टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मिसळ आणि गोटी-सोडा.....
कोल्हापुर.....मी या शहरात आलो की बर्याच गोष्टींचा आनंद अगदी न चुकता घेण्याचा प्रयत्न करतो.....
त्या पैकीच एक गोष्ट म्हणजे कोल्हापुरची मिसळ ..
या वेळी यथेच्छ मिसळ खाल्ली.आहाहा काय सांगु तुम्हाला.....
या वेळी बरीच यादी पाहिली होती मिपा वर कुठे कुठे मस्त मिसळ मिळते ते.......त्यामुळे त्या यादीतील फडतरे हे नाव लक्षात ठेवले.....
इतके वर्ष मी कोल्हापुरात येतो आहे पण त्यांची मिसळ काही खाल्ली न्व्हती.
मिसळ खाण्याची सुरुवात आम्ही चोरग्यांपासुन केली.
आम्ही (आई,बाबा व मामा) ही मिसळ खाण्यास फार आतुर झालो होतो.
माझ्या समोर आलेली मिसळ ही अशी होती...................

मी या मिसळीवर मजबुत ताव मारला..आणि हो इकडे मिळणारा पाव हा आयताकृती असुन चवीला एकदम मस्त असतो.. काही वेळातच परत एकदा वाढप्या गरमगरम झणझणीत कट घेऊन समोर उभा राहिला.
चोरगे , मोहन आणि फडतरे या तिन्ही ठिकाणी हजेरी लावुन आलो.....
व्वा कोल्हापुरी मिसळेची बातच काही और आहे...............
मोहनच दुकान जरी लहान असल..(काही वर्षापुर्वी रस्ता रुंदीकरणात जवळ जवळ पाऊण दुकान गेल.....)तरी तिथ मिळणारी मिसळ ही सुंदरच असते.
आता वेळ होती फडतर्यांची मिसळ चापण्यासाठी.....
खुप रांग लागते तेथे मिसळ खाण्यासाठी म्हणुन मी व माझा मामे भाऊ सकाळी सकाळी तेथे गेलो...आणि मिसळीचा मस्त नजारा पाहिला.

हे दुकान सुद्दा छोटेखानी असुन फडतरे कुटुंबीय पहाटे पासुनच या मिसळ बनवण्याच्या कामात स्वतःला गुंतवुन घेतात.
फडतर्यांची मिसळ बरीच प्रसिद्द आहे याचे दाखले मला तेथेच पहायला मिळाले.


ही मिसळ बनवताना त्यांची चालु असलेली तयारी मला टिपता आली.

तयार झालेली मिसळ माझ्यासमोर हाजीर......

या वेळी मिसळ मिसळ आणि फक्त मिसळ चापली.....
आता जी दुसरी गोष्ट मला आवडते ती म्हणजे गोटी सोडा..

या गोटी सोड्याची चव मला अजुनही विसरता येत नाही...
त्याची ती विशिष्ठ आकाराची बाटली...
बाटली उघडण्याची ती आगळी वेगळी पद्दत..आणि ती उघडताना होणारा आवाज...सर्व काही निराळच.....
साध्या सोड्या पासुन ते मसाला सोडा पिण्याची कमाल मी या वेळी केली.
या गोटी सोड्याच मला फारच आकर्षण आहे...रंकाळा किंवा एस.टी स्थानक या ठिकाणी हा गोटी सोडा हमखास मिळतो.....
हा गोटी सोडा आता हळुहळु विलुप्त होत चालला आहे.
(मिसळ आणि गोटी सोडा प्रेमी)
मदनबाण.....
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


छान.
हो, कोल्हापुराची मिसळ अशीच असते, फोटो छान आलाय, आणि ब्रेडच्या स्लाईस असतात,
माझ्याकडे २१ला किटी पार्टी आहे, त्यामध्ये मी माझ्या मैत्रीणी॑ना कोल्हापुरी मिसळ , दही वडा, आणि पुलाव असा मेनु टेवला आहे.
कारण पुण्यात कादा॑पोहे डिशमध्ये ठेऊन त्यावर मटकीचा कट घालतात, आमच्या येथे कोल्हापुरात मटकीची उसळ मोड काढलेली आणी त्यामध्ये भिजवलेले शे॑गदाणे, एवढेच असते.
गोटी सोडा माहित आहे पण चव नाही घेतली अजुन. पुढच्या वेळी कोल्हापुरला गेल्यावर नक्की घेईन.
क्या बात है...
पुण्यात कादा॑पोहे डिशमध्ये ठेऊन त्यावर मटकीचा कट घालतात, आमच्या येथे कोल्हापुरात मटकीची उसळ मोड काढलेली आणी त्यामध्ये भिजवलेले शे॑गदाणे, एवढेच असते.
हे मात्र खरं आहे. म्हणून पुणेरी मिसळ मला विशेष नाही आवडत.
गोटी सोडा ...... येस्स. सह्हीच लागतो... वा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
गोटीसोडा
गोटीसोडा गोव्यातपण मिळतो, आणि अजून चव नाही घेतलीस शीतल????? कुठे फेडशील हे पाप??????
वा!
वा! मिसळीची आणि गोटी सोड्याची प्रकाशचित्रे मनमोहक आहेत!
तात्या.
हो चल आलेच.
>>>>गोटीसोडा गोव्यातपण मिळतो, आणि अजून चव नाही घेतलीस शीतल????? कुठे फेडशील हे पाप??????
यशोधरा,
मला आता ते पाप फेडायची लै इच्छा झाली आहे, मग चल आपण दोघी तो गोटी सोडा पिऊन टाकु. त्याआधी मिसळ खाण्याचे पुण्यकर्म करू, आणि बिल भरण्याचे सत्कार्य तु कर.
>< वा
>
<
वा मदनदा....
मिसळ...गोटी सोडा...क्या बात है!
आणि खास मदनदा स्पेशल 'फोटू युक्त' लेख
थ्यांक्यू रे मदनदा...मागच्या वेळी आपण बोललेलो गोटीसोड्याबद्दल, ते हे असं सचित्र इथं देशील असं नव्हतं वाटलं...मजा आली..
>> बिल
>> बिल भरण्याचे सत्कार्य तु कर
अग तू बिलाची काय चिंता करतेस?? मदनबाणने लेख लिहिल्यामुळेच तर आता आपल्याला इच्छा होतेय हे खायप्यायची? वरून फोटू पन टाकलेत!! आपण बिल त्यालाच पाठवून देऊ, कस??
बिल का मामला है.....
आपण बिल त्यालाच पाठवून देऊ
नो प्रोब्स ताई लोग तुमचा हा छोटा बंधु बिल भरण्याचे सत्कार्य करण्यास तत्पर आहे.....
बोला कधी येता मिसळ खायला ?
(मिपा वरील तायड्यांचा नटखट बंधु)
मदनबाण.....
सह्ही
फोटो मस्त आहेत्....
मदनदा? हे नवीनच रे धमु?
मदन्या चा मदनदा कधी झाला?
अहाहा
मिसळ आणि गोटी सोड्याचे फोटु उत्तम...
____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
+१
फोटो खल्लास आले आहेत. लगे रहो !
तो॑डास
तो॑डास पाणी सुटल॑ फोटो पाहून..
फोटो
फोटो आणि त्यावरची टिपण्णी दोन्ही मस्त!
स्वगत : पण आता इथे कुठे मिसळ मिळणार? कर ,स्वाती आता तूच मिसळ कर त्याशिवाय काही खरं नाही..
(मिसळ खाण्यास आतुर)स्वाती
मिसळ व
मिसळ व गोटी सोडा ! क्या बात है !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
वा!`
माझ्या गावची खासियत


मोहन मिसळ कुठे खाल्ली हे सांगणार का???
पुढच्या ट्रिपला हाणावी म्हणतो.
गोटी सोडा हा आधी सर्रास सगळीकडे मिळायचा आता कोल्डरिंक मुळे दुर्मिळ आहे.
त्याची बाटली आणि उघडल्यानंतरचा आवाज मला आवडतो. पण तो सोडा आवडत नाय बॉ.
जळजळ होते जिभेवर. अर्थात लहान असताना ट्राय मारला होता आता परत ट्राय करुन बघायला हरकत नाही.
मदणबाण फोटो छान आले आहेत.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मोहन मिसळ
झकासराव, अहो आपल्या हॉटेल मोहनची मिसळ. महाद्वारापासून जरा पुढे गेले की अनुबंधन स्टोअर्स, भूषण स्वीट मार्ट च्या जवळच आहे की. अप्रतिम असते.
आपला,
(मिसळप्रेमी) अनिरुद्ध दातार.
प्यारे मोहन.....
झकासराव..... जवळच कटके आणि बहिरशेठ ही दोन अत्तराची दुकाने आहेत... छान अत्तरे मिळतात तिथे...
(अत्तर प्रेमी)
मदनबाण.....
मस्त!
फोटो बघून तोंड चाळवले गेलेय आता मिसळ करायलाच हवी लवकरच!
गोटी सोड्याची बाटली बघून मनात 'ठँप्प्प्प्...सुंईईईईई' अशा उघडलेल्या बाटलीचा आवाज आला आणि तोंडावर चव मिरमिरली!
चतुरंग
मस्तच रे
मस्तच रे मदनबाणा. फोटो पण छान.
मी चोरगे मिसळ खाल्ली आहे. मस्त असते.
वा! क्या बात है!
वा! काय मस्तच फोटो आले आहेत मिसळीचे बघून तोंडाला पाणी सुटलं. वा तुम्ही एकतर एकटे मिसळ चापणार वर आम्हाला
जळ्वायला छान फोटो पण पाठवणार.(हे आकाशातील देवा त्यांना माफ कर )
एकदा या की कोल्हापुरात
प्रगतीताई, या एकदा आमच्या कोल्हापुरात. फडतरे, चोरगे, मोहन, आहार, खासबाग अशा सगळ्या मिसळी खाऊ घालतो. तेंव्हा मग फोटो काढून येथे प्रकाशित करा.
)
(जळवूया इतरांना.......
वा! मस्त आयडिया.
मी तुम्हाला काय अभियंता दादा म्हणू का?
तर मी काय सांगत होते कोल्हापूरच्या मिसळीचे फोटो सगळ्यांनी बघितले तुम्ही आमच्या ठाण्याला या, आपण ठाण्याची प्रसिद्ध" मामलेदार मिसळ "खाऊ .आपले मिसळ खातानाचे फोटो प्रकाशित करु आणी
त्यांना जळवू
मामलेदार मिसळ
खूप ऐकुन होतो, तेव्हा ठाण्याला गेलो होतो त्यावेळेस आवर्जुन खाल्ली. आधी मिडीयम घेतली, ती आवडली नाही म्हणून तिखटही घेतली. दोन्ही मिसळी नाही आवडल्या! जरा घाबरत होतो सांगायला...पण आता धीर केला. त्यात नुसतेच तिखट होते, चव नाही (पुण्यातील रामनाथ सारखे); शिवाय लिंबू पण नाही. मीठ आणि लिंबाशिवाय तिखटाला मजा नाही. तिखट झेपते हो, पण मिसळीला चव तर हवी ना? एकूणच "मामलेदार मिसळ" नाही आवडली. पुण्यातली बेडेकर पण नाही आवडली. सध्या तरि पुण्यातली "काटा किर्र" माझी सगळ्यात आवडती आहे - तिखट पण आणि चवदार पण.
एकदा कोल्हापूरला मिसळ दौरा काढायची इच्छा आहे, बघुया कधी जमते. पुण्यात अजून कुठे आहे का चांगली मिसळ? तापीकर काकांची ठीक आहे, खास नाही.
चिंचवडला
चिंचवडला नेवासे ची ट्राय करुन पहा...
काटा किर्रर्र....ला सध्या तोड नाहीच
सहमत...
पुण्यातली बेडेकर पण नाही आवडली. सध्या तरि पुण्यातली "काटा किर्र" माझी सगळ्यात आवडती आहे - तिखट पण आणि चवदार पण.
सहमत. 'काटा किर्र' बेष्ट. 'श्री मिसळ'ही चांगली आहे. 'श्री मिसळ' आता पौड रोडवर 'येना' बंगल्याशेजारीही मिळते.
ठाण्यातील 'मामलेदार मिसळ' मला तरी आवडली बाबा.
श्री - शनिपार का?
श्री म्हणजे शनिपार का? मला तिथली चव ठीक वाटली, पण फारच 'सौम्य' होती - तिखट नाही.
होय..
होय, तिच मिसळ. नारायण पेठेतही आहे. आणि आता पौड रोडवर.
अरे वा
अरे वा श्री आता तिथे मिळायला लागली का? सहीये! मला तरी तीच मिसळ आवडते, कारण तिखट नाही झेपत! बेडेकरंची खाल्ली होति, मेजर तिखट वाटली, पण चवीला श्रीच बेस्ट(आत्तापर्यंततरी..) हे काटा किर्र (नाव भारीय!) हा प्रकार नवीनच दिसतोय, ट्राय केली पाहीजे!
http://bhagyashreee.blogspot.com/
अरे वा!
अभियंता धन्यवाद रे.


