गंभीर हास्य !!!

अर्धवटराव's picture
अर्धवटराव in काथ्याकूट
15 Sep 2010 - 6:50 am
गाभा: 

नमस्कार मंडळी.

हि लिंक बघा.
http://www.youtube.com./watch?v=gclosBcTgF8&feature=related

आपण यापुर्वी असल्या क्लिप्स बघितल्या असतील... मला तर हे सगळं फार फार करमणुकप्रधान वाटलं. पण नंतर काहि प्रश्न देखील पडले...
१) गेंड्याची कातडी म्हणतात ति हीच काय ???
२) आपण थेट रामायण कालापासुन ते शिवयुग, भारताचा स्वातंत्र्यलढ्यापर्यंत सर्व सर्व घटनांचा, कृतींचा पुरावा शोधत असतो, त्यावर वादविवाद करत असतो, अभ्यास करत असतो. इथे आजच्या म्हणता येईल इतक्या ताज्या घटनेचे ढळढळीत सत्य राजरोसपणे संपूर्ण उलट पालट करुन ते लोकांच्या पचनी पाडण्यात येत आहे... उद्या याची ऐतिहासीक संदर्भ म्हणुन कोणी नोंद घेतली तर कसाबच्या कृत्याचे चित्र त्याच्या नजरेत कसे असेल ??
३) आपले अभ्यासु मिपाकर, काळे काका, नेहमी म्हणत असतात कि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतापेक्षा खूप जास्त यशस्वी आहे... पाकिस्तानी मिडीयाच्या असल्या बातम्यांमुळे त्याला हातभार लागत असेल काय ?
४) भारताविरुद्ध हा जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद चाललाय त्याला केवळ तेथील लश्कर आणि आय्.एस्.आय जवाबदार आहे असं म्हटलं जातं. पण जर तेथील जनता अश्या बातम्या रोज बघत्-पचवत असेल तर तीही भारताविरुद्ध आकस बाळगुन नसेल काय ??

चला... फार गंभीर लिखाण झालं. तत्सम क्लीप पुन्हा एकदा बघतो आणि पोटभर हसुन घेतो कसा...

(हास्योत्सुक) अर्धवटराव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Sep 2010 - 10:46 am | विसोबा खेचर

मालक, दुवा उघडत नाहीये..

मृत्युन्जय's picture

15 Sep 2010 - 10:51 am | मृत्युन्जय

हॅहॅहॅहॅ. हा विडीओ आधी पण बघितला होता. तो बाबा खुपच इनोदी बोलतो आणि बाया मठ्ठ आहेत. हे लोक जर पाकिस्तानी जनतेचे प्रतिनिधित्व करत असतील तर अवघड आहे त्यांचे. भारताचे काय होणार ते माहित नाही पण हे लोक नक्की डुबणार येत्या १०-२० वर्षात. तेवढे दिवस आपण कळ काढली तरी होउन जाइ./

चिगो's picture

15 Sep 2010 - 11:22 am | चिगो

कुठून आणतात हो हे असले नमूने !? "गिरी तो गिरी, तेरे उपर मेरी"... हाणा तिच्यामारी...

राजेश घासकडवी's picture

15 Sep 2010 - 11:42 am | राजेश घासकडवी

ती क्लिप मी तीनेक मिनिटं पाहिली, व बंद केली. त्याखालच्या प्रतिक्रिया वाचल्या. पाकिस्तानी लोकसुद्धा त्याला महत्त्व देत नाहीत (शिव्या देताहेत...) तर आपण का त्याला सीरियसली घ्यावं? सोडून द्या ना राव. लक्ष देण्यासारख्या इतर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2010 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार

ती क्लिप मी तीनेक मिनिटं पाहिली, व बंद केली.

मी मात्र पुर्ण क्लिप बघितली. दोन्ही आयटम मस्त आहेत.

प्रामाणिक

अर्धवटराव's picture

16 Sep 2010 - 4:34 am | अर्धवटराव

खास करुन दुसरी आयटम आपल्याला लई आवडली ;)

(आयटमबाज) अर्धवटराव

खास करुन दुसरी आयटम आपल्याला लई आवडली
सहमत... ;)

मराठमोळा's picture

15 Sep 2010 - 2:18 pm | मराठमोळा

अरु मामु,
हे पी टीवी वर रोज चालु असतं.. बर्‍याच वेळा यापेक्षा भयंकर..
आणि काश्मिरात पी टीवी फ्री आहे. :)

अमेरीकेला लाथा घालता घालता पण अमेरीकेचं कौतुक केलय की अमेरीकेची ९/११ ची पर्सेप्शन मॅनेजमेन्ट छान होती म्हणे. म्हणजे नक्की लाथा घालायच्यात की कौतुक करायचय ते धड होत नाहीये ....... आणि भारताला अक्कल नाही त्यामुळे "ताज्-ऑबेरॉय हल्ल्याची" परसेप्शन मॅनेजमेन्ट चुकली म्हणे.

यांना गोर्‍यांचं सगळं (अर्वाच्य शब्द घालणे) चांगलं कसं वाटतं कळत नाही.

प्रचेतस's picture

16 Sep 2010 - 11:47 am | प्रचेतस

हॅहॅहॅहॅ, मला वाटले की गौतम गंभीर जेव्हा हसतो तेव्हा त्याच्या हास्याला गंभीर हास्य असे म्हणतात. :)

सुहास..'s picture

16 Sep 2010 - 1:13 pm | सुहास..

अरे व्वा !! आपण गौतम गंभीरला हसताना पाहिले ??

ये क्या मजाक है मिंया !!