राम जन्मला गं सखे,राम जन्मला ।

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
1 Apr 2012 - 6:46 pm

तर श्रोतेहो,आज जी राम-जन्म कथा परिचित करवुन देतोय,ती आहे एका वेगळ्या राम जन्माची... पिंपरी/चिंचवड महानगरपालिकेच्या इमारती मागिल P.M.T म्हणजेच परफेक्ट मशिन टूल्स कंपनीमधे हा रामजन्माचा कार्यक्रम(सोहळा नव्हे हो...!सोहळे रामाच्या नावा-वर निघालेली मंडळं करतात,भक्त नव्हे..!) गेली चाळीसएक वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे,त्याची...!
ऐकुन तंसं फारसं काही विशेष वाटणार नाही,हो ना..? ''एखाद्या कंपनीत वर्षानुवर्ष एखादी पुजा होते काय..? आणी तीचं खास लिहावं,असं विशेष ते काय..?'' असा प्रश्न माझ्याही मनात आलावता खरा. पण खास आहे,ते हे,की हा कार्यक्रम कंपनीच्या साहाय्यानी नव्हे,तर कामगारांच्या इच्छेतुन आणी कामगारांच्याच सहभागानी होतो... प्रत्येक छोट्या/मोठ्या कामाची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलि जाते,ती लोकं खरच इमानेइतबारे ही जबाबदारी पार पाडत असतात, म्हणजे हे काम सांभाळणारा कामगारांमधला ग्रुप नेहमी छोटाच राहात आला,पण त्यातली शिस्त/सातत्य/अव्याहतता ही रामाच्या त्या तसल्या तथाकथित मंडळांपेक्षा शतपटीने खरी आहे... ,कारण इथे कामं वाटली जातात असं फक्त शब्दशःच खरं आहे,व्यवहारतः इथे प्रत्येकजण काम आपल्या वाट्याला आलय,ते नीट केलं पाहिजे अश्या श्रद्धेनी करत असतो. मग ते प्रसादाचा सुंठवडा पंचामृत आणणं असो,अगर पुजेला लागणारं साहित्य आणणं असो.त्यात चुक व्हायची नाही. नायतर आमच्या(च) तथाकथित मंडळांमधली या बाबतितील मजा बघण्यासारखी असते,तिथले कार्यकर्ते हे काम न करण्यासाठीच नेमलेले असल्यानी आंम्ही यादी कित्तीही आलबेल दिली,तरी मांडवात गेल्यापासुन प्रत्येक गोष्ट मागुन मागुन जमवता जमवता राम म्हणायची पाळी येते.
उदा-
<<मंडळ कार्यकर्ते आणी गुरुजी संवाद मोड ऑन....
गुर्जी (मांडवात गेल्या गेल्या) :- चला आणलं का सगळं पुजेचं साहित्य..?
कार्य-कर्ता:- हा...गेलाय आनायला आमचा एक मानुस,तो पर्यंत तुमी बाकिची तयारी करा...
गुर्जी:-(बाकिची काहिही तयारीच तिथे नसल्याने एक खडा मारुन बघतात) पुजेला कोण बसणार आहे..? ते तयार आहेत का..?
कार्य-कर्ता:- (इतरांना) ए...त्या रम्याला हाक मार रे...
दुसरा आवाजः- त्याची अजुन अंगोळ नाय झाली...(इतरांचं हॅss हॅss हॅss)
तिसरा अवाजः- अरे तो रम्या नाय,बेनकरांचा रम्या... तो आज सकाळी उठलावता की...त्याला आणा (?)
चौथा आवाजः- ए... काशी घालु दे त्याला,.......ओ काका(म्हणजे आंम्ही..)
गुर्जी:-(भयकंपित मुद्रेनी) काय..?
चौथा आवाजः- मी चालतो का..?---(???????)
गुर्जी:- (चेहेर्‍यावर तयार भाव आणुन) हो तुम्ही चालणार हो भाऊ, ज्याच्या मधे भक्ति...त्यालाच मिळते रामाची शक्ति...! (राम कृष्ण हरी... हे मनात)
चौथा आवाजः-( अत्यंत आनंदात..!) ... ए... आपन पुजेला बसायच्या कामाला तयार हाय रे... ते सामान आलं की बोलवा आपल्याला... (हे म्हणुन तो कुठेतरी निघुन जातो)
मग जरा वेळानी साहित्य वगैरे येऊन,आयत्यावेळी मगाचचा ''तयार'' झालेला राम भक्त वगैरे न येता,कुणातरी अती उत्साही नवविवाहित जोडप्याला पकडुन आणले जाते... आणी रामाचा (एकदाचा..) जन्म होऊन आंम्ही (रामासह..) सुटतो....
मंडळ कार्यकर्ते आणी गुरुजी संवाद मोड ऑफ....>>

हे असलं सगळ नेहमी ज्या देवतेचा उत्सव असतो,तीला नानाठाई नाना प्रकारे भोगावं लागत असतं...अश्या या वातावारणात मी स्वतः अगदी पुण्यात कामाला सुरवात केली तेंव्हापासुन या पि.एम.टी. मधे न चुकता जात आलोय ते रामाच्या खर्‍या भक्तांमधे काम करायला मिळतं म्हणुन...
इथे रामाचा पाळणा म्हणायला सुद्धा जो सुर लागतो,तो आपोआप रामाशी एकरुप होणारा असाच लागतो,तो इतरत्र ठिकाणांप्रमाणे काढावा लागत नाही... कामात कधीकधी सुख असतं,ते..हे!

या कंपनीत हे सगळं घडवुन आणण्यात पुरुष मंडळींचाच प्रामुख्यानी वाटा असला,तरी तिथे असलेल्या महिला वर्गामधुनही काहीजणी हौशीने पाळणा सजवायला,त्याभोवती रांगोळी काढायला येतात... एकुणात सगळ्यांचा खराखुरा हातभार लागतो,आणी रामरायाचा जन्म होऊन सुंठवडा खाता खाता मंडळी पुन्हा आपल्या कामावर रुजु होतात. असा हा माझा अवडता रामजन्म होऊन आज मी नेहमी प्रमाणे निघत होतो...तेंव्हा कानावर काही वाक्य आली,तिथला एक कामागार काही जणांना सांगत होता, ''हा काका लै बेश्ट माणुस आहे,सायकल वरनं येत होता,तवा पास्नं येतोय आजुनही... न चुकता...!" बास्स... मला रामाच्या कृपे पेक्षा जगायला बळ देणारं खर काही ज्याला संजीवनं म्हणावं असं काही असेल,तर ते हे आहे...मी ही पार्किंगला गाडीपर्यंत जाई स्तोवर मनात बोलत होतो, ''आपल्यालाही इथे यायला लागुन चांगली पंधरा वर्ष झाली की...!'' अर्थात मला ही वर्ष स्मरणात येऊ द्यायला तो आपुलकिनी कौतुकाचे दोन बोल बोलणारा तो कामगार भाग आहे.
कंपनीगेट मधुन गाडीनी रस्त्याला लागलो,आणी डोक्यावर उन्ह असलं तरी मनाला गारवा देणारी गीत रामायणातली बाबुजिंची रचनाच सहज ओठावर आली,
चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी,गंधयुक्त तरिही वात उष्ण हे कीती..?
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला..?,राम जन्मला गं सखे राम जन्मला

हे रामजन्माचे काही फोटो १)

२) पाळणा

३) पाळणा सजवतांना



४)

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Apr 2012 - 7:10 pm | निनाद मुक्काम प...

सुरेख सचित्र लेख झाला आहे.
माझ्या लहानपण मोठ्या पाळणाघरात गेले. ५० मुले आणि ६ मावश्या होत्या.
दुपारी मुले झोपली कि ह्यातील दोन मावश्या सुवाच्च अक्षरात " श्रीराम जयराम ,जयजयराम " असे वहीत लिहित असत. एक लाख रामाचे नाव लिहून झाले कि प्रत्यक्ष श्रीराम दर्शन देतात असा त्यांचा विश्वास होता.
मी एकदा बालसुलभ शंकेने विचारले " तुम्ही लिहितांना नंबर कुठे देत आहात, १ लाख लिहून झाले कि कसे तुम्हाला कळणार.
त्या म्हणाल्या होत्या" आपण आपले लिहिण्याचे कार्य करावे.तो पाहत आहे."
जेवणाची आम्हा २४ मुलांची समवयस्क मुला मुलींची पंगत बसायची. तेव्हा नेहमीचे श्लोक म्हणून झाले कि आम्ही रामाचा एक श्लोक म्हणत असू
" संगे खाऊ ,संगे खाऊ .संगे करूया सगळे काम
आपुल्या संगे सैदैव राहू सगळ्यांच्या तो श्री भगवान"

झकास संवाद... बारकावे नेमके टिपलेत.

असे लेख आणखी येवूद्यात.. तुमच्या राशीला रोज वेगवेगळ्या व्यक्ती आणि वल्ली* लाभत असतील.. उत्तरपूजा बांधा त्यांची इथे. :-D

* इंडीयाना जोन्स वल्ली नाय हा..

मोदक.

निवेदिता-ताई's picture

1 Apr 2012 - 8:46 pm | निवेदिता-ताई

छानच..:)

चौकटराजा's picture

1 Apr 2012 - 8:55 pm | चौकटराजा

लेख चित्र दोन्ही आवडले.
जाता जाता रामनवमी निमित्त -
माडगूळकरांनी म्हणे सर्व अक्षरी रामनाम " गीतरामायणा" साठी रेडी ठेवले होते. खरे खोटे "राम" च जाणे . पण आम्ही हा काय उद्योग असावा असा तर्क करून खालील सामग्री गोळा केली आहे.
एक अक्षरी - श्री
दोन अक्षरी- प्रभु . राम
तीन अक्षरी- राघव, कौन्तेय
चार अक्षरी-दाशरथी, रामचंद्र
पाच अक्षरी - रघुनंदन
सहा अक्षरी- जानकीवल्ल्लभ
सात अक्षरी- दशरथनंदन, रघुकुलदीपक
आठ अक्षरी-लंकाधिपतिमर्दन
नउ अक्षरी-अयोध्याहितदक्षनृप

तिमा's picture

2 Apr 2012 - 11:22 am | तिमा

'श्रीरामभाजपापुरस्कृत'

व्वा:!!!
मजा आली.
:)
गुरुजी आणि कार्यकर्त्याचा संवाद तर झकासच.

पैसा's picture

1 Apr 2012 - 9:14 pm | पैसा

मंडळातला संवाद आणि कंपनीतलं वातावरण दोन्हीतला फरक छान लिहिलाय!

तर्री's picture

2 Apr 2012 - 12:01 am | तर्री

आवडले गुरुजी.
आपले लिखाण अगदी सहज आहे.

सुहास झेले's picture

2 Apr 2012 - 11:23 am | सुहास झेले

नेहमीप्रमाणेच सहज, सुंदर आणि वाचकांना खिळवून ठेवणारे लिखाण. तो संवाद तर सहीच !!

५० फक्त's picture

2 Apr 2012 - 11:47 am | ५० फक्त

उत्तम धागा,

अवांतर - नागपुरहुन येउ घातलेल्या रामजन्म सोहळ्याच्या रिपोर्टच्या प्रतिक्षेत.

काल रामजन्म कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष बुवांच्या भेटीतच हा सर्व वृत्तांत समजला होताच. पण लिखाण वाचायला मजा आली. फोटोही छानच.

अत्रुप्त आत्मा साहेब ,एकदम भारी लेख....

अप्रतिम लेख लिहिला आहेत सचित्र.

खरच लिखाण वाचायला मजा आली.

एकदम बहारदार लेख झाला आहे

लेख वाचुन व चित्र बघुन त्रुप्त झालेला आत्मा

निश

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2012 - 2:03 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व प्रतिसादकांस धन्यवाद... :-)