१० मे १८५७

१० मे १८५७ !

काही महीन्यांच्या धावपळी नंतर तात्या टोपे व इतर क्रांतीका-यांनी ३० मे चा दिवस ठरवला होता बंडाचा ! विदेशी राज्यकर्ते खदेडून बाहेर काढण्यासाठी.
पण प्रचंड सामाजिक तनाव व मंगळ पांडे मुळे कानुपुर छावणीत झालेल्या उठावामुळे तात्यांना आंदोलन ठरलेल्या दिवसापेक्षा आधीच चालू करावे लागले.. व त्याची सुरवात कानपूर तथा सुरत छावणी पासूनच झाली सर्वांनी मिळूनबहाद्दुर शहा जफर ला बादशहा मानला व तात्या टोपे ह्यांच्या हाताखाली सर्व उत्तर भारत एक होऊन इंग्रजाच्या विरुध्द पहिले स्वातंत्र्य बिगूल फुकले...

ह्या दिवसाला व त्या क्रांती कार्याला गेल्या १० मे ला १५० वर्ष पुर्ण झाली !

सर्व क्रांतीका-यांना माझे नम्र अभिवादन !

जे माहीत आहेत त्यांना व जे माहीत नाही त्यांना लाख लाख नमन !

बहाद्दुर शहा जफर च्याच शायरीने यातना काय व कश्या होत्या ह्याचे उत्तर मिळते.

"ईतना बदनसीब है जफर.
दफन के लिए,
दो गज जमीं भी ना मिली,
कु-ए-यार में "

१९ शे नाही हो!!!

१९५७ असते तर तात्या टोपे आणि मनूताईंना याची देही याची डोळा पाहिले असते. D Oh परंतु ते सर्व १८५७ साली होते, दिडशे वर्षांपूर्वी. तेव्हा जरा लेख संपादित करा.

उप्प्स !

माफी असावी !
जरा नजर चुकी मुळे घोळ झाला !

तात्या त्यात्या मला वाचवा हो! (आपले मिपावाले तात्या... )

माझ्या विनंतीला मान देऊन बदल केला गेला आहे हे पाहून आनंद झाला.. आपला आभारी आहे तात्या !
(* मिपा चालू झाल्या नंतर आम्ही ईतर जागी लिहणे बंद केलेच होते ते का ह्याचे उत्तर त्या **गत वाल्या सदस्याला मिळालेच असेल ! धन्यवाद.)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

याबाबत एक सामान्य प्रवाद ...

आहे की:-
१."स्वातंत्र्य समर" म्हणुन ज्याचा उल्लेख होतो, ते केवळ "शिपायांचे बण्ड " होते.
१.१सामान्य जनता ह्यात फारशी सहभागी नव्हती.
१.२खुद्द शिपाई सुद्धा सगळे नव्हते पेटुन उठले, तर काही गटच पेटले होते.

२.बहादुर शहा जफर हा काही उठावात सामील नवहता.
बंड केलेल्या शिपायांनी आग्रा किल्ल्यात घुसुन जवळ जवळ त्याला स्थान बद्ध केले, ते त्याला "संरक्षण" देण्याच्या नावाखाली.
("मुकाट्याने आम्हाला पाठिंबा द्या(कारण प्रतिकात्मक,नाम्धारी का असेना,तोच तत्कालीन मुघल प्रांताचा शासक होता.), अन्यथा तुमचं काही खरं नाही." असं त्यांनी धमकावलं आणि तो आपल्याक्डुन आहे असं खुशाल जाहीर केलं.)
बंड करणार्या शिपांयांचा पाडाव झाल्यावर जेव्हा इंग्रज आत शिरले,
तेव्हा त्या वयो वृद्ध बादशाहापाशी एकही शिपाइ नव्हता.(हे अस्सल ऐतिहासिक लिखाणातुन लिहिलेलं आहे.शंका नसावी.)
त्याला (आपल्या राजाला!)आहे तसेच टाकुन शिपाइ मिळेल त्या वाटेने पसार झाले होते.
(ह्याचा एक उल्लेख त्याच काळात राज वाड्याजवळ राहणार्‍या जग प्रसिद्ध उर्दु शायर मिर्झा गालिब ह्यांच्या "अलंबु"
ह्या ग्रंथात आहे. )

