जही घट प्रीती न प्रेमरस , पुनि रसना नहि राम
ते नर इस संसार मे, उपजि भये बेकाम ||
" नेहमी शोधत राहायचे की आपल्या हॄदयामध्ये प्रेमरस ओत्तप्रोत भरलेला आहे की नाही आणि समजा भरलेला नसेल, आणि लक्षात आले की आतमध्ये वाळवंट आहे, तेथे पाउस पडणार नाही. तेव्हा त्वरा करा, अहंकार बाजूला करण्याची..!! तेच ध्यान आहे , हीच प्रार्थना आहे! अहंकाराला बाजूला सारण्याची कला म्हणजे योग , तोच खरा धर्म...!! अहंकार आणि विचार सोडले तर तुमच्या हृदयात प्रेमरस भरू लागेल. बाहेर पाउस बरसतच असतो.. तुम्ही तुमचे हृदय अहंकाराच्या झाकणाने बंद केले आहे..
प्रेम एक माधूर्य आहे.. एक अस्वाद.. रोमारोमात त्याच अस्वाद भरायला हवा.. तुम्ही इतके प्रेम प्यायला हवे, की तुमच्या हृदयातून प्रेम भरभरून व्ह्यायला लगले पाहिके .. एकदम बेहिशोबी..
पण तुमची समस्या उलटीच आहे. आता तुम्ही एक रिकामा घट॑ आहात आणि चारी दिशांनी भिक्षूकासारखे फिरत आहात की माझा घट भरून द्या , तुम्ही एक भिकारी आहात..तुम्ही प्रत्येकाच्या समोर उभे राहाता आणि थोडेसे प्रेम मागता. तुमचे डोळे प्रेम मागतात, भीक मागताय तुम्ही.. केवढी लाचारी..! कुणी थोडेसे जरी तुमच्या कडे बघून हसले, तरी किती खूष होऊन जाता तुम्ही.. तुमच्या दारिद्र्याला अंत नाही ! कोणी तुमच्या पात्रात दगड जरी टाकले , तरी तुम्ही त्याला हिरे समजता...!! प्रेमासाठी अस्वस्थ झाला आहात तुम्ही..
आणि एक लक्षात घ्या ज्यांच्याकडे तुम्ही प्रेम मागता आहात, ते ही तुमच्या सारखेच रिकमे घडे आहेत. ते फक्त अश्वासन देउ शकतात., गम्मत आहे ! एक भिकारी दुस-या भिका-या समोर उभा आहे, भिक्षापात्र पसरवून आणि प्रत्येकजण एकमेकाला आखडून दाखवत आहे की मी सम्राट आहे. आलाय मागण्यासाठी आणि देण्याची गोष्ट बोलत आहे..!!!!! तुम्ही थोडेसे प्रेम देताना नजरेस पडता ना, ते एवढ्यासाठीच की ते परत येईल..तो एक सौदा असतो..
या जगात प्रत्येकजण दुस-याकडे प्रेम मागत आहे. .. प्रेम द्या प्रेम द्या म्हणून,, पण हे कुणाच्या ल़क्षात येत नाही की, आपण ज्यांच्याकडे मागत आहोत, ते ही आपल्याकडे मागण्यासाठीच आले आहेत. यामुळेच प्रेम असफल होते.. सुरवातीला थोडे दिवस ही फसवणूक चालते.. पण किती दिवस चालणार..? एक दिवस समजते की दुसराही भिकारी आहे.. आणि आपण चांगल्याच संकटात सापडलो आहोत....
इथे प्रत्येकाच्या हातात मासे पकडण्याची काठी आहे आणि प्रत्येकाच्या काठीला पीठ लावलेले आहे.. येथे फक्त पीठ आहे .आतमध्ये काटा आहे..असले प्रेम दोनचार दिवस टिकले, तरी मी म्हणतो भरपूर झाले. इथे सगळेच म्हणत असतात प्रेम देउ प्रेम देउ आणि सगळेच मागत फिरत आहेत...
पण जेव्हा कोणी आपली ही अवस्था बरोबर समजून घेतो विचारांना आणि अहंकाराला बाजूला ठेवतो, तेव्हा त्याच्या रोमारोमात प्रेम वाहू लागते.. प्रेमाचा अर्थच आहे "स्व" चे रुपांतरण. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला.. जो कोणी आपला अहंकार सोडेल त्याच्यावर प्रेमाचे मेघ बरसतील
लक्ष्यात घ्या , तारूण्य, जे शरिराचे आहे ते येते आणि जाते.. पण आत्म्याचे तारूण्य.. परमसत्तेचे आहे.. ते शाश्वत आहे..!!!! ह्या स्वतःच्या शांतीमध्ये डुबुन गेल्यावर, तुम्हाला मिळेल एका नवतारूण्याची झलक, एक असे यौवन जे कधीही सरणार नाही !!!!
अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारे काही बदलून जाते.. मग कोणतेही मतभेद राहात नाहीत.. कोणत्याही भिंती उरत नाहीत.. बस फक्त प्रेमाचा आविर्भाव होत असतो.. फक्त प्रेमच प्रेम.. अनंत प्रेम..अहर्निश प्रेमाचे नृत्य...तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसू लागेल.......!!!"
कबीर बादल प्रेम का, हमपर बरसा आई
अंतर भीगी आत्मा, हरी भरी बनराई ||
प्रतिक्रिया
12 Jul 2011 - 12:35 pm | प्रास
लेख अर्धवट वाटतोय.
कबीराच्या पहिल्या ओळीतील अर्ध्या भागावरच तुम्ही हे लेखन आधारीत ठेवल्याचं जाणवतंय.
हे तर खरं आहेच पण यातला कबीराचा मूळ मुद्दा -
हा आहे. मुखी नाम नसेल तर तुमच्या घटामध्ये प्रेमरसाची उत्पत्ती तरी कशाने होईल?
तुम्ही तुमच्या लेखामध्ये प्रत्येकाचा घट कसा प्रेमरस नसलेला अहे आणि प्रेमरस नसलेला एक घट दुसर्या तसल्याच घटाला कसा तो देऊ शकत नाही हे सांगताय पण तसा तो प्रेमरस त्या रीकाम्या घटात कसा उत्पन्न व्हावा हे जे कबीर सांगत आहेत त्याकडे दुर्लक्ष होतंय असं जाणवल्यामुळे हा प्रतिसाद प्रपंच.
तेव्हा संपूर्ण दोहा विवेचनाला घेऊन लेख पूर्ण संपादित केल्यास अधिक चांगला आणि परिणामकारक व्हावा अशी आशा आहे.
शुभेच्छांसहित,
12 Jul 2011 - 4:30 pm | चन्द्रशेखर गोखले
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे,, मी त्या भाष्यातले काही निवडक वेचे घेतल्यामुळे हा घोळ झाला असावा...
12 Jul 2011 - 10:51 pm | सुधीर
तरीही मी म्हणेन, चांगले विचार आहेत.
जमल्यास संपादन करून पुन्हा प्रकाशित करा.
12 Jul 2011 - 10:51 pm | सुधीर
तरीही मी म्हणेन, चांगले विचार आहेत.
जमल्यास संपादन करून पुन्हा प्रकाशित करा.