ट्रकवाले

ट्रकवाले हा तसा जगाने वाळीत टाकलेला विषय. पण का कोण जाणे मला दिवस दिवस रस्त्यावर प्रवास करणाऱ्या ह्या लोकांविषयी कुतुहल वाटत आलंय. सुदैवाने मला ह्यांचं आयुष्य जवळून बघायची संधी मिळाली. आणि ते अनुभव आता तुमच्या समोर मांडण्याचा विचार आहे. कसं वाटतंय हे नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रीया पाहून पुढला भाग लिहावा की नाही ही ठरवेन.

----------------------------------------------------------------------------------------------------

कधी काळी माझा आणि ह्यांचा संबध येईल आणि त्यांच्यावर मी चक्क एक लेख लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण संबंध आला आणि आता मी लेखही लिहितोय.

दारूडे, बेजबाबदार पणे सुसाट गाड्या हाकणारे, दिवसचे दिवस घरापासून दूर राहणारे, शरीराची गरज भगवण्या साठी वेश्यांकडे जाऊन पाठीशी रोग लाऊन घेणारे, अशिक्षीत, मॅनरलेस, गलिच्छ. अशी बरीच विशेषणं त्यांच्या फार जवळ न जाता जगानी त्यांना चिकटवली आहेत.

जुन्या मुंबई पुणे महामार्गा सारखाच मुंबई - अहमदाबाद हा सुद्धा माझा अतिशय आवडता रस्ता आहे. रात्री अपरत्री, धो-धो पावसात, टळटळीत दुपरी, अशा प्रत्येक वेळी मी इथे गेलोय. आणि दर वेळे वेगवेगळया लोकांना भेटलोय. असंच एकदा हौस म्हणून बाईक वरून मुंबई - अहमदाबाद महामार्गावर फिरता फिरता मला विरार च्या पुढे सधारण १०-१५ किलोमिटर वर एक ढाबा दिसला. आज काल कुत्राच्या छत्र्यांप्रमाणे महामार्गांवर असणाऱ्या ढाब्यांसारखा हा 5 Star AC ढाबा नव्हता. साध्या सरळ मध्यमवर्गीय माणसा प्रमाणे संस्कृतीशी इमान राखून असणारा ढाबा होता.

समोर गाड्या पार्क करायला मोकळी जागा आणि आत मध्ये साधारण २५-३० माणसं बसू शकतील इतका हॉल, त्या पलीकडे किचन असा आटोपशीर पसारा होता. पावसाळा सोडल्यास बाकीचे दिवस बाहेर खाटाही टाकलेल्या असत. तिथे अजुनही खऱ्या तंदूरी मध्ये जेवण बनवलं जातं. विजेवर चालणाऱ्या तंदूरीत नाही. त्यामुळे परठ्यांना शुद्ध तुपासोबातच कोळशाच्या रांगडा चवही येतो. लस्सी अजुनही हाताने घुसळूनच बनवली जाते. अगदी ऑथेंटीक ढाबा.

मला भेटलेला पहीला ट्रक वाला म्हणजे अर्जून. जुलै महिन्यात एके रात्री प्रचंड पाऊस पडत असताना मी साधारण २ च्या सुमारास ढाब्यावर पोचलो. ढाब्या समोरच्या मोकळया जागेत पावसामुळे लहानसं तळं तयार झालं होतं. मी नेहेमी प्रमाणे अगदी दरवाज्या पशी जाऊन बाईक पार्क केल. बाजूच्या रामचंदर पान वाल्याला हात दाखवला. हा पान वाला २४ तास सुरू असतो. सकळी भाऊ बसतो आणि रत्री हा. त्या दिवशी पाऊस जरा जास्तच जोरात पडत असल्याने ढाब्यावर बरीच गर्दी होती. आत शिरण्या इतकीहि जागा नव्हती. लोकं (ट्रक वाले) वाफाळता चहा पीत पीत पाउस कमी होण्याची वाट बघत होती. आता पर्यत बऱ्याच वेळा तिथे गेल्याने ढाब्याचा मॅनेजर 'परी' माझ्या चांगला ओळखीचा झाला होता.

आता काय करावं ह्या विचारात असतानाच परी एका हातात छत्री नि दुसऱ्या हातात चाहाचे तीन ग्लास घेऊन आला नि म्हणाला चल. कुठे, कशासाठी, वगैरे न विचारता त्याच्या मागून गेलो. तो एका ट्रक पाशी जाऊन थांबला. दार वाजवलं. दार आतून उघडल्या गेलं. ह्याने कप आत दिले, स्वतः चढला आणि मलाही आता यायची खुण केली. आत जाऊन सिट वर बसलो आणि हा ट्रक कुणाचा असा विचार करत असतानाच मागच्या बाका वरून आवाज आला 'मै अर्जून'. ट्रकचा मालक आरामात मागच्या अरूंद बाकावर बसरला होता. 'मै जोशी' 'ऐसी बारीश बरसोंके बाद लगी है, रात भर चलेगी शायद' असं म्हणून त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहीलं.'

क्रमशः राह

क्रमशः
राहीलं की काय???

मात्र छान आहे श्टोरी !!!
Smile

ऍडी.. वाताव

ऍडी..
वातावरण निर्मीती एकदम झकास...
पण हे काय रे? सुरु करता करता एकदम संपवूनच टाकलंस की?
च्यायचं "क्रमशः" तुमचं! आग लागली त्या क्रमशः ला!

बाकी, हे असले ऑथेंटीक ढाबेवाले तसे एकदम प्रेमळ असतात हा आमचा अनुभव...घशात करंगळी घातली तर बोटाला लस्सी लागेल आणि मधलं बोट घातलं तर बोटाला रोटी आणि चिकन/मटण लागेल इतकं खाऊ घालतात लेकाचे!

लवकर टाक रे पुढचा भाग..

-(प्रतिक्षेत) ध मा ल.

स्वगतः ऍन्टी-क्रमशः डिपार्टमेंटला जरा टीप द्यावी म्हणतो..इथं लैच क्रमश: बोकाळलंय Wink

ऍन्टी-क्रमशः डिपार्टमेंट

स्वगतः ऍन्टी-क्रमशः डिपार्टमेंटला जरा टीप द्यावी म्हणतो..इथं लैच क्रमश: बोकाळलंय

देच!

माझे तेच म्हणणे

इथं लैच क्रमश: बोकाळलंय ...........माझे तेच म्हणणे
क्रमशः लिहायला बोकाळलेला ....विजुभाऊशः

हटके विषय

स्वयंभू....... वाचायला नक्कीच आवडेल.......
विनाविलंब येउद्यात.......!!

आपला, ऍडी

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

धन्यवाद मित्रहो. तुमच्या फेवरेबल प्रतिक्रिया पाहून पुढे लिहायचं ठरवलंय. आज ऑफीस मधे वेळ मिळाला तर पुढचा भाग आजच टाकीन Big Grin

वेळ मिळालाच तर...

अरे पुढचा भाग आधी लिही आणि वेळ मिळालाच तर ऑफिसचे काम कर!
Smile

तेच करतोय

तेच करतोय Big Grin

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

लवकर

जे काय आहे ते लवकर करा. पण सगळ एका दमात येउद्या. उगाच शेवटी ते क्रमशःचे बोंडुख नका लावू.
बाकी या भागाने उत्सुकता चांगलीच चाळवलेली आहे. उत्तम. येउद्यात पुढचे भाग लवकर.

वा

स्वयंभु राव .. येउद्या पुढचा भाग ..

येवु दे पटापट

येळ लावु नगा Smile
घशात करंगळी घातली तर बोटाला लस्सी लागेल आणि मधलं बोट घातलं तर बोटाला रोटी आणि चिकन/मटण लागेल इतकं खाऊ घालतात लेकाचे!>>>> Smile
क्या बात है. ह्याच प्रतिक्रिया मागच्या दोनचार दिवसात मिसल्या रे

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

ह्याच

ह्याच प्रतिक्रिया मागच्या दोनचार दिवसात मिसल्या रे

माफी असावी सरकार! अंमळ गडबडीत होतो ना...
आता परत नाही नाराज होऊ देणार Smile

ऍडीजी

ऍडीजी लवकर लिहा पाहु पुढचा भाग.....

(टापोटाप)
मदनबाण.....

केवढुस्स

केवढुस्स लिहिलय हे..... Confused आत्ता आत्ता वाचायला मजा येतेय म्हणेपर्यंत संपलं पण!!

खरच...

केवढुस्स लिहिलय हे.....
खरंच, फारच छोटा 'क्रम' आहे. हे जे लिहीले आहे त्याच्या दुप्पट लेखन करून जर 'मॅटर' उरली असेल तर क्रमशः टाकायला काहीच हरकत नाही.

मस्त !

पुढल्या भागाची वाट पाहतोय.

आपलाच,
मनोबा

टाकलाय

टाकलाय पुढचा भाग :\

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/