सिंधुदूर्ग

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in कलादालन
10 Apr 2012 - 2:49 pm

कोंकणात भटकायचे तर पावसाळा संपल्यासंपल्या लगेच जावे. सगळीकडे निसर्गाचे विलोभनिय दर्शन होते. छायाचित्रकारांना तर पर्वणीच. पण काही कामा निमित्त हल्लीच मालवण आणि गोवा अशी सफर केली. काही निसर्गचित्रे कॅमेरात बंदिस्त केली. तीच आज तुमच्या आस्वादासाठी सादर करीत आहे.

सौंदर्याचे वरदान लाभलेला मालवण किनारा.

Malvan-Kinara

Malvan-Kinara-1

Malvan-Kinara-4

मालवणात मुख्य खाद्य मासे. गल्लोगल्ली उपहारगृहे आहेत. तसेच, काही घरांमधूनही 'घरगुती पाककौशल्याचे नमुने' चाखावयास मिळतात. पक्षांना तर काय विचारुच नका. पानं वाढलेलीच आहेत केंव्हाही या आणि झोडा मेजवानी....

Malvan-Pakshi

मालवणच्या किनार्‍यावरून सिधुदूर्गाचे दर्शन..

Sindhudurga-6

सिंधुदूर्ग किल्ला अधिक जवळून....

Sindhudurga

एक बुरूज...

Sindhudurga-1

मुख्य प्रवेशद्वार.....

Sindhudurga-2

गडावर वस्ती आहे. तुरळक शेती होते. मुख्य व्यवसाय मासेमारी, मालवणच्या किनार्‍यापासून ह्या सागरी गडापर्यंत पर्यटकांची ने-आण करणे इ.इ.इ.

Sindhudurga-3

गडावर खुपसा प्रदेश खडकाळ आहे. पण महाराजांच्या कारकिर्दीत नक्कीच इथेही वस्ती, गडाची व्यवस्था पाहणारी खाती, कचेर्‍या, कोठारं, शस्त्रागार, कारखाने इ.इ.इ. असणार.

Sindhudurga-4

भर समुद्रात असलेल्या एका खडकावर सिंधुदूर्ग ताठ मानेने उभा आहे. काही प्रमाणात तटबंदीची पडझड झाली आहे पण तटबंदीची मुळ शान अजूनही टिकून आहे.

Sindhudurga-5

चारही बाजुंनी खार्‍या पाण्याने वेढलेल्या ह्या गडावर 'दूध बाव' आणि 'साखरी बाव' ह्या गोड पाण्याच्या दोन विहिरी आहेत. आजही विहिरींना पाणी आहे आणि त्या सिंचनासाठी वापरात आहेत.

Dudha-Bav

Sakhari-Bav

परतीच्या प्रवासात दूर किनार्‍यावरचे हे मंदीर फारच सुंदर दिसत होते.

Mandir

दिवसभर पर्यटकांची ने-आण करून थकलेली ही नाव संध्याकाळच्या थंड हवेवर जणू विसावा घेत आहे.

Sandhyakal

इथून पुढे प्रसन्न मनाने गोव्याच्या वाटेवर निघालो. वाटेत दिसत होते निसर्गाचे अनेक 'तुकडे'. त्यापैकीच एक.

Konkan-1

प्रवास

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

10 Apr 2012 - 2:54 pm | परिकथेतील राजकुमार

पेठकर काका, बाहेर इतके बेक्कार ऊन पडलेले असताना ही अशी चित्रे बघणे काय स्वर्गसुख आहे सांगावे.
मस्त मस्त मस्त !

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2012 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा

पेठकर काका येकदम स्वालिड हायती फोटू... किनार्‍यावरुन सिंधुदुर्ग आणी विश्रांती होडी जास्त अवडले.. :-)

यकु's picture

10 Apr 2012 - 3:25 pm | यकु

अहाहा मस्त गार गार फोटो!!!
धन्यवाद पेठकर काका.

प्रचेतस's picture

10 Apr 2012 - 4:47 pm | प्रचेतस

देखणा किल्ला, सुंदर फोटो.

जाई.'s picture

10 Apr 2012 - 4:47 pm | जाई.

सुरेख
फोटो छान आलेत

पहाटवारा's picture

10 Apr 2012 - 5:03 pm | पहाटवारा

शिवरायांच्या हाताचे ठसे नाहि पाहिलेत का ? किल्ल्यात एक छोटेखानी मन्दिर आहे त्याचे ..
बाकी फोटो मस्त आलेत ..

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2012 - 7:27 pm | प्रभाकर पेठकर

पाहिले. एका बुरुजावर दोन ठिकाणी आहेत. त्यावर सिमेंटचे छोटे (एखाद्या खोक्याच्या आकाराचे) बांधकाम केले आहे. त्याला जाळी आणि कुलूप आहे. पण, त्या ठशांबद्दल मला साशंकता वाटली म्हणून मी विशेष महत्त्व दिले नाही.

पाचगणीला सुद्धा भीमाच्या पायाचा ठसा म्हणून दगडातील एक (मोठ्ठ्या) पावलाचा ठसा दाखवतात. मी कॉलेजच्या वयात तिथे गेलो होतो तेंव्हा तिथे तसे काही नव्हते. हल्लीच्याच भेटीत तो ठसा दाखवण्यात आला.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Apr 2012 - 7:39 pm | बिपिन कार्यकर्ते

भीमराव हल्लीच येऊन गेले असतील! ;)

मोदक's picture

10 Apr 2012 - 9:07 pm | मोदक

सुंदर फोटो..

हाताच्या ठशाबद्दल पैसाताईंना +१ .

शिवरायांच्या हाताच्या ठशात तिथे येणार्‍या पब्लीक ने आपला हात ठेवून ठेवून त्याचा आकार बिघडवला.
गोनीदांनी याच हाताच्या ठशाचा प्लॅस्टर ऑफ पॅरीस ने दुसरा ठसा बनवून घेतला. "दुर्गभ्रमणगाथा" नावाच्या अप्रतीम पुस्तकात संपूर्ण घटनेचे वर्णन केले आहे.

(असेच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मुर्तीविषयी ऐकले होते.. भावीकांनी आपले डोके ठेवून ठेवून मुर्तीच्या पायाला खड्डे पडले आहेत असे ऐकवात आहे..)

(असेच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मुर्तीविषयी ऐकले होते.. भावीकांनी आपले डोके ठेवून ठेवून मुर्तीच्या पायाला खड्डे पडले आहेत असे ऐकवात आहे..)

असाच काहीसा पण थोडासा किंचीत वेगळा विषय आहे.. कदाचित काथ्याकुटाचा.
पण असल्या विषयावर काथ्याकूट करण्याची सवय नसल्याने इथेच लिहितो.

पंढरपूरच्या बडव्यांनी म्हणे विठ्ठलाच्या मूर्तीवरील 'तेज' काढून एका कुंभात भरले.

आणि तो कुंभ गुप्त ठिकाणी ठेवला.

कुठं वाचलं होतं आठवत नाही.

मोदक's picture

11 Apr 2012 - 1:18 am | मोदक

हो.. मी पण हे वाचले आहे...

एका प्रसंगानंतर ज्यांना देवळात जाणे पटले नाही ते लोक मूर्ती ऐवजी त्या कुंभाचे / कळशीचे दर्शन घेवून मनाचे समाधान करत..

वपाडाव's picture

10 Apr 2012 - 5:11 pm | वपाडाव

विशेषतः मंदिराचा अन होडीचा विसावा घेतानाचा फटू ड्येंजर भारी आहेत...

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Apr 2012 - 7:39 pm | बिपिन कार्यकर्ते

क्लास!

पैसा's picture

10 Apr 2012 - 8:15 pm | पैसा

सगळे फोटो छान! आमचां कोंकण तसांच!

पेठकर काका ते ठसे अधिकृत असावेत कारण गोनीदांनी त्यांच्याबद्दल एक लेख लिहिलेला वाचलेला आठवतोय. आणि त्याला जाळी हल्लीच बसवली आहे. पूर्वी लोकांनी आपला हात त्यावर ठेवून हाताचा ठसा बिघडवला आहे पण पायाचा ठसा मात्र सुबक आहे असं गोनीदांनीच लिहिलं होतं.

सुनील's picture

10 Apr 2012 - 9:14 pm | सुनील

सुंदर फोटो.

एखाद्या खरपूस तळलेल्या तुकडीचा फोटोदेखिल टाकला असतात तर लेख अधिक "रुचकर" झाला असता!

चिंतामणी's picture

10 Apr 2012 - 11:37 pm | चिंतामणी

>मालवणात मुख्य खाद्य मासे. गल्लोगल्ली उपहारगृहे आहेत. तसेच, काही घरांमधूनही 'घरगुती पाककौशल्याचे नमुने' चाखावयास मिळतात.

तुमच्या सारख्या दर्दी माणसाने हे वर्णन येथेच थांबवल्याने अंमळ निराशा झाली. त्या पदार्थांचे छानसे फोटो आणि सोबत वर्णन आले असते तर बहार आली असती.

(मत्स्यप्रेमी) चिंतामणी

नंदन's picture

11 Apr 2012 - 12:13 am | नंदन

फोटो आवडले. किनार्‍यावरचं ते मंदिर बहुतेक भवानीमातेचं आहे. (चू.भू.द्या.घ्या.) तारकर्ली, जय गणेश मंदिर, तिथली खानावळ आणि चैतन्य हॉटेल - हा सगळा परिसर आठवून गेला.

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 1:07 am | प्रभाकर पेठकर

परिकथेतील राजकुमार, अतृप्त आत्मा, यकु, वल्ली, जाई., पहाटवारा, बिपिन कार्यकर्ते, मोदक, वडापाव, पैसा, सुनिल, चिंतामणी आणि नंदन आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

@पैसा,

पर्यटकांच्या एकेक तर्‍हा बघितल्या तर त्यांना अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांवर मज्जाव करावा असेच वाटते. तिथे काही पर्यटक, विशेषतः एकमेकांना लटकून चालणारी तरूण जोडपी, पाहिली. त्यांना त्या थंड वार्‍यावरही पेप्सी प्यायची होती त्यामुळे त्यांनी तिथल्या एकुलत्या एक दुकानावर धाव घेतली. 'कोणाचा किल्ला आहे हा? नांव काय किल्ल्याचे?' असे प्रश्न ऐकू येत होते. तर काही तरूण पुरुष पर्यटक 'आयला, बिअर आणायला पाहिजे होती' ह्या विचाराने कासाविस झाले होते. असो.

@सुनिल आणि चिंतामणी,

मी भावना समजू शकतो. पुढच्या वेळी आवर्जून मालवणची 'खाद्यभ्रमंती' करूया. तेंव्हा खरपुस तळलेली तुकडी, माशाचे कालवण, सुकटाची चटणी आणि सोलकढीला प्रथम स्थान देईन असे म्हणतो.

>>>. तेंव्हा खरपुस तळलेली तुकडी, माशाचे कालवण, सुकटाची चटणी आणि सोलकढीला प्रथम स्थान देईन असे म्हणतो.

हे इतके डीटेल लिहायची गरज आहेच का..?? काय काका.. सकाळी गडबडीत नाष्टा केलेला नाही आणि त्यात तुमचे वर्णन.

या वीकांताला कोकणात महाड जवळ जायचे आहे.. बघूया कुठे स्कोप मिळतो का..

रमताराम's picture

11 Apr 2012 - 1:22 am | रमताराम

सिन्धुदुर्ग म्हटले की आम्हाला अन्तू बरव्याचे 'सिधू कसली सिंधुदुर्ग तो... मालवणचा' हे जगप्रसिद्ध वाक्य आठवते.

बाकी आमची सिंधुदुर्ग ट्रिप एका म्हमईकराने संस्मरणीय केली (यात म्हमईबद्दल जेनरलायजेशन नाही, त्या बाप्याबद्दल एवढेच समजले हि मर्यादा). नावेत बसवून नाखव्याने आम्हाला अर्ध्या वाटेपर्यंत नेले नाही तोच उंच उंच लाटा उसळू लागल्या. नाखवा शांतपणे मशीन चालू-बंद करून लाटांना तोंड देत होता त्यावरून इतक्या लाटा काळजी करण्याचे कारण नाहीत हे समजून - आणि सालं अर्ध्या वाटेवर तसंही आपण काही करू शकत नाही या रिजाईन्ड वृत्तीने - आम्ही आपले लाटा येन्जॉय करत असताना बोटीतील या वीराने ठो: ठो: बोंब ठोकायला सुरूवात केली. काय झाले विचारले तर म्हणे एवढ्या लाटा आहेत , होडी उलटली तर मी बुडेन ना, मला पोहायला येत नाही. म्हटलं बाळा, आपण चौदा लोक इथे आहोत, बुडलो तर सारेच बुडू. तो एकटा नावाडी तसेही चौदा जणांना वाचवू शकणार नाही, तेव्हा बोंबलू नकोस. (काय पण समजूत घालणे नै?) हे ऐकून गडी आणखीनच पॅनिक झाला नि ठ्यां;: ठ्यां: बोबलू लागला. त्याच्या बायकोने मला शिव्या घातल्या. गंमत म्हणजे एक गावठी मास्तर दहा-बारा वर्षांच्या चार-पाच शाळकरी पोरांना घेऊन त्याच नावेत होता, ते सगळे मजेत 'मालवण दर्यावरी किल्ला, शिवाजी आत कसा गेला....' हे गाणे गात एन्जॉय करत होते. (प्रामाणिकपणे सांगायचं तर आमचा धीर त्यांच्यामुळेच टिकून होता). प्रत्यक्ष किल्ल्यात गेल्यावर मात्र सुखिया जाला. (फक्त काँक्रिटमधला छत्रपतींच्या पायाचा ठसा पाहून ह. ह. पु. वा.) इथे दोन शेंड्यांच्या माडाचा फोटो दिसत नाही. एक दखलपात्र आश्चर्य आहे म्हणे ते. (खरे खोटे देव जाणे.)

>>> दोन शेंड्यांच्या माडाचा फोटो

२ / ३ वर्षांपूर्वी वीज पडून ते झाड जळाले असे पेपरात वाचले. :-(

Y शेपचे ते झाड वेगळेच दिसायचे.

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 1:58 am | प्रभाकर पेठकर

होय रमताराम, ते झाड वीज पडून जळून गेले असे गडावरच समजले.
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

गणपा's picture

11 Apr 2012 - 1:56 am | गणपा

नयनरम्य फोटो.

चित्रा's picture

11 Apr 2012 - 2:08 am | चित्रा

फोटो आवडले. पहिला व दुसरा फोटो अधिकच आवडले.

५० फक्त's picture

11 Apr 2012 - 7:52 am | ५० फक्त

दोन वर्षापुर्वी गेलो होतो त्या आठवणी जागवल्यात काका तुम्ही, तुमची परवानगी आहे असं समजुन सिंधुदुर्ग किल्यातल्या त्या ठस्यांचे फोटो डकवत आहे.

हा सिंधुदुर्ग किल्यातल्या महाराजांच्या मंदिरात असलेला वाळुचा गणपती,

आणि हा मालवण गावात असलेल्या साळगांवक्ररांच्या मंदिरातील गणपती, इथं संध्याकाळी आरतीला जमावं खुप छान वाटतं आणि नंतर ओल्या नारळाचा साखर घातलेला प्रसाद.

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 9:44 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद ५० फक्त. दोन्ही छायाचित्रे खुप छान आहेत.

वाळूचा गणपती हुकलाच माझा. साळगावकरांचा गणपती मात्र पाहिला. मस्त आहे.

प्यारे१'s picture

11 Apr 2012 - 9:03 am | प्यारे१

खूप छान फोटो नी वर्णन पेठकर काका.
शाकाहारी 'झाल्या'मुळं फार दु:ख नाही वाटणार तळलेले तुकडे न पाहण्याचं. :)
सोबत ५० चे फोटो पण खूपच छान.

पियुशा's picture

11 Apr 2012 - 9:47 am | पियुशा

चेपस !!!!!:)

इरसाल's picture

11 Apr 2012 - 9:53 am | इरसाल

इतकंच म्हणेन मी काका.

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 10:15 am | प्रभाकर पेठकर

मोदक, गणपा, चित्रा, ५० फक्त, प्यारे१, पियुशा आणि इरसाल प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

काकाश्री एकदम भारी फोटु काढले आहेत तुम्ही... :)

जयवी's picture

11 Apr 2012 - 11:30 am | जयवी

अहाहा.........सुखद निळाई !!

दिपक's picture

11 Apr 2012 - 11:40 am | दिपक

खल्लास फोटो!! :-)

स्वाती दिनेश's picture

11 Apr 2012 - 6:59 pm | स्वाती दिनेश

आत्ता, जरा उशिरानेच फोटो पाहिले. खूप छान !
स्वाती

सगळी छायाचित्रे भारी आली आहेत.

सर्वसाक्षी's picture

11 Apr 2012 - 11:20 pm | सर्वसाक्षी

पेठकर शेठ

उत्तम चित्रे. दौरा जोरदार झालेला दिसतोयः)