हल्ली गाडीचे अॅव्हरेज पार झोपले होते.त्यामुळे मेक्यानिकच्या हवाली केले होते.
गाडी दुरुस्तीचे काम विचित्र असते गाडी दुरुस्त होत असताना आपण गप्प बसणे अवघड जाते आणि काहि करणे देखील शक्य नसते. गाडी दुरुस्त करणारा मिस्त्री अनोळखी असला तर हे अवघड जागचे दुखणे होते. आमचा नेहमीचा बारक्या मिस्त्री म्हणजे एक वल्लीच आहे तो कशाला काय म्हणेल हे सांगता येत नाही. त्याची ती सातारी बागवानी हिंदी हे एक भन्नात प्रकरण.
थोडिशी हैद्रबादी आणि बरीचशी मराठी अशी काहिशी ती भाषा आहे. कळायला सोप्पी बोलायला गेलो तर कैच्या कैच अर्थ निघतात.
पुर्वी बजाजची चेतक स्कुटर असताना त्याची माझी ओळख झाली. स्कुटरच्या डिक्कीत पाणी साठून रहायचे.
बारक्याने ते बघितले आणि म्हणला भाइ आपण एक कामा करेंगे. गाडीकी डिकीमे ना दो सुरागा पाडेंगे.
मला गंमत वाटली . त्याने एक खिळा हातोडी घेवून ठाक ठुम करून दो सुरागा पाडले आणि त्याच्या भाषेत बोलायचे तर प्राब्लेमा सोडवला.
त्याच्या गॅरेजच्या पासून घर जवळच असावे. एकदा त्याला त्याच्या बायकोला काहितरी सांगायचे होते.
तो तेथूनच ओरडुन सांगत होता. " अरे तुम बायका बायका आगे जाव ना हमे आतैच पिछिशे.
और वो किटल्या मे तीन चार चाया भीजू इदर हमना वासते.
या भाषेचे व्याकरण मजेशीरच भाषा वरवर हिंदी वाटत असली तरी ती मराठी म्हणून खपून जाते
हिंदीत नसलेले शब्द बेमालुमपणे या भाषेत येतात.उदा तुमकु बोला ना हल्लू मार करके. तो हल्लूच मारना. ए भित्ताड के भाई... नीट इदर देख. नै तो काना के निच्चु दोन बजावुंगा.
त्या दिवशी गाडी चे अॅव्हरेज का मिळत नाही यावर त्याचे संशोधन चालु होते.
बराच काळ त्याने बॉनेट उघडून कार्बोरेटर आणि तत्सम पार्ट बघितले. त्याला हवे ते सापडत नव्हते.
त्याने डोके बाहेर काढले आणि तंबाखूचा बार भरून पुन्हा बॉनेटखाले डोके घालणर इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आले. तो म्हणाला भई गाडी के टायरा दीखु. एकदम गोलटा. ऐशे टायरा रहेंगे तो गाड्या कैशी चलेंगी. सब नक्ष्क्षी एकदम खल्लास एकदम गोलटा हुवा हय ये.
आन डिक्की का टायरा कैशी है वो बताव.
मी म्हनालो डिक्की का टायर.म्हणजे स्टेपनी.........
हा वोच वोच
मी स्टेपनीचे टायर बघितले ते देखील फारसे उत्तम नव्हते.
एक कामा करो ये टायर मै आगे बिटाता हुं. और आग्गे के दोनो टायरा पिछे लगातै.
फिर ?
डिक्की का टायरा थोडे दिन चलेगा फिरबी नै होगा. तुमको सब टायरां बदलनाच पडेगा.
का कोणास ठाउक मी त्याला त्या भाषेत विचारायचे म्हणून विचारले बारक्या आब्बी की बात कर मेरेकु ये बता. ष्टीप्नी का टायरा लगाने से अॅव्हरेज अच्छा मिलेगा या रेग्यूलर टायर लगानेसे अच्छा मिलेगा. रेग्यूलर टायर अगदीच गोल्टा नई हय पण ष्टीप्नी बी अच्छी हय ना. मेरेकु और थोडी दिन तो चलेगी ना. अगले म्हैनेमे बदलेंगे.
यावर तो बराच वेळ हसत उभा राहिला. अगदी डोळ्यात पाणी येइपर्यन्त हसला.
भई इतना ज्योका नको मारू.
कसला ज्योक ....अन तुला हसायला काय झाले?
भई डिक्की का टायर टायर होता है..... ष्टीप्नी अलग अस्तीय.
म्हणजे?
ष्टीप्नी मायने ष्टीप्नी ..... वो ....वो......... त्याने नाकावर बोट टेकवत मला खुलासा केला.
मी काही कळाले नाही.
अरे भई वो.. घर मे बाहर हुती हय वो..
क्या? !!! आता आश्चर्यचकित व्हायची वेळ माझी होती.
नै तो क्या . एक्ष्ट्रा हुती हय ना. घरकी बायकु वरीजनल( ओरिजनल) हुती हय अन ज्यादा वाली ष्टीप्नी.
त्या बोलण्यावर मी नक्की काय बोललो त्या वाक्यांचा विचार करत होतो.
१) जुन्या गाड्या चांगल्या असायचा. लँब्रेटा . व्हेस्पा , बजाज.... प्रत्येकाला स्टेपनी असायची
नव्या गाड्याना प्लेझर , अॅक्टीव्हा , याना स्टेपनी नसते. मोटारसायकलला नसतेच नस्ते. हे असे का?
२) रेग्यूलर टायर वर गाडीचे अॅव्हरेज चांगले मिळेल का स्टेपनी वर चांगले मिळेल?
३) स्टेपनी किती किलोमिटर नंतर बदलावी?
पण बारक्या च्या भाषेत "ष्टीप्नी " अर्थ कळाला आणि माझे सगळे प्रश्न घशातच अडकले
प्रतिक्रिया
29 Aug 2011 - 7:10 pm | यकु
:D :D :D :D
पुलंच्या 'नामू परिट' मधली
ही ष्टेपनी, ती निराळी
ही कॉमेंट आठवली..
29 Aug 2011 - 7:12 pm | शुचि
मजेशीर किस्सा.
29 Aug 2011 - 7:28 pm | राजेश घासकडवी
बारक्याचे संवाद, त्याची भाषा भारी आहे.
काही गाडीचालकांना चार चार टायरचे जोड ठेवण्याची सोय असते. इतरांना त्यासाठी स्टेपन्या ठेवाव्या लागतात. 'समान गाडी कायदा' झाल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही.
मायलेज कसं काढावं याची तांत्रिक चर्चा नुकतीच झाली. मायलेज वाढवावं कसं याबद्दलच्या उत्तम चर्चेच्या प्रतीक्षेत. :)
29 Aug 2011 - 8:07 pm | धमाल मुलगा
कैशी बातां कर्ते...वो बारक्या हस हस के गिर्याईच र्हेंगा ना.
- (सारक्या मिस्त्री) ध.
29 Aug 2011 - 8:15 pm | चतुरंग
विजु भौ, यापेक्षा ते आगस्ट फळं की काय तसा लेख टाका ना राव!
-(सर्किटब्रेकर) रंगा
29 Aug 2011 - 9:25 pm | शैलेन्द्र
घ्या विजुभो.. हे तर मी तुम्हाला त्या धाग्यावरच सांगीतलेलं.. अॅव्हरेज रेग्युलर टायरचाच चांगला मीळणार.. स्टेपनीची मजा वेगली पण कष्ट करावे लागतात, ओरीजनल टायर बाजुला करा, जॅक लावा, स्टेपनी बसवा.. परत तिच्याकडे स्पेशल लक्ष ठेवाव लागतं, दुर्लक्षीत राहीली तर ओरीजीनल टायर पंक्चर झाल्यावर स्टेपनी पन काम करायला नकार देते.. शिवाय, स्टेपनी हे एक ओझच.. ते वाहुन न्यायला आधिक इंधन खर्च होत..
ओरीजीनल टायर चाकावर चांगला रुळलेला असतो , अॅव्हरेजला तोच चांगला.. आता काही जण, स्टेपनीलाच ओरीजीनल टायर करतात, आनी रुळवतात, तिथे त्यांना स्टेपनीचा चांगला अॅव्हरेज मिळतो, आणी ओरीजिनल टायर कधीतरीच वापरला जातो.
30 Aug 2011 - 12:36 am | सोत्रि
हा हा हा....
विजुभौ बारक्या बहुतेक श्रावण संपुन भाद्रपद चालु झाल्याच्या मुडमधे असावा ;)
- (ष्टीप्नी नसलेला) सोकाजी
30 Aug 2011 - 2:00 am | पाषाणभेद
टायर वर्रीजनल असो वा स्टेप्नीवालं, डायवर ला गाडी चालवणं महत्वाचं आस्तं
30 Aug 2011 - 11:34 am | इरसाल
स्टेपनी हा प्रकार पूर्वापार चालत आलेला आहे.
जुन्या काळात जेव्हा लाकडी चाकावर धाव बसवून बैलगाडीला वापरले जायचे त्यावेळेस बैलगाडीच्या मागे एक जास्तीचे चाक म्हणजेच स्टेपनी बांधलेली असायची.
नंतर प्रगती होत होत जेव्हा दोन चाकी आल्या त्यांनाही तिसरे चाक डीकीच्या जागी किंवा विरुद्ध बाजूला अडकवलेले असायचे.हीच तऱ्हा चारचाकी साठी.
पण त्यावेळेस लोकांना स्टेपनी ठेवायला परवडायचे.
सध्या च्या युगात जादाच्या स्टेपनीचा खर्च परवडत नाही अवरेज मार खातो.मग ह्यावर तोडगा म्हणून काही लोक स्टेपनीचा रेगुलर म्हणूनच वापर करतात. पण असे आढळून आले आहे कि स्टेपनी ला रेगुलर करणे महागात पडते.
रेगुलर आणि स्टेपनी एकत्र बाळगणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
30 Aug 2011 - 11:50 am | स्पंदना
विजुभाउ सुरेख व्यक्तीचित्रण कम अनुभव कम, बरच काही.
या बर्याच काहीला सलाम!
उत्तम लिखाण.
30 Aug 2011 - 11:52 am | सुनील
स्टेपनी अशी कायमची ओझ्यासारखी वागवण्यापेक्षा स्टेपनी भाड्यावर घ्यावी. काही ठिकाणी दर ताशी रेट मध्येदेखिल मिळते.
30 Aug 2011 - 11:58 am | सविता
घासून घासून गुळगुळीत झालेले द्वयर्थी शब्द आणि त्याच्याशी संबंधित जोक वाचून अतिशय कंटाळा आलेला आहे.
मी मिसळ्पाव वाचतेय दोन वर्षे त्यात किमान सहा ते सात वेळा याच टाईपचे जोक आणि द्वयर्थी कॉमेंट्स वाचल्या आहेत. आता हसू येत नाही.
30 Aug 2011 - 12:05 pm | सुनील
आता हसू येत नाही
म्हणजे? लेख विनोदी होता? मला तो माहितीप्रद लेख असावा असे वाटले. लेखाचे वर्गिकरण - संस्कृती विचार
30 Aug 2011 - 2:24 pm | विजुभाऊ
सवितातै तुम्ही लिहिलेत त्याच्याशी मी असहमत आहे
या धाग्यावर मी जे काही लिहिले आहे त्यात द्व्यर्थी वगैरे काही नाही जे लिहिलय ते सरळ लिहीलय. मला जो अनुभव आला तो लिहीला आहे.
मराठी भाषेत द्वयर्थी शब्द आहेत त्यामुळे विनोद घडतात. हसू येणे न येणे या बाबतीत बोलायचे झाले तर कणेकरांच्या भाषेत " लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलीटी " अथवा घटत्या उपयुक्ततेचा सिद्धान्त असे म्हणावे लागेल. जो चहा तुम्हाला स्ट्रॉन्ग वाटेल तो एखाद्याला एकदम लाईट वाटण्याचा संभव असेल किंवा एखाद्याला पिता येत नाहे इतका गुळमट वाटेल. प्रत्येकाची चव वेगळी असते.
द्वर्थी शब्दांबाबत दादा कोंडके म्हणाले होते की "सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे करणी देह माझा पडावा " या ओळी एखादा तरूण एखाद्या तरुणीकडे पाहून म्हणाला तर ते द्व्यर्थी मानायचे का?