टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वहिन्नीच्या बान्गड्या - चित्रपट भाग - १
पारावर सगळी मन्ड्ली जमली होती, छोटे मोठे डॉन, भडकमकर मास्तर, आन्द्या, स्वप्ण तुन परत आलेले विजुभौ इ. आली होती. सगळी कडे चैतन्य नलिका, काही पाने - चुना चे काम चालु होते.
सगळी सराई सम्पली होती. आन्द्या आणी धमाल मुलाचे विटि दाण्डु चालु होते.
अचानक सरपन्च येताना दिसले, आल्या आल्या टोला मारला, 'आता घोड्यावर बसायचे वय झाले आणी विटि दाण्डु खेळताय?, च्या मायला'. हे ऐकुन पोरे पळाली.
सरपन्च दिसले कि मनोबा पाटिल धावत आहे.
आजचा ऐकदम तातडीचा विषय माडण्यात आला. गावकरी सगळे 'वळु' वघुन आल्याले, त्यातच शिवाजी पार्क ची सभा झालेली. सगळे चान्गले फुल फार्मात. मराठी माणुस पुढे गेलाच पाहीजे.
हा विषय आला होता सगळ्या पुढे. गावात नवीन पिक्चर काढायचे चालले होते.
मास्तरान्नी मुद्दा काढ्ला , पिक्चर काढायचा म्हन्जे नट, नटी, तिचा बाप, खलनायक, लेखक अशी माणसे पाहीजेत.
'मग तुम्ही कशाला आहत, फुकट पोराकडुन भाजी घेता काय? गावासाठी करा काय तरी?' - पाटिल. पाटिल म्हणले कि सरळ बोलणे नाही.
'आणी पैशाचे काय करायचे' - इ. पिवळा डाम्बिस.
'हे बघा, मी कथा लिहितो, आता या वयात नटाचे काम नाही जमणार !' - मास्तर. चेहरर्यावर मन्गळ असलेल्या वधुपित्याच्या अजिजीने म्हणाले.
'च्या आयला, हा मास्तर नट तर आम्ही काय पाळण्यात बसायचे काय? - छोटे डॉन. तीकडुन आन्द्या 'अरे हळु बोल, मास्तर ने ऐकले तर हा आपले कोप्या करायचे प्रकरण सगळ्या गावात कारायचा, माझे तर अजुन लग्न पण झाले नाही.'
सरपन्च तीकडे आपले, नव्या मास्तरीन बाईशी ओळ्ख वाढवत होतो. गाडी घरी कोण्-कोण असते इथपर्यत पोचली होती. आता, ते कधी घरी असतात त्याची चौकशी करणार, इतक्यात पिवळा डाम्बिस म्हणाला, 'अहो, सरपन्च, जरा इकडे बघा, आपल्याला पिक्चर काडायचा आहे.'
सरपन्चनी बाईन्चा मोबाइल नम्बर पाकिटात सारला आणी बोलायला सुरवात केली.
क्रमशः
(इथे काही मोठ्या लोकन्चा एकेरी नावने उल्लेख केला आहे. जर ह्या लेखाणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या अस्तील तर माफी मागतो)
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


च्या मारी...
गटणे साहेब फॉर्मात... पुढे काय झाले?
गाडी घरी कोण्-कोण असते इथपर्यत पोचली होती. आता, ते कधी घरी असतात त्याची चौकशी करणार,
सही...
गावात नवीन
गावात नवीन पिक्चर काढायचे चालले होते.
ह्म्म्म,
गोष्ट रंगेल पुढे असं दिसतय. पहिला भाग जरा लहान वाटला. अजून येऊ द्यात.
-- पक्या
अरे झोपलो
अरे झोपलो होतो, मनात कल्पना आली म्हणुन लिहिले आहे (झोपेतुन उठुन !!), रात्री च्या १२.३० ला लिहीले आहे.
सगळे लिहायला नको ऐकाच वेळी, म्हट्ले मीपाकर काय म्हणतात ते बघावे आधी. !!!!
छान
चांगले लिहलय .. चालुद्या !
हेच म्हणते..
चांगले चालले आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वाचायला मजा येईल..टाका अजून.
वाचायला मजा येईल असं दिसतय प्रकरण. टाका अजून्...जास्त वाट पहायला लावू नका.
(झोपेतुन उठुन !!), रात्री च्या १२.३० ला लिहीले आहे.
मानलं बॉ तुम्हाला. पुढील लेखनास शुभेच्छा.
-- वेलदोडा
वाचायला मजा येईल..टाका अजून.
वाचायला मजा येईल असं दिसतय प्रकरण. टाका अजून्...जास्त वाट पहायला लावू नका.
(झोपेतुन उठुन !!), रात्री च्या १२.३० ला लिहीले आहे.
मानलं बॉ तुम्हाला. पुढील लेखनास शुभेच्छा.
-- वेलदोडा
च्यामारी!!
च्यामारी, शिंच्येहो!! काय तुमी पिवळया डांबिसाला सरपंचाकडून फटकावणार कायरं!!
)
))
आसं काय केलं ना तर याद राखा, तुमाला कधी शंका पन येणार नाय आशा येळेला येऊन झपाटीन!!
मंग म्हनाल रोज तं यवस्थित होतं आज काय झालं!!!!!!
नाय आपुन आपली आगाऊच वार्निंग द्येतूय!!!
मग बोल लावू न्हकात!!!
:)
सरपन्चनी बाईन्चा मोबाइल नम्बर पाकिटात सारला आणी बोलायला सुरवात केली.
हा हा हा! चालू द्या...!
आपला,
(बाईलवेडा) तात्या.
मस्त रे ...
आयला मी आणि विजूभाउ नंतर हा लगेच निघाला "मिपा" च्या स्वारीवर ...
पण मस्त आहे, मज्जा येतीय ... लिही अजून ...
"छोटे मोठे डॉन, भडकमकर मास्तर, आन्द्या, स्वप्ण तुन परत आलेले विजुभौ इ. आली होती. सगळी कडे चैतन्य नलिका, काही पाने - चुना चे काम चालु होते."
काही तरीच काय, आम्ही पारावर आल्याआल्या "पारावरच्या मारुतीची पुजा" केली होती. त्यावेळी लावलेल्या "उदबत्यांचा धुर" होता तो आणि पानाचं म्हणशील तर आल्यागेल्यांना "पानसुपारी" द्यायला आणली होती.
तुम्ही करा आम्हाला बदनाम "चैतन्यनलिका आणि पान्-चुना" म्हणून ...
हा हा हा !!!
"सरपन्चनी बाईन्चा मोबाइल नम्बर पाकिटात सारला आणी ...."
आयला हे बरंय, सरपंचा मात्र मास्तरिण बाई आणि आम्ही काय "शाळा सुटल्याची घंटा " वाजवायला का ?
येऊ दे अजुन !!!
[ शाळेची घंटा वाजवणारा ]छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
:))
आयला हे बरंय, सरपंचा मात्र मास्तरिण बाई आणि आम्ही काय "शाळा सुटल्याची घंटा " वाजवायला का ?
हा: .. ह्हा:.. ह्ह्हा:......
आयला हे बरंय, सरपंचा मात्र मास्तरिण बाई आणि आम्ही काय (शाळा सुटल्याची)" घंटा " वाजवायला का ?
जबराच
आयला हे बरंय, सरपंचा मात्र मास्तरिण बाई आणि आम्ही काय (शाळा सुटल्याची)" घंटा " वाजवायला का ?>>>>>>>.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
छान.
मस्त मज्जा आली वाचायला, अजुन येऊद्यात.
लै भारी रे!
सखाराम भाऊ,
)
कुडचेडकर आणि येरकुंटकरांचं अभिजात साहित्य सोडून हे काय चालू केलंत? अहो, "केतकी पिवळी पडली" चं रसग्रहण लिहा की (पिवळ्या रंगाच्या साम्यामुळे कोणीही केतकीचा डांबिसकाकांशी बादरायण संबंध जोडू नका हो...हां आता त्यांनीच झपाटल्यानं ती केतकी पिवळी पडली असली तर आपल्याला काय ठाव न्हाई बा!)
खल्लास रे
)
हाण तिच्याआयला.....
सरपंच...हे वागनं बरं न्हवं
च्यामायला, किती दिवसांनी डान्याची कोलांटी रे!!! हाण तिच्याआयला
पण मी काय म्हणतो, पिक्चर काढायचंय ना? मग फिकीर कसली राव?
आपले मास्तर काय पटकथा लिहितात..अरे भलेभले गार पडतील. खोटं नाही बोलत मी...हातात विडी आहे, अग्नि शप्पथ सांगतो. मास्तर एखादी पटकथा लिहाच आता तुम्ही...बाकीची काळजी नको, च्यामारी, त्या सुभाष घई आणि रामू वर्माला सांगून ठेवतो, बघू कोण चांगलं डील देतोय ते...क्काय?
मस्त 'प्रांतिय जाज्वल्य अभिमानाची कौटुंबिक अभिव्यक्ति' असलं काहीतरी सबटायटल हाणू त्याला...तुम्हाला सांगतो, उड्या पडतील उड्या...हाणामार्या होतील शिणेमा बघायला...खोटं नाही सांगत...अग्नि शप्पथ!
डांबिसकाका, तुम्ही चिंताच सोडा हो, पैसा पैसा काय है? आपले सरपंच एकदम दिलदार माणूस हां! अहो गावची पोरं-सोरं शिणेमा करत्यात म्हणल्यावर इकडून-तिकडून पैसा उभा नाही राहिला तर आपले सरपंच धा-पाच एकराच्या तंबाखूचा बंबाखू झाला असं म्हणून एका वट्टात सोत्ताच्या खिशातून पैसा पुरवतील...
सरपंच, मास्तर, आन् मंडळी तुम्ही फकस्त हो म्हणा...येक फॉर्म देतो त्याच्यावर सह्या हाणा..बाकीचं सगळं मी बघतो...
असा शिणेमा उभा करु की; तिच्यामायला, सा म्हैन्यात कान फेश्टिवल ला जाईल....खोटं नाही सांगत...हातात विडी आहे, अग्नि शप्पथ !
गाडी पुढे न्या
गटणे मामा पिक्चर चा मुहुर्त जोरात केला होत्ता. गाडी पुढे न्या की
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत