जपानी माणूस हा हाडाचा ‘सोशिअल ऍनिमल’ आहे. काहीतरी कारण शोधून जथ्थ्याने एकत्र येउन साके आणि खासकरून बीयरच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवत जीवनाचा आनंद लुटणॆ हे त्यांच्या रक्तातच आहे. असाच एक सामजिक सोहळा म्हणजे हानाबी - ‘फटाक्यांची आतिषबाजी’. हे जपानी फारच कलासक्त असतात त्यांची लेखी लिपी 'कांजी' हे त्याचे प्रतिक आहे. एक कांजी म्हणजे एक शब्द असतो. ह्या कांजी एकापुढे एक जोडून नवीन शब्द तयार होतात.
हानाबी, 花火 हा शब्द हाना (花) म्हणजे फुल आणि बी (火) म्हणजे आग ह्या दोन कांजींनी बनला आहे त्याचा अर्थ - आगीची फुले. किती छान आणि कलात्मक शब्द बनवला आहे.
खरतर आपल्या देशातील कसल्याही क्षुल्लक कारणासाठी केलेली आतिषबाजी बघितलेल्यांना हे काय फॅड ब्वॉ? असे वाटू शकेल, पण रूढीप्रिय जपानमधे फारच गाजावाजा करून हानामी साजरी केली जाते. घरे बांधण्यासाठी केलेल्या लाकडाच्या मुबलक वापरामुळे जपान तसा नेहमी आगीच्या धोक्याखाली असणार देश आहे. त्यामुळॆ कदाचित फटाके वाजवण्यावर प्रचंड बंधने येउन ‘फटाक्यांची आतिषबाजी’ साजरी करण्यासाठी हानाबी चालू झाली असावी (हे माझे मत). खरेतर जपान्याला काहीतरी करून सर्वांबरोबर एकत्र येउन दारू रिचवण्याचाच शौक जास्त, काहीतरी कारण हवे :)
तर जपान मधे उन्हाळ्यात जुलै एंड किंवा ऑगस्ट सुरुवातीला ही हानाबी प्रत्येक नगरपालिकेच्या हद्दीतील नदीकाठी ही हानाबी साजरी केली जाते.
हानाबीची सुरुवात जपानी माणसासाठी आदल्यादिवसापासून सुरु होते. आदल्या रात्री जाउन जागा आरक्षित करावी लागते. महत्वाचे म्हणजे त्या आरक्षित जागेवरून अजिबात भांडणे होत नाहीत. आरक्षण न केलेल्या जोड्प्यांना आनंदाने सामावून घेतले आते. साकेचा आणि खासकरून बीयरचा (उन्हाळा असल्यामुळे) अंमल जपन्याला ‘रगेल’ न बनवता ‘रंगेल’ बनवतो.
ह्या नीळ्या ताडपत्री म्हणजे आरक्षित केलेली जागा.
दुपारच्या जेवणानंतर जपानी मंडळी हळूहळू नदीकिनार्या"वर जमू लागते आणि आरक्षित केलेल्या जागेवर स्थानापन्न होउ लागते (अजिबात भांडणे न होता). जनतेचा अफाट सागर नदीच्या दुतर्फा दुपारच्या उन्हातच जमा होउ लागतो.
आता फटाक्यांची आतिषबाजी तर रात्री होणार मग दुपारपासून गर्दी का असा प्रश्न तुम्हाला पडणे सहाजिकच आहे. पण असा प्रश्न ‘पिण्यासाठी जन्म आपुला’ हे ब्रीदवाक्या असण्यार्याा जपान्याला पडणॆ शक्यच नाही. बीयरच्या बाटल्या रिचवत, आनंदाने कलकलाट करीत रात्रीचा अंधार होण्याची वाट बघत असतात (आतिषबाजी बघण्यासाठी हो, हे नमूद केलेले बरे ;)). अंधार जेवढा जास्त उशीर करून येइल तेवढे चांगले, तेवढीच बीयर जास्त ढोसता येते :P
आता सर्वच जण एवढीssss ढोसतात की पोट ‘रिकामे करणे’ आलेच, त्यासाठी पोर्टेबल कमोड्सची सोय केलेली असते.(खालील फोटोमधे लाल खूण असलेली जागा.) हा फोटो टाकण्याचे कारण म्हणजे ह्या पोर्टेबल कमोड्स समोर असलेली ही तोबा गर्दी, रांग दुपारपासून जी लागलेली असते ती हानाबी संपली तरी तेवढीच असते :) :) :) काही महाभाग असे असतात कि त्यांचा हानाबी सोहळा त्या पोर्टेबल कमोड्सच्या रांगेतच संपून जातो ;)
आता अंधार पडू लगतो आणि चालू होते हानाबी (花火) - ‘फटाक्यांची आतिषबाजी’. चोहोकडुन मग फक्त एकच ललकारी ऐकु येउ लागते "सुगोइ किरेssss, सुगोइ किरेssss". जपानी ललना तर अक्षरशः चिरकत असतात (बहुतेक पोटातली बियर चिरकत असावी ;))
मला स्वतःला ही हानाबी तितकीशी आवडली/आवडत नाही, पण अनुभव म्हणून फार छान सोहळा होता.
प्रतिक्रिया
4 Aug 2011 - 2:53 pm | स्पा
मस्त अनुभव
टाक्यांची आतिषबाजी’. चोहोकडुन मग फक्त एकच ललकारी ऐकु येउ लागते "सुगोइ किरेssss, सुगोइ किरेssss". जपानी ललना तर अक्षरशः चिरकत असतात
चीरकणार्या जपानी ललनांचा फोटू न टाकल्याबद्दल जाहीर निषेध :D
4 Aug 2011 - 2:58 pm | गजा गाजरे
ऊत्तम माहिती ........ पुण्यातहि हा हानाबी चालु करुयकि ...्म्म
अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........
हानाबित हारवलेला ....
4 Aug 2011 - 4:23 pm | विजुभाऊ
पुण्यातहि हा हानाबी चालु करुयकि ...्म्म
चित्र डोळ्यासमोर आले.......... कलमाडी यानी नदीपात्रातील रस्त्याच्या बाजूस हानाबी फेस्टीवल आयोजीत केला आहे. सर्व लोक नीरा किंवा गेला बाजार त्या अॅल्युमिनियमच्या दुकानातून मिळणारा दोन चमचे अमृततुल्य पीत उभे आहेत.( महत्वाचे म्हणजे त्या आरक्षित जागेवरून अजिबात भांडणे होत नाहीत. हे मात्र अज्याबात इमॅजीन्होत नाहिय्ये )
विषेश म्हणजे उडणारे सगळे फटाके चांगले निघतात फुसके निघत नाहीत आणि दै.सकाळ मध्ये वाचकांची पत्रे मध्ये हानाबी फेस्टीव्हल मध्ये पैसे उधळण्यापेक्षा नदीपात्रातील रस्त्यावरचे खड्डी बुजवावे " अशा आशयाची पत्रे येत आहेत.
5 Aug 2011 - 12:26 am | ५० फक्त
हो आणि खालि बसायला ताडपत्रीच्या ऐवजी संध्यानंद / नवाकाळ / पोलिस टाइम्स अशी सोय केलेली आहे, पण एक शंका आहे ओ, कलमाडींच्या हानाबीला पवारांच्या लवासातुन पाणि सोडणार का नदित, का कोरड्या नदी किनारीच भागवायचं सगळं.
4 Aug 2011 - 4:57 pm | स्वाती दिनेश
आम्ही एन्जॉय केलेल्या हानाबी फेस्टिवलची जुनी आठवण ताजी झाली.
स्वाती
4 Aug 2011 - 5:09 pm | विनायक प्रभू
आमच्यात ह्याला हाणुयाकी म्हनतात.
4 Aug 2011 - 8:32 pm | शुचि
आगीची फुले - खल्लास!!! पुढला जन्म जपानी व्यक्ती म्हणून हवा आपल्याला.
4 Aug 2011 - 11:27 pm | मी-सौरभ
त्सुनामी परत येईल म्हणे :)
4 Aug 2011 - 11:07 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त! आवडले!!
5 Aug 2011 - 12:24 am | ५० फक्त
सोत्रि, फोटोंचं टायमिंग मस्त एकदम मस्त.
@स्पावड्या, जपानी ललना फटाके बघुन चिरकतात, यामाहा बघुन नाही.
5 Aug 2011 - 6:06 am | गणा मास्तर
तुम्ही जुन्या आठवणी जाग्या केल्यात. मे जपानमधे असताना म्योदेनजवळ एदोगावा नदीकाठी हा सोहळा पाहिला होता.
आणि या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जपानी कन्यका त्यांचा पारंपारीक किमोनो घालुन येतात.
5 Aug 2011 - 6:49 am | सहज
>मला स्वतःला ही हानाबी तितकीशी आवडली/आवडत नाही, पण..
बर मग सचित्र ऑन्सेन भाग कधी टाकताय ? :-)
5 Aug 2011 - 7:17 am | गणा मास्तर
वा सहजराव चांगली सुचना आहे
7 Aug 2011 - 12:23 pm | सोत्रि
सचित्र ओंनसेन इथे टाकले तर सं.मं.कडुन माझा आयडी गायब केला जाण्याची दाट शक्यता आहे ;)
सबब आपली विनंती इथे मी विनम्रपणे नाकारतो आहे :)
- (विनम्र) सोकाजी
7 Aug 2011 - 12:19 pm | सोत्रि
बर्याच जाणकारांच्या सांगण्यावरून फोटोजची लोकेशन बदलली आणि धागा लोड होण्याचा काळ जवळजवळ 4 पटीने जलद झाला.
एक दोन नवीन फोटो पण ऍड केलेत आता.
- (जलद्) सोकाजी