मिपावर चित्रकलाविषयक स्वतंत्र विभाग सुरु करावा का?

जरूर, आम्हाला मिपाकरांनी काढलेली अजून नवनवीन चित्रे पहायला आवडतील.
94% (३४ votes)
मुळीच नको, चित्रं बघून कोणाचं भलं झालंय!:)
3% (१ vote)
माहित नाही, आम्ही जन्मांधळे असल्याने चित्रं म्हणजे काय ते आम्हांला कल्पना नाही:)
3% (१ vote)
एकुण मतं : ३६

मस्त कल्पना.

मिपावर एक सो एक चित्रकार आहेत आणि त्याची चित्र पहाण्यास स्वत॑त्र विभागच सुरू झाला तर आन॑द आहे.

मिपा

करांची उत्तम चित्रे नक्कीच पहायला आवडतील

चतुरंग

जरूर

मिपाकरांची चित्रे पहायला नक्कीच आवडेल. मला वाटते त्यातही २ उपविभाग असावेत..
एक पेन, पेन्सिल, रंग वगैरे माध्यम वापरून काढलेल्या चित्रांसाठी आणि दुसरा कॅमेर्‍याने टिपलेल्या चित्रांसाठी.

ईश्वरी

सहमत.....

दुसरा कॅमेर्‍याने टिपलेल्या चित्रांसाठी.

हे झाल तर मस्तच.....

(फ फ फोटो चा ) असे म्हणणारा.....
मदनबाण.....

नको, कारण

नको, कारण सतत चित्रे काढणारी मंडळी आहेत का ते पहावे लागेल...
नाहीतर चित्रांचा विभाग तसाच पडून रहायचा ...

हेच म्हणतो..

नको, कारण सतत चित्रे काढणारी मंडळी आहेत का ते पहावे लागेल...
नाहीतर चित्रांचा विभाग तसाच पडून रहायचा ...
मास्तरांशी सहमत..
(सहमत)केशवसुमार
पण विभाग चालू केलातर काही उत्साहि लोक चित्र काढायला पण सुरवात करतील..
(आशावादी)केशवसुमार

सहमत

मास्तरांशी सहमत...

उगाच आरंभशूरपणा नको.. Smile)

सध्या मंडळींना जनातलं-मनातलं विभागातच चित्रं टाकू देत. चित्रकारांच्या उत्साहात सातत्य दिसलं तर वेगळा चित्रकला विभाग नक्कीच काढू.....

तात्या.

वेगळा विभाग !!!

चित्रकलेसाठी वेगळा विभाग असला पाहिजे असे वाटते.

चित्रकारांच्या उत्साहात सातत्य दिसलं तर वेगळा चित्रकला विभाग नक्कीच काढू.....

चित्रकारांनी पुढे चित्रे नाही काढली तर आम्ही नुसत्या रेघोट्या मारु अन् तिथे चित्र टाकू आणि त्याचा काय अर्थ असेल तो वाचकांवर सोडवू Smile पण चित्रकारांसाठी वेगळा विभाग झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.

- प्रा.डॉ.
(वर्षानुवर्ष डोंगर आणि उगवत्या सूर्याचे चित्र काढणारा चित्रकार Smile)

ओक्के!

चित्रकारांनी पुढे चित्रे नाही काढली तर आम्ही नुसत्या रेघोट्या मारु अन् तिथे चित्र टाकू आणि त्याचा काय अर्थ असेल तो वाचकांवर सोडवू पण चित्रकारांसाठी वेगळा विभाग झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.

ओक्के, Done.. ! Smile

तात्या.

कौल जरासा

'पक्षपाती' झालेला आहे कारण इतर दोन पर्याय असे काही विशिष्ट शब्दरचना करुन दिलेले आहेत की नेमका 'हवा तोच' पर्याय निवडला जावा Smile
Smile)

पण वेगळा विभाग हवाच !

मी पण

जरासा सहमत!
पिडाकाका, कौलाचे प्रर्याय देताना थोडासा डांबिसपणा केलात हो Wink

अगबाई, खरंच की!

