यंजनाने शब्द संपवण्याला द्रविडियन मान्यता नाही

हे कधी झालं? तमिळमध्ये सापडतात बरेच व्यंजनान्त शब्द! शेवटी अम् आणि अन् तर चिक्कार येतात.

बॅटमॅन's picture

9 Oct 2013 - 5:22 pm | बॅटमॅन

अरे ते श्व-डिलीशन बद्दल म्हणायचे असेल. शब्दांतीचा स्वर शक्यतोवर पूर्णच उच्चारला जातो इ.इ.

पिशी अबोली's picture

9 Oct 2013 - 7:10 pm | पिशी अबोली

तमिळमध्ये सापडतात बरेच व्यंजनान्त शब्द

प्रोटो-द्रविडियन(संदिग्ध विषय) मधे कदाचित व्यंजनान्त शब्दांना मान्यता असावी असे म्हणतात. पण नंतरच्या काळात अर्धमात्रक 'उ' हा आधी केवळ प्लोजिव साऊंड्सनी संपणार्‍या शब्दांना, आणि नंतर हळूहळू सर्वच व्यंजनान्त शब्दांना जोडायला सुरुवात झाली अशी माझी पढिक माहिती आहे. मला द्रविडियन भाषा येत नाहीत, पण जुन्या कोंकणीत थोडीफार अशी पद्धत होती हे नक्की माहीत आहे. या 'उ' ला 'इनन्सिएटिव वॉवेल' अशी संज्ञा ऐकलेली आहे.

हा 'उ' जेव्हा उच्चारला जात नाही तेव्हा पुढे उच्चारल्या जाणार्‍या शब्दाची सुरुवात सर्वसाधारणपणे स्वराने होत असते. तुम्ही म्हणताय त्या शब्दांच्या बाबतीत अशी काही परिस्थिती आहे का? कारण मॉडर्न तमिळमधे बहुतेक शब्द स्वरान्त असतात असाही उल्लेख मी वाचलेला आहे. किंवा, हे शब्द लोनवर्ड्स- इंआ किंवा इंग्रजीकडून उसने घेतलेले असतील तरीही अशी शक्यता आहे.

म् आणि न् हे अनुनासिक असल्याने कर्मठपणे व्यंजनांचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे हे असेल तर मला अंदाज नाही. आता हळूहळू अन्य भाषांच्या प्रभावामुळे द्रविडियन भाषांमधेही व्यंजनान्त शब्द दिसतही असतील(खास करुन ल् ने संपणारे) पण मलातरी वाटतं, मराठी-कोंकणीच्या जन्माच्या काळात हा नियम तेवढा शिथिल नसावा, म्हणून हा प्रभाव पडला असावा.

तमिऴमधल्या या अर्धमात्रक उ चा उच्चार करणे खरे तर सोपे आहे. उच्चार र्‍हस्व उ चा करायचा, पण तोंडाचा चंबू न करता, अ चा उच्चार करताना ठेवतो तसे तोंड करून. आणि हे नेहमी शब्दाच्या शेवटीच येते. आणि जेमिनेट असेल तरच- आणि क, च, त, ट, प, ऱ (तो हार्श र- र्र सारखा उच्चारवाला) ही अक्षरे शेवटी असतील तर येतो. अर्थात ही अक्षरे म्हंजे जवळपास सगळी तमिऴ वर्णमाला झाली हेवेसांनल =)) "तमिऴ तेरियादु" मध्ये जे दु आहे त्याचा स्वर हा आहे. "मुडियादु" मधील दु देखील असाच आहे.

शिवाय, खुद्द तमिऴ भाषेत "तमिऴ" हा शब्द व्यंजनान्त आहे. "तुम्ही लोक" अशा अर्थाचा "नींगळ्" शब्दही व्यंजनान्त आहे. अर्थात, बरेच शब्द स्वरान्त आहेत हे खरेच आहे. प्रत्यक्ष पर्सेंटेज काढले पाहिजे. पण व्यंजनान्त शब्दांमध्ये म,न,ळ मध्ये एंड होणार्‍या शब्दांचे प्रमाण जास्त आहे.

पिशी अबोली's picture

10 Oct 2013 - 9:43 am | पिशी अबोली

व्यंजनान्त शब्दांमध्ये म,न,ळ मध्ये एंड होणार्‍या शब्दांचे प्रमाण जास्त आहे.

म्हणून म्हटलं, 'ल्' चा उच्चार होत असावा आता... तू म्हणतोयस ती व्यंजने एक 'र' सोडल्यास प्लोसिव मालिकेतील आहेत. त्यांना स्वरान्त बनवणं कंपल्सरी आहे. जेमिनेशनमधेही हीच व्यंजने येणार जवळपास. या सिरीज मधील व्यंजनांनी एखादा मूळ तमिळ शब्द संपत असेल तर तो बघणं इंट्रेस्टिंग ठरेल.
आणि 'उ' चा उच्चार अगदी बरोबर असाच वर्णन केलेला आहे... 'अ' ही असेच अर्धवट उच्चारले जाते. शेवटच्या व्यंजनाला पूर्णत्व देण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
कन्नडमधे काय होते? खास करुन सीमेवरील कन्नडमधे हा पॅटर्न आहे का?

प्लोझिव्ह मालेतील व्यंजनान्त शब्द असेल तर मित्राला विचारून पाहीन.

अ अर्धवट उच्चारले जाते का? याबद्दल साशंक आहे. नाही म्हणायला सीमाभागावरच्या कन्नडचा स्व-डिलीशन प्याटर्न मराठीसारखाच आहे, काही ठिकाणी लांबवतात इतकेच. शिवाय खास मराठी असा "दीर्घ अ" तिथेही कुठे कुठे आढळतो.

शिल्पा ब's picture

11 Oct 2013 - 7:12 am | शिल्पा ब

केवढं ते व्याकरण ! एक शब्द लागला नाही.

पिशी अबोली's picture

9 Oct 2013 - 10:51 pm | पिशी अबोली

या 'उ' च्या ऐवजी 'अ' वापरलेलंपण तमिळ साहित्यात आढळतं म्हणतात. तुळू आणि मल्याळम या भाषांमधे 'अ' चाही सढळ वापर आहे.

मल्लु कलीग फोन वर कुणाला तरी स्पेलींग सांगत होता.
ये फार याप्पल, बी फार बाल हे असलं झाल्यावर म्हणाला
यफ्फ्फ यफ्फ... यफ्फ फॉर Xक्क्क

आशु जोग's picture

7 Oct 2013 - 3:48 pm | आशु जोग

माझी भिंत अन मी. काय अन कुठल्या भाषेत शेअर करायचे ते मी पाहीन. मला बोलणारे तुम्ही कोण?

हे पूर्वी ठीक होतं. पण आता भिंत चालत जाते ना इतरांच्या अपडेट्स मधे !

बॅटमॅन's picture

7 Oct 2013 - 4:06 pm | बॅटमॅन

भिंत चालत जाते म्हणजे ज्ञानेश्वरांची असणार. आणि त्यांनीच तर म्हटलेय ना "माझा मराठाचि बोलु कौतुके" इ.इ. त्यामुळे भिंतीवर मराठी खरडण्यास साक्षात् ज्ञानेश्वरांची संमती आहे.

आशु जोग's picture

7 Oct 2013 - 4:16 pm | आशु जोग

सिंहचा उच्चारही लोक चुकीचा करतात.
आता ते लिहून कसं समजावायचं हाही प्रश्न आहे.

उत्तर भारतीय सिन्ह तर दक्षिण भारतीय सिम्ह असा उच्चार करतात. वास्तविक पाहता हे दोन्ही उच्चार चुकीचे आहेत. मराठी सिंव्ह वाला उच्चार संस्कृत उच्चाराच्या सर्वांत जवळचा आहे.

आशु जोग's picture

9 Oct 2013 - 12:08 am | आशु जोग

अगदी हेच म्हणायचे होते.

आशु जोग's picture

7 Oct 2013 - 11:49 pm | आशु जोग

तमिळ लोकांच्या चुम्मा शब्दावरून आठवलं.

आमचा एक मित्र एका मुलीशी याहूचॅट करीत असे. त्यात काही चिन्हेही पाठवण्याची सोय होती. तो कधी हार्टस कधी कीस असे सिंबॉल पाठवीत असे. त्या चॅटींगला नाव ठेवले होते चुम्मा चॅटींग. हा चुम्मा चॅटींग शब्दही आमच्या मित्रांमधे फार रूढ झाला होता.

म्हणजे दोन बंगले एकमेकांच्या जवळ अगदी खेटून धनकवडी स्टाइलने बांधलेले असले तर बंगल्यांचे काय चालू आहे तर चुम्मा चॅटींग असं म्हटलं जाई.

बॅटमॅन's picture

8 Oct 2013 - 12:15 am | बॅटमॅन

अश्लील =)) =)) =)) =))

आशु जोग's picture

9 Oct 2013 - 12:14 am | आशु जोग

बॅटमन
तुमचं आपलं चुम्मा काहीतरीच.

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2013 - 5:50 pm | श्रीरंग_जोशी

माझाही एक सहकारी बोलता बोलता काही नवे कळले की चुम्मा असे उद्गार काढायचा... सुरूवातीला मला काही कळायचेच नाही हा असे का उद्गारतोय? मग माझ्या चेहर्‍यावरचे भाव पाहून आणखी एका सहकार्‍याने चुम्मा चा तामिळ अर्थ सांगितला :-).

राही's picture

8 Oct 2013 - 12:12 am | राही

सिंह चा उत्तर भारतीय उच्चार सिंघ च्या जवळ जाणारा असतो आणि आपल्याला तो सिंग असा ऐकू येऊन देवनागरीत लिहितानाही आपण सिंग असेच लिहितो. उदा. मनमोहन सिंग, मुलायम सिंग, वी.पी. सिंग वगैरे. पण हिंदी वर्तमानपत्रांत ही नावे मनमोहन सिंह, मुलायम सिंह अशीच छापली जातात. आपणही खरे तर तसेच लिहायला पाहिजे. पण इंग्रजी वर्तमानपत्रांतून मजकुराचा अनुवाद करताना आपण इंग्रजी स्पेलिंग़्ज़ तंतोतंत मराठीत उतरवू लागलो आहोत. लश्कर-इ-तय्यबाला आपण तोयबा म्हणतो कारण अमेरिकन लोक टॉय्बा म्हणतात. कसाब हे नाव माध्यमांमध्ये सुरुवातीसुरुवातीला कित्येक वेळा कासब, कासव असे लिहिले ,उच्चारले गेलेले पाहिले-ऐकले आहे. कारण नेहमीच्या लिखित इंग्रजीमध्ये अ आणि आ साठी ए हे एकच अक्षर वापरले जाते. त्याचे भाषा-लिप्यंतर ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार केले जाते.

हिंदी वर्तमानपत्रांत ही नावे मनमोहन सिंह, मुलायम सिंह अशीच छापली जातात. आपणही खरे तर तसेच लिहायला पाहिजे.

ह्याच्याशी फारसा सहमत नाही. मराठी कानाला ती नावे सिंग अशी ऐकू येतात (फक्त स्पेलिंग बघून नव्हे. तसे असते तर सिंघ केले असते. आपण मराठी लोक महाप्राण असे सहजासहजी सोडत नाही. ;) )
अशी नावे सिंग लिहिण्याची बऱ्यापैकी मोठी परंपरा मराठीत निर्माण झाली आहे. सिंह लिहून मग मूळ नावापेक्षा वेगळा उच्चार करा, किंवा सिंह असे लिहून सिंगसारखा उच्चार करा हे दोन्ही पर्याय फारसे पटत नाहीत.
त्यापेक्षा राहू देत सिंगच. त्याच्या मुळाशी सिंह आहे हे कुठे तरी लक्षात राहू देत इतकेच. :)

बॅटमॅन's picture

10 Oct 2013 - 1:02 pm | बॅटमॅन

सिंह मधील ह हलन्त उच्चारला तर सिंग/सिंघ सारखे ऐकू येते.

सार्थबोध's picture

10 Oct 2013 - 10:04 am | सार्थबोध

against ला अगनेस्ट म्हणतात

वासु's picture

10 Oct 2013 - 2:59 pm | वासु

माझ्या पुर्विच्या कंपनीत एक मित्र होता. कंपनीत एक सुन्दर झाड होत तर सहजच मि त्या झाड ला हात लावला तर लगेच तो मित्र म्हनाला "उस जाड को चुना मत" त्याच आम्हाला खुप हसु आल लगेच तो "क्या हुइ" मला अजुनच हसु आल.

श्रीरंग_जोशी's picture

11 Oct 2013 - 8:04 am | श्रीरंग_जोशी

या धाग्यावर विविध भाषावर शास्त्रिय दृष्टिकोनातून अत्यंत मोलाची भर घातल्याबद्दल पिशी अबोली व बॅटमॅन यांना अनेक धन्यवाद.

आपल्या प्रतिसादांतील बर्‍याच शास्त्रिय संज्ञा प्रथमच ऐकल्या अन नेमकेपणाने कळल्या नाही. या विषयावर त्यांनी लेखन करावे. जेणे करून या विषयाशी फारशी ओळख नसणार्‍या पण आस्था बाळगणार्‍या माझ्यासारख्या अनेकांच्या ज्ञानात मोलाची भर पडेल.

स्थितप्रज्ञ's picture

24 May 2016 - 8:59 am | स्थितप्रज्ञ

ते "H" ला 'एच' नाही तर 'हेच' (च-च चिमट्याचा ) म्हणतात.
"And" ला अंड म्हणतात.
"ग" चा उच्चार "ग्ग" असा करतात उदा, फिग्गर.
'ज' चा उच्चार 'ज्ज' असा करतात उदा, व्हेज्ज बिर्याणी.
आणि थोडीशी सुद्धा complex concept समोरच्याला समजवायची असेल तर वाक्याची सुरुवात चुकचुकून करतात (त्यांचा म्हणण्याचा अर्थ "काय राव याला इतका पण समजत नाही" असा नसतो पण बोलण्याची ती एक सवय असते).