आता गेलो की खाउन येइन.
मदणबाण हो हो ती दुकान माहीत आहेत. माझ्या लग्नाच्या वेळी मी तिथुनच घेतले होते अत्तर.
मामलेदाराची मिसळ मला तरी आवडली. तिखट सांगुन घेतली होती. चवीच म्हणाल तर फक्त मला मीठ कमी वाटले पण चव चांगली होती.
फडतरेच्या जवळपास जाणारी. मला तरी ती मिसळ फार तिखट वाटली नाही.
हे काटा किर्र आहे कुठे नेमक?? कोथरुडात कुठेस आहे अस इकडेच वाचलय पण नेमक लोकेशन काय??
आणि मला नेवासे जवळ आहे मी जैन तिकडे खायला. हीच नेमक ठिकाण सांगा बघु???
आकुर्डीत "जयश्रीची"मिसळ चांगली मिळते.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
काटा किर्रर्र....
काटा किर्रर्र...गरवारे कॉलेज समोर थोडा पुढे डेक्कन साईडला आहे. रेल्वे रिझर्वेशन समोर.
उगाच पुणेरी लोकांना शिव्या घालतात...खाण्याचे ठिकाण ५ वाजता बंद म्हणजे हद्द झाली!
तो मिसळ वाला कोल्हापुरचा आहे, (तरीही) तो दुकान संध्याकाळी ५ वाजता बंद करतो!
मामलेदाराची मिसळ - मीठ मलाही कमी वाटले म्हणून मागून घेतले ते मिळाले, पण लिंबू मागितले तर नाही म्हणाले. (असे अनुभव ठाण्यातही येतात, उगाच पुणे बदनाम...असो!)
माझ्या
माझ्या लग्नानंतर माझ्या दिरांनी तु ठाण्याची ना तुला कोल्हापुरी ठसका दाखवतो असे सांगून रोज वेगवेगळ्या ठिकाणची मिसळ खाउ घातली होती. काय मस्त दिवस होते ते.त्या मुळे कोल्हापूरची बहुतेक ठिकाणची मिसळ मी खाल्ली आहे. नंतरच्या भेटित ते कधिहि चल मिसळ खायला असे म्ह्टले नाहित.
उद्या...
फारच पाणी सुटलय तोंडाला...उद्या जातो जरा मिसळ खायला...येतय कारे कोणी? एक मिनी मि.पा. कट्टा जमवू या सकाळीच मिसळीचा.
पेठकर काका - तुमच्याकडेच येउ का? फक्त जागा नक्की कुठे आहे ते नाही कळले अजून. सिंबॉयसिस चे कुठले क्~अन्टिन? (कसे लिहायचे हे?)
मिसळप्रेमी
म्या पन् येकेकाळी मिसळप्रेमी व्हतो. लई तिकटं खाल्यात राव. पन् येक वार्निंग हाय बगा समद्यांना, हांसत कर्म करावे ...... तसा प्रकार व्हतो माज्यासारके म्हातारे जाल्यावर, अन् मग निस्ती आ..गा ग !!!!