गाभा:
पहिला पगार घेताना तुम्हाला कसे वाटले?..
नेमक्या काय भावना होत्या तुमच्या? त्या पगाराचे तुम्हि काय केले.....
कसा खर्च केला? कोणाला भेट वस्तु आणल्या?.
मी पण २१ चा असताना मेक इंजीनीअर झालो व नोकरीला लागलो साल १९६७ पगार..रु १५०=०० प्रति महिना....
मी इ.एस.आय कापुन हातात मिळालेला १३७=०० रु पगार माउलिच्या हातात दिला...
तिला खुप भरुन आले.
प्रतिक्रिया
15 Apr 2010 - 12:43 pm | चिरोटा
विशेष नाही वाटले.कारण माझ्या पगाराच्या दुप्पट पगार मित्रांना मिळत होता.
असे सहा पगार एकदा मिळाले की कलटी मारायची .!!बहुतेक अर्धा पगार एका संस्थेला दिला होता.बाकीचा बँकेत्.खर्च करण्याएवढा तो पगार नव्हताच.
भेंडी
15 Apr 2010 - 12:48 pm | टुकुल
पहिला पगार???
प्रतिसाद द्यायची इच्छा होत आहे, पण प्रतिसाद तुमच्या लेखापेक्षा बराच मोठा होइल, म्हणुन देत नाही..
--टुकुल.
15 Apr 2010 - 6:38 pm | अनिल हटेला
एकदम अशीच भावना मनात आली म्हणुन....
प्रतीसादाची इच्छा -आकांक्षा असताना सुद्धा ,देत नाहीये..
असो... :)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D
16 Apr 2010 - 1:58 am | टारझन
च्यायला ... ६७ साली २१ चे म्हणजे २०१० साली कुलकर्णी साहेब ६३-६४ चे असावेत :)
इतके दिवस उगाच चावत होतो :) आता उगा कमी जास्त व्हायचं ... हॅहॅहॅ ... चावतांना विचार करावा लागेल =))
बाकी पहिल्या पगाराला आपण लै रडलो होतो बॉ ... :) असो, जुण्या आठवणी :)
15 Apr 2010 - 1:07 pm | प्रमोद देव
मिळायला मला चार महिने लागले.२६एप्रिल १९७२ साली नोकरीला लागलो...चार महिन्यानंतर ..पहिल्या महिन्याचा पगार हातात पडला...तो होता २८२.९० फक्त....तोवर असे वाटले होते की बहुदा साहेबाने आपल्या पगाराचे पैसे खाल्ले असावेत......नंतर मग इतर महिन्यांचा राहिलेला पगारही मिळाला...आणि पुढे मग न चुकता दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळत राहिला.
काय केलं त्याचं? काही नाही...नेऊन वडिलांच्या हातात दिले.
15 Apr 2010 - 1:37 pm | अप्पा जोगळेकर
ज्यांनी खूप कष्ट करुन शिक्षण घेतले ते कदाचित या बाबतीत भावूक होऊ शकतात. मी लहानपणापासून आजतागायत कधी खस्ता खाल्ल्याचे आठवत नाही. त्यामुळे काही खास वाटलं नाही.
15 Apr 2010 - 2:21 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
नितिन थत्ते
15 Apr 2010 - 5:45 pm | विशाल कुलकर्णी
ज्यांनी खूप कष्ट करुन शिक्षण घेतले ते कदाचित या बाबतीत भावूक होऊ शकतात. मी लहानपणापासून आजतागायत कधी खस्ता खाल्ल्याचे आठवत नाही. त्यामुळे काही खास वाटलं नाही.>>>>
माफ करा आप्पा पण मी याच्याशी सहमत नाही. पहिल्या पगाराबद्दल काही वाटण्यासाठी तुमची परिस्थिती वाईट असणे आवश्यक नाही. कारण ती तुमची पहिली स्व-अर्जित कमाई असते. बापाच्या जिवावर कितीही गाड्या उडवल्या असल्या तरी स्वतःच्या कमाईच्या पहिल्या रुपयाबद्दल प्रत्येकाला काहीतरी विशेष वाटणे साहजिकच आहे.
असो, मला तरी पहिल्या पगाराच्या बाबतीत फारसा वाईट अनुभव आला नव्हता. सगळी रक्कम १७७३ रुपये आणि काही पैसे (आता आठवत नाही) ४ तारखेला (४ ऑक्टोबर १९९४) ला हातात पडले. त्यातून आम्ही प्रथम सोलापूरात कल्पना टॉकीजला जावून सिनेमा बघितला... (द किड्_चार्ली चॅप्लीन) एक दोन अडीचशे रुपये जवळ ठेवून बाकी रक्कम आईच्या स्वाधीन करून टाकली. पण पहिली कमाई या नात्याने त्या पगाराबद्दल निश्चितच अप्रुप होते आणि राहील.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
15 Apr 2010 - 6:33 pm | मनिष
सहमत. स्वतःच्या पहिल्या कमाईबद्द्ल अप्रूप असते बहुदा!
माझाही पहिला पगार अर्थातच बॅकेंत खात्यात जमा झाला. फायनान्सची मेल आली आणि मी बेंकेत जाऊन सगळे पैसे काढले (सॅलरी अकाऊंट ० बॅलन्स असल्याचा फायदा). २००० साली १०,००० रुपये होते (थोडा टॅक्स कापला होता बहुतेक), घरी पेढे आणले...मी मोठा असल्यामुळे बाबांनंतर पहिलाच कमावणारा....घरात जरा ओढाताण होती. पडते नव्हते, आणि सोफ्याचे कव्हर जीर्ण झाले होते. ते तले. बाकी जवळच्या मित्रांना, आई-बाबांना छोटया गोष्टी...आणि स्वतःसाठी एक टायटनचे घड्याळ घेतले पहिल्या पगारातून, १०वीत घेतलेले प्लॅस्टीकचे घड्याळ कंपनीत जरा विशित्रच दिसायचे! नंतर उरलेले पैसे परत बँकेत. पीजी साठी शैक्षणीक कर्ज काढले असल्याने मग पगारातून हप्ते जायचे, त्यामुळेच स्वतःची कामाई असूनही फार पैसे कधी उधळले नाही. खर्च व्हायचा तो पुस्तक आणि सीडी/कॅसेट साठीच.
तेव्हा १०,००० म्हणजे "केवढा" सारा पगार असे वाटायचे! :)
15 Apr 2010 - 1:45 pm | चिऊ
कदाचित आम्हाला हा अनुभव नीट मिळत नाही कारण आम्हाला पगार हातात मिळत नाही....आमचे सगळे पगार डायरेक्ट खात्यामधे जमा होतात..त्यामुळे 'Salary slip' कि॑वा Bank SMS पाहूनच आम्हाला काय तो आन॑द होतो...
15 Apr 2010 - 2:09 pm | Dipankar
पहिला पगार मिळाल्या वर काहीच वाटले नाही, कदाचित आणखी मिळायची हाव असेल म्हणुन
15 Apr 2010 - 2:33 pm | सह्यद्रि
पहिला पगार मिळायला १५ दिवस उशिर झाला, त्यात भरिसभर म्हनुन मालकाने अर्धाच दिला, फार वाईट वाटले. पण काय झाल देवाला ठाऊक मालकाने उरलेला अर्धा लगेच दिला आणि म्हणाला ' अरे तुझा हा पहिलाच पगार आहे ना....'
जिवात जिव आला ...... नाहितर पहिल्याच पगाराला का़त्रि लागलि होति..
15 Apr 2010 - 2:55 pm | स्वतन्त्र
पहिला पगार(रुपये ५०००) घेतला तेव्हा असं वाटलं कि खूप पैसे मिळाले आहेत (कारण या पूर्वी एवढी रक्कम कधीच पहिली नव्हती).
मग त्या पगारातून माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी कोणी मला साथ दिली त्यांच्यासाठी गरजेच्या वस्तू खरेदी केल्या.
आणि ह्या सर्वातून उरले फक्त ७६ रुपये, जे मी आजही जपून ठेवलेत !
15 Apr 2010 - 3:33 pm | शुचि
माझ्या पहील्या पगाराची आठवण मनात कोरली गेलेली नाही मला वाटतं (९९%) चेक देवापुढे ठेवला होता. बस.
पण ...... नवर्याचा अमेरीकेतला पहीला पगार आम्ही मला मोत्याची अंगठी घेऊन साजरा केला. खूप नाजूक आणि चांदीत घडवलेली फार सुरेख, विशेष महाग नाही पण तिला इतकं भावनिक महत्त्व आहे की मला ती सर्वात आवडणारा दागीना आहे मंगळ्सूत्राखालोखाल. याचं कारण हे असेल की मी एच १ वर आले आणि नवर्याला मग खूप कष्ट लागले पुढे नोकरी मिळायला. खरोखर आमची कष्टाची पहील्या कमाइची अशी ती अंगठी आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
15 Apr 2010 - 3:49 pm | इंटरनेटस्नेही
शुचीताई,
तुम्हाला अंगठी आणि नवरयाला स्वतःला काहीच नाही..!
:W
दिस इस नॉट फेयर!
--
(पुरुष मुक्तीवादी) इंटरनेटप्रेमी!
15 Apr 2010 - 5:53 pm | शुचि
त्यानी काय बरं घेतलं स्वतःला? आठवतच नाहीये मला. पण घेतली असेल सी डी वगैरे काहीतरी. ...... मला माझंच लक्षात आहे : (
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
16 Apr 2010 - 5:31 am | इंटरनेटस्नेही
"घेतली असेल सी डी वगैरे..."
ऐकुन बरे वाटले..
15 Apr 2010 - 5:06 pm | मी ऋचा
खात्यावर जमा होणार्या पगाराला हातात मिळणार्या पगाराच॓ काही फील येत नाही..पहिला काय आणि दुसरा काय! :<
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
15 Apr 2010 - 5:33 pm | मीनल
मी प्रभादेवीच्यासिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. तिथे मोठा हार घातला. नारळ पेढा नैवेद्यासाठी नेला होता.
नंतर दादरहूनच बाबांसाठी सिल्कचा कुर्ता, चुडीदार आणि आईसाठी सेमी नारायण पेठ साडी घेतली. ब्लाऊज पिस कापून घेतला. आईच्या नकळ्त तिच्या शिंप्याकडून शिवून घेतलला आणि सर्व गिफ्ट्स लपवून ठेवले .
लवकरच आलेल्या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या उधळून त्यांना सव गिफ्टस दिले.
आई खूप रडली होती तेव्हा !!!नंतर तीच साडी नेसली. बाबांनी कुर्ता, चुडीदार घतला आणि आम्ही बाहेर जेवायला गेलो.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
15 Apr 2010 - 6:04 pm | झकासराव
हम्म.
माझा पहिला पगार नेमकी रक्कम आठवत नाहिये पण आम्हाला स्टायपेंड होता ३५०० रु. कटींग होउन ३४०० च्या आसपास रक्कम मिळाली होती.
अर्थात बँकेत जमा झाली.
खुप खुश झालो होतोच. :) शिवाय ते भावुन वैगेरे पण झालो होतो.
कारण मला मिळालेला पहिलाच पगार माझ्या वडीलांच्या पगारापेक्षा जास्त होता. त्यात (म्हणजे वडीलांपेक्षा जास्त पगार अशी रेस नाहिये हा) आनंद होताच पण आताशा परिस्थिती बदलेल अशी आशा होती.
माझी खुपच इच्छा होती की घरच्यांसाठी काहितरी घ्याव.
पण मी पुण्यात आणि घर कोल्हापुरात.
मी लगेच कोल्हापुरला जाणार देखील नव्हतो.
मग एक हजार रुपयाचा डीडी काढला आणि पाठवला होता घरी.
आईला साडी आणि वडीलाना कपडे घ्यायला लावले होते.
ही घटना आहे २००१ ची.
15 Apr 2010 - 7:35 pm | गणपा
ह्म्म्म..
नोकरीला लागुन जेमतेम आठवडा उलटला होता.
नोकरी कसली हो अनुभव मिळवण्यासाठी एका आर्किटेक्टकडे जात होतो ग्रँटरोडला. मी तेव्हा सांताक्रुझला रहायचो.
महिना अखेरीस सगळ्यांना पगार मिळाले. मलाही बंद लखोटा मिळाला. नुसताच अनुभव मिळवण्यासाठी जात असल्याने पगारची बोलणी झाली नव्हती. पण रेल्वेचा पास आणि बसभाडे सुटावे अशी अपेक्षा ठेवली होती.
तर लंच टाइम मध्ये आजु बाजुला कुणी नाहीसे पाहुन हळुच पाकिट उघडल. नोटा मोजल्या रु.१५००/- होते. लगेच गणित माडल ७ दिवसांना १५०० तर ३० दिवसांना किती? जवळ जवळ ६५०० आकडा आलेला पाहुन जाम खुश झालो. स्वारी आनंदात घरी आली.
नेहमी आईबाबांपुढे पसणार्या हातांनी पहिला पगार दोघांच्या हातावर ठेवला. त्यांनी आशिर्वाद दिला आणि पाकिट देवघरात देवा समोर ठेवल.
बाबांनी त्यांच्या पैशांनी पेढे आणले.
पुढे दुसर्या महिन्यात आमचा भ्रमाचा भोपळा फुटला. परत पाकिटात १५००/- फक्त :(
मागाहुन कळल तो साहेबांचा मोठेपणा होता की ७ दिवस रुजु होउनही पहिला पगार पुर्ण महