गजर (Journey of the soul)

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
18 May 2011 - 7:18 am

गजर (Journey of the soul)

लेखक-दिगदर्शक : अजित भैरवकर
कलाकार : चिन्मय मांडलेकर, सुखदा यश, एडवर्ड, सुहास शिरसाट
---

१८ दिवस चालणारी पंढरीची वारी आणि ज्ञानेश्वरीचे १८ अध्याय यांचा योग्य संगम (नाविन्यपुर्ण विचार) मला खुपच आवडला .. या एका कल्पनेसाठीच लेखकाला सलाम, अजोड परिश्रम.. वारीच्या खरा अनुभव .. खर्‍या वारीमध्ये १८ दिवस केलेले शुटींग.. वारीतील प्रसंग.. रिंगण आणि इतर प्रथा... आणि एका माणसाच्या जीवनात वारीमुळे होणारा योग्य बदल हे ह्या सिनेमाच्या मुख्य बाजु वाटतात ..
त्यातच वारीतल्या शेतकर्यांच्या थोड्याश्या कहाण्या.. शेतकर्यांबद्दल टाकण्यात येणारा थोडासा प्रकाश ( हा पुरेसा नाही हे माहित आहे.. पण तो पर्यत्न आवडला.. )विशेष करुन घरच्या परिस्थीतीला .. तेथे आपली गरज असतानाही अखंड हरिनामाचा गजर करण्यासाठी आलेले शेतकरी त्यांचे भाव.. त्यांचे मन छान पद्धतीने टिपले आहेत.
कॅमेरामॅन कोण असेन त्याने अतिशय सच्चे भाव टिपले आहेत वारकर्‍यांचे.

एका डोक्युमेंटरी होउ शकत असलेल्या विषयाला चित्ररुप आणताना .. आयुष्यात अर्जुनाप्रमाणे गोंधळलेला नायकामध्ये (पार्थ)या वारीमुळे झालेला परिणाम .. वारीतील लोकांच्या जगण्याचे .. आयुष्याचे ध्येय म्हणजे काय हे कळुन आपल्या घरातील पुर्वीपासुनच्या वारीच्या प्रथेबद्दल बोलतानाचा नायक उत्तम -
नेत्रदान.. शेतकरी समश्या.. या सामाजिक गोष्टीही जाता जाता वारीमध्ये दाखवुन, देण्यात येणारा सामाजिक संदेश मस्तच.
एडवर्ड मार्फत घेतलेले फोटो खरेच पाहण्यासारखे आहेत पिक्चर मध्ये..
एक अप्रतिम सुखद अनुभव होता पिक्चर पाहताना... छान वाटले .. वारीचा रीअल टच खरेच रीअल पणा देतात
आणि मी ही वारीला जाणार, तेथील अनुभव.. एकमेकांमध्ये अनोळखी असुनही वारकरी या एकाच नात्यात गुंतणार हे मनाशी पक्के झाले आहे.. पिक्चर पाहताना ही स्वताला वारीत असल्या सारखेच वाटत होते ...

अवांतर : (निगेटीव्ह)
तार्यांचे बेट आणि बालगंधर्व या दोन्ही जबरदस्त फिल्म मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.. आणि बालगंधर्व या सिनेमामुळे कदाचीत "गजर" झाकोळला ही गेला.. मी ही बालगंधर्व साठी गेलो होतो आणि "गजर" लागला होता म्हणुन पाहिला..
येव्हडा छान चित्रपट पण या दोन्ही बड्या चित्रपटांमध्ये उगाच प्रदर्शित झाला असे वाटले ..
नायिका नविनच आहे.. मला तरी अभिनय आवडला नाही तिचा..
पण औद्या मस्त साकरला गेला आहे ..आवडला एकदम.
सिनेमा तांत्रिक दृष्ट्या आणि अजुन बर्याचश्या भागात आनखिन उत्कृष्ट करता आला असता असे वाटले.. पहिला भाग हिंदीमिश्रित मराठी मुळे थोडा स्लो वाटला..आणि वारीच्या विषयात ही 'live-in relationship' मध्ये दाखवलेले नायक्-नायिका आवडले नाहित, पहिला भाग आवडला नाही.. (पण 'live-in relationship' मुळे नविन होतकरु कलाकाराची दयनिय स्थीती दाखवण्यास त्यामुळे कदाचीत मदत झाली असे वाटले)... दूसरा भाग उत्तम ग्रेट पहावाच असा आहे ..

गजर.. माउलीचा.. आणि माउली - माउली - माउली ऐकायला मस्त वाटले .. तरीही "झेंडा" सारखे आनखिन एखादेतरी उत्कृष्ट गाणे हवेच होते असे वाटले..

काहीही असले तरी सिनेमा खरेच पहाण्यासारखा आहे.. व्यवस्थीत लक्ष दिले तर ज्ञानेश्वरीच्या १८ अध्यायाप्रमाणे आपल्यात ही थोडा जरी बदल झाला तरी जन्माचे सार्थक आहे..

अतिअवांतर :
चित्रपट परिक्षण हे मी कधीच लिहिलेले नाही, त्यामुळे व्यवस्थीत पात्रानुसार काय घडते हे कसे लिहायचे हे न कळल्याने येथे चु.भु.दे.घे....
हे परिक्षण ही लिहिणार नव्हतोच.. पण तार्‍यांचे बेट आणि अगदी मिपावर ही "बालगंधर्व" सुपरहिट ठरल्यामुळे अजुन एक मराठी उत्कृष्ट-वेगळ्या विषयावरील ( पहिल्यांदाच वारीवर निर्मित झालेला सिनेमा) "गजर" चा कोणाला विसर पडु नये म्हणुन हा लेख. गजर बद्दल लिहिण्यापेक्षा-- गजर साठी लिहिलेला हा माध्यमवेध ...

संस्कृतीवाङ्मयइतिहाससमाजजीवनमानचित्रपटरेखाटनप्रकटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 May 2011 - 7:44 am | प्रचेतस

हा चित्रपट दोन चांगल्या चित्रपटांमुळे झाकोळला गेला हे खरेच. त्यात बालगंधर्वच्या झगमगाटापुढे तार्‍यांचे बेट पण कमीच पडला.
गजर मुळात एका वेगळ्या विषयावरील चित्रपट. वारीवर 'पंढरीची वारी' सारखे चित्रपटही आधी येउन गेलेले आहेत. हा चित्रपट थोडासा मल्टिप्लेक्स प्रेक्षकांसाठी वाटतो, एकतर थोडासा कलात्मक, त्यात नाव गजर (Journey of the soul), त्यात एक विदेशी पात्र, लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे.

गणेशा's picture

18 May 2011 - 8:32 am | गणेशा

"पंढरीची वारी" हा चित्रपट पंढरीच्या वारीवर आधारीत नव्हता असे वाटते .. पंढरीची वारी त्या सिनेमा मध्ये होती आणि कथानक वारीभोवती नसुन नायिकेभोवती होते असे वाटते..
तरीही लहान असताना पाहिलाय हा पिक्चर आठवत नाहि तितकासा.. पण नायिका (जयश्री गडकर?) पंढरीच्या वारीला जाते आणि तिला विठ्ठल मुलाच्या रुपात भेटतो .. आनि पुढे असे कथानक आहे बहुतेक त्या चित्रपटाचे.
वारीवर चित्रीत चित्रपट.. वारी म्हणजे काय आणि कशी याबद्दल नसुन तो चित्रपट वारीत गेलेल्या नायिकेवर आहे असो..

तरीही तितकासा आठवत नाहि हे नक्की.. फक्त अरुण सरनाईक यांचा ह्या चित्रपटा च्या चित्रिकरणासाठी जाताना अपघात होउन मृत्यु झाला होता हे ठावुक आहे.
----

विदेशी पात्र असले तरी तो एक Anthropology Ph.D Student असुन, त्याचा विषय या वारीवर असल्याने तो येथे त्याकरता आलेला असतो.. आणि पार्थ(नायक) याच्यासाठी नायिका स्वता ह्या पिक्चरसाठी पैसे लावते आहे पण त्याला तसे कसे सांगायचे .. त्याचा स्वाभिमान दुखावला जाईन असे वाटुन ती या विदेशी मित्रालाच सिनेमा करायचा आहे असे सांगते ..
मला वाटते तसे व्यव्स्थीत सांगितले आहे हे ... बाकी विदेशी पात्राचे सिनेमात काही उल्लेखनिय काम नाही फक्त प्रेझेन्स आहे,,..

"लिव्ह इन रिलेशनशिप" दाखवताना.. हताश .. स्वताच्या हातात एक ही प्रोजेक्ट नसणारा नायक दाखवला आहे, शिवाय मुलीच्या घरुन त्याला लग्नाची ऑफर आहे त्यामुळॅ फक्त थिल्लर कारणे दाखवुन नविन उचभ्रु पब्लिक सआठी हा सिनेमा आहे असे वाटत नाही...

तरीही दूसर्या भागासाठी पहिल्या भागाकडे दुर्लक्ष करता आले तर चांगले आहे...
आणि नाही पाहिला हा सिनेमा तरीही अभिजात कलाकृती मिस केली असे काही नाहीये..
फक्त आपल्या मातीचा - आपल्या संस्कृतीचा सिनेमा म्हणुन पहावा असा वाटला..

मल्टीप्लेक्ष प्रेक्षक वगैरे मी मानत नाही.. तसे काही नसते ... ते आपण निर्माण केले आहे..
चांगले मराठी सिनेमे हेच मुळी मराठी मातीतील चित्रपट असतात.. मग ते मल्टीप्लेक्ष मध्ये बघा नाही तर साध्या टॉकीज मध्ये बघा.. एक नितळ खरा आनंद देवुन जातात

अवांतर :
श्वास, सावरखेड ... , देवराई, चकवा, मी शिवाजी राजे ... , टिंग्या, वळु आणि गजर , काय द्याच बोला ..
आणि असे अनेक अलिकडचे चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये बघितल्याचा आनंद आहे मला ..
आणि सर्वांनी मराठी चित्रपटाला पाठिंबा द्यावा, त्यांना उगाच पायरेटेड डीव्हीडीमधुन बघु नये असे वाटते.

भारीबंडू's picture

18 May 2011 - 8:14 am | भारीबंडू

गजर चित्रपट अत्यंत मस्त वाटला , एकूणच मांडणी आणि अभिनय भारी आहे .
वारीवर अनेक चित्रपट पहिले पण हा प्रयत्न सुंदर वाटला.
खटकणारया बाबी म्हणजे पहिले १५ मिनिटे आणि सतत सिगरेट ओढणारा नायक .
बालगंधर्व आणि याची तुलना खरेतर योग्य नाही , पण ग्रामीण भागात हा चित्रपट नक्की चालेल
बालगंधर्व ग्रामीण भागात कितपत चालेल यात शंका , कारण त्याची गाणी डोक्यावरून जातात
बाकी गजर पाहून वारीचा अनुभव घेण्याची इच्छा प्रबळ झाली आहे !
जय विठ्ठल !!

तिमा's picture

18 May 2011 - 12:12 pm | तिमा

प्रथेप्रमाणे या चित्रपटाची स्तुती करणारी परीक्षणे आधी येतील, मग टोकाची टीका करणारी पण येतील. शेवटी ज्याला त्याला आपले मत चित्रपट पाहूनच ठरवावे लागेल.

आनंदयात्री's picture

18 May 2011 - 12:18 pm | आनंदयात्री

जर चित्रपट यशस्वी झाला तरच चिखलफेक होईल असे वाटते, अन्यथा नाही.

५० फक्त's picture

19 May 2011 - 2:13 am | ५० फक्त

छान गजर, म्हणजे परीक्षण गणेशा. आईला या रविवारी घेउन जाणार होतो पण परी क्षण वाचल्यावर तिला दाखवण्यासारखं असेल काही यात असं वाटत नाही मला.

समीरसूर's picture

19 May 2011 - 5:44 am | समीरसूर

छान आहे परीक्षण आणि चित्रपट एक वेगळा अनुभव म्हणून बघायला हरकत नसावी असे वाटते. वेळ मिळाल्यास नक्की बघणार.

मोठ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत छोटे परंतु चांगले चित्रपट झाकोळले जातात हे खरे आहे. पण गजरला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळतोय असे वाचनात आले. शिवाय खूप कमी ठिकाणी रीलीज झालाय हा चित्रपट म्हणून असेल कदाचित....लोकांना वेळ, अंतर, तिकिट इत्यादी गोष्टी जमून येत नसतील...