हे असंही असतं.....

हो वरती जो फोटो दिलेला आहे तो चप्प्लांचा आहे......
हा फोटो कोणत्या ही बाबा,महाराज किंवा कोणत्याही मंदिरा बाहेरुन उचलुन आणलेल्या चप्प्लांचा नसुन्,,,त्या माझ्या दैनंदिन वापरातल्या आहेत.....
आता तुम्ही म्हणाल की या चप्पलांचा फोटो इथ देण्याचं प्रयोजन काय?
तर मी म्हणेन या माग एक स्टोरी आहे.....
काही वर्षापुर्वी कोल्हापुरास आलो असताना बरीच भटकंती केली होती...
कोल्हापुरी चपला या जगप्रसिद्द आहेत हे काही नव्याने सांगायची गरज नाही,,या चपलांचा चालताना येणारा विशिष्ठ असा आवाज,,त्यांची वेगळ्या धाटणीची शिलाई आणि आकार हे मला फार आवडायच....मग मी ठरवल की एक नवी जोडी विकत घ्यावी.....
या आधी ही मी अशा बर्‍याच जोड्या विकत घेतल्या होत्या पण काही दिवसातच त्या बाद होऊन गेल्या होत्या..मग मी मामाला विचारायच ठरवल...मामा इथलाच असल्याने त्याला कुठल्या दुकानात चांगल्या कोल्हापुरी चप्पला मिळतील हे माहित असेल अस मला वाटल होत...आणि त्याला ते माहित होत..
तो म्हणाला बघ अभ्यंकर नावाचे दुकान आहे जिथ उत्तम चपला मिळतील...त्याने मला त्या दुकानातुनच विकत घेतलेली त्याची चप्पल दाखवली...मी त्याला म्हंटल की याचे डिझाईन तर कोल्हापुरी चप्पले सारख नाही !!! त्या वर तो म्हणाला त्याच्या एका मित्राने या चप्पलांची विशेष गुण सांगितले आहेत.. ते असे:--
१) ही चप्पल झिजता झिजत नाही..ती कशीही वापरा त्याने काहीच फरक पडत नाही.....
२)या चप्पलेचा अंगठा कधीच तुटत नाही...
३) ह्याचा अनेक वर्ष वापर करुन करुन शेवटी लोकच इतके कंटाळतात की तेच ही चप्पल कुठल्यातरी देवळा बाहेर सोडुन येतात..
हे सर्व ऐकल्या वर मी मनात म्हंटल ह्या असे कसे बर शक्य होईल हे म्हणजे जरा अतीच होतय...
आणि चप्पलेचा अंगठा तुटत नाही हे तर असंभव आहे!!!!!(चप्पलेच्या तुटलेल्या अंगठ्यावर स्वतःच्या पायाचा अंगठा ठेवुन विचित्र चाल चालणारी माणसे मी पाहिली आहेत.....)
शेवटी मी त्या दुकानात जाऊन वरील चप्पल विकत घेतली..जरी दिसायला ती टिपीकल कोल्हापुरी चप्पल नसली तरी वापरात तिचा कोणताच तोड नाही..... गेले ६ वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटला,,तरी ती आहे तशीच आहे..अनेक वेळा पाण्यात भिजुन सुद्दा ही चामड्याची चप्पल आहे तशीच आही..रंग सुद्दा आहे तसा आहे...आणि चप्पलेचा अंगठा आहे जो अजुन पर्यन्त कधीच तुटला नाही !!!!!

(अभ्यंकर नावातच काही पॉवर दिसते) असे म्हणणारा.....
मदनबाण.....

ऐ शाब्बास

पत्ता दिला तर बरे होईल. लेडिज चप्पल पण मिळतात का?

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मिळतात ना!

विशेष म्हणजे, या चप्पलांचा रोड रोमियोंची थोबाडं सडकायला फारच उपयोग होतो. Big Grin

मदन्या, लेका पुढच्या वेळी माझ्यासाठी पण एखादा जोड आण रे!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचन
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

पत्ता दिला तर..

बिनखांबी गणेश मंदिरा जवळ आहे बहुतेक...आता त्या दुकानात जाऊन बरेच वर्ष झाली असल्या मुळे पत्ता निटसा आठवत नाही..

मदनबाण.....

बिनखांबी

बिनखांबी गणेश मंदिरा जवळ आहे बहुतेक - बरोबर

कोल्हापुरी चप्पल म्हणले की साधारणतः पिवळ्या/सोनेरी रंगाची चप्पल डोळ्यासमोर येते.
फोटोत दाखवलेली ही नव्या स्वरुपात आहे वाटतं

मामांना

मामांना विचारून पत्ता कळवा की.....

खेटरे

अभ्यंकर अशीही खेटरे देतात तर Smile हा हा हा

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ,

पुण्यातही बहुदा अभ्यंकरांची खेटरे मिळतात! Wink नागनाथपाराजवळ पूर्वी दुकान होते. आता आहे की नाही माहीत नाही.

(स्वगत - 'विसोबा खेर' ह्या नावाचे विडंबन 'विसोबा खेर' असे होईल का? Thinking Tongue रंग्या, खातोयस जोडे आता तू! )

चतुरंग

पुण्यातला पत्ता..

पुण्यातला पत्ता मिळाला तर भारतवारीत चपला आणता येतील,
स्वाती

अभ्यंकर!

कोल्हापूरात नव्या महाद्वार रोड वर बिनखांबी गणेश मंदीरा जवळ त्यांचे दुकान आहे. पिढीजात एकच घराणे हे दुकान सांभाळते आहे. खरोखरीच उत्कृष्ट गुणवत्ता. टिकावूपणा एवढा की वापरणारा(री) कंटाळणार पण चप्पल तुटणार नाही. अगदी "प्राण जाये पर चप्पल न जाये". मलापण या चपला खूप आवडतात.
पण विवीधता अगदी कमी. नवीन नमून्यांचा अभाव. वर्षानुवर्षे तेच नमुने. उत्पादन आणि विक्री या दोन्ही गोष्टींवर स्वतःचेच नियंत्रण ठेवण्याचा अट्टहास. यामुळे वितरण व्यवस्थे कडे दुर्लक्ष. (कदाचित मालात भेसळ - duplicate -होऊ नये म्हणून असेल). यासर्वांमुळे फार लोकांना माहीत नाहीत. कोल्हापुरात सुद्धा यांची दोनच दुकाने आहेत.
अरे हो एक सांगायचे राहिले. यांची विक्रीपश्चात सेवा फारच तत्पर आहे. चपलेचा तळवा झीजेपर्यंत कितीही वेळा चप्पल विनामुल्य दुरुस्त करून दिली जाते. तुम्हाला पावती देण्याची सुद्धा गरज नाही.

अभ्यंकर

अभ्यंकर चपलांना खरेच तोड नाही.

(कोल्हापुरात राहूनही अभ्यंकर चपला न घालणारा Surprise )
अनिरुद्ध दातार

हाणा आता त्या चप्पला आम्हाला

कोल्हापुरी चप्पला आणि अंभ्यकराच्या चप्पलामध्ये खुप फरक आहे. कोल्हापुरी चप्पला पुर्णपणे कातड्यापासुन तयार केली जाते. त्याच्या तळ देखिल कातड्यापासुन केला जातो.अस्स्ल कोल्हापुरी चप्पला कोल्हापुर शहरापेक्षा ग्रामिण भागात उत्तम बनवुन मिळतात.बनवण्यास सांगितल्या नंतर ७ दिवसात मिळतात. त्यात पण खुप प्रकार आहेत. कोल्हापुरी, कापसी अशी विवीध नावे आहेत. त्यात वेगवेगळ्या डिझाईन पण मिळतात.अभ्यंकराच्या चप्पलाचे तळवे कातडी नसतात.पण कोल्हापुरी चप्पलाचा डौल काही औरच आहे.

(कोल्हापुरी) वेताळ

मदनबाण

यांनी लिहिलेले १००% खरे आहे. हे मी नुसते सांगत नाही तर अनुभवाचे बोल आहेत...
अजुनही मी त्यांची (अभ्यंकर मेड) चप्पल वापरते.....(यु.के.मधे एक जोड आणला आहे.Smile)
ती चप्पल तुटता तुटत नाहीत...झिजत नाहीत....पावसाळ्यात कुजत नाहीत...सगळ्या मौसमांत चालतात..
वरील प्रश्नांची उत्तरे...
१.कोल्हापूरात बिनखांबी जवळ (महाद्वार रोड ला लागून), जे.के.टेलर्स समोर आहे..सोमवारी बंद..मालक कोकणस्थ आहे..चुकूनही सोमवारी उघडे नसते.
२.पुण्यामधे नागनाथ पार जवळ स्वरूप फुटवेअर मधे यांची चप्पल मिळते.
३.लेडिज चप्प्ल सुद्धा असतात....
४.कलर फक्त काळा, तपकीरी, चॉकलेटी,लाल बाकी कोणताही नाही.
५.ही आणि कोल्हापूरी टोटली वेगवेगळ्य आहेत...
६.फक्त एकच आहे, त्यांची डिझाईन फार जुनी आहेत तीच आहेत...काही चेंज नाहीत...
तरीसुद्धा मी त्याची चाहती आहे...
७.त्याचे फिटींग छान असते........

वरील माहीतीसाठी मला अभ्यंकरांकडून काही मिळालेले नाही...याची कृपया नोंद घ्यावी....Smile

आणखी एक

किंमत रु.१५० ते रु.३०० फक्त...(मागच्या जुलै मधे).

अरे बापरे

पाहिलच पाहिजे ह्या चपलांना...मदनबाणा मी तिथे आले की दर्शन दे एकदा मला ह्या चपलांचं

मी तिथे

मी तिथे आले की दर्शन दे एकदा मला ह्या चपलांचं

लोक कोल्हापुरात आंबाबाईच्या दर्शनास येतात

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

असेच.

ह्या चपला तुटता तुटत नाही म्हणुन मी काही त्या वापरत नाही आणि त्या खुप सिप॑ल आहेत.
बघुन पण मनात भरत नाही पण आमच्या जवळ्चे लोक ह्याच चप्पस वापरतात.
मला मात्र कोल्हापुरी मस्त कातड्याच्या चप्पला आवडतात, त्या चप्पला मुळे खुप वेळा पडले ही आहे पण वापरण्याची हैस लै.
राजाराम पुरीत ८ गल्लीत ही अभ्य्॑कर या॑चे नविन दुकान आहे तेथे स्टायलिश चप्पल मिळतात. पण तेही जुणे होतील चप्पल पण तुटत नाही त्या दुकानातुन मात्र मी एक सॅण्ड्ल घेतले होते.

विजय असो...! :)

अभ्यंकर खानदानाचा विजय असो.. Smile

आपला,
तात्या अभ्यंकर! Smile

धन्यवाद

धन्यवाद मदनबाण,
फार छान माहीती दिलीत!
या चपला कोल्हापूरी बाजाच्या बिलकूल नाहीत. पण इतक्या टिकाऊ असतील तर एकदातरी वापरायलाच हव्यात.
या मे महिन्यातच गावाहून येताना खास कोल्हापुरी चपल्या आणल्या.
आमच्याच तालुक्यात म्हणजे राधानगरी तालुक्यात मडिलगे या गावात आणि निपाणी रस्त्यावरील लिंगनूर या गावी फार चांगल्या चपला मिळतात असं ऐकून होतो. मडिलगे गावातून तर खूद्द शरद पवारांसाठी चपल्या जातात असं कळलं. मडिलग्यात चपला महाग मिळतात म्हणून लिंगनूरहून आणल्या. या चांभाराने दिलेल्या माहितीनूसार कोल्हापुरी चपलांचे तीन प्रकार. भुईवादी, कापशी आणि कुरंदवाड चपला. यापैकी भुईवादी चपलांचं देखणे पण काही औरच! कापशी काहीश्या पसरट तर कुरंदवाड चपला ग्रामीण बाजाच्या आणि मजबूत! भुईवादी चपलांनाच सर्वसाधारणपणे कोल्हापुरी चपला म्हणतात. या भुईवादी चपलांना लाल रंग दिला म्हणजे एकदम राजे महाराजे असल्यासारखं वाटतं!
डोक्यावर फेटा, अंगरखा, धोतर, पल्लेदार मिशी आणि भुइवादी चपला!! च्यामारी, असा पोशाख करू एकदा मुंबईतून फिरायचं आहे!!
रम्या