भारतवेडी कमला
आपण ऐकत आलोय स्वामी विवेकानंदांच्या आभावलयामुळे प्रभावित झालेल्या भगिनी निवेदिता किंवा महात्मा गांधींच्या सात्विक व तत्वनिष्ठेने प्रभावित झालेल्या मीराबेनची आत्मसमर्पणाची भावना. देश बंधु-बांधवांना सोडून भारताची आस धरुन आलेल्या त्यागी महिला. अशीच एक भारती वेडी महिला - कमला!
नाडीग्रंथांच्या प्रथम आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने झेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागच्या वास्तव्यात अनेकांच्या व्यक्तिमत्वांची छाप आम्हावर पडली त्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे कमला उर्फ कॅथरिना स्लाडका.
कॅथरिन दिसायला ठेंगणी ठुसकी. गोरी, घारे डोळे, सरळ नाक व मक्याच्या कणसातून निघणाऱ्या कोवळ्या सोनेरी झुपक्यांच्या रंगाचे केस असलेली. अस्खलित इंग्रजीतून प्रभावीपणे आपले मनोगत स्पष्ट करणारी.
वारंवार भेटत राहिली. भारताविषयीच्या आपल्या आदराच्या भावनांना शब्दांकित करताना डोळ्यात आनंदाश्रू उभे करून गेली.
कॅथरिन आठवली की तिच्यासारखे भारतावर निर्व्याज प्रेम आम्ही भारतीय तरी करू शकतो का असे सहजच वाटायला लावणारी ही मुलगी. साधारण ४०चाळीशीतील असेल असे तिचे नाडी ग्रंथातील कथनावरुन मानावे लागले.
भारतातून कोणी आले की मला फार आनंद होतो. त्यांच्याशी बोलताना, त्यांचे विचार ऐकताना मला प्राचीन गौरवशाली भारतीयांच्या मनाला भेटल्याचे समाधान वाटते. मी नाडीग्रंथावरील आपल्या इंग्रजी पुस्तकाची पारायणे केली आहेत. आपली जर हरकत नसेल तर मी आपल्या सानिध्यात राहून नाडीमहर्षींच्या बाबतीतील आपले विचार ऐकायची फार इच्छा आहे. आपण बोलत रहावे.
मी तिला बोलते करायला विचारले, तुला भारताविषयी इतके प्रेम केंव्हापासून वाटायला लागले? तू भारतात केंव्हा आलीस? का आलीस?
ती म्हणाली की अगदी लहानपणापासून मी मला भारतीयच असल्याचे समजते. का? कसे? मलाही ठाउक नव्हते. मी आले ते पुण्याच्या जवळील लोणावळ्यातील एक गुरुंच्याकडून योगसाधना करायला. त्यानंतर फिरत फिरत रमणाश्रमात जाऊन तेथील तिरुवन्नमलाईच्या पर्वतावरील रम्य व गूढ वातावरणाने मला वेडे केले.
मी भारतीय नृत्य़ व अन्य कला शिकले. भारतात अनेक पवित्रस्थानांना भेटी दिल्या. अनेक संत महंतांचे आशीर्वाद मिळवले. मी इथे प्रागला आमच्या प्रॉपर्टीज् सांभाळायला राहाते. पण अमेरिकेत शिक्षणासाठी राहायला लागल्यामुळे मला इंग्रजीत बोलायचा उत्तम सराव आहे.
खरे तर मी शरीराने या झेक देशात असले तरी मनाने मी सतत भारतात वावरते. तशी मी भारतीयच मानते स्वतःला!
आज माझे नाडी ग्रंथांतील कथन ऐकून मला प्रथम धन्य वाटले की प्राचीन भारतीय परंपरा किती थोर आहे. मानवतेसाठी निस्वार्थ बुद्धीने आपली पज्ञा पणाला लावणारे फक्त भारतीयच असू शकतात हे मला आज नाडीग्रंथांतून माझ्या बाबतच्या कथनाने प्रकर्षाने जाणवले.
"महर्षी तर मला भेटायला आले होते. त्यांच्या लाडक्या मुलीला. तिचे लाड करायला. तिला तिचा पुर्वजन्मातील इतिहास कळवायला" नाडीग्रंथांतील तिची ताडपट्टी मिळाली तेंव्हा त्यातील कथनाने तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. नाडीवाचनाच्या रुमच्याबाहेर येऊन मला सांगताना तिने आपल्या पुर्वजन्माबद्दल म्हटले, "नाडी महर्षींनी कथन केले की तू त्या काळातील लोकांना आपल्या देश बांधवांना, निरपराध जनतेला परागंदा व्हायला परावृत्त केलेस. त्यांच्या यातना तुला कळाव्यात. त्यांची ताटातूट तुला अनुभवायला यावी म्हणून तू आज ऐश्वर्यात व सुखात असलीस तरी मायदेशाची ओढ तुला चैन पडू देत नाही. तुला अद्दलही घडवायची आहे आणि तुझी पारमार्थिक प्रगती करायला तुला प्रवृत्तही करायचे आहे.
ती पुढे म्हणाली, "नाडीमहर्षींनी त्यांच्या इथे येण्याची कारणमिमांसा कशी केली ते सांगते, "असे अनेक मानव आमची इथे (परदेशात) वाट पहात होते त्यांना योग्य वाट दाखवून काही काळांने त्यांना त्यांच्या आयुष्याची सार्थकता कशात आहे याची जाणीव करून द्यायची वेळ आली. आम्हाला भारताची सीमा ओलांडून तुमचा पाहुणचार घ्यायला, इथल्या काही लोकांना प्रवृत्त केले गेले. यापुढे या खंडातील अनेक लोकांना नाडी ग्रंथांचा परिचय करून देऊन आमच्या कार्याची सखोल माहिती करून द्यायला अनेकांना उद्युक्त करायचे कार्यही आमच्याकडून होत आहेत."
महर्षींच्या द्रष्टेपणाची झलक मला त्यावेळी प्रकर्षाने जाणवली. लहान बालकाला त्याच्या चालीने हातात हात धरुन त्याला रुचेल असे वागून आई-वडील ज्या आस्थेने बालकांचे पालनपोषण करतात, त्याच मानसिकतेने आम्हा सामान्यांना नाडी महर्षी ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार हिताचे मार्गदर्शन करतात. सुचवतात. काही मानतात. त्यांना उपयोग होतो.
हॉटेलात जेवताना फक्त शाकाहार व शुद्ध पाणी पिणारी, कॅथरिना फार लाघवी. गप्पिष्ठ. ती बोलायला लागली की तिची वाणी ऐकत रहावीशी वाटे. आमच्या राहत्या घरात येऊन मी आपल्याला भेटले तर आपल्याला आवडेल का? मी आपल्या सारख्या भारतीयांबरोबर क्षण न क्षण घालवायला आतूर आहे. अशा भारतवेड्या मुलीला नाही तरी कसे म्हणणार?
तिला तिच्या गुरूंनी जेव्हा “कमला” हे नामाभिकरण केले तेंव्हा ती फारच आनंदली. तिची अध्यात्मिक प्रगती पाहून तिच्या बरोबरच्यांना वाटले की तिला आपले गुरू काहीतरी खूप उच्च दर्जाचे नाव लावायला सांगतील. त्यामानाने कमला फारच अळणी वाटले. त्यावर तिने केलेले भाष्य फारच प्रभावी होते. “KAMALA MEANS LOTUS. IT IS THE FORM OF PURITY. SHOWING THE WORLD HOW ONE CAN UPHOLD ITSELF BEING IN THE SWAMP OF COMPLEX AFFAIRS OF THE NATURE.”
“भारत” म्हटल्यावर तुझ्या मनात काय येते? असे विचारल्यावर तिचे बोल होते, “COMPASSION. TOLERANCE, KNOWLEDGE AND PURITY.”
विमानातून खाली उतरल्यावर ही मुलगी नतमस्तक होऊन प्रथम भारतभूमीचे चुंबन घेण्यात धन्यता मानते.
धन्य तो देश. धन्य ती माती. धन्य ते महान लोक ज्यांनी या भारताला हे महानपण दिले. धन्य ती भारत वेडी कमला!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
22 Oct 2010 - 2:30 pm | योगी९००
तिला तिच्या गुरूंनी जेव्हा “कमला” हे नामाभिकरण केले तेंव्हा ती फारच आनंदली.
असे नाव बदलायची गरज असते का?
22 Oct 2010 - 2:40 pm | विजुभाऊ
अरे बाबा अध्यात्मात हे असेच असते. नाव बदलणे याचा अर्थ वैयक्तीक इतिहास पुसणे असा होतो.
असो.
बाकी लेख वाचून डोळे पाणावले.
ओक साहेबांच्या चिकाटीचे आता मात्र खरच कौतुक वाटते.
ते नाडीची कास सोडत नाहीत
22 Oct 2010 - 10:50 pm | शिल्पा ब
वा रे वा!!! अशी नाडीची कास सोडुन कसे चालेल?
22 Oct 2010 - 5:14 pm | गुंडोपंत
चांगली ओळख करून दिली भारतावरचे प्रेम पाहून बरे वाटले असे लोक आहेत हेच आपले सुदैव!
22 Oct 2010 - 5:40 pm | अवलिया
चांगला लेख. ओक साहेब कार्य जोमाने चालु ठेवा !
22 Oct 2010 - 10:46 pm | मिसळभोक्ता
“KAMALA MEANS LOTUS. IT IS THE FORM OF PURITY. SHOWING THE WORLD HOW ONE CAN UPHOLD ITSELF BEING IN THE SWAMP OF COMPLEX AFFAIRS OF THE NATURE.”
कमळ (अथवा कमल) म्हणजे लोटस. कमला म्हणजे लक्ष्मी.
नाडीमहर्षींना परदेशी महिलांमध्ये साक्षात लक्ष्मी दिसली, ह्यात नवल ते काय ?
नाडीमहर्षींनी त्यांच्या इथे येण्याची कारणमिमांसा कशी केली ते सांगते, "असे अनेक मानव आमची इथे (परदेशात) वाट पहात होते त्यांना योग्य वाट दाखवून काही काळांने त्यांना त्यांच्या आयुष्याची सार्थकता कशात आहे याची जाणीव करून द्यायची वेळ आली.
आयुष्याची सार्थकता आणि लक्ष्मी ह्यांचा संबंध आहेच मुळी !
27 Oct 2010 - 6:26 pm | सिद्धार्थ ४
छोट्या छोट्या गोष्टीत चुका नका शोधू....भावनाको समझो !!!!!
27 Oct 2010 - 6:10 pm | मितभाषी
भारतवेडी कमला आणि नाडीवेडे ओकसाहेब वा व्वा!
27 Oct 2010 - 6:17 pm | स्पा
छान लेख ओक साहेब................
27 Oct 2010 - 6:22 pm | सिद्धार्थ ४
छान लेख..
एक प्रश्ण :- माझे नाडी भविष्य कुठे मिळेल?
27 Oct 2010 - 7:19 pm | वेताळ
लेख वाचताना मनाने मी प्राग मध्ये पोहचलो होतो. खुपच छान लेख.
27 Oct 2010 - 8:59 pm | मधुशाला
हे काय असतं? आणि नाडीग्रंथ कसला? नाड्या कश्या बांधाव्यात/नाड्यांच्या वेगवेगळ्या गाठी असला काही प्रकार आहे काय? धन्य आहे. कोण कसल्या विषयावर संशोधन करेल काही सांगता येत नाही. चालू द्या...
(पूर्ण लेख वाचला नाही. वेळ मिळाला की वाचेन... कदाचित)
28 Oct 2010 - 8:58 am | पिवळा डांबिस
असे साक्षेपी लोक भारताच्या संरक्षकदलात होते हे जाणवून भीतीने अंग शहारले.........
(अधिक माहितीसाठी रशिया आणि रशियन प्रभावाखालच्या राष्ट्रांनी अजमावलेल्या हेरगिरिच्या विविध क्लूप्त्याबद्दल अधिक माहिती मिळवावी!!!!)
बाकी नाडी भविष्य वगैरे चालू द्या.....
हु द हेल गिव्ह्ज अ डॅम्न!!!!
28 Oct 2010 - 12:15 pm | विजुभाऊ
हेरगिरीसाठी नाडीचा वापर करता येईल का?
30 Oct 2010 - 10:52 pm | शशिकांत ओक
कमला विमला ,
लेखाच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
कमळाप्रमाणे विमल व्यक्तिमत्व शोधण्याचा प्रयत्न.
नाडी ग्रंथांबद्दल लिहिण्याआधी एकदा अनुभव घेऊन मग विचार व्यक्त केले असते तर अधिक चांगले झाले असते.
31 Oct 2010 - 10:18 am | मितभाषी
ओकसाहेब मग कमलाची नाडी सोडली ...म्हणजे
शोधली का?
नाडी शोधन काय असते बॉ?
31 Oct 2010 - 11:18 am | ज्ञानेश...
तुमची मते काहीही असू द्यात, पण एका महिलेबद्दल असे लिहिणे शोभत नाही.
संपादकांनी दखल घ्यावी.
31 Oct 2010 - 11:46 am | शिल्पा ब
+१
31 Oct 2010 - 11:49 am | अवलिया
+२