आज सकाळ मध्ये विवाह कायद्यातील ब दलांविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा दूवा असा आहे -
http://www.esakal.com/esakal/20110407/5049728020328664240.htm
या नवीन बदलांनूसार स्त्रीला नवर्याच्या संपत्तीत थेट वाटा द्यावा असे सूचविण्यात आले आहे. लग्नाच्या वेळेला नवर्याच्या नावावर असलेल्या संपत्तीत वाटा घटस्फोटित पत्नीला मिळावा अशी ही शिफारस आहे.
हा बदल अजून शिफारस या पातळीवर असल्याने शयातील त्रुटींवर चर्चा निश्चितच होईल. आपल्या कडे कायदे करताना त्यांचा दूरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जाते का? या बद्द्ल मी साशंक आहे.
हे संभाव्य बदल पुरुषांचा घात करणारे आहेतच पण त्यामूळे उपस्थित हॊणारे प्रश्न असे आहेत -
० हा कायदा जरी शोषित स्त्रीयांना डोळ्यासमोर ठेवून केला असला तरी मुकत स्त्रीया याचा गैरफायदा घेऊ शकतात. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी ३-४ लग्न करणार्या स्त्रियांची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. या प्रकारामध्ये या प्रस्तावित बदलामुळे वाढ होईल. एवढेच नाही तर संपत्ती बळकवण्यासाठी खोट्या धमक्या देण्याचे प्रकारही वाढतील. नुकत्याच पुण्यात झालेल्या एकाच कुटुंबातील सर्वांच्या आत्महत्येची आठवण ताजी असेल.
० वडलांच्या संपत्तीत समान वाटा असताना घटस्फोटीत नवर्याच्या संपत्तीत वाटा देणे म्हणजे पुरूषांना केवळ ओरबाडणे हाच कायद्याचा हेतू आहे.
० लग्नाच्या वेळेला स्त्रीच्या नावावर असलेल्या संपत्तीची अशी समान वाटणी झालेली मुक्त स्त्रीयांना चालेल का?
० या प्रस्तावित बदलांना माझ्या दृष्टीने एकच उतारा आहे - तो म्हणजे विवाहपूर्व लिखित करार करणे. त्याला दूर्दैवाने अजून कायदेशीर मान्यता नाही
पुरूषानो या नव्या कायद्याला( बदलाना ) कडाडुन विरोध करा
प्रतिक्रिया
7 Apr 2011 - 8:21 am | चिरोटा
कुठे बसायचे आहे विरोधाला? दिल्लीत हजार्यांचे आटपू द्या. नंतर हा मुद्दा घेवू.
तीन चार लगीन करणार्या खरोखरच अनेक स्रिया भारतात आहेत? मग त्यामागे संपत्ती हे कारण नसेल.
7 Apr 2011 - 8:23 am | अविनाशकुलकर्णी
दिल्लीत हजार्यांचे आटपू द्या.
चिरोटा..लई भारी..
हहपुवा
7 Apr 2011 - 8:30 am | सविता
युयुत्सु राव.....काय पहाटे पहाटे "चा" पण प्यायच्या आधी सगळा पेपर धुंडाळून स्त्रीयांच्या साठी काही नवीन तरतुदी आणि स्त्री ने पुरूषांवर केलेले अत्याचार, लुबाडणूक यावर काही बातमी आहे का ते बघून त्यावर तातडी ने धागा काढता की काय?
असो.... हा कायदा मला निमशहरी आणि ग्रामिण भागातील महिलांसाठी उपयुक्त वाटतो. लग्ना आधी/लग्नानंतर स्वतःचा चरितार्थ चालू ठेवण्या इतपत कमावत्या / कमावण्याची क्षमता असणार्या (उच्चशिक्षीत) स्त्रीयांना याचा उपयोग करता येणार नाही असे काही कलम असेल तर या कायद्याचा गैरेफायदा घेण्यावर आळा बसेल.
7 Apr 2011 - 9:45 pm | सुधीर१३७
>>>>हा कायदा मला निमशहरी आणि ग्रामिण भागातील महिलांसाठी उपयुक्त वाटतो.>>>>
.... शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात कायद्याच्या पोटगीच्या तरतुदीचा कसा गैरवापर केला जातो याची न्यायालयात जाऊन खात्री करुन घ्या, म्हणजे असे गैरसमज होणार नाहीत.
>>>>>लग्ना आधी/लग्नानंतर स्वतःचा चरितार्थ चालू ठेवण्या इतपत कमावत्या / कमावण्याची क्षमता असणार्या (उच्चशिक्षीत) स्त्रीयांना याचा उपयोग करता येणार नाही असे काही कलम असेल तर या कायद्याचा गैरेफायदा घेण्यावर आळा बसेल.>>>>
... असे कलम असूनही त्याचा उपयोग होणार नाही कारण अशा स्त्रिया नवर्याला त्रास देण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी असलेल्या नोकर्या-व्यवसाय सोडणार नाहीत याची हमी देता येणार नाही. आणि उच्चशिक्षित नसूनही कमावू शकणार्या वा क्षमता असणार्या महिलांचे काय???
7 Apr 2011 - 8:33 am | शिल्पा ब
कायदा केला तरी पुरुष हा कायदा धाब्यावर बसवायचे उपाय शोधतीलच त्यामुळे काळजी नसावी.
बाकी भारतात ३-४ लग्न करणाऱ्या स्त्रिया आहेत हे वाचून मनोरंजन झाले...किती टक्का आणि कोणत्या थरातल्या स्त्रिया आहेत याविषयी माहिती उपलब्ध असेलच ती जरा देता का? धन्यवाद.
7 Apr 2011 - 9:49 pm | सुधीर१३७
३-४ लग्ने जाऊ द्यात, पण १ लग्न झाल्यावर दुसरे लग्न न करताही अन्य पुरुषांबरोबर तशाच राहणार्या स्त्रियांबद्दल आपणांस काय म्हणावयाचे आहे??? आपणांस हवा असलेला विदा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र कौल घ्यावा लागेल..... :wink:
7 Apr 2011 - 8:34 am | नेत्रेश
घटस्फोटाच्या वेळी नेमका कीती वाटा द्यायचा हे सांगितलेले नाही.
तेव्हा १%, १०%, ५०% की ९०% द्यायचे हे प्रत्येक केस मध्ये परीस्थीती पाहुन ठरवणार असतील.
"विवाहप्रसंगी पतीच्या नावावर असलेल्या मालमत्तेतील वाटा पत्नीला मिळाला पाहिजे." याचा अर्थ काय? विवाह-विच्छेदनाच्यावेळी वाटणी करताना वाटा मिळु शकतो, विवाहाच्यावेळी कसा देणार?
"अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये घटस्फोटानंतर पती व पत्नी यांना मालमत्तेत समसमान वाटा मिळतो" हे वाक्य एकदम चुक आहे.
अमेरीकेत बहुतेक राज्यात विवाह झाल्यापासुन घटस्फोट होईपर्यंतच्या काळात पती-पत्नी दोघांनी मीळुन जेवढे कमावले त्याची समान वाटणी होते. त्यानंतर जास्त कमावणारा/री कमी किंवा न-कमावणार्याला पोटगी देतात. ज्याच्याजवळ मुले रहातात त्याला/तीला दुसरा/री मुलांच्या संगोपनासाठी आणाखी भत्ता देतात.
7 Apr 2011 - 6:24 pm | वपाडाव
याचा अर्थ असा की, लग्नाच्या वेळी जी काही मालमत्ता नवर्याच्या नावावर आहे, तीतला वाटा घतस्फोटाच्या वेळी पत्नीला मिळावा.
पण युयुत्संना एक प्रश्न विचारावा वाटतो
जर नवर्याच्या लग्नाच्या वेळच्या मालमत्तेत अन घटस्फोटाच्या वेळच्या मालमत्तेत फरक/तफावत आढळल्यास (कुणी कमावुन तीत वाढ करु शकतो किंवा कुणी गमावुही शकतो) वाटा कमी-जास्त होइल काय?
म्हंजे जर घटस्फोटावेळी पुरुष फकाट झालेला असेल (धनाढ्य असल्यास काहीही फरक पडणार नाही) तर स्त्रीने अशावेळी काय केले पाहिजे? याबद्दल या कायद्यात काही तरतुद आहे का????
7 Apr 2011 - 10:58 pm | नेत्रेश
लग्नाच्या आधी पती/पत्नी च्या नावावत असलेलल्या संपत्तीची वाटणी व्हायचे कारण काय? त्यांनी विवाहीत असलेल्या काळात मिळवलेल्या संपत्तीची वाटणी होणे बरोबर वाटले. पण लग्नाआधीच्या संपत्तीची वाटणी होऊ नये असेच वाटते. कारण त्यामुळे केवळ संपत्तीसाठी लाटण्यासाठी श्रीमंत पुरुशाशी लग्न करुन घटस्फोट घ्यायचे प्रमाण वाढेल.
7 Apr 2011 - 11:23 pm | रेवती
केवळ संपत्तीसाठी श्रीमंत पुरुषांशी लग्न करणे किंवा श्रीमंत स्त्रीशी लग्न करणे हे नवीन नाही. अशी मनोवृत्ती असणारे कायदा असण्या नसण्याची वाट बघत नाहीत. करायचे ते करून मोकळे होतात. हा कायदा अश्या स्त्रीयांसाठी आहे की ज्यांना माहेरचा रस्ता बंद झाला आहे, आधार नाही, स्वकमाई नाही. मुलेबाळे असणे, त्यांचे वाढते खर्च आणि महागाई तर आपण सगळेजणच पहात आहोत. घरकाम हे कमाईच्या अंतर्गत आहे की नाही हा वेगळा मुद्दा झाला. पण सध्याच्या परिस्थितीत घरकामाचे मोजमाप असे करता येत नाही म्हणून अश्या स्त्रीयांना सोडून देताना पैशाचेही मोजमाप न करण्यासारखी परिस्थिती झाली आहे.
माझ्या एका नातेवाईकांचे लग्न आणि घटस्फोट हा केवळ पैशासाठी झाला होता. अगदी व्यवस्थितपणे त्या मुलीने फसवले होते. ते सर्व जवळून पाहिल्यानंतरही असे म्हणावेसे वाटते की आपल्या समाजात भरडले जाण्याची वेळ बहुतेकवेळा बायकांवरच येते. कायदा हा जास्तीतजास्त लोकांना फायदा करून देणारा असावा. प्रत्येक गोष्टीचे गैरफायदे घेणारी मंडळीही आहेत. आपल्याकडे स्त्रीया जेंव्हा जास्त सक्षम होतील तेंव्हा या सगळ्याची गरज भासणार नाही.
8 Apr 2011 - 9:45 am | वपाडाव
सगळ्याच स्त्रिया ह्या म्हंजे दुर्बल व पिडित घटकांत मोडत नसाव्यात.. तसे असेल तर हरकत नाही. कमावत्या/स्वार्थाखातर लग्न करणार्या स्त्रियांविषयी चर्चा सुरु आहे. त्यांनी असे केले नाही / करणार नाही याची काय शाश्वती...
8 Apr 2011 - 9:50 am | शिल्पा ब
अशा किती स्त्रिया स्वार्थापोटी लग्न करून ते मोडतात याची माहिती द्यावी. आणि कायद्याचा गैरवापर करणारे ते कसाही करतातच.
8 Apr 2011 - 10:12 pm | रेवती
हेच म्हणायचे आहे.
@वडापाव, यामध्ये पूर्णपणे कायदा, व्यवहार आणता येत नाही तरीही जास्तित जास्त व्यवहार्य बनवावं लागतं तो हा प्रकार आहे. जसं लग्न करणे हा मनाचा, प्रेमाचा प्रकार असला तरी त्यासाठी नियम, कायदे मात्र करावेच लागतात.
काही भाग हा स्त्रीयांच्या नैसर्गिक स्वभावाचाही असतो म्हणूनच पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया बळी जाताना दिसतात.
बनेल आणि उनाड स्त्री आणि पुरुष यांची संख्या असेल ती असो पण कायदा हा रक्षणासाठी आहे.
स्वभावत:च सुरक्षितपणाकडे कल असणार्या स्त्रियांना तसे राहू न दिल्यानेच तर त्या स्वावलंबी बनायला बघतात.
शक्यतो कुटुंब टिकवून ठेवण्याकडे कल असतो. मुलं वाढवणे, घर सांभाळणे हे सरसकट नाही तरी बर्याच प्रमाणात स्त्रियांना करायला आवडणार्या गोष्टी आहेत.
7 Apr 2011 - 8:37 am | प्रकाश घाटपांडे
तुम्हाला मुक्त म्हणायचे आहे कि शोषक. शोषक ही वृत्त्ती आहे. तिथे स्त्री पुरुष भेद नाही. शिवाय एका ठिकाणचा शोषक हा दुसर्या ठिकाणी शोषित असु शकतो.
7 Apr 2011 - 8:41 am | युयुत्सु
मुक्त स्त्रीया शोषणाच्या बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत
7 Apr 2011 - 9:02 am | प्रकाश घाटपांडे
भविष्यात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ला मान्यता मिळेल. हिंदु धर्मात विवाह हा संस्कार आहे तर मुस्लिम धर्मात तो करार आहे.
7 Apr 2011 - 9:51 am | विकास
मला नावानिशी आठवत नाही, पण युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोला अर्थशास्त्रात प्राध्यापक असलेल्या जोडप्याचा असा घटस्फोटाच्या वेळेस करार होता. दोघेही आपल्या क्षेत्रात नामांकीत होते आणि एकमेकांना मदत करणारे असावेत. म्हणून करारात बायकोने सांगितले होते की घटस्फोटानंतर जर काहीतरी दिड-दोन वर्षांच्या कालावधीच्या आत नवर्याला नोबेल मिळाले तर त्यातील रकमेत अर्धावाटा तीचा असेल.
नवर्याला त्या करारान्वये मुदत संपायच्या आधी केवळ एक महीना नोबेल मिळाले! अर्थात त्याला रकमेत हिस्सा देयला काहीच वाटले नाही कारण नाव त्याचेच झाले होते. हे कधीतरी नव्वदच्या पुर्वार्धात घडले होते.
7 Apr 2011 - 9:58 am | पैसा
गेलात का परत दुसर्या टोकाला? बॉर्र्र्र्र्र्र्र्र्र.
8 Apr 2011 - 3:38 am | धनंजय
मुक्त असलेल्या लक्ष्मीबाईंना गंगाधररावांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा द्यायला हवा होता/नव्हता... वगैरे विचार मनात आले.
8 Apr 2011 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-)
8 Apr 2011 - 12:28 pm | युयुत्सु
मला तर थडग्यात गडबडा लोळ्णा-या धोण्डोपतांना काय वाटत असेल असे विचार डोक्यात आले.
7 Apr 2011 - 10:08 am | गवि
पुरुषी वर्चस्वाने भरलेली राजकारण आणि कायदेपद्धत असणार्या भारत देशात काहीतरी स्त्रियांसाठी आधारस्वरुप कायदा आला हीच फार मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल अत्यंत आनंद वाटायला हवा. आपल्या सिस्टीमचे अभिनंदन.
गैरफायदा घेणारे असतीलही पण एका गैरफायदा घेणारीमागे एक लाख सामान्य, गरीब, पिचलेल्या स्त्रियांना त्याचा आधार अतएव व्हॅलिड लाभ होत असेल तर असा कायदा सुयोग्यच असतो.
आपल्या देशात तर तो हवाच.
7 Apr 2011 - 10:46 am | टारझन
ह्या वेळी युयुत्सु रावांशी मी सहमत आहे . पैसा हे मुळ कारण आहे सगळ्या समस्यांचे . देणं ही णको आणि घेणं ही नको .
ह्या कायद्यामुळे स्त्रीया पुरुषांवर डिपेंडेबल बणतात. तसेच घटस्फोट मिळाला तरी काय ? आयती संपत्ती भेटणारंच आहे ना ? असा एक छुपा कुटील विचार स्त्रीयांमध्ये वाढिस लागेल. सगळ्या स्त्रीयांनी स्वतःच्या पायावर उभे राहुन स्वावलंबी बनावे. जे आपले नाही त्यावर स्त्री असो वा पुरुष , अधिकार सांगुच नये .
जे आपलं नाही ते घ्यायची भुक्कड प्रवृत्ती म्हणजे जंगलातला " तरस" ह्या प्राण्याचे प्रतिक . आणि स्त्रीयांना "तरसा" ची उपमा देणे गैर ठरेल , क्लेशदायी ठरेल , दु:खदायी ठरेल , मनाला कष्टी करणारं ठरेल किंबहुना स्त्रीयांना देखील ते रुचणार नाही .
तेंव्हा अशा भुक्कड कायद्याला स्त्रीयांनी सुद्धा विरोध करणे गरजेचे आहे . जेणे करुन स्त्रीयांची मान अजुन ताठ राहिल . केवळ युयुत्सुंनी धागा काढळाय म्हणुन त्याला अंधळा विरोध करु नका. पेटुन ऊठा .
- (पेटलेला) जळगावकेळी
7 Apr 2011 - 11:12 am | विनायक बेलापुरे
से बाय बाय टू हाफ युअर एसेटस् .
7 Apr 2011 - 11:54 am | पक्का इडियट
जाऊ द्या हो म्हटलेच आहे ना सर्वनाश समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः
जीव वाचला संपला विषय.
7 Apr 2011 - 12:46 pm | मुलूखावेगळी
असे युयुत्सुनी म्हनले आहे, पन त्यांनी हा उपाय अवलंबला होता का त्यांच्या विवाहाच्यावेळी?
7 Apr 2011 - 4:21 pm | वपाडाव
त्यावेळी हा कायदाच आला नसेल कदाचित...
ती अमेंडमेंट आताशा झालेली आहे...
7 Apr 2011 - 12:47 pm | गवि
या प्रस्तावित बदलांना माझ्या दृष्टीने एकच उतारा आहे - तो म्हणजे विवाहपूर्व लिखित करार करणे. त्याला दूर्दैवाने अजून कायदेशीर मान्यता नाही
का बरे? केला करार तर कोणता कायदा अडवणार आहे ? तशी पद्धत नाही असे म्हणूया..
7 Apr 2011 - 1:39 pm | मुलूखावेगळी
कायदा नाही अडवनार .
पन काही मुली विवाहाला नाही म्हन्तील इतकेच.:)
7 Apr 2011 - 2:03 pm | गवि
तेच तर..पोरीच का?पोरेही नाही म्हणतीलच (डिपेंडिंग ऑन काँट्रॅक्टची कलमे..) :)
म्हणजे कायद्याचा अडसर नाही असे काँट्रॅक्ट करण्यास.
तशी पद्धत नाही. हे योग्य.. :)
7 Apr 2011 - 2:42 pm | मुलूखावेगळी
नाही (चांगली) मुले सहसा मुलीना नाराज करत नाहीत
7 Apr 2011 - 10:14 pm | सुधीर१३७
कायद्याच्या तरतुदीविरुद्ध असलेला कोणताही करार हा अवैध असतो व अशा कराराची अंमलबजावणी करता येत नाही. सदर करार अवैध असल्यामुळे करार करणार्यांवर तो बंधनकारक नसतो. हाच असा करार करण्यातील मोठा अडसर आहे. त्यामुळे अशी पद्धत नाही असे म्हणणे अयोग्यच......
7 Apr 2011 - 11:30 pm | पुष्करिणी
http://www.legalserviceindia.com/article/l284-Pre-nuptial-agreements.html
इथे तर भारतातील काही ठिकाणी लग्नाआधी असा करार करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय असं म्हटलय.
8 Apr 2011 - 12:35 pm | सुधीर१३७
याच लेखात सुरुवातीलाच ३-४ वाक्यांनंतर हा अतिशय महत्त्वाचा उल्लेख आहे, तो कसा विसरलात???
In India however there is no such thing as pre-nuptial agreement. , unlike most countries where a valid prenup is legal and binding when a couple separates, the Indian legal system does not recognise this pre-marital agreement.
......आणि केवळ असे करार करण्याचे प्रमाण वाढले, म्हणजे कायदा त्याला मान्यता देतो असे थोडीच आहे???
8 Apr 2011 - 8:13 am | युयुत्सु
असा करार केला असल्यास आणि वाद उत्पन्न झाला तर न्यायालय त्याला ( करारनाम्यास) कचर्याची टोपली दाखवते.
7 Apr 2011 - 1:23 pm | गणेशा
घटस्फोट घेताना जर बायकोने घटस्फोटाची मागणी केली तर तीला नवर्याच्या मिळकतीतील हिस्सा मिळत नाहि असे ऐकुन आहे. ( कायद्याचे ज्ञान नाही).
पुरुषाने जर घटस्फोटाची मागणी केली तर त्याला बायकोला पोटगी खातर मिलकतीतील वाटा द्यावा लागतो ...
माझ्या म्हणण्याने ... घटस्फोट घेताना दोघांच्या मिळकतीचे अर्धे अर्धे वाटे सरकार च्या तिजोरीत जावुद्या .. आनि त्यांना पेंशनटाईप रक्कम देण्याची तरतुद सुरु करा(त्यांच्या मिळकतीनुसार).. त्या शिवाय हे असले बिंडोक सुधारणार नाहीत आणि सरकारला नविन इन्कम सोर्स पण मिळेल ...
7 Apr 2011 - 9:58 pm | सुधीर१३७
घटस्फोटाची मागणी कोणीही केली तरी परिस्थितीनुसार पोटगी द्यावी लागते. हिंदु कायद्यामध्ये अशी पोटगी पुरुषालाही स्त्रीकडून मिळवता येते, दोघांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून.........
7 Apr 2011 - 10:10 pm | मुलूखावेगळी
तुम्हाला पगार किती , तुम्ही बोलता किती ;)
ह.घ्या.
7 Apr 2011 - 10:13 pm | सुधीर१३७
माफ करा, पण मला पगार मिळत नाही, तर द्यावा लागतो............... :)
8 Apr 2011 - 9:49 am | वपाडाव
या प्रतिसादावरुन मुवे वेठबिगार असल्याचे कळते...
8 Apr 2011 - 11:07 am | टारझन
=)) =)) =)) =)) सकाळी ऑफिस ला जाताना एमआयडीसी मधे नाक्यावर कुदळ-फावडे घेऊन कामासाठी उभ्या असल्या स्त्री-पुरुष कळपाची आठवण झाली :)
8 Apr 2011 - 11:26 am | llपुण्याचे पेशवेll
आणि डोक्यावर चुंबळ पण. ;)
7 Apr 2011 - 1:26 pm | विजुभाऊ
या नवीन बदलांनूसार स्त्रीला नवर्याच्या संपत्तीत थेट वाटा द्यावा असे सूचविण्यात आले आहे. लग्नाच्या वेळेला नवर्याच्या नावावर असलेल्या संपत्तीत वाटा घटस्फोटित पत्नीला मिळावा अशी ही शिफारस आहे.
यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. भारतीय समाजात महीला या बरेचदा पुरुषांवर अवलंबून असतात . पुरूष एकटाच अर्थार्जन करतो आणि स्त्री घर सांभाळते. अशा परीस्थितीत स्त्री स्वत्:ची संपत्ती कशी निर्माण करणार? जर अर्थार्जनाचा अधीकार नसेल अथवा कामाची तशा प्रकारची वाटणी झालेली असेल तर मग अर्थार्जन करणार्या घटकाने मिळवलेली संपत्ती त्या त्या प्रमाणात अर्थार्जन न करणार्या परंतु अर्थार्जन करणार्या घटकास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार्या घटकास मोबदला म्हणून मिळालीच पाहीजे.
उदा: एखाद्या ऑफीसात सफाई कामगार म्हणून काम करणारा हा अप्रत्यक्षपणे विक्री करणारना मदत करतच असतो.
अवांतरः स्त्रीया किती हुशार असतात. लग्न झाल्यानन्तर एक दोन दिवसातच नवर्याच्या वडीलांच्या घराला स्वतःचे घर मानायला लागून हे माझे घर ही माझे स्वयंपाकघर असे बोलायला लागतात.
पुरूष त्यामानाने असे करत नाहीत.
7 Apr 2011 - 5:36 pm | रेवती
ही बातमी असलेल्या पेप्रात आरोग्यदिनानिमित्त बातमी आलीये ती बघितलीत का हो युयुत्सु?
तीही महिलांविषयीच आहे. काही लिहिले नाहीत अजून त्याबद्दल.
7 Apr 2011 - 5:50 pm | धमाल मुलगा
मी काय म्हणतो,
जर ती स्त्री कमवत नसेल, तर तीला असा वाटा देणं न्याय्य आहे. पण जर ती कमावती असेल, स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभी असेल तर मात्र देण्याची गरज नसावी.
ह्याउप्पर मी असं म्हणेन की, दोघांच्या संपत्तीची (कमावलेली, मिळालेली अशी) मोजदाद करुन ज्याची संपत्ती कमी भरेल त्याला, मग तो वादी-प्रतिवादी स्त्री आहे की पुरुष ह्याचा विचार न करता समान वाटली जावी. ...
निदान वेगळं होताना तरी कोणत्याशा एखाद्या पातळीवर का होईना सारखे येतील. :)
7 Apr 2011 - 10:02 pm | सुधीर१३७
>>>>>> ह्याउप्पर मी असं म्हणेन की, दोघांच्या संपत्तीची (कमावलेली, मिळालेली अशी) मोजदाद करुन ज्याची संपत्ती कमी भरेल त्याला, मग तो वादी-प्रतिवादी स्त्री आहे की पुरुष ह्याचा विचार न करता समान वाटली जावी. ... >>>>
............. सहमत, पण त्यामध्ये दोघांवर अवलंबून असणार्यांचा (आई, वडील, मुले, मुली, मतिमंद अगर अपंग भावंडे) यांचाही विचार केला जावा.
7 Apr 2011 - 10:19 pm | धमाल मुलगा
कायदा म्हणजे फतवा नसावाच.
न्याय्य विचार केलेला असावाच.
7 Apr 2011 - 10:37 pm | सुधीर१३७
धमु,
नाही नाही................. कायदा म्हणजे फतवाच, पण न्याय्य विचार करुन केलेला (काढलेला).......... :) :wink:
8 Apr 2011 - 9:29 am | विनायक बेलापुरे
+१
7 Apr 2011 - 6:12 pm | सांजसखी
धमाल , आपल्याशी सहमत .
8 Apr 2011 - 9:56 am | पिवळा डांबिस
हा कायदा जरी शोषित स्त्रीयांना डोळ्यासमोर ठेवून केला असला तरी मुकत स्त्रीया याचा गैरफायदा घेऊ शकतात. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी ३-४ लग्न करणार्या स्त्रियांची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात.
आयला, ३-४ लग्ने करणार्या स्त्रियांशी ४-५वे लग्न करणार्या गाढवाला अशीच शिक्षा हवी!!!!!
वाटाच काय सगळीच संपत्ती हिरावून त्याची!!!!!
आणि त्याच्या नावांने रस्त्यावर एक दिव्याचा पोल उभारा!!!!
:)
8 Apr 2011 - 12:28 pm | सुधीर१३७
सहमत..................पण फक्त पहिल्या लग्नांची माहिती असताना देखील पुन्हा विवाह केलेल्या पुरुषांनाच असा अपवाद सुचवून.................. :)
8 Apr 2011 - 7:10 pm | वाहीदा
इब्तिदा-ए-इश्क़ है ,रोता है क्या ??
आगे ,आगे, देखिये होता है क्या ...
[इब्तिदा-ए-इश्क़ = प्रेमाची सुरवात ]
-- मीर तक़ी 'मीर'
ह्म्म हे 'इब्तिदा-ए-इश्क़' त्या ऐवजी 'इन्तेहा-ए-इश्क' म्हणावे का ?
आता पिडित पुरुष कदाचित हेच म्हणणार
मैंने तुम्हे चाहा ये मेरे इश्क की इब्तदा थी, अब देखना ये है कि, तेरे जुल्म की इन्तेहा क्या है। ;-)
अवांतर : The study done across six countries shows that majority of Indian men believes that women should tolerate violence (60%), and stated that women should be beaten up (65%). And only 14% of men in the country shares household chores
8 Apr 2011 - 10:21 am | नगरीनिरंजन
कायदे करून प्रश्न सुटत असते तर आतापर्यंत पृथ्वीचा स्वर्ग झाला असता.
बाकी चालू द्या.
अवांतरः विवाहित असलेला कोणताही पुरुष कडाडुन नाही फक्त आडुन आडुन विरोध करू शकतो. :-)
8 Apr 2011 - 10:47 am | प्रकाश घाटपांडे
अहो स्वर्गात बी लई लफडी असत्यात. संदर्भः गाढवाचे लग्न तील सावळ्या कुंभार
8 Apr 2011 - 1:41 pm | वपाडाव
ह्या प्रतिसादाला टाळ्या न मिळालेल्या पाहुन वाक्याची शाश्वती पटते.
8 Apr 2011 - 10:01 pm | प्रशु
समजा हा कायदा आला आणि घटस्पोटच्या वेळी जर पुरुषाचे घर असेल तर त्याच्या पत्नीला त्या घराचा समान वाटा मीळेल पण त्या घरावर जर ग्रुहकर्ज असेल तर त्याच्या हप्तांची सुद्धा समसमान वाटणी व्हावी.
हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत असे नागरीकशास्त्र म्हणतं...