रानात सांब भोळा
उघडा असे दुपारी
'देवा कसाही तू रे...!?'
मी एक त्या विचारी
म्हणतो मलाही सांब
'मी खेळ तव मनाचा,
असतो निसर्ग सारा..
कधी देव का कुणाचा..?'
'पडणार साऊली जी
माझेच अल्प रूपं..,
का बांधता तुम्ही हे..
नसते खुळे हिशेबं..?'
'व्यापुनि चराचरी या
मी विश्वरूपं सारे...,
माझेच भोग मजसी..
छळतीलं का कधी रे..?'
'तुमच्या खुळ्या स्वभावी
मज देव-जन्म आहे..,
कुणी 'देवं' का म्हणा ना..?
अंती निसर्ग आहे...!'
'त्याचीच शुद्ध किमया
भासे तुम्हा उन्हाळा,
निर्जीव मूळचा मी
तुमचाच सांब भोळा...!'
फोटो:-घनगड-शिवाजी ट्रेल ट्रीप----
प्रतिक्रिया
24 Mar 2012 - 5:03 pm | चौकटराजा
आत्माजी, पहिलं म्हणजे आपलं चित्रं टाकण्याचं वेड, दुसरं वि+ चित्र टाकण्याचं वेड, तिसरं विडंबन टाकण्याचं वेड ... म्हण्जे एक वेड नाही हजार वेडं ? खरे अतृप्त शोभता आपण.
अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत
निसर्गात भरूनि राहे अनादि अनंत
हीच कल्पना जरा वेगळ्या स्वरूपात. आता नवकवि तुमच्या इतर कवितांवर कद्धी कद्धी रागावणार नाहीत बरं ?
मस्त कविता !
24 Mar 2012 - 5:07 pm | प्रकाश घाटपांडे
वा गुर्जी क्या बात है! चित्रही अगदी समयोचित.
24 Mar 2012 - 5:10 pm | यकु
फोटो आणि कदाचित त्यावरुनच झालेला काव्यरुपी संवाद दोन्ही आवडले.
24 Mar 2012 - 7:03 pm | अत्रुप्त आत्मा
@फोटो आणि कदाचित त्यावरुनच झालेला काव्यरुपी संवाद दोन्ही आवडले. >>> कदाचित नाही हो यक्कूशेठ,,, निश्चित त्यावरुन झालाय हा संवाद...! घनगडला जाताना मला एका ट्रेलच्या सभासदानी मुद्दाम आडवाटेला असलेला ह्ये सांब भोळा दाखवला..आणी ह्याला छत बांधायला हवं असं तो बोलला.झालं... तिथुन गडावर जाईपर्यंत आमचं निधर्मविषयक चिंतन सुरू झालं...पण वरती गेल्यावर ते कामाच्या नादात अडगळीत जाऊन पडल होतं. ते आज दुपारी फोटो पहाता पहाता बाहेर आलं... आणी दिल की बात बाहेर आल्यावर-जे व्हायचं तेच झालं- कविता,,, नाईलाज आहे भाऊ..नाईलाज आहे... :-)
24 Mar 2012 - 7:06 pm | यकु
:)
26 Mar 2012 - 3:06 pm | मी-सौरभ
भटजी बुवा,
मस्त जमलयं काव्य...
24 Mar 2012 - 5:14 pm | सांजसंध्या
_______/\_______
नतमस्तक !!
भापो.
24 Mar 2012 - 5:28 pm | पैसा
वनवासी सांब सदाशिव आणि त्याचं मनोगत आवडलं!
24 Mar 2012 - 6:27 pm | प्रचेतस
सुंदर.
भटा छान कविता रचलीस रे.
_/\__/\__/\_
24 Mar 2012 - 7:04 pm | चौकटराजा
आपले तीन नमस्काराची आयडिया उत्तम पण " कोपरापासून ढोपरापर्यंत " नमस्कार याविषयी काही संशोधन ????? काही चिन्हे ???
24 Mar 2012 - 9:01 pm | प्रचेतस
कोपरापासून ढोपरापर्यंत संशोधन नाही ब्वा आपले, पण कोपरखळ्या मारताना ढोपरं(दुसर्यांची) दुखावली जाणार नाहीत हे मात्र बघतो
24 Mar 2012 - 9:12 pm | शैलेन्द्र
मस्त आहे कविता.. आवडली..
26 Mar 2012 - 10:34 am | ५० फक्त
छान कविता,
या अशा चौकोनी पिंडीचं रहस्य कुणी उलगडुन सांगेल का ?
26 Mar 2012 - 10:36 am | प्रचेतस
शाक्तपंथीयांची असावी काय?
पाटेश्वरला अशा चौकोनी आकाराच्या बर्याच शाळूंका आहेत ना?
26 Mar 2012 - 10:44 am | पैसा
ही त्यातली साखळी (हरवळे) इथली एक. यातल्या काही कदंबांच्या काळातल्या तर काही त्याहून जुन्या आहेत.
26 Mar 2012 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा
@शाक्तपंथीयांची असावी काय?>>> कल्पना नाही,पण पुढच्या वर्षीच्या पुजेवेळीपर्यंत गावकर्यांच्या सहमतीने,पिंड तिथुन गडावर हलवली जाणार आहे... भोवती देऊळही बांधले जाणार आहे... तेंव्हा कदाचित पिंड काढतांना काही माहिती कळेल...
26 Mar 2012 - 11:09 am | विदेश
मनाला खूप भावली .
छान रचना .
26 Mar 2012 - 4:54 pm | मूकवाचक
कुणी 'देवं' का म्हणा ना..?
अंती निसर्ग आहे...!
यावरून सतार नवाझ उ. शुजात खाँ यांनी गायलेल्या गझल मधला एक शेर आठवला -
मेरी बेज़ुबा आँखों से, गिरे जो चंद कतरे
जो समझ सको तो आंसु, ना समझ सको तो पानी
27 Mar 2012 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा
@जो समझ सको तो आंसु, ना समझ सको तो पानी >>> व्वा... उदाहरण छान आहे,... शायर म्हणतोय...की,
''अरे वेड्यांनो माझ्या डोळ्यातुन वाहिलेल्या या अश्रूंना,जर समजुन घेतलं नाहित तर तुमच्या लेखी ते पाण्यासमानच रहाणार...''
म्हणजेच इथे अश्या अश्रूंना पाणी समजणारे निव्वळ मूढमती ठरतात...!
तद्वतच वरिल ओळीतुन आधुनिक मनात आज शिल्लक असलेला देव मानवांना असे आवाहन करतो,की...
'' तुंम्ही निसर्गाच्या प्रत्येक रुपाची/परिणामाची देव म्हणुन कितीही भलावण केलीत,तरी मी अंतिमतः फक्त आणी फक्त निसर्गच आहे.मला तुंम्ही अज्ञपणानी,मूर्खतेनी,स्वार्थानी,भोळेपणानी दिलेलं देवाचं/देवं-धर्म कल्पनेचं रुप मूलतः खोटं/निसर्गविसंगत/आणी मनुष्य हिताचं नाही...,त्यामुळे ज्याप्रमाणे शायर म्हणतो,की अश्रूंना पाणी म्हणु नका,त्याप्रमाणेच हे आधुनिक मन म्हणते.की...निसर्गाला देव म्हणु नका...! अश्रूंना अश्रूच म्हणा आणी निसर्गाला निसर्गच म्हणा'' :-)
म्हणजे इथे निसर्गाला देव समजणारे मूढमती ठरतात...
आत्मत्रुप्त यांनी तुलनेसाठी आणी अर्थ अधिक खोलात स्पष्ट होण्यासाठी जो शेर शेअर केला,त्याबद्दल मी धन्यवाद देतो... :-)
27 Mar 2012 - 6:51 pm | वपाडाव
हे घ्या भटजी !!!
बाकी, कविता मस्तच...
26 Mar 2012 - 5:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात क्या बात
मजा आला.
खुप खुप मस्त झाली आहे रचना!!
27 Mar 2012 - 12:00 pm | अत्रुप्त आत्मा
सांब भेटिस आलेल्या सर्वांचे धन्यवाद... :-)
28 Mar 2012 - 8:11 am | मदनबाण
सुंदर कविता अन् फोटु ! :)
28 Mar 2012 - 10:28 am | राघव
छान प्रकटन. :)
राघव
28 Mar 2012 - 10:32 am | सुहास झेले
व्वा व्वा भटजीबुवा.... सुंदर !!!
म्हणतो मलाही सांब
'मी खेळ तव मनाचा,
असतो निसर्ग सारा..
कधी देव का कुणाचा..?'
ह्या ओळी विशेष आवडल्या :) :)
28 Mar 2012 - 12:53 pm | चाणक्य
अप्रतिम...खूप आवडली. लै च भारी
28 Mar 2012 - 12:53 pm | चाणक्य
अप्रतिम...खूप आवडली. लै च भारी
20 Feb 2015 - 12:39 am | चाणक्य
महाशिवरात्रीलाच वर काढणार होतो, पण कामाच्या नादात राहीलं. बुवा...या रचनेत तुम्ही जी काही उंची गाठलीये त्याला तोड नाही. मला फारच आवडते ही रचना.