कौल 'पक्षपाती' झालेला आहे कारण इतर दोन पर्याय असे काही विशिष्ट शब्दरचना करुन दिलेले आहेत की नेमका 'हवा तोच' पर्याय निवडला जावा
कौलाचे प्रर्याय देताना थोडासा डांबिसपणा केलात हो
तसा हेतू नव्हता. मी फक्त ते पर्याय (तुम्हा लोकांच्या अभिप्रायावरून असं दिसतंय की असफलरित्या!) विनोदी बनवण्याचा प्रयत्न केला होता.Smile

अरे आपल्या मिपावरची मंडळी इतकी भोळी-भाबडी आहेत का की मी वापरलेल्या शब्दांमुळे त्यांची दिशाभूल होईल?

तरीही सर्वांसाठी जाहीर निवेदन:
हे तीनही पर्याय सारख्याच वेटेजचे असून आपल्याला हवा तो पर्याय मुक्तपणे निवडावा.

मिपावर एकदा प्रकाशित केलेले लेखन लेखकाला संपादित करता येत नाही .तरी सरपंचांना यांत कुणाच्या भावना दुखावल्या जाण्याचा संशय आला तर त्यांनी पर्यायांमध्ये योग्य ती दुरुस्ती करावी.

-पिवळा डांबिस

:)

Smile
पिडाकाका, आमचाही तसा हेतु नव्हता बरं का! Wink
फक्त वरती ह.घ्या. असं लिहायला विसरलो.

अवांतर - पिडाकाकांशी कोण पंगा घेईल म्हणा......उगाच उद्या मला झाड बनवतील Big Grin
(कृ.ह.घ्या.)

(घाबरलेला) टिंग्या Nail Biting

हो, जरुर

हो, जरुर सुरु करावा असा एखादा विभाग.

सहमत...

नक्की करा हा विभाग सुरू.

पण विभाग चालू केलातर काही उत्साहि लोक चित्र काढायला पण सुरवात करतील..
केशवसुमारांशी सहमत.

चित्रकारांनी पुढे चित्रे नाही काढली तर आम्ही नुसत्या रेघोट्या मारु अन् तिथे चित्र टाकू आणि त्याचा काय अर्थ असेल तो वाचकांवर सोडवू पण चित्रकारांसाठी वेगळा विभाग झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.
ओक्के, Done.. !

त्यात एक मॉडर्न आर्ट नावाचा लेखन प्रकारही असू द्या Wink

मिपाकरांची चित्रे पहायला नक्कीच आवडेल. मला वाटते त्यातही २ उपविभाग असावेत..
एक पेन, पेन्सिल, रंग वगैरे माध्यम वापरून काढलेल्या चित्रांसाठी आणि दुसरा कॅमेर्‍याने टिपलेल्या चित्रांसाठी.

ईश्वरींशी सहमत.

उम्म्म्म...
थोडक्यात, आतापर्यंतच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत. Big Grin

सहमत आहे ...

"चित्रकारांनी पुढे चित्रे नाही काढली तर आम्ही नुसत्या रेघोट्या मारु अन् तिथे चित्र टाकू आणि त्याचा काय अर्थ असेल तो वाचकांवर सोडवू पण चित्रकारांसाठी वेगळा विभाग झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.
त्यात एक मॉडर्न आर्ट नावाचा लेखन प्रकारही असू द्या "

हां, हा महत्वाचा भाग आहे ...
आमची चित्रे [ पक्षी : आम्ही काढलेली पण आमची स्वताची नसलेली ] ही "मॉडर्न आर्ट" ह्या प्रकाराशिवाय दुसर्‍या कशात मोडूच शकत नाही. सबब हा विभाग सुरु करताना त्यात आमच्यासाठी वेगळ्या दालनाची सुविधा असावी ...

दुसर्‍याचे "पिवळ्या रंगाचे खडू " पळवणारा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सहमत

>>दुसरा कॅमेर्‍याने टिपलेल्या चित्रांसाठी.
सहमत

चित्रे आणि प्रकाशचित्रे

चित्रे आणि प्रकाशचित्रे दोन्हीसाठी मिळून एक विभाग असण्यास फुल टू पाठींबा.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश