वाघ्या मी मुरळी देवाची ग तू

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 Feb 2012 - 5:14 am

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू

सर्वप्रथम '२७ फेब्रुवरी अर्थात मराठी भाषा दिवसाच्या' सर्व मराठी भाषीकांना हार्दीक शुभेच्छा!

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जाववू ||धृ||

देव खंडोबा मार्तंड मल्हारी
मणी मल्ल दैत्य संहारी
चढलो नवलाख पायरी
देव आहे जेजुरी गडावरी
जवळ बसली म्हाळसा सुंदरी
नवस देवाचा आता पुरा ग करू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||१||

तळी उचलून करू चौक भरणी
परसन्न करू देवाची करणी
माथा झुकवूनी त्याच्या चरणी
बेल भंडार उधळू गगनी
तेजानं दिवटी बुधली ग पेटवू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||२||

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जाववू ||धृ||

- वाघ्या पाषाणभेद

संस्कृतीकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Feb 2012 - 8:38 am | प्रचेतस

सुंदर.

भीडस्त's picture

27 Feb 2012 - 12:21 pm | भीडस्त

आता मुरळ्या राहिल्यात कुठे? जागरणंही कमीच झालीत. आताशा वराती ,धेडवा हे म्युझिक सिस्टीमच्या तालावर नाचवले जातात. जागरणातही लंगर तुटेपर्यंत फक्त वाघेच जागे असतात.

अवांतर- रात देवाची जावू .इथे व ऐवजी ग हवा होता का?

जाववु म्हणजे कळाले नाही..

बाकी सरव नेहमीप्रमाणे फक्कड ..

@ भिडस्त :
आताच घरी जागरण झाले. एकदम पुर्वी सारखे.

पक पक पक's picture

27 Feb 2012 - 10:49 pm | पक पक पक

जाववु म्हणजे कळाले नाही..

गणेशा ते त्यांना 'जागवु' असे म्हणायचे असेल.....

मदनबाण's picture

28 Feb 2012 - 9:49 am | मदनबाण

मस्त ! :)

पाषाणभेद's picture

29 Feb 2012 - 12:06 am | पाषाणभेद

>>>> मिळून जागरण करू... रात देवाची जाववू

मंडळी ते जागवू असेच वाचावे. स्वसंपादनाची सुविधा मला नसल्याने दुरूस्त करता आलेले नाही. वाचक, प्रतिसादकांचे जाहिर आभार.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय मराठी, जय महाराष्ट्र.