३. झाशी च्या राणीच्या शौर्याबद्दल प्रश्नच नाही. पण शौर्य वापरले ते कोणत्या उद्देशासाठी?
मागणी तिने स्वतःपुरती केली होती असं दिसतं.
"मै मेरी झांसी नही दुंगी" ह्याचा अर्थ कित्येक जण असा लावतात की
तिची ब्रिटीश(कंपनी सरकार)चे मांडलिक म्हणुन राहण्यात काहिच ना नव्हती.
(तशी ती मांडलिक मागील कित्येक वर्षे होतिच.)तिच म्हणणं हे दिसतं की "मी मांडलिक रहायला तयार असतानाही राज्य का काढुन घेतले.(का खालसा/बरखास्त केले?)"

४. स्वामी विवेकानंदाचं "परिव्राजक " हे पुस्तक वाचनात आलं होतं.
त्यातही या घटनेचा उल्लेख "शिपायाचे बंड" असाच आहे.

५. १८५७ मध्ये घडलेल्या घटनांना "पहिले स्वातंत्र्य समर" असं म्हटलं पहिल्यांदा ते स्वा. सावरकरांनी.
ते ही घटना घडुन गेल्यावर खुप खुप वर्षां नंतर.
(खुद्द टिळक-आगरकर्-चिपळुणकर ह्यांच्या संभाषणात उल्लेख "बंड" असाच आहे,असं ऐकलयं.)

डिसक्लेमरः- ह्यात कुठेही मी माझं मत मांडत नाहिये.
विविध ठिकाणी विखुरलेली,वाचनात आलेली माहिती फक्त इथे शक्य तितक्या समानता शोधुन लिहित आहे.
कृपया पुढील लिखाणात जी काही झोड उठणार आहे, ती ही माहिती देणार्‍यावर उठावी.मज पामरावर नको.

आपलाच,
मनोबा
उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

धन्यवाद.

Not Talking

जर मला इतरांचेच मत वाचायचे असते तर मी येथे गेलो असतो, येथे चर्चा चालू केली नसती.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ह्म्म्म...

>> जर मला इतरांचेच मत वाचायचे असते तर मी येथे गेलो असतो, येथे चर्चा चालू केली नसती.

तर मग इथे चर्चा सुरु केलीत कशाला?
इथे काय (लेखकाशिवाय )इतरांची (त्याच विषयाबद्दल ची)मते मांडायला बंदी आहे का?
(असल्यास क्षमस्व. ती मते इथे देउन आम्ही अजाणतेअणी गुन्हा केला आहे.)

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

मला

मला इतरांचे म्हणजे मिपा सदस्य सोडून बाहेरी लेखन / लेख / माहीती असे लिहावयाचे होते , चुकी बद्दल क्षमा..... !
जे मिपाचे सद्स्य आहेत त्यांचे मत जाणून घेण्याची माझी ईच्छा होती / आहे.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

हां हां ओक्के

ओक्के.
काय प्रॉब नाय.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

विनम्र अभिवादन !!!

जर मला इतरांचेच मत वाचायचे असते तर मी येथे गेलो असतो, येथे चर्चा चालू केली नसती.

राजे, क्षमा असावी.

अवांतर: मिसळपाववरील सूर्य नावाचे आमच्या मित्राने दिलेला दुवा आम्ही सध्या पाहतोय. Smile

उठाव आणि स्वरूप

तुमच्या मताशी मी सहमत आहे. १८५७ ला इंग्रजांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात उठाव झाला याला राष्ट्रीय महत्व आहेच. मात्र त्याला भारताचं स्वातंत्र्यसमर म्हणतांना काही गोष्टी अडतात.

जसे की हा प्रामुख्याने शिपायांचा उठाव होता. त्यांच्यातील भेदभावपुर्ण वागणुकीचा त्यांना संताप होता. ब्रिटीश सरकार शिस्तीच्या नावाखाली धर्मात ढवळाढवळ करते असं त्यांचं मत होतं. ब्रम्हदेश लढाईसाठी समुद्रमार्गे हिंदू सैनिकांना घेऊन जाणे. सर्वांचा खाणा एकत्र शिजवणे. गंध आणि दाढी ठेवण्यास प्रतिबंध करणे आदी. या सोबतच कायमच जोखमीची कामे करून सुध्दा तनखा गोर्‍या सैनिकांपेक्षा कमीच. अधिकाराच्या जागा मिळण्याची शक्यता अगदी कमी. ह्या सर्वांचा स्फोट बराकपूरला झाला. मंगल पांडेनी गोळी झाडली ते पुढे शहीद झाले. हे खरं आहे आणि मान्य सुध्दा पण ह्यात राष्ट्रविचार होता का याचा विचार निदान आता तरी केला पाहिजे. पुर्वनियोजीत तारखेच्या आधी गोळी झाडून खरं तर मंगल पांडेंनी उठावाचे नुकसान केले. ह्या असंतोषाची जाणिव इंग्रजांना मिळाली आणि ते पुरेशी तयारी करू शकले.

नाना साहेब व त्यांचे सेनापती तात्या टोपे यांनी हा उठाव करायचे ठरवले होते. सर्व अन्यायग्रस्त संस्थानिकांना एकत्र करून त्यांना विश्वासात घेणे आणि एकाच दिवशी सर्वत्र उठाव करण्यास प्रोत्साहन देणे आदी कामे पेशव्यांनी खुप उत्तम केली. मात्र मंगल पांडेच्या गोळीने एक प्रकारे घातच केला असं म्हणावं लागेल. त्यानंतर मिरत कानपुर आदी ठिकाणी सैन्याने मनात येईल तसा आणि तेव्हा उठाव केला. एका एकामागून एक असल्यामुळे इंग्रजांना हा उठाव मोडण्यात यश आले. आधी ठरल्याप्रमाणे एकाच वेळी हा उठाव झाला असता तर मात्र उठाव यशस्वी होण्याची शक्यता होती.

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या उठावात सहभागी झालेले लोक प्रामुख्याने इंग्रजांकडून दुखावल्या गेल्यामुळे यात सामिल झाले होते. ते तसे दुखावले गेले नसते तर ते या उठावात सहभागी झालेच नसते. उदाहरणादाखल पेशवे आणि झाशी राणी लक्ष्मीबाईंबद्दल विचार करूया. नानासाहेब दत्तक पुत्र म्हणुन त्यांचा तनखा इंग्रजांनी रद्द केला. झाशीचे राव गंगाधरराव निपुत्रीक होते. त्यांच्या नंतर त्यांच्या दत्तक पुत्राला वारस मानण्यास कंपनी सरकारने नकार दिला. १८५२ ते १८५७ पर्यंत लक्ष्मीबाईंनी इंग्रजांशी पत्रव्यवहार केला तो आपल्या दत्तक पुत्राला वारस म्हणुन मान्यता मिळण्यासाठी विनंती अर्जाच्या स्वरूपातच होता.

उठवात सहभागी झालेले संस्थानिक हे कंपनीच्या म्हणजेच लॉर्ड डलहौसीच्या कारभारामुळे दुखावल्या गेलेले होते. ज्यांचे हितसंबंध अबाधित होते ते या उठावात सामील झाले नाहीत. झाशी आणि ग्वाल्ह्वेर हे अंतर शंभर किलोमिटर असावं मात्र शिंदे या उठावात कुठेच नव्हते तसेच इंदौरचे होळकरसुध्दा नव्हते. भारतीयच असलेले शिख आणि गोरखा या वेळी इंग्रजांकडून लढले. हे राजे सुध्दा जे लढले ते त्या त्या संस्थानासाठी अथवा आपल्या मागण्या अमान्य झाल्यामुळे लढले होते. राणी लक्ष्मीबाईंना तर आपल्या हेतू बद्दल जरा सुध्दा शंका नव्हती. आपली झाशी कुणालाच देणार नाही अशी घोषणाच करून त्या लढाईत उतरल्या. झाशीसाठी लढल्या. त्यांचं शौर्य असामान्य होतं. त्यांचं नेतृत्व आणि युध्दकौशल्य सुध्दा वाखाणण्यासारखं होतं अशी नोंदच कंपनीच्या सरदाराने म्हणजे कॅ.ह्यु रोज याने करून ठेवली आहे.
तात्या टोपेने दाखवलेल्या असामान्य युध्दकौशल्याचं सगळ्या जगात कौतुक व्हावं अशी त्यांची योग्यता. ही सगळी मंडळी शौर्यात कुठेच कमी नव्हती. मात्र यांच्या मनात राष्ट्र ही संकल्पना होती का ? ती तशी असावी याला तरी काही कारण होते का? यांच्या कित्येक पिढ्यांआधी केवळ मोगलांना या देशावर मोठ्याप्रमाणात राज्य करता आले. त्या आधीचा इतिहास वेगळाच.मात्र यांच्या काळात दिल्लीपती म्हणजेच देशाचा राजा. बाकीचे आपापल्या संस्थानाचे राजे. ही एवढीच कल्पना त्या काळात होती. असं असतांना या लढ्याला भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणने जरा कठीणच आहे.
त्या त्या योध्याने त्या त्या संस्थानासाठी लढाई केली आणि आपापले योगदान दिले. या लढ्यातील विरांच्या कथा वाचाल तर अगदी भारावून जाल. एवढ्या विपरीत परिस्थितीत त्यांनी आपल्या शौर्याची चमक दाखवलेली आहे. मात्र तरीही असं वाटतं की यात देश किंवा राष्ट्र हा विचार नसून आपलं राज्य हाच विचार होता.

देशाचा विचार करून आणि आपल्या हितसंबंधांच्या विरोधात नसल्यावरही देशकार्यात ज्यांनी उडी मारली त्यांचं योगदान मान्य करायला हरकत नाही. नव्हे त्यांचे उपकारच आहेत सार्‍या देशावर. मात्र ज्या लोकांना देश- राष्ट्र आदी संकल्पनाच माहिती नव्हत्या आणि ज्यांनी होता होईस्तोवर संघर्ष टाळून पाहण्याचा प्रयत्न केला, त्यांची आपल्या राज्यासाठीची ( येथे संस्थान हा शब्द अधिक योग्य होईल) लढाई समस्त राष्ट्राची कशी काय म्हणता येईल?

जाज्वल्य देशभक्ती म्हटलं की डोळ्यासमोर येते ती चौदा वर्षाची विनायकाची मुर्ती. 'देश स्वातंत्र्यासाठी मरे मरेतो झुंज देण्याची' शपथ घेण्यासाठी राष्ट्रप्रेमाशिवाय अन्य प्रेरणा नव्हती. हा वन्ही पेटायला तात्कालीक कारण चाफेकर बंधुंचं हौतात्म्य होतं मात्र घेतलेलं व्रत तात्पुरतं नव्हतं की भावनावेगात नव्हतं.
असंच उदाहरण पुढे भगतसिंह आणि आझादांबद्दल देता येईल. शुध्द देशाचा विचार करून ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली. त्यांना खरच राष्ट्रीय म्हणतांना आमची छाती अभिमानानं भरून येते.
मात्र केवळ इंग्रजांच्या विरूध्द लढला म्हणून तो देशभक्त असं नाही म्हणता यायचं. अंदमानात हजारो कैदी होते. मात्र सागराला अगस्तीची धमकी देण्याची मस्ती फक्त एकाच कलंदरात होती.

अजून बरंच काही आहे जे लिहीता येईल. जसे सावरकरांचचं स्वातंत्र्यसमर नावाचं पुस्तक आणि काही इंग्रजांनी सुध्दा नोंदवलेले उठावाचे राष्ट्रीय स्वरूप. न.र. फाटकांनी याला शिपाईगर्दी म्हटलेलं आहे, आदी. मात्र ते नंतर कधीतरी आता येवढं पुरे.

नीलकांत.

आम्हाला इतकेच माहित आहे.

नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ही चार मराठी माणसे त्या प्रचंड स्वातंत्र्यसंग्रमात अग्रेसर होती आणि त्याचा एक मराठी माणूस म्हणुन आम्हाला प्रचंड अभिमान आम्हाला आहे. रंगो बापूजी आणि अझीममुल्लाखान यांनी टेम्स नदीच्या काठावर बसून १८५७ च्या बंडाचे बीजारोपण केले. त्याच बरोबर यानिमित्ताने हिंदुमुस्लीमात जे ऐक्य निर्माण झाले तसे ऐक्य आजतागायत झाले नाही असे म्हणतात.

अवांतर : आमचे इतिहासाचे ज्ञान केवळ माहितीवर आणि बराचसा अंदाजपंचे असा विकसीत झाला आहे, तेव्हा चु.भु.दे.घे.

अवा॑तर

दहा मे ह्याच तारखेचे आणखी एक ऐतिहासिक महत्व म्हणजे एकोणीसशे चाळीस साली याच दिवशी विन्स्टन चर्चिल इ॑ग्ल॑डचा प॑तप्रधान (पहिल्या॑दा) बनला व त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाचे पारडे जर्मनीच्या विरूद्ध झुकले.. (अर्थात एकट्या चर्चिलने हिटलरचा पराभव केला नाही पण तो एक 'मेजर फॅक्टर' होता ह्यात श॑का नाही)

मूळ उद्देश

१० मे १८५७ ला चालू झाले ते शिपायाचे बंड होते का स्वातंत्र्यसमर हा कितीही चघळला तरी न संपणारा विषय ठरू शकतो. दोन्ही बाजूने लिहीणारे या संदर्भात आढळतील. बरोबर कोण आणि चूक कोण ह्यात एकमत होणारच नाही. तरी देखील ह्या शाब्दीक खेळामागचे "मला वाटत असलेले" कारण समजण्याचा प्रयत्न करतो:

ब्रिटीशांचा उद्देश काय? - ह्याला बंड म्हणा म्हणजे ते शिपायांपुरतेच मर्यादीत राहते आणि जनसामान्यांना त्यातून प्रेरणा मिळत नाही.

प्रामुख्याने सावरकर आणि तत्कालीन तत्सम इतरांचा उद्देश काय? - ह्यात अशा अनेक घटना आहेत ज्यांचा अन्वयार्थ लावायचा झाला तर झालेला "उठाव" हा केवळ शिपायांपुरताच मर्यादीत नव्हता. तो केवळ कंपनीमधे काम करणार्‍यांचा असंतोष नव्हता तर विदेशी कंपनी सरकार विरुद्ध झालेला तो असंतोषाचा भडक होता. परीणामी तो सुसुत्रपणे झाला नाही. जे काही तात्या टोपे आणि नानासाहेब पेशव्यांना करायचे होते ते मंगल पांडेच्या एका अर्थी आततायीपणा / घाई मुळे होवू शकले नाही. म्हणून ते केवळ शिपायांचे बंड न ठरवता ब्रिटीशांविरुद्धचे पहीले स्वातंत्र्य समर असे संबोधण्यात आले.

आता झाशीची राणी आणि तत्सम इतरांबाबतः बरोबर आहे झाशीची राणी "मेरी झाशी नही दूंगी" असे म्हणाली. पण तीने आणि ह्या स्वातंत्र्यसमराच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या इतरांनी हिंदूस्थानचा बादशहा म्हणून "बहाद्दूरशहा झफर" याचे सार्वभौमत्व मान्य केले होते. थोडक्यात तत्कालीन पद्धतीत "देश/राष्ट्र" ह्या शब्दाच्या व्याखेत हिंदूस्थान हे एक राष्ट्र होते पण स्थानीकपातळीवर वेगवेगळी संस्थाने/राज्ये अस्तित्वात होती आणि ह्यात त्यांच्या दृष्टीने काहीच परस्परविरोधी नव्हते. आजच्या पद्धतीने भारत म्हणून ते एकसंध राष्ट्र नव्हते म्हणून त्याला जर राष्ट्रच मानायचे नसले तर ते अयोग्य ठरू शकेल- किमान माझ्यासारख्यांच्या नजरेतून.

जर केवळ हे शिपायांपुरते अथवा काही भागापुरतेच मर्यादीत असते तर त्यातून प्रेरणा घेणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तयार झाले. नंतर त्यातूनच चाफेकर, सावरकर, आणि इतर प्रांतातील पण अनेक असतील ज्यांनी त्यातून प्रेरणा घेतली. जर हे केवळ बंडच असते तर ते जनसामान्यांच्या स्मरणात राहू शकले नसते. थोडे वेगळे उदाहरण म्हणून सांगतो: आज जर मुंबईतील गिरणी कामगार संप म्हणून विचारला तर अनेक जणांच्या लक्षात असल्याची आणि माहीती असण्याची शक्यता आहे, कारण त्यात जनसामान्य होते. पण ८० ते ८४ च्या काळात कधीतरी (वर्ष पण नक्की आठवत नाही). त्यावेळेस पोलीसांचा त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायामुळे भडका उडला आणि काही काळ बंड झाले. दादर स्टेशनबाहेर पण पोलीसांनी फुकटचा गोळीबार चालू केला. त्या नंतर अनेकांना बडतर्फ केले गेले इत्यादी...पण आज ते "बंड" किती जणांना माहीती आहे?

थोडक्यात १८५७ ही आजपण भारतीयांसाठी (आणि काही अंशी ब्रिटीशांसाठी) सामाजीक आठवण आहे जी एका पिढीतून दुसर्‍यापिढीकडे सातत्याने दिली गेली आहे. जर ते निव्वळ बंड असते तर ज्यांना भारतीयांची (बर्‍यापैकी अहींसक) मानसिकता माहीत असेल त्यांना समजेल की हे इतके स्मरणात राहीले नसते.

या संदर्भात ज्याला शाब्दिक बुद्धीभेद म्हणता येईल असे अनेक प्रकार ब्रिटीश आणि पाश्चात्यांनी केलेले आहेत पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

वर "राजे" साहेबांनी बहाद्दूरशहाची शायरी सुनावली आहेच. तसेच खालील उदाहरण वाचल्यास ह्याल निव्वळ बंड म्हणणे योग्य ठरेल का ह्याचा आपण विचार कराल असे वाटते: (आठवणीतून - चु.भू. द्या.घ्या.)

कंपनीसरकारच्या एका चमचा कवीने बहाद्दूरशहाला खालील ओळी म्हणून हिणावले -

दुमदुमाये दम नही, अब खैर मांगो जान की, ऐ जफर अब ठंडी हुई समशेर हिंदूस्थान की |

त्यावर शायर असलेल्या बहाद्दूरशहाने त्याला उलट सुनावले -

गाझियोमे बू रहेगी जब तलक इमान की, तब तो लंडन तक चलेगी समशेर हिंदूस्थान की |

बहाद्दूर शहाच्या आणि तात्या टोपे आदींसारख्यांच्या दुर्दैवाने हे "इमान" राहीले नाही आणि फितुरीने ह्या प्रथम स्वातंत्र्यसैनीकांना मरणाला सामोरे जावे लागले.

काही प्रदर्शनातील छायाचित्रे

बीबीसी ने गेल्या वर्षी त्यांच्या संकेतस्थळावर १८५७ ला १५० वर्षे झाल्या निमित्त विविध माहीती ठेवली होती. त्यात लखनौला झालेल्या प्रदर्शनातील छायाचित्री पण होती. आपणास पहायला आवडू शकतील असे वाटते:

(टिचकी मारून पिकासावर पाहील्यास छायाचित्रांबाबत बीबीसे नी लिहीलेली हिंदीतली माहीती पाहू शकाल)

अन्वय...

इस्ट इंडीया कंपनीच्या बराकपूर येथील छावणीत शिपायांनी बंड केले व ते पुढे इतर ठिकाणी पसरले ह्यामुळे इंग्रज याला बंड म्हणत. तसेच पुढे ज्यांच्या सहभागाने या उठावाला मोठे स्वरूप प्राप्त झाले ते सगळे राजे लोक इंग्रजांचेच मांडलीक होते. त्यामुळे इंग्रजांचा बंड हा शब्द त्यांच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटतं.

