टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
ट्रकवाले - २
आत जाऊन सिट वर बसलो आणि हा ट्रक कुणाचा असा विचार करत असतानाच मागच्या बाका वरून आवाज आला 'मै अर्जून'. ट्रकचा मालक आरामात मागच्या अरूंद बाकावर बसरला होता. 'मै जोशी' 'ऐसी बारीश बरसोंके बाद लगी है, रात भर चलेगी शायद' असं म्हणून त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहीलं.'
मी मनात म्हटलं असं नको म्हणू मेल्या, तू इथेच आडवा पडून रहशील. मला ३५-४० किलोमीटर बाईक हाकत जायचंय घरी.
क्या करते हो आप.
मला त्याला ऍड एजन्सी मध्ये कॉपीरायटर म्हणजे काय हे कसं समजवावं हे न सुचल्याने मी म्हणालो 'प्रायवेट कंपनी में हूं'
हं...
हं...
ये ट्रक आपका है?
ह्या वर तो हाहाहा करून हसला.
अगर मेरा ट्रक होता तो और क्या चाहिये था...
बहुसंख्य ट्रक वाल्यांप्रमाणे हा सुद्धा दुसऱ्या कुणाचा ट्रक चलवत होता. आणि बहुसंख्य ट्रक वाल्यांप्रमाणेच आपल्याही मालकीचा एखादा ट्रक असावा हे त्याचं स्वप्न होतं.
कबसे चला रहे हो ट्रक?
कुछ ६-८ साल हो गये. छोटा था तब पिताजी के साथ घुमता था. वो भी ट्रक चलाते था. बडा होने पर उन्होने अपने मालीक की ट्रांसपोर्ट कंपनी मे लगा लिया. और तबसे घर छूट गया.
आता हा पुढे ट्रक ऍक्सीडंट मध्ये वडील गेले असं सांगतो की काय असं वाटलं. पण सुदैवाने ते जिवंत होते. पण आता वयामुळे असं ट्रक चलवणं जमत नव्हतं. म्हणून त्याच्या वडिलांनी गावातून जाणाऱ्या हायवे वर ट्रकचं गॅरेज काढलं होतं. घरी आई, वडील, बायको आणि एक ३ वर्षाचा मुलगा होता. इतर ट्रक चालवणाऱ्या लोकांप्रमाणे हा सुद्धा आयुष्यावर नि गरीबीवर वैतगलेला असेल असं मला वाटलं. पण हा तर एकदम जॉली माणूस निघाला. त्याने आता रस्ता म्हणजेच आपलं घर हे सत्य स्विकारलं होतं.
तुम ऐसे हमेशा घर से बाहर रहेते हो, बिवी कुछ बोलती नहीं?
पेहले बोलती थी, मगर उसके पिताजी भी ट्रक चलाते थे. सो उसे आदत है. मुझे भी शुरुवात में बहुत याद आती थी घर की. पर अब एहसास भी कुछ धुंधलेसे हो गये है.
आप कहांसे हो?
कहांसे मतलब? यहीं से हुं. जनम बंबई मे ही हुवा है.
मुंबई
हां. अब मुंबई. मगर मेरा जनम हुवा तब वो बंबई ही थी. हा हा हा हा
मी पण हा हा हा हा
मनात विचार आला हा तर साला ओरिजीनल ट्रकवाला नाहीये. ट्रकवाला म्हटलं की उंचा पुरा मध्यमवयीन पंजाबी माणूस, छाती पर्यंत वाढलेली पिकलेली धाढी, डोक्यावर फेटा, असा अवतार डोळ्या समोर येतो.
तेवढ्यात हा बोलला 'वैसे गांव पंजाब में है. पिताजी और मां अब वहीं रेहते है.' मी जरा खुश झालो.
कभी जाते हो उनसे मिलने.
कभी कभी डिलीवरी के लिये गांवसे गुजरता हुं तब मिल लेता हुं.
अर्जुन अशिक्षीत असला तरी असंस्कृत नव्हता हे मला त्याच्याशी झालेल्या पुढल्या भेटींतून उलगडत गेलं. हॉर्न - ओके - प्लीज चा अर्थ त्यानीच मला समजावला. हॉर्न (उजवीकडे) - ओके (मध्यभागी) - प्लीज (डावीकडे) असं लिहिलेलं असतं. ह्याचा अर्थ म्हणजे उजव्या बाजुने ओवरटेक करायचा असेल तर हॉर्न वाजवा, मागे मागे यायचं असेल तर ठीक आहे, नि डव्या बाजूने जायचं असेल तर प्लिज जा. हॉर्न ची गरज नाही.
गपा मारता मारता त्यानी मला विचरलं लग्न झालंय का? मी नाही म्हणाल्यावर तो एकदम आश्चर्य चकीत झाला. त्याच्या लग्नाला ४ वर्ष झाली होती. नि मी त्याच्यापेक्षा मोठा असून अजून एकटाच होतो. नालायक परी ने ही त्याची बाजू घेतली. माझी सुटका करून घेण्यासाठी त्याच्या लग्नाचा विषय काढला.
त्याचा प्रेम विवाह होता. पण बायको मुसलमान होती. तिचे वडील सुद्धा ह्याच्याच ट्रांसपोर्ट कंपनीत ट्रक चालवायचे. त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ह्याची तिच्याशी ओळख झाली. ह्याला ती बघता क्षणीच आवडली. हळू हळू भेटी गाठी वाढत गेल्या नि दोघे प्रेमात पडले. एकत्र जगण्या मरण्याच्या शपथा घेऊन झाल्या. एके दिवशी अर्जुन ने घाबरत घाबरत वडीलांसमोर विशय कढला. सांगीतलं मला शहीदा आवडते. शांतपणे विचार करून ते म्हणाले 'बेटा, तेरे खुशी में ही हमारी खुशी है. मगर मै रफीक को जानता हुं. वो कभी नही मानेगा.' ह्याने एकदा घरून परवानगी मिळाल्यावर तिला तिच्या वडीलांशी बोलायला सांगितलं. अपेक्षे प्रमाणेच ते भडकले. घरी येऊन हात पाय तोडायच्या धमक्या देऊन गेले.
मग महिना भर शहीदा घरात बंद होती. तिची आई मात्र नशिबाने त्यांच्या पाठीशी होती. तिला हाताशी घेऊन ह्यांनी एक प्लॅन बनवला. दोघांनी ह्याच्या गावाला पळून जाऊन लग्न करायचं. इथलं शांत होई पर्यंत त्याच्या भावाच्या घारी रहायचं. पोटा पाण्या साठी त्याच्या भावाने तिथल्या एका हॉटेल मध्ये ह्याच्या नोकरी विषयी बोलुनही ठेवले. ठरल्या प्रमाणे हे दोघे मध्य रत्री घरून निघाले. पण नशीब आडवं आलं. तिचे वडील त्या दिवशी ड्युटी संपवून लवकर घरी आले नि ह्यांना बघितलं. आरडा ओरडा करून मोहोल्ल्यामधली माणसं जमवली नि ह्याला बेदम मारलं.
पोटच्या पोराची ही अवस्था बघून ह्याचे वडीलांचं पंजाबी खून सळसळून उठलं. रफ़ीकच्या घरी जाऊन 'दिन दहाडे तेरी बेटी को तेरे आखोंके सामने ले जाउंगा, जो उखाडना है वो उखाडले' असं सांगून आले. नि अर्जुन बरा झाल्यावर खरंच एके दिवशी त्याच्या घरी ६ ट्रक भरून माणसं घेऊन गेले. निघण्यापुर्वी शहीदाला विचरलं 'बेटा, तुझे इस शादी से कोइ ऐतराज तो नहीं. ' ती नाही म्हणाल्यावर दोघांना घेऊन तडक रजिस्ट्रार ऑफीस गाठलं नि लग्न लाऊनच परत आणलं. माणसं जमवणं, पोलिसांना पुर्व सुचना देणं, रजिस्ट्रार ऑफीस मध्ये तारीख घेणं ह्या सगळ्या तयाऱ्या त्याच्या वडीलांनी आधीच केल्या होत्या. भारी माणूस.
त्या नंतर तिच्या वडीलांनी तिच्याशी बोलणंच टाकलं. आई मधून मधून दर्ग्यात भेटायची. वडीलही मुलीच्या भेटीसाठी मनतल्या मनात झुरत होते. तिला ह्या काफिरांच्या घरी त्रास होउ नये म्हणून अल्ला ला सकडं घालायचे. पण सरळ बोलायला इगो आड येत होता. तोही एके दिवशी गळून पडला. शहीदा ला ६ वा महीना चालू असतान ती एकदा दर्ग्यात गेली होती. बाहेर पडताना समोरून तिचे वडील आले. तिला तसं बघून ते क्षणभर थांबले नि मग तिला एकदम मिठी मारून मनाचा बांध फुटल्या सारखे रडायला लागले. अश्रुंसोबत मनतली जळमटंही वाहून गेली.
थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि मी घरी जायला निघालो. तर हा म्हणाला 'अब इतनी रात गये कहां घर जा रहे हो? यहीं सो जाओ ट्रक में. पिछे कंबल डाल के देता हुं. चाहो तो यहां बाकडे पे सो जाओ' मी म्हटलं 'रात का डर नही भाई. रात अपनी सहेली है. फिर मिलेंगे.'
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


पुढे?
पुढे?
अहो श्वास
अहो श्वास घेउ द्या की जरा. मनस्वी ने सांगीतल्या प्रमाणे ऑफीसचं काम सोडून हे टाईप केलंय. आता काम करावंच लागणार
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
आज
आज सुक्कीरवार हाय, बिनकामाचा दिवस
फकस्त ह्ये फुडं लिवायच बघा 
पुढे..?
अर्जुनच्या कहाणीत इंटरेस्ट वाटतो आहे,पुढचा भाग लवकर येऊ दे..
हा भाग छान झाला आहे,
स्वाती
पुढला भाग
पुढला भाग नंतर. नाहीतर मला अर्जुन चा क्लीनर व्हावं लागेल
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
हॉर्न - ओके - प्लीज
आत्ता कळला ह्याचा अर्थ!
स्क्रीन अंधुक दिसायला लागली हो..
मस्त लिहिलंय स्वयंभू.. पुढचा भाग लवकर येउद्या..
असेच म्हणतो...
"हॉर्न - ओके - प्लीज" आत्ता कळ्ळं ह्ये.
नाय तर मला म्हंजी वाटायाचं:-
हॉर्न्-ओके-प्लीझ =
" हॉर्नला ओ दिली की मगच पुढे जा प्लीझ. "
बाकी , लेख मस्त सुरु आहे.
पुढल्या भागांच्या प्रतिक्षेतः-
आपलाच,
मनोबा
पुढे काय
पुढे काय झाले ?
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
चला
चला मित्रहो मी आता कलटेश होतोय. भेटूच सोमवारी नव्या भागासोबत. हॅप्पी वीकएंड टू ऑल.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
हॅप्पी वीकएंड
भन्नाट आठवण... आता पुढच्या आठवड्याची वाट पाहतो.
झकास झालंय की राव.
दोन्ही भाग एकदम वाचले. मस्त रंगतेय कथा. पुढील भाग येऊ द्यात.
नीलकांत
छान
छान लिहिलंय
हॉर्न ओके प्लीज मधील डावे उजवे नाही कळले.
उजव्या
उजव्या डाव्याचा घोटाळा झालाय
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
हॉर्न ओके
हॉर्न ओके प्लीज मधील डावे उजवे नाही कळले
मलाही नाही..खर॑ म्हणजे 'हॉर्न' डावीकडे लिहिलेले असते.. जोशीबुवा॑चा काहीतरी घोटाळा झालेला दिसतो.. (कि॑वा ते 'डावखुरे' असावेत
पण छान लिहिता॑य, आवडीने वाचतो आहोत..
जोशीबुवांचा घोळ
जोशीबुवांचा काहीही घोळ झालेला नाहीये बरं का..
हॉर्न डावीकडे लिहिलेले असते की नाही.. म्हणजे डावीकडून ओव्हरटेक करताना हॉर्न वाजवा.
मागूनच चालवणार असाल तर "ओके" - काही हरकत नाही.
आणि उजवीकडून ओव्हरटेक करणार असाल - तर प्लीज.. तुम्ही खुशाल जाउ शकता.
अर्जुन
अर्जुन च्या स्टोरीत पुढे काय घडलं असेल ह्याची उत्सुकता आहे. आत्तापर्यतची स्टोरी छान झाली आहे.
मला प्रवासात ट्रकमागे लिहिलेली वाक्ये , शेर वाचायला मजा येत असे. अजूनही भारतात गेले की प्रवासात ट्र्क दिसला की असे वाचणे आपोआपच होते. काही काही लिहिलेले फारच मजेशीर असायचे...कधीतरी काहीतरी चांगलं ही लिहीलेलं वाचायला मिळायचं .
'बुरी नजरवाले तेरा मुह काला ' हे तर कॉमनच आहे.
ईश्वरी
फार मस्त
फार मस्त लेख! वेगळा विषय.. त्यामुळे फार उत्कंठा न ताणता संपवून टाक!
झकास!!!!!!!
'रात का डर नही भाई. रात अपनी सहेली है. फिर मिलेंगे.'
Dare Devil ईश्टाइइइइइइइल!!!!!!
स्वयंभू भाईंच लिखाण म्हणजे मेजवाणी असते! दोन्ही भाग एकदम वाचले. मस्त जमलेत. एक नंबर!! You Rock!!!
विकेंड ला घरी बसून सगळी स्टोरी लिहून टाक.
अरे वा
वेगळा विषय मस्त लिहिताय्....पुढच्या भागाची वाट पहातेय...
रात
रात अपनी सहेली है
अपना भी कुछ ऐसाही हाल है |
ऍडीजी एकदम मस्त लिवल हाय तुम्ही.....
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.....
मदनबाण.....
छान...
हॉर्न - ओके - प्लीज चा अर्थ त्यानीच मला समजावला. हॉर्न (उजवीकडे) - ओके (मध्यभागी) - प्लीज (डावीकडे) असं लिहिलेलं असतं. ह्याचा अर्थ म्हणजे उजव्या बाजुने ओवरटेक करायचा असेल तर हॉर्न वाजवा, मागे मागे यायचं असेल तर ठीक आहे, नि डव्या बाजूने जायचं असेल तर प्लिज जा. हॉर्न ची गरज नाही.
आत्ता कळला याचा अर्थ!
दोन्ही भाग छान...! सहजसोपं लिहिलं आहे, वाचायला चांगलं वाटतं आहे!
तात्या.
अवांतर - इतर काही हजारोंच्या संख्येने सभासद संख्या असलेल्या संस्थळांवर ह्याच्या पहिल्या भागाची प्रतिसादांच्या बाबतीतली दयनीय अवस्था पाहिली आणि क्षणभर वाईट वाटले! त्यातला एक प्रतिसाद मराठी भाषेच्या चुका काढणारा होता!
)
असो, आपल्या लेखनाची कुठल्या संस्थळावर काय किंमत होते हे या निमित्ताने लेखकांना कळाले तरी उत्तम!
आणि बरं का जोशीसाहेब, इथे तुम्हाला जे सहजसोपं वाटेल तसं मराठी लिहा. भाषेच्या नियमांची इथे सक्ति नाही. आम्ही मिपाकर भाषेच्या व्याकरणापेक्षा भाषेत व्यक्त केलेल्या भावना अधिक महत्वाच्या मानतो, भावनांनाच अधिक किंमत देतो! मिपावर व्याकरणाचे आणि शुद्धीकरणाचे आसूड ओढले जात नाहीत, तसेच मिपावर शुद्धीचिकित्सक नामक आचरटपणाही नाही!
असो...
आपलाच,
(कट्टर मिपाकर) तात्या अभ्यंकर.
हहमे...
'तिकडचा' प्रतिसाद बघितला... ह. ह. मे. (हसून हसून मेलो...)
बिपिन.
:)
'तिकडचा' प्रतिसाद बघितला..
वरील वाक्यातील 'ति' र्हस्व आणि 'घि' र्हस्व काढल्याबद्दल धन्यवाद बिपिनराव!
आपला,
(शुद्धीचिकित्सक!) तात्या.
गप रे...
गप रे तात्या, मेल्या लाजवतोस काय?
(ह्या वाक्यात शुध्द्लेखनची चूक काढून दाखव!!!)
'तिकडचा'
'तिकडचा' प्रतिसाद बघितला... ह. ह. मे. (हसून हसून मेलो...)
खरंच की हो !
लेखक महोदय,
तुम्हाला मास्तरांचा क्लास लावावा लागेल जोडशब्दांसाठी असे वाटत आहे..
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
तात्या,
तात्या, मिपा वेगळी आहे हे वेगळं सांगायची काय गरज??? म्हणूनच एखादा नवीन शब्द लिहीला कि तो प्रथम मिपा वर टाकतो.
हा ट्रकवाल्यावरचा वरचा लेख मी एक एक्सपिरीमेंट म्हणून सुरू केला होता. पण आपल्या सगळ्यांच्या प्रतीसादामुळेच आता मी त्याचं एका दिर्घकथेत रुपांतर करणार आहे. लेख लिहीण्याचे जितके श्रेय मला आहे त्याहून अधीकच मिपा करांच्या दिलखुलास प्रतिसादाला नी हौसला अफजाईला आहे. असेच प्रेम येउ द्या.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
चांगल
लिहिलय.


रात अपनी सहेली है क्या बात है
डावा उजव्यात गोंधळ झालाय हे खरं. कारण हॉर्न डाव्या बाजुला लिवलेल असत रे.
का त्याने उर्दु ष्टाईलीत उलट लिहिल असेल??
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
छान लिहिलेस.
छान लिहिलेस. मजा आली वाचून.
बाकी तुम्ही म्हणता ते खरं. मी 'तिथे' हा लेख वाचल्यानंतर प्रतिसाद लिहिण्यासाठी खाली गेलो आणि अचानक नाही लिहावासा वाटला. म्हटलं एवढा छान लेख असूनही एवढे मर्यादित प्रतिसाद का? मग मिसळपावर प्रतिसादांची रांग पाहून छान वाटले. आणि लिहून टाकला प्रतिसाद. (कदाचित हा अकृत्रिम आपुलकीचा भाग असेल का?)
खरं आहे..
मग मिसळपावर प्रतिसादांची रांग पाहून छान वाटले. आणि लिहून टाकला प्रतिसाद. (कदाचित हा अकृत्रिम आपुलकीचा भाग असेल का?)
भोचकगुरुजी, आपलं म्हणणं खरं आहे. अकृत्रिम आपुलकी आणि रोज नुसतं ऑनलाईन येऊन हजर सभासादांच्या यादीतल्या एका कोपर्यात मनातल्या मनात कुढत न बसता, प्रकाशित लेखनावर बरीवाईट जी काही असेल ती मनमोकळी दाद देण्याची वृत्ती अधिक महत्वाची!
तात्या.
मस्त...
जोशी बुवा.... रंगते आहे गोष्ट. येऊ द्या लवकर लवकर...
बिपिन.
अजुन वाचायला आवडेल.
छान लिहिले आहे, ट्रकवाला अर्जुन आणि त्या॑चे लग्न आणि त्या॑च्या वडिला॑ची जिगर मस्तच.
वा! लई भारी
लई भारी!! मजा आली
शेवटचे वाक्य तर कंडा!
पुढील भाग येऊ देत!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
है शाब्बास रे!
स्वयंभू,
मस्त
आवडला हाही भाग.
आयला, ह्या अर्जुनचा बा म्हणजे एकदम आमच्या पठडीतला दिसतोय की.
पोर घरातून पळवायची म्हणजे सगळी तयारी कशी पध्दतशीर.
एक काळ साला आम्हीही गाजवला होता ही "पुण्याची कामं" करण्यात. पोरीच्या सहीच्या ऍफिडेव्हिट पासून ते लग्नाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळं कसं नीट मॅनेज करावं लागतं बाबा!
वा....बाप असावा तर असा! च्यामारी कोण माईचा लाल आहे मग आडवा यायला?
हॅट्ट....येडेच असतात राव...एव्हढं प्रेम असतं पण भांडतात कशाला मग?
लढ बाप्पू !!!!
सगळी भुतावळ एकत्र जमलीये तर. आम्हीपण तुमच्या मैतरिणीचे चांगले मित्र आहोत म्हणलं
कामाच्या व्यापातून वेळ काढून लिहिलंयस, धन्यवाद....म्हणणार नाही ज्जा!!!!
पु.ले.शु.
-(किन्नर) ध मा ल.
किन्नर?
किन्नर?
असो.
================================
खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!
लडदू 'तो' किन्नर हा नव्हे हो!
आपला धमाल किन्नर, म्हणजे 'क्लीनर' - 'डायवर्-किन्नर' जोडीतला किन्नर!
(स्वगत - हे वाचून धमालाचा चेहेरा कसा बरं झाला असेल?
)
चतुरंग
अंगाश्शी!
लडदू,
चतुरंगरावांनी बरोब्बर ओळखलं बघ.
अरे ते यक्ष-किन्नर वाल्यातला किन्नर नाही काही, डायवर-किन्नर वाला किन्नर
हा असा:
)
घामानं थबथबलेला, 'टरक' साफ करताना हाताला लागलेलं वंगण नीट न पुसल्याने ते तोंडावर इथं-तिथं लागलेलं, कपाळावर चौकड्याचा गमछा पिळून बांधलेला, (बाकी शरीरयष्टीत काही फरक नाहीच आहे म्हणा
आणि लडदूने दिलेला विकीवरचा किन्नरचा अर्थ वाचून
हा असा

छान लिहिले
छान लिहिले आहे ...