टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
तो मी नव्हेच!
मंडळी सद्या 'प्रमोद देव' हे नाव वर्तमानपत्रात खूप गाजतंय.
महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोगाचे अध्यक्ष डॉ.प्रमोद देव हे गेले कैक दिवस वृत्तपत्र आणि इतर प्रसार माध्यमात गाजत आहेत. परवाच एक बातमी आली होती त्याप्रमाणे रिलायन्स एनर्जी मध्येही एक 'प्रमोद देव' आहेत. हे वाचून मलाही आश्चर्य वाटले.
ह्या गोष्टीमुळे मला काही जणांनी विचारले की ह्यापैकी आपण कोण ?
तर मंडळी मी जाहीरपणे सांगतो की हे दोघेही ' प्रमोद देव' म्हणजे मी नव्हे. तो मी नव्हेच! 
मी तिसराच(सद्या तरी...चौथा माहित होईपर्यंत
) प्रमोद देव आहे आणि एक सामान्य माणूस म्हणूनच मी ओळखला जातो.
महाजालावरील मिपासह इतर काही मराठी संकेतस्थळांवर फुटकळ लेखन करणारा ही माझी दुसरी ओळख.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


अमान्य !!
संकेतस्थळांवर फुटकळ लेखन करणारा ही माझी दुसरी ओळख.
आपले लेखन फुटकळ नक्कीच नाही किंबहुना एक अतीशय अभ्यासपुर्ण लेखन आहे.
आपले ही नाव अगामी काळात यासाठी नक्कीच घेतले जाईल.
त्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा !!
केळकर
विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष :)))
डॉ. प्रमोद देव हे जर विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष असतील तर आमच्या वीज भारनियमनाकडे लक्ष घालावे ही नम्र विनंती.
इन्व्हर्टर दम मारत नाही. तेव्हा आपण ते जर नसाल तर आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवाव्यात ही नम्र विनंती !!!
वीज चोरीचे प्रमाण आमच्या जिल्ह्यात कमी असूनही आम्हाला भारनियमनाचा भयंकर त्रास होतो. खेड्यात तर बारा-बारा तासाचे वीज भारनियम होत आहे, ही परिस्थिती बदलली पाहिजे. खरा त्रास वयक्तिक आम्हाला होतो, दिवसातून सहा तास भारनियमन असल्यामुळे संस्थळावर भटकता येत नाही
रिलायन्स एनर्जी मध्येही एक 'प्रमोद देव' आहेत.
आपण रिलायन्स एनर्जीत असाल तर आमचे वीजभारनियमन मुंबै प्रमाणे करावे, आम्ही वाढीव युनिट प्रमाणे वीज बील भरण्यास तयार आहोत.
प्रमोद देव आहे आणि एक सामान्य माणूस म्हणूनच मी ओळखला जातो.
महाजालावरील मिपासह इतर काही मराठी संकेतस्थळांवर फुटकळ लेखन करणारा ही माझी दुसरी ओळख.
प्रमोद देव, सामान्य माणूस आहे का ? आम्ही काही मराठी संकेतस्थळांवर भटकलो... मिसळपाव, उपक्रम, मायबोली, लेखन अनुमतीची प्रतिक्षा करणा-या संस्थळावरच नव्हे तर, जिथे जिथे मराठी संस्थळे आहेत तिथे प्रमोद देवांचे लेखन दिसते, सदस्य नोंद तरी केलेली दिसते. आमच्या समोर संस्थळावरील एक खडूस माणूस म्हणुन आपली प्रतिमा होती, ती काही दिवसापासून मवाळ स्वरुपाची होत आहे, असे दिसते. या बदलाचे आम्ही स्वागत करतो.
( ह. घ्या )
आपल्या ज्ञानाचा, जेष्ठत्वाचा प्रचंड आदर आहे, पण आपली फिरकी घेतल्याशिवाय आम्हाला चैनच पडत नाही. चु.भु क्षमा असावी !!!
आपला,
दिलीपराव !!!
आपल्या
आपल्या ज्ञानाचा, जेष्ठत्वाचा प्रचंड आदर आहे, पण आपली फिरकी घेतल्याशिवाय आम्हाला चैनच पडत नाही. चु.भु क्षमा असावी !!!
हे मात्र जबरा !!
बाकी आम्ही फक्त एक प्रमोद देवांना ओळखतो... ते आपले मिपावाले लेखक प्रमोद देव... बस.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
हाहाहा!
आमच्या समोर संस्थळावरील एक खडूस माणूस म्हणुन आपली प्रतिमा होती



हे बाकी मस्त !
अहो खरंच मी तसा आहे. आता मवाळपणाचे जरा नाटक करतो झाले.
काय करणार? प्रा.डॉ. अशा पदव्या असणार्या माणसाशी बोलताना जरा जपून बोलावे लागते ना! नाहीतर कान धरायचे आमचा!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
आमचेही..
आंतरजालीय प्रमोद देव हे आमचेही एकेकाळचे चांगले मित्र होते आम्ही त्यांना मिपाचे एक बुजूर्ग म्हणून मानत होतो/आजही मनतो.
परंतु मध्यंतरी एक घटना अशी घडली जी आम्हाला चूक वाटली व त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती असे आम्हाला वाटते. परंतु त्यांना त्यात काहीच गैर वाटले नाही/वाटत नाही. त्यांच्या मते ते त्यांच्या जागी बरोबर आणि आमच्या मते आम्ही आमच्या जागी बरोबर! त्यामुळे आम्ही दोघेही या बाबतीत माघार घ्यायला तयार नाही! परंतु त्यामुळे आमचे एकेकाळी असलेले अत्यंत चांगले व मनमोकळे संबंध, आमच्यातला संवाद मात्र कायमचा बंद झाला याचा आम्हाला राहून राहून खेद वाटतो!
चालायचेच! सगळीच माणसे काही जन्माला पुरत नाहीत व सगळ्यांच्यातच नेहमी गोडीबुलाबीचे संबंध राहतात असेही नव्हे. तरीही प्रमोद देव मिपावर नित्यनियमाने येत असतात, वाचन करतात, लिहितात याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. त्यांनी केलेले ललितलेखनही आम्हाला आवडते. अलिकडे ते काही बजुर्ग कलाकारांच्या प्रकाशचित्रांचे संकलन करून मिपावर टाकत असतात तेही आम्हाला अत्यंत आवडते व आम्ही त्यात आमच्या परिने प्रतिसादात्मक भागही घेतो.
आमचे अल्लादियाखासाहेब म्हणायचे त्याप्रमाणे आमची दुश्मनी हलवायाशी आहे, मिठाईशी नाही!
तात्या.
आमची दुष्मनी?
कुणाशीही नाही. तात्विक मतभेद जरूर आहेत आणि ते राहणारच. कारण कुणीतरी म्हटलंय ना की 'व्यक्ती तितक्या प्रकृती'... आम्ही हेच मानतो. प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा असतो.... हे तत्व आम्ही प्रमाण मानतो.
तेव्हा आमची दुष्मनी कुणाशीही नाही.... मिठाईशी नाहीच आणि हलवायाशी देखिल नाही. तत्वाच्या बाबतीत मात्र सहसा तडजोड करत नाही.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
आम्हीही नाही!
तत्वाच्या बाबतीत मात्र सहसा तडजोड करत नाही.
सहमत आहे. आम्हीही करत नाही! मग भले संबंध कायमचे तुटले तरी बेहत्तर!
तात्या.
धत तेरे की
शीर्षक वाचुन प्रमोदकाकांचा हा लेख म्हणजे मला वाटलं की प्रभाकर पणशीकरांचे फोटो आले असतील.
निदान सगळ्या प्रमोद देवांचे तरी...
सुलानामा
आभासी जगात तत्व वगैरे पाळावेत का ? हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण दोन जाणत्या संगीत रसिकात, दोस्तात काही वाद असू नयेत असे आम्हाला वाटते, कोणी तरी एक पायरी खाली यावे, आणि कोणी तरी एक पायरी वर जावे म्हणजे दिल से दिल मिलेंगे !!!
हलवाई आणि तत्व या दोघांनाही जरा दूर ठेवले पाहिजे असे वाटते
या उप्परही आपापली मर्जी !!!
आपला
(बिरुटे वकील )
सरांशी सहमत आहे
तत्त्वे जर लवचिक नसतील तर नुकसान होणारच/होतेच.त्यामुळे तत्त्वांचा दुराग्रह कुठवर जपायचा आणि मानवी संबंधांच्या संदर्भात तत्त्वे व हितसंबंध यांपैकी कुणाला कधी किती प्राधान्य द्यायचे हे ठरवता आले म्हणजे झाले.
(तात्त्विक)बेसनलाडू
:)
कोणी तरी एक पायरी खाली यावे, आणि कोणी तरी एक पायरी वर जावे म्हणजे दिल से दिल मिलेंगे !!!
बिरुटेशेठ,
आमची मांडवली झाली आहे बरं का!
आपला,
(प्रमोदकाकांचा पुतण्या!) तात्या.
तात्याशी सहमत!
वाद मिटला...भाईकाकांच्या आशीर्वादाने!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
महाराष्ट्
महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोगाचे अध्यक्ष डॉ.प्रमोद देव हे गेले कैक दिवस वृत्तपत्र आणि इतर प्रसार माध्यमात गाजत आहेत. परवाच एक बातमी आली होती त्याप्रमाणे रिलायन्स एनर्जी मध्येही एक 'प्रमोद देव' आहेत. हे वाचून मलाही आश्चर्य वाटले.
ह्या गोष्टीमुळे मला काही जणांनी विचारले की ह्यापैकी आपण कोण ?
'देव' सर्वव्यापी आहे हेच खरे.....
देव
देव सर्वत्र असतो हे माहीत होते (ऐकले आहे), आता प्रमोद देव पण कुठेही असू शकतात हे समजले...
>>>'देव' सर्वव्यापी आहे हेच खरे.....
बाकी मिपाच्या प्रमोदरावांनी दिलेल्या बातमीवरून काही (प्रमोद) देव हे सर्वव्यापी म्हणजे सर्वांना व्याप होणारे असतात असा या वाक्याचा अर्थ वाटू लागला
ताप म्हणा!
देव हे सर्वव्यापी म्हणजे सर्वांना व्याप होणारे असतात असा या वाक्याचा अर्थ वाटू लागला
व्याप नव्हे...ताप म्हणा!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
देव पावला!
बरं झालं की त्या दोघांपैकी तुम्ही नाही. देवच पावला.