भारतीयांच्या दृष्टीने मात्र हे बंड नसून हे स्वातंत्र्यसमर आहे असं म्हटल्या जातं. ह्याला स्वातंत्र्यसमर का म्हटल्या जातं याचा शोध घेतला असता असं जाणवतं की १९०७ ला म्हणजे या उठावाला ५० वर्षे झाल्यावर त्याच्या सुवर्णमहोत्सवाला सावरकरांनी 'अठराशे सत्तावन चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक लिहीले. त्यापुस्तकावर प्रकाशनपुर्वच बंदी घालण्यात आली होती. तरीही बाबाराव सावरकरांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. भारतात ते खुप गाजलं. यापुस्तकापासून अनेक क्रांतीकारकांनी प्रेरणा घेतली.

आता थोडं मागे जाऊया. म्हणजे सावरकर भुगूर येथे होते तेव्हा १९०० ला त्यांनी 'मित्रमेळा' ही संघटना बांधली. पुढे चार पाच वर्षांनंतर त्याचे रुपांतर 'अभिनव भारत' मधे केलं. पुण्यात असतांना स्वदेशी आंदोलनात भाग घेतला. त्यांचं प्रसिध्द भाषण सुध्दा पुण्यात झालं. त्यानंतर त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले होते. टिळकांनी त्यावर 'हे आमचे गुरू नव्हेत' असा अग्रलेख लिहीला होता. या सर्व काळात सावरकरांचे नेतृत्व गुण आणि त्यांची प्रचंड क्षमता सर्वांच्या लक्षात आली. पुढे त्यांना शिवाजी शिष्यवृत्ती देण्यात आली व ते लंडनच्या 'इंडीया हाऊस' मधे आले. 'इंडीया हाऊस' म्हणजे भारताबाहेर राहून क्रांतीकार्य करणार्‍या सर्व क्रांतीक्रारकांचे शक्तीस्थान होते. ह्या इंडीया हाऊसची जवाबदारी काही दिवसांत सावरकरांवर आली. सावरकर हे खरं तर एक स्फुर्तीकेंद्र होतं. एक ऊर्जास्त्रोत होते. त्यांनी आपल्या देशातील तरूणांनी पेटून उठावं म्हणून इटली व इतर देशांतील क्रांतीकारकांच्या कथा व चरित्र मराठीत आणली. जसे इटलीचा जोसेफ मॅझणी आदी. ह्या पुस्तकांचे स्वागत तर झालेच मात्र ही परक्यादेशांतील पात्रे भारतात एवढी प्रेरणादायी ठरली नाहीत. मग सावरकरांनी १८५७ चा सुवर्णमहोत्सव लक्षात घेऊन आपल्या मातीतील नायक उभे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोग अत्यंत सफल झाला. १९०७ मधे देशकार्यासाठी देशातील तरूण पेटून उठावा त्याने देशहितासाठी सर्वोच्च त्याग करण्यास सिध्द व्हावे ही या मागची भुमिका.

त्यामुळे सावरकरांनी १८५७ ला स्वातंत्र्यसमर म्हटले असावे. त्यांचा हेतू स्पष्ट होता. आणि त्यापुढे ज्या घटना घडत गेल्या त्यावरून आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्यवीरांनी जसं ठरवलं होतं तसंच घडलं. सावरकरांच्या या क्षमतेचा ब्रिटीशांना बरोबर अंदाज आला होता. उगाच एका शिडशिडीत बांध्याच्या युवकाला दोन जन्मठेप देण्याचे आणि भारताच्या मुख्यभुमीच्या दूर पाठवण्याचे कारण काय?

तर १९०७ ला भारत पारतंत्र्यात असतांना युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून भारतीय मातीतील नायक उभे करणे आणि त्यांना उर्जास्त्रोत बनवने ही एक रणनीती म्हणून योग्यच होते. त्याचा हवा तसा परिणाम झालाच. मात्र त्यानंतर आज २००८ मधे तरी आपल्याला मागे घडलेल्या घटनांकडे जरा चिकित्सकपणे बघता आलं पाहिजे की नाही? आज त्या नायकांना घेऊन युवक पेटवण्याची गरज नाही. असं मला वाटतं.

१८५७ चा उठाव अयशस्वी झाला. त्याचे काही तोटे झाले तसेच त्यामुळे काही चांगल्या गोष्टीही झाल्या त्या अश्या.

  • भारतातील राजेशाहीचा कणा मोडला. भारतात नवीन युग येऊ लागलं.
  • भारतावरील इस्ट इंडीया कंपनीचं राज्य संपुष्टात येऊन येथे ब्रिटीश संसदेचे राज्य आले. भारताला आधुनिक राजवट मिळाली. कायद्याचा वापर सुरू झाला.
  • ब्रिटीशांनी भारताचे शोषण केले हे खरे आहे. मात्र सोबतच कायदा दिला आणि कायद्यासमोर सगळे समानची भाषा वापरली. अर्थात गोरे अधीक समान होते Wink पण सगळे भारतीत एका रांगेत बसवले ते त्यांनीच.
  • इंग्रजी भाषा आणि त्यामुळे नव्या जगाशी झालेली नव्याने ओळख. ह्यामुळेच आम्हाला जगातील क्रांतीमुल्यांची ओळख झाली. यापुढे झालेली सगळी आंदोलणे ही भारताला स्वातंत्र्य मिळावी म्हणून झाली. माझ्या प्रदेशाला किंवा राज्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून नाही.
  • समता , बंधुता आदी मुल्यांची ओळख आम्हाला या नंतरच झाली. आणि आमच्यावर परकियांची सत्ता होती म्हणून आम्हाला चिडून उठायला कारणीभुत सुध्दा ठरली.
  • इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी स्थापन केलेल्या अनेक तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा झाला आहे. अर्थात यासाठी आपले नेतृत्व कारणीभूत ठरलं आहे.

नीलकांत

माझेही अभिवादन..!

ह्या दिवसाला व त्या क्रांती कार्याला गेल्या १० मे ला १५० वर्ष पुर्ण झाली !
सर्व क्रांतीका-यांना माझे नम्र अभिवादन !

माझेही अभिवादन..!

तात्या.

ते बंड

ते बंड होते.. अथवा काही शिपायांचा विद्रोह.... अथवा क्रांती समर.... पण त्या सर्वांनी कुठे ना कुठे तरी एक मोठा प्रयत्न करुन विदेशी साम्राज्याला एक धक्का दिल्ला होता.... व त्या धक्क्यातून इंग्रजांना कधीच सावरता आले नाही हे त्या क्रांतीचे यश ! मी त्या क्रांतीच्या भावनेला सलाम करतो !

कोणी आपल्या प्रदेशासाठी लढले तर कोणी आपल्या गादी साठी.... पण सर्वांचा हेतू इंग्रजांना देशातून बाहेर हकलणे हाच होता.... त्यामुळे त्या सर्वांना सलाम !!!!!

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

सूरवात म्हणूनच पहायला हवे.

१८५७ चे समर अथवा बंड जे काही म्हणायचे असेल ते आपण म्हणू या मात्र त्यानंतर ब्रिटीश आणि तत्कालिक सामान्यजन यांनी यातून बरेच धडे घेतलेले दिसून येते.

ब्रिटीशांसाठी : ईस्ट इंडिया कंपनीचे विलीनिकरण.

हिंदुस्थान्यासाठी : ब्रिटीशांशी लढुन स्वातंत्र्य मिळविणे अवघड / अशक्य आहे. यातूनच योग्य तो बोध घेऊन १८८५ साली राष्ट्रीय सभेची स्थापना आणि अहिंसेच्या मार्गाने स्वराज्यप्राप्ती.

"अहिंसेच्

Surprise
"अहिंसेच्या मार्गाने स्वराज्यप्राप्ती."

हे तुम्हाला कोणी सांगितले की अहिंसेनेच स्वराज्य मिळाले हे ? असे लिहून तुम्ही जहाल क्रांतीकारांना विस्मरणात टाकण्याच प्रयत्न केला आहे असे वाटत आहे !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !