टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वहिंनीच्या बांगड्या - चित्रपट भाग - ३
वहिन्नीच्या बान्गड्या - चित्रपट भाग - १
वहिन्नीच्या बान्गड्या - चित्रपट भाग - २
गेल्या आठवड्यात दुसर्या गावातील लाकांनी येथे जरा मस्ती केली होती. त्याची मारामारी केल्या मुळे गावकरी दमले होते. वेगवेगळे महाराज येउन गेले, सर्वे झाले, त्यामुळे गावकरी जरा ह्या आठवड्यात सुस्तच होते.
आम्बोळी हा गावचा ऐकदम फेमस माणुस. गावात कोण ह्याचा नाद नाही करत. त्याला आजन्म मयताचे कन्त्राट मिळाले होते. कोणाची ही गेम करायची असेल तर ह्याला सांगायचे. सध्या छोटा डॉन च्या टोळीत शुटर चे काम करत आहे.
गावात आम्बोळी चे कन्दीलाचे दुकान होते. ह्यांन्च्या पुर्वजान्चा आणि शिवाजी राजांचा जवळचा संबंध. ह्यान्चे पुर्वज रांजांच्या चाकरीत होते. लढाइच्या कामात ऐकदम पुढे. दिसला यवन कि लाव कन्दील. म्हणुन तर मावळे जंगलातल्या लढाया जिन्कत. हा कन्दिल दिवसा उजेडी चालत नाही. पुढे हा कन्दील पेशव्याकडे पोचला. पण गडावरुन चढ्-उतारामुळे पुढे याचा परिनाम कमी झाला आणि मराठेशाही बुडाली. कोहिनुर हिर्याप्रमाणे हा परदेशी पोचला. आता तो अमेरिकन राष्ट्रपती याच्याकडे आहे. त्यांनी तो आता पेटवल्यामुळे तेलाच्या किमती वाढत आहेत आणि इराक, अफगाणिस्तान मध्ध्ये माणसे मरत आहेत. उगाच भारताचे नाव खराब. अशी ऐक कथा मिपा गावात प्रचलित आहे. अजुन ऐक कन्दील आम्बोळी कडे आहे. पण त्याचा उपयोग आता रात्रीचा मासे, खेकडे मारणे या साठी होतो.
तिकडे ह. भ. प. विजुभाउ 'अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीट' चे पारायण करुन उठले होते. हा मिपा धर्माचा धर्मग्रन्थ होता. त्यांनी पिडा काका कडुन आनलेली १०० मिली घेतली होती. बैटरी फुल चार्ज मध्ये होती. इतक्यात गावचा पोष्टमन पत्र घेउन आला. अत्तराच्या वासामुळे त्याने ते विजुभाउ चे पत्र धमुला दिले. पत्रावर ऐनी चा पत्ता बघताच धम्याने ते पत्र फोड्ले आनी वाचायला सुर्वात केले. कळवायला अतिशय वाईट वाटते आहे की आपण आमच्या घरी कान्दे पोहे खायला आलात; (आणि आमच्या घरचा फोवर पॉट फोडला, ह्या ओळी लिहुन नंतर खोड्ल्या होत्या.) आम्हला आनंद झाला, आपली आज्ञावली इशावाकु आहे. आणि माझी खिडकी आहे. ह्या वैर ग्रह असल्यामुळे पत्रिका जुळत नाही. तरी आपला मित्र लांब केस वाले आणि चश्मावाले छोडॉ यांची पत्रिका व फोटो पाठ्वुन द्यावेत. - आता लोभ नसावा ऐनी (सौ. चि. का. छोटी डॉनी व्ह्यायच्या प्रतिशेत).
इकडे छोडॉ च्या वाळवंटात बर्याच दिवसाने हिरवळ फुलली होती. छोडॉ ने आपल्या हातातल्या पिवळा डांबिस बाबांनी दिलेल्या ताईताकडे हसत हसत नजर टाकली.
'सरपंच, हनिमुन साठी चान्गले ठिकाण कोणते हो' तिकडे छोडॉ ने सरपंचांना विचारले
'म्हणजे, तुला आधी लग्न करायचे का हनिमुन ?' - सरपंच
'लग्नच' - छोडॉ
'मग, लग्न करा आणी माझ्याकडे या, येताना पिवळ्या डांबिस काकांच्या दुकानात जाउन या' - सरपंच. 'आम्हाला बरे वाट्ते कि आजची तरुण पिढी आमच्या सारख्या अनुभवी लोंकांचा सल्ला घेते आहे. अनुभवाचा लोकांना फायदा व्हायला हवा.' - सरपंचानी उगाचच आपले महत्व वाढवुन घेतले.
आणि विजुभाउ नी रडुन रडून डोळे लाल केले होते. पिडा काका त्याला धीर देत होते. 'बस, रेल्वे आणी मुली पाठीमागे कधी पळायचे नसते, ऐक गेली तर दुसरी येते'. आणि कांदे-पोहे खायला अविवाहीत मित्राला घेउन जायचे नसते. चल मी तुला दुसरी मुलगी दाखवतो. माझ्याक्डे जेलो चा प्रोफाईल आहे. ती तुमच्यापुढे गेल्यावेळी ढगात बसली होती. तीला भारतीय पुरुषांमध्ये रस आला आहे. तीला आता पुण्यात सेटल व्हायचे आहे. पुणे तिथे काय उणे.
पिवळ्या डांबिस बाबांचे बरेच मिपा गावात आल्यापासुन बरेच घरगुती उद्योग, कुटिर उद्योग चालु केले होते, उदा. गांजा पिकवणे, काळ्या गुळापासुन पिवळा द्रव तयार करणे. गावातल्या लोकांना प्रेमप्रकरणे याबाबत सल्ले देणे, न जुळणार्या पत्रिका जुळवणे, ग्रह शान्ती करणे इ. उद्योग चालु होते.
गावातील सर्वात रंगीत मानुस म्ह्ण्जे सरपंच. गावात आलेले लोककला मंडळ यांचा आश्रयदाता. खास लोककला कलावन्ताना वाड्यावर जागा देणे. गरिबांना शिक्षण देणे (कसले शिक्षण ते विचारु नये, आपापले समजुन घ्यावे.) त्यांनी मिपात १००१ वे पोर जन्माला आल्यावर, गावात त्यांनी गरिबांना टि-शर्ट वाटले, जेवण वैगरे घातले.
थोड्या वेळाने मनोबा पाटिल, सरपंच, छोटा डॉन (आणी त्याची गैंग आन्द्या, धमाल मुलगा; ह्यान्च्यातला डावा-उजवा हात तुम्हीच ठरवा, पिवळा डांबिस- खजिनदार, आजकाल ही गैन्ग ई. यम. आय. वरती पण किड नैपीग करते. तुम्ही दर महीन्याला थोडे थोडे पैसे देउ शकता. म्हणुन जरा जपुन.), प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, डॉ. दाढे, पेठकर इ. मंडळी आली होती.
'पाटिल आणि सरपंच, आपण पिक्चर ची तयारी केली लवकर केली पाहेजे' - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. बिरुटेंनी विषयाला तोंड फोड्ले.
'हे, बघा सगळी प्लनिंग मास्तर करायेत.' सरंपच. 'कुठे गेले हे मास्तर, आलेत की नाहीत'
'हो हो, आलोय मी' - मास्तरांनी पन्चायती समोरच तम्बाकुचा तोबरा टाकला.
'काल आमची म्हणजे मनोबा पाटिल, सरपंच इ. मान्यवर लोकांची बैठ्क झाली. त्यात खालील प्रमाणे ठरले आहे.' - मास्तर
उर्वरीत भाग जाहीराती नन्तर........
(या क्षणी, पुढ्चा भाग लिहित आहे. तो लवकरच मिपा वर येइल.)
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


छान.
पत्रावर ऐनी चा पत्ता बघताच धम्याने ते पत्र फोड्ले आनी वाचायला सुर्वात केले. कळवायला अतिशय वाईट वाटते आहे की आपण आमच्या घरी कान्दे पोहे खायला आलात; (आणि आमच्या घरचा फोवर पॉट फोडला, ह्या ओळी लिहुन नंतर खोड्ल्या होत्या.) आम्हला आनंद झाला, आपली आज्ञावली इशावाकु आहे. आणि माझी खिडकी आहे. ह्या वैर ग्रह असल्यामुळे पत्रिका जुळत नाही. तरी आपला मित्र लांब केस वाले आणि चश्मावाले छोडॉ यांची पत्रिका व फोटो पाठ्वुन द्यावेत. - आता लोभ नसावा ऐनी (सौ. चि. का. छोटी डॉनी व्ह्यायच्या प्रतिशेत).
हा हा हा
मस्त झाला हा ही भाग.
येऊ दे !!!
वहिनीच्या बांगड्या, य.गो. जोशीच्या कादंबरीवर सखाराम गटणे यांनी काही परिक्षण केले की काय असे वाटले ? ( या चित्रपटात डोळे भरणारे प्रसंग कोणते, यावर चिंतन-मंथन असेल असे वाटले )

गटणेसाहेब, या पुर्वीचे दोनही भाग वाचले आणि आज तिस-या भागात साहित्याशी एकनिष्ठ असलेल्या पुलंच्या गटणे यांनी तर मजा आणली आहे, येऊ दे !!! जाहिरातीच्या भागानंतर पुढे काय वाढून ठेवले आहे, वाचण्यास उत्सुक
थ्री
थ्री चिअर्स फॉर गटणे...
जबरा झाला आहे हा भाग.
आजकाल ही गैन्ग ई. यम. आय. वरती पण किड नैपीग करते. तुम्ही दर महीन्याला थोडे थोडे पैसे देउ शकता. म्हणुन जरा जपुन
बिपिन.
:)
चांगल चाललयं.......चालु देत!
सूक्ष्म आणि यथार्थ चित्रण? :))
गटण्या, लेका प्राज्ञ परीक्षा पास केल्याचा फायदा झालाय हां!!
तुझं जीवनविषयक सूत्र आता तुझ्याच लक्षांत आल्यासारखं वाटतंय!!!
आणि शब्द तर काय "पोरांच्या चड्ड्यांतून खिसे उलटे केल्यावर गोट्या पडाव्यात" तसे पडताहेत!!!
तिकडे ह. भ. प. विजुभाउ 'अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीट' चे पारायण करुन उठले होते. हा मिपा धर्माचा धर्मग्रन्थ होता.
)
मग काय वाटलं काय? अतिशय पावरफुल ग्रंथ आहे तो बाबा! विजुभाऊंची अजुनी फक्त सहाशेसत्रा पारायणेच झाली आहेत. एकदा एक सहस्त्राचा आकडा पुरा करूदेत! मग बघ, ह. भ. प. विजुभाऊ कसे "वे(द)शा(स्त्र)संपन्न" विजुभाऊ होतात ते!!
इकडे छोडॉ च्या वाळवंटात बर्याच दिवसाने हिरवळ फुलली होती. छोडॉ ने आपल्या हातातल्या पिवळा डांबिस बाबांनी दिलेल्या ताईताकडे हसत हसत नजर टाकली.
मग! आम्ही ताईत दिला आणि त्याचा गुण नाय आला असं कधी होईल का?
(स्वगतः नवीन ताईत बनवायला टाकले पाहिजेत! मिपावर लग्नेच्छु पोरग्यांना काय तोटा? आता तर आपसूक जाहिरातही झालीय!!)
'म्हणजे, तुला आधी लग्न करायचे का हनिमुन ?' - सरपंच
)
हो, म्हणजे लग्न करायचं असेल तर त्या डांबिसस्वामींकडे जा! नुसता हनिमून (धमाल!) करायचा असेल तर आमच्याकडे, तात्यास्वामींकडे ये!! आम्ही मराठी, गुजराती, तेलगू, सगळ्या भाषांमधून हनिमून शिकवतो!!!
विजुभाउ नी रडुन रडून डोळे लाल केले होते. पिडा काका त्याला धीर देत होते. 'बस, रेल्वे आणी मुली पाठीमागे कधी पळायचे नसते, ऐक गेली तर दुसरी येते'.
(मिपाकरांनो, कॄपया, कॄपया, ह. घ्या!!)
अगदी बरोबर! आणि गेलेली जरी गच्च भरलेली असली (बस हो!) तरी येणारीमध्ये झोपायला सुद्धा जागा मिळू शकते!!
पिवळा डांबिस- खजिनदार!

तद् माताय! न करून सांगतात कोणाला?
जारण-मारण विद्या येण्याचे बरेच फायदे असतात की!!
पिवळ्या डांबिस बाबांचे बरेच मिपा गावात आल्यापासुन बरेच घरगुती उद्योग, कुटिर उद्योग चालु केले होते, उदा. गांजा पिकवणे, काळ्या गुळापासुन पिवळा द्रव तयार करणे. गावातल्या लोकांना प्रेमप्रकरणे याबाबत सल्ले देणे, न जुळणार्या पत्रिका जुळवणे, ग्रह शान्ती करणे इ. उद्योग चालु होते.
स्वगतः हा गटण्या लई बारकाईनं चौकश्या करतोय आमच्या कुटीर उद्योगांच्या!! तरी बरं आज दुकानात चांगली लिंबं आलीयत!! दोन राखून ठेबावी म्हणतो या गटण्यावर मूठ मारायला!!
जय, जय काली कलकत्तेवाली!!!!
हा!! हा!! हा!! हा!! हा!! हा!!
काका मला वाचवा...
पिडां काका मला वाचवा...
)तुमचे ताईत खपतात्....पण आमची ऍन जाते त्याचे काय
( बाकी हे अगदी अमेरिकन स्ट्रॅटेजी प्रमाणे होतय हो....ते दोन्ही देशाना शस्त्रे विकतात्....आणि दोघाना ही उत्तेजन देतात्....ह घ्या
ऍन शिवायचा विजुभाऊ :&
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
मिपालीवूड
गटणे शेठ पिच्चर तर धमाल काढून राहिले आहेत. आपल्याला साला एक्स्ट्रॉ मंदी पन चानस दिसत नाही. फुक्कट मि पाली वूड मधे इतके दिवस (बोटे) घासली.
आता शेवटचा उपाय म्हनजे गटणे शेट कडे वशिला लावावा लागेल. आधी पोष्ट हाफीस मधे फुलांचा गुच्छ पाठवून देऊया. खफ वरून उचलता येईल.
:)
गावातील सर्वात रंगीत मानुस म्ह्ण्जे सरपंच. गावात आलेले लोककला मंडळ यांचा आश्रयदाता. खास लोककला कलावन्ताना वाड्यावर जागा देणे. गरिबांना शिक्षण देणे (कसले शिक्षण ते विचारु नये, आपापले समजुन घ्यावे.)
हम्म!
गटण्या, चालू दे बा!
तात्या.
वहिंनीच्या बांगड्या - चित्रपट भाग - ३
खुपच छान........लिहिलय...
गावात आम्बोळी चे कन्दीलाचे दुकान होते. ह्यांन्च्या पुर्वजान्चा आणि शिवाजी राजांचा जवळचा संबंध. ह्यान्चे पुर्वज रांजांच्या चाकरीत होते. लढाइच्या कामात ऐकदम पुढे. दिसला यवन कि लाव कन्दील. म्हणुन तर मावळे जंगलातल्या लढाया जिन्कत. हा कन्दिल दिवसा उजेडी चालत नाही. पुढे हा कन्दील पेशव्याकडे पोचला. पण गडावरुन चढ्-उतारामुळे पुढे याचा परिनाम कमी झाला आणि मराठेशाही बुडाली. कोहिनुर हिर्याप्रमाणे हा परदेशी पोचला. आता तो अमेरिकन राष्ट्रपती याच्याकडे आहे. त्यांनी तो आता पेटवल्यामुळे तेलाच्या किमती वाढत आहेत आणि इराक, अफगाणिस्तान मध्ध्ये माणसे मरत आहेत. उगाच भारताचे नाव खराब. अशी ऐक कथा मिपा गावात प्रचलित आहे. अजुन ऐक कन्दील आम्बोळी कडे आहे. पण त्याचा उपयोग आता रात्रीचा मासे, खेकडे मारणे या साठी होतो.
........शिवाजि महाराजा वर खुप वाचन केलय .........हो ना.........
जबरा, ह. ह. पु.वा.
जबरा. ह. ह. पु.वा.
विजुभाऊंच्या 'अर्धविझल्या उदबत्त्या ', आंबोळीचा कंदील, छोटाडॉन च्या वाळवंटातील हिरवळ, पिवळ्या डांबिस बाबांचे बरेच घरगुती उद्योग , सरपंचांचा रंगिनपणा सगळंच जबरदस्त जमून आलयं.
'सरपंच, हनिमुन साठी चान्गले ठिकाण कोणते हो' तिकडे छोडॉ ने सरपंचांना विचारले
'म्हणजे, तुला आधी लग्न करायचे का हनिमुन ?' - सरपंच
पिडा काका त्याला धीर देत होते. 'बस, रेल्वे आणी मुली पाठीमागे कधी पळायचे नसते, ऐक गेली तर दुसरी येते'. आणि कांदे-पोहे खायला अविवाहीत मित्राला घेउन जायचे नसते.
चांगले विनोद पेरलेत. पुढचा भाग टाका लवकर.
ऐनी (सौ. चि. का. छोटी डॉनी व्ह्यायच्या प्रतिशेत).
अत्तराच्या वासामुळे त्याने ते विजुभाउ चे पत्र धमुला दिले. पत्रावर ऐनी चा पत्ता बघताच धम्याने ते पत्र फोड्ले आनी वाचायला सुर्वात केले. कळवायला अतिशय वाईट वाटते आहे की आपण आमच्या घरी कान्दे पोहे खायला आलात; (आणि आमच्या घरचा फोवर पॉट फोडला, ह्या ओळी लिहुन नंतर खोड्ल्या होत्या.) आम्हला आनंद झाला, आपली आज्ञावली इशावाकु आहे. आणि माझी खिडकी आहे. ह्या वैर ग्रह असल्यामुळे पत्रिका जुळत नाही. तरी आपला मित्र लांब केस वाले आणि चश्मावाले छोडॉ यांची पत्रिका व फोटो पाठ्वुन द्यावेत. - आता लोभ नसावा ऐनी (सौ. चि. का. छोटी डॉनी व्ह्यायच्या प्रतिशेत).
हे बरोबर नाही हो ....विजुभौवर हा अन्याय आहे.......पुढच्या वेळेस त्या ऍन वहिनींचे मन वळवण्यासाठी विजुभौ डाम्बीस बाबांचा ताईत वापरतील आणि ऍन पुन्हा विजुभौ ना मागचा मजकूर हा एप्रिलफूल मानुन घ्यावा असे पत्र लिहिते असे दाखवा....
पुढच्या
पुढच्या वेळेस त्या ऍन वहिनींचे मन वळवण्यासाठी विजुभौ डाम्बीस बाबांचा ताईत वापरतील आणि ऍन पुन्हा विजुभौ ना मागचा मजकूर हा एप्रिलफूल मानुन घ्यावा असे पत्र लिहिते असे दाखवा....
उर्वरीत भाग जाहीराती नन्तर........
मग काय्......काका........उर्वरित भाग्.....कधि...प्रकाशित्....करनार्...?...जाहिरात कधिच सम्पलिय.......
वहिंनीच्या बांगड्या - चित्रपट भाग - ३
अगदी ह. ह. पु. वा. आम्हाला पण काहीनाहीतर निदान" बांगडीचा "रोल मिळेल का? 8>
काही प्रश्न
१)बांगडा माश्याच्या बायकोला बांगडी म्हणतात का?
२)माशी याचे पुल्लिंगी रूप काय?
३)ससा याचे स्त्रीलिंगी रूप काय?
४)गटण्याचे लग्न झाले तर त्याच्या बायकोला गटणीण म्हणायचे काय?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
काय बोलु बॉ ???
आयला आमचा पंटर "धम्या" म्हणतो तसं तुझं आपल "उचलं की आपट, उचल की आपट" असं चाललं आहे ....
मस्त रे, असेच चालू दे तिच्यायला. बिनधास्त गाडी हाण !!!
>>कोणाची ही गेम करायची असेल तर ह्याला सांगायचे. सध्या छोटा डॉन च्या टोळीत शुटर चे काम करत आहे
हे मातुर खरे हां, मागे एकदा "चंप्या का गंप्या " का असल्याच कुठल्या "फडतूस गॅंगने" आमची सुपारी घेतली तेव्हा पण ह्याने आमचे संरक्षण केले.
आत्तापण कुणाचा गेम करायचा असेल तर हा लै भरोश्याचा बरं ....
>>ह्या वैर ग्रह असल्यामुळे पत्रिका जुळत नाही. तरी आपला मित्र लांब केस वाले आणि चश्मावाले छोडॉ यांची पत्रिका व फोटो पाठ्वुन द्यावेत. - आता लोभ नसावा ऐनी (सौ. चि. >>का. छोटी डॉनी व्ह्यायच्या प्रतिशेत).
>>इकडे छोडॉ च्या वाळवंटात बर्याच दिवसाने हिरवळ फुलली होती. छोडॉ ने आपल्या हातातल्या पिवळा डांबिस बाबांनी दिलेल्या ताईताकडे हसत हसत नजर टाकली.
अरे बाबा, का माझ्या जिवावर उठला आहेस ...
इज्याभाय्चा टेरर तुला म्हाईत नाय काय ? अरे भलेभले थरथर कापतात राव त्याच्यासमोर ...
त्यांचा गुजरात मध्ये कोण तरी "मोटाभाई" नावाचा गॉडफादर आहे म्हणे ....
बाकी डांबिसकाकांचे उपाय म्हणजे एकदम "अक्सिर दवा" रे बाबा, तुझ्या वधुसंशोधनासाठी पण तु त्यांना भेटायला हरकत नाही ...
>>'म्हणजे, तुला आधी लग्न करायचे का हनिमुन ?' - सरपंच

पण प्रश्न चांगला "मुद्द्याचा" आहे ....
>>चल मी तुला दुसरी मुलगी दाखवतो. माझ्याक्डे जेलो चा प्रोफाईल आहे.
आयला, मग त्या "सिंडी क्रॉफर्डचे" काय झाले? सध्या "खाली" आहे काय ?
इच्छुकांनी भेटण्य्सास हरकत नसावी ....
>>गावात आलेले लोककला मंडळ यांचा आश्रयदाता. खास लोककला कलावन्ताना वाड्यावर जागा देणे. गरिबांना शिक्षण देणे (कसले शिक्षण ते विचारु नये, आपापले समजुन >>घ्यावे.) त्यांनी मिपात १००१ वे पोर जन्माला आल्यावर, गावात त्यांनी गरिबांना टि-शर्ट वाटले, जेवण वैगरे घातले.

खरे की काय, आम्हाला नाही भेटले काही ...
कदाचित जेवण व पोषाख दोन्ही "सात्विक" असल्याने आम्हाला बोलावणे नसेल ...
बाकी आम्ही नंतर बघुन घेऊ ....
अवांतर : आता ३ भाग झाले, स्टोरी थोडी पुढे गेली तर बरे वाटेल. बाकी या सल्ल्याबद्दल राग नसावा ...
अतिअवांतर : ज्या मोठ्या केसाबद्दल लिहले आहे ते इथे घरी आल्यावर घरच्यांच्या "आग्रहामुळे" कापावे लागले. त्यामुळे आईच्या म्हणण्याप्रमाणे "आता कसा माणसात आलो" ...
सौ. चि. का. छोटी डॉनीच्या प्रतिक्षेत - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
>बाकी
>बाकी डांबिसकाकांचे उपाय म्हणजे एकदम "अक्सिर दवा" रे बाबा, तुझ्या वधुसंशोधनासाठी पण तु त्यांना भेटायला हरकत नाही ...
) श्रम परीहरासाटी रंगीत पाण्याची सोय करा. हवे तर मल्लिका, राखी ला बोलवुन घ्या.
माझा कोर्स पुरा झाला. सखोल मार्गदर्शन करतात. कालच नवीन ताईत बनवायला टाकले. लवकर जा 'इनविटेशन ऑफर' आहे.
>आयला, मग त्या "सिंडी क्रॉफर्डचे" काय झाले? सध्या "खाली" आहे काय ?
> इच्छुकांनी भेटण्य्सास हरकत नसावी ....
पिडाकाकांना भेट. आहे वाटते त्याच्याकडे प्रोफाईल.
>अवांतर : आता ३ भाग झाले, स्टोरी थोडी पुढे गेली तर बरे वाटेल. बाकी या सल्ल्याबद्दल राग नसावा ...
टाकतो टाकतो, म्हट्ले जरा रमत गमत जावे. नाही राग नाही. आता मिपा वर इतके दिवस घालवल्यानंतर तु, आंद्या (माफ करा, थोरले आंनदराव पेशवे), धम्या, विजुभाउ ई. ऐका बैंच वर बसल्यासारखे वाटते.
तुमच्या गैंग साठी भारी भुमिका आहे. हत्यारे तयार ठेवा. धार वैगेरे लावा. नवीन काडतुसे ध्या. कंदील पुसा. (फक्त पेटवु नका
अरे
सौ. चि. का.
नाही चि. सौ. का.
च्यामारी ह्या गटण्याच्या....
खरंच "धर की आपट...धर की आपट" चाललंय बॉ!!!
ठाण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण.....घ्या तिच्याआयला!
अरे कोण म्हणतो गावकरी दमले? आम्ही वाईच कामासाठी तालुक्याच्या गावाला गेलो होतो रे, नायतर.....
असं का? असं? अत्तराच्या वासाच्या पत्राबद्दल तुला कसं रे माहिती झालं?
आरारारारा....विजुभाऊ, जाऊदे हो...जे गेलं ते आपलं नव्हतंच असं म्हणायचं, जायचं असेल तर जाऊ द्या, ते परत आलं तरच खरं आपलं ! असो, इश्वरईच्छा बलियेसि! त्याच्या मर्जीपुढे कोणाचं काय चाललंय का?
डान्या, लेका यव्हढी घाई बरी नव्हं

मायला, आमचा सरपंच म्हणजे येक नंबरचा बेरकी हाय बॉ! जिथं तिथं फिरकी ताणतोय की
अग्गायायाया....लै लै भारी...
बोला डांबिस बाबा की ......ज्जै !!!!!
डांबिसबाबा, मला मंतर द्या...इंचु चढवायचा आन् मानसं रडवायचा.
(ते...आपल...हे.....वशिकरण वगैरेमध्ये काय जालिम उपाय हायत का हो बाबा? आमच्या म्यानेजरनीला वश करावं म्हणतो....लै ताप व्हायला लागलाय डोस्क्याला.)
अय...गटण्या....नीट र्हायचं, काय?
मायला, ई.यम.आय. वरुन गॅन्गची इज्जत नाय काडायची...ती फॅशिलिटी आमी फकस्त गोरगरीबांसाठी काडलीये. त्यानलापण आमच्या सर्विसचा फायदा घेता यावा म्हनुन!
गटण्या, येलकम टू टवाळ क्लब
आता लै वेळ हिश्ट्री सांगण्यात नको घालवू....पिच्चर येऊ दे रे भाऊ .................
(माझा काय रोल असेल बरं? मला हिरव्हिनीचा भाऊ-बिऊ केला तर गटण्याचा गेमच वाजतो मी!)
(माझा काय
(माझा काय रोल असेल बरं? मला हिरव्हिनीचा भाऊ-बिऊ केला तर गटण्याचा गेमच वाजतो मी!)
ई. यम. आय. वर मांडवली करतोस कारे?
(गरीब )सखाराम_गटणे
ह्म्म्म.....
ई.यम.आय. वर मांडवली? चलेंगा...चलेंगा!!!!
पयले उत्पन्नाचा दाखला घेऊन ये..मंग गरीब असचिल तं ई.यम.आय. फॅशिलीटी दिऊ तुला
आमाला काय
आमाला काय रोल हाय का नाय???
की आमी "बांगडी" ???
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
ह ह पु वा
मस्त लिहिलय रे....
अजुन ऐक कन्दील आम्बोळी कडे आहे. पण त्याचा उपयोग आता रात्रीचा मासे, खेकडे मारणे या साठी होतो.
बघ हं सांभाळून खराच कंदील त्याच्याकडे असला तर तुझं काय होईल??
हा क्षण
उर्वरीत भाग जाहीराती नन्तर........
(या क्षणी, पुढ्चा भाग लिहित आहे. तो लवकरच मिपा वर येइल.)
हा क्षण कधी उगवणार रे गटण्या..........
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
आज नाही तर
आज नाही तर उद्या टाकतो.
सखाराम गटणे
)
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला
हा हा हा
शैली छान आहे