फायनल : विघ्नसंतोषीपणा (?)

चिगो's picture
चिगो in काथ्याकूट
4 Apr 2011 - 4:54 pm
गाभा: 

वर्ल्डकपची फायनल. भारताच्या इनिंगला पुर्ण वेळ मी शब्दशः "फिंगर्स क्रॉस" करुन बसलेलो होतो. धोनीचा सिक्सर गेला नी मी फुटलो.. काय करावं ते कळेना. आरोळ्या, बोंबा, शिट्या सगळं झालं.. टिव्हीवर दिसणारा जल्लोष पहात बसलो जवळजवळ रात्री २ पर्यंत, आणि हे करतांनाच फोन, मेसेजेस सुरु होतं...
दुसर्‍या दिवशी सकाळी मोबाईल पाहीला. त्यात एक मेसेज होता, "अरे, मॅच फिक्स्ड होती. आम्हाला आधीच सगळं (म्हणजे स्कोर, विकेट्स वगैरे) माहीत होतं." आणि सोबत कोणाला काय मिळालयं त्याचं वर्णन... मी चमकलो. कारण मेसेज करणारी व्यक्ती बेजबाबदार, उगाच काहीतरी बोलणारी नाहीय. विघ्नसंतोषी पण नाही. मी रिप्लाय केला, "हा एप्रिल फुलचा मेसेज जुना झालाय." समोरची व्यक्ती तडकली. पुन्हा मेसेज, "तू अजुन लहान, अजाण आहेस. त्यातल्या त्यात "नॉर्थ ईस्ट"ला राहतोयस, त्यामुळे तुला बर्‍याच गोष्टी माहीत नाही तुला."
आता मात्र मी सटकलो. मी लिहीलं, "मान्य की मी नॉर्थ ईस्टला राहतो, आणि कदाचित मला काही गोष्टी माहीत नसतील. पण जर तुम्हाला सगळं आधीच माहीत होतं तर तुमचा सोर्स तरी सांगा. आणि आम्हाला सांगत चला, म्हंजे मॅचच्या वेळी जी पाकपुक-पाकपुक हालत होते ती तरी होणार नाही." ह्याला मात्र उत्तर आलेले नाही...

मला सांगा, प्लिज :
१.ही सर्वज्ञानी माणसं "मॅच फिक्स होती" हे मॅच झाल्यावरच का सांगतात? आधी कुठं आणि का लपवून ठेवतात मग असली बहुमोल माहीती? आणि खोटं असेल तर का हा विघ्नसंतोषीपणा?

२.मॅचनंतर सचिन, युवी, भज्जी आणि इतर खेळाडुंचे डोळे पाणावलेले होते. सगळे भावुक, येडेपिसे झाले होते. सब झूठ होतं?
आपले प्लेअर्स नुसते अ‍ॅड्स करुन एवढे चांगले अ‍ॅक्टर्स झालेयत?

३. माझ्या पाहण्यातली ही सगळ्यात टफ वर्ल्डकप फायनल होती. (मला आठवतात त्या १९९९, २००३ आणि २००७ च्या मॅचेस एकतर्फी झाल्या होत्या.) कशाला मग श्रीलंकेनी एवढी उरस्फोड मेहनत घेतली? शेवटच्या ३० चेंडूत ६३ धावा कशाला?

४. श्रीलंकेचे खेळाडू पण अ‍ॅक्टींग करतात काय? कारण शेवटी स्कोअर वाढल्यावर झालेला आनंद तर अस्सल होता त्यांच्या वागण्यातून. आणि मुख्य म्हणजे खरंच कुठलाही खेळ असा चढ-उतारांसहीत आधीच ठरवता येऊ शकतो ??

मित्रांनो, तुमच्या जल्लोषावर, आनंदावर मळभ टाकायची इच्छा नाहीय. ते आलं की कसं वाटतं हेही अनुभवतोय.. पण फक्त स्वत:च्या मनातली जळमटं, जळजळ (किंवा जे काही असेल ते) बाहेर टाकण्यासाठी कुणी आमच्या आनंदावर शेण पसरवत असेल, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्यासाठी हे कुटणं...

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

4 Apr 2011 - 5:03 pm | सुहास..

चिन्या, आधी एक लेख झालाय रे ;)

पण असो

फक्त स्वत:च्या मनातली जळमटं, जळजळ (किंवा जे काही असेल ते) बाहेर टाकण्यासाठी कुणी आमच्या आनंदावर शेण पसरवत असेल >>>
आम्ही तेच शेण वापरुन ओटा सावरुन घेतो आणि असल्या शहाण्यांची राख रांगोळी करतो ..

तु का टेन्शन घेतो आहेस ..व्ही आर दि वर्ल्ड चॅम्पियन्स नाऊ फॉर फर्दर फोर इयर्स !!

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2011 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार

सुहास हिच प्रतिक्रीया देणार हे लेख यायच्या आधीच माहिती होते.

फिक्सिंगकथेतला बेटिंगकुमार

पराहास हिच प्रतिक्रीया देणार हे प्रतिक्रिया यायच्या आधीच माहिती होते. ;)

©º°¨¨°º© म्यांव ©º°¨¨°º© ;)

रामदास's picture

4 Apr 2011 - 5:58 pm | रामदास

नेहेमीच होत असतात -होत राहतात. मग तो विश्वचषक असो किंवा विश्वसुंदरीची निवड असो. एखाद्या लग्न समारंभाला गेल्यावर मुलीच्या /मुलाच्या चारीत्र्याविषयी मांडवातच चर्चा करणारे महाभाग प्रत्येक समारंभात भेटतात तसा हा प्रकार आहे.

विनायक प्रभू's picture

4 Apr 2011 - 6:05 pm | विनायक प्रभू

पण भारतीय विश्वसुण्दरी खिताब फिक्स होता ह्या बाबतीत काही ही संशय नाही.
डेवलपींग कंट्री मधे कंट्री लोका नी ब्युटी प्रॉदक्ट विकण्या करता.

रेवती's picture

4 Apr 2011 - 6:20 pm | रेवती

मला शेवटच्या बॉलला (सिक्सरवाल्या) शंका आली हे नाकारत नाही.
पण बाकी म्याच तशी वाटली नाही.
जर तसे असेल तर आणखीनच अवघड आहे.
एखाद्याने इतक्याच रना करायच्या किंवा अमूक एका ओव्हरमध्ये स्व:चा गेम ओव्हर करायचा याचे गणित मनात ठेवून खेळायचे काम कष्टाचे आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2011 - 6:24 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावरील काही लेखन व प्रतिक्रीया देखील फिक्स असतात अशी शंका आहे ;)

रेवती's picture

4 Apr 2011 - 6:32 pm | रेवती

होय तर!
तेवढच राह्यलय बाबा!;)
तुला म्याच होइल अशी मुलगी शोधून लग्न फिक्स कोणं करणार अशी काळजी वाटतिये.;)

साधारण ८-१० महिण्यांपुर्वी एका आयडी च्या बॅन साठी १३,००० करोड रुपयांचा सट्टा लागला होता.

राजेश घासकडवी's picture

5 Apr 2011 - 9:03 am | राजेश घासकडवी

१३००० करोड नाही, तेराशे रुपयांचा सट्टा होता. पण ते डील फायनली दोन-तीन मस्तानीमध्ये झालं...

संदीप चित्रे's picture

4 Apr 2011 - 6:42 pm | संदीप चित्रे

सचिनला खांद्यावर उचलून मारलेली फेरी आणि भारतीय संघाच्या डोळ्यातले आनंदाश्रू लक्षात ठेव.
बाकी त्या एस.एम.एस.सारखी ये&%$%$गिरी कुणी ना कुणीतरी करतच.. लक्ष नही देनेका :)

चिगो's picture

4 Apr 2011 - 11:26 pm | चिगो

सचिनला खांद्यावर उचलून मारलेली फेरी आणि भारतीय संघाच्या डोळ्यातले आनंदाश्रू लक्षात ठेव.
तेच तर लक्षात ठेवलयं, दोस्ता.. मलाही कंठ दाटल्यासारखं वाटत होतं..

रमताराम's picture

4 Apr 2011 - 7:17 pm | रमताराम

अशा प्रकारच्या सर्व 'प्रॉफसीज्' ना आम्ही 'पॉस्ट्राडेमसिजम' म्हणतो. नॉस्ट्राडेमसच्या तथाकथित प्रॉफसीज जशा प्रत्यक्षात उतरल्यावरच लोकांना समजतात (नि पुलंच्या बटाट्याच्या चाळीतील ज्योतिषी जसे हे असे होणार असे त्यांच्या डायरीत आधीच टिपून ठेवलेले असते तसे) तसेच हे. म्हणून तर आम्ही नॉस्ट्राडेमसला 'पॉस्ट्राडेमस' म्हणतो नि त्याच्या भविष्य वर्तवण्याच्या पद्धतीला पॉस्ट्राडेमसिजम'. असो.

मुळात म्याचेस पूर्णांशाने फिक्स करता येतात असे म्हणणे हे असे म्हणणार्‍याच्या डोक्याचा आतील आवश्यक इंद्रिय गायब असल्याचे लक्षण आहे असे आम्ही मानतो. त्यामुळे 'कॉन्स्पिरसी थियरी' आवडणार्‍यांच्या मूर्खपणाचा वापर करून आपले उखळ पांढरे करून घेणार्‍या टेलिकॉम कंपन्यांना मदत करण्याचा आम्ही चुकूनसुद्धा प्रयत्न करीत नाही. धन्यवाद.

भारतच जिंकणार हे सांगणारे समस ठेवायचे, वाचायचे आणि त्यांचा आनंद घ्यायचा, ते प्रत्यक्षात उतरलेले पहायचे आणि कल्ला करायचा!! :) बाकीचे निगेटीव्ह आणि विरोधी समस, आणि ते करणारे ह्यांच्याकडे दुर्लक्ष करणे! इतकं सोप्पं आहे. :)

किशोरअहिरे's picture

5 Apr 2011 - 3:24 am | किशोरअहिरे

अरे लै टेंशन घेऊ नका..
बादवे .. भारत पाक मॅच फिक्स झाल्यासारखी वाटत होती..
ज्या प्रकारे पाकड्या प्लेयर नी विकेट्स फेकल्या आणी मिसबाह खेळला..
आणी अफ्रिदी मॅच हारल्यानंतर एवढा खुष का होता ते पण झेपले नाही.. (हँन्सी क्रोंजे पण असाच खुष होता :( म्हणुन एक डाऊट)
खरतर अझहर्/जडेजा/मोंगिया आणी क्रोंजे सारख्या खेळाडुंनी खालेल्या शेणामुळे क्रिकेट चा ईंट्रेस्ट गेला..

पण भारत श्रीलंका मॅच फिक्स नो वे.. अशक्य आणी केवळ अशक्य..
ही मॅच फक्त देवाने फिक्स केली होती असेच म्हणता येईल .. :)
शेवटी ज्या प्रमाणे संघकारा आणी ईतर १० जण सगळ्या जीवाचा आकांड तांडव करीत मॅच फिरवु पाहत होते..
त्यातल्या त्यात त्या झिपरु मलिंगाचे यॉर्कर .. जर फिक्स असती मॅच तर त्याला आजारी म्हणुन बाहेर ठेवले असते..
पण मेंडीस ला बाहेर का ठेवले हे काय कळाले नाही..

मृत्युन्जय's picture

5 Apr 2011 - 10:09 am | मृत्युन्जय

मी काय म्हणतो, समजा असेल फिक्स केलेली. काय फरक पडतो? १००% खात्री नाही आहे ना. मग करा ना एंजोय च्यायला. तेवढाच आनंद मिळेल ना. बाकी सगळं गेलं *स*त मग.

एकदा शंकासुर आला की असाच छळत राहणार आणि कशाचाच आनंद घेऊ देणार नाही.

मला वाटते की कितीही पैसा ओतून मॅच फिक्स करु गेले तरी वर्ल्ड कप फायनल सारख्या मॅचबाबतीत हे शक्य होईल असं वाटत नाही.

जरी सर्वच्या सर्व टीम भ्रष्ट आहे आणि कोणीच व्हिसल ब्लोअर नाही, सर्वांना संतुष्ट करणारी रकमेची वाटणी होत आहे आणि चोवीस कानांत मिळूनही प्रामाणिकपणे गुप्तता जपली जातेय असं सगळं सगळं गृहीत धरलं तरी असे गैरप्रकार उघड होण्याचं प्रमाण इतकं वाढलंय की बक्षीसाचे आणि जाहिरातींचे मिळून जे काही वीसपन्नास कोटी मिळतील ते आणि थोडाफार मानसन्मान घेउन गप सेफ राहण्याचीच शक्यता जास्त आहे. अजून पन्नास कोटी जास्त मिळावेत म्हणून कोणी संघातलं स्थान अतएव सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापेल असं वाटत नाही.

(अझरुद्दिन वगैरेला कोणी पान मसाल्याची तरी जाहिरात दिली का तोंड काळे झाल्यापासून?)

शिवाय हे असं असलं तर ते साध्या पर्सनल एसेमेस मधून उघड होईल असं वाटत नाही. त्यासाठी जरा वरच्या लेव्हलचे ओपनिंग चॅनेल्स आहेत टपलेले.

शिवाय एसेमेस मधे म्हटल्याप्रमाणे श्रीलंका जिंकली नाहीच. इतका मोठा (खरं तर सर्वात मोठा) मुद्दा खोटा ठरल्यावर बाकीच्या किरकोळ मुद्द्यांना शून्य सत्यता राहते.

चिगो's picture

5 Apr 2011 - 10:06 pm | चिगो

एकदा शंकासुर आला की असाच छळत राहणार आणि कशाचाच आनंद घेऊ देणार नाही.

अगदी हाच तर प्रॉब्लेम आहे ना, गवि..
बाकी तुमचे मुद्दे पटले. मलाही हेच म्हणायचंय की चारचव्वल कोटींसाठी कुठलाच खेळाडू हा मुर्खपणा करणार नाही. आय पी एल पायी तसेही लै पैसे मिळताहेत आजकाल त्यांना..

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2011 - 12:12 pm | llपुण्याचे पेशवेll

भारताने मॅच जिंकण्यासाठी कोणी फिक्सिंग केलेच असेल तर आम्हाला त्यात अत्यंत आनंद आहे. :) असेच फिक्सिंग करून भारताने यापुढे फुटबॉल वर्ल्डकप, ऑलिम्पिक पदकेही जिंकावीत अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो.

त्याला "बे चोक आठ" म्हणायचे आन Go To Hole....

सुधीर१३७'s picture

5 Apr 2011 - 9:51 pm | सुधीर१३७

असले sms पाठविणार्‍यांच्या मेंदूची कीव कराविशी वाटते, च्या xxx भxxx xxत ......

मारा xxवर........................

सू.अ.सां. न.

सुधीर१३७'s picture

5 Apr 2011 - 10:43 pm | सुधीर१३७

ही बातमी वाचा.

http://navbharattimes.indiatimes.com/cwcarticleshow/7875380.cms

यांनाही योग्य जागी मारण्यात आले आहे................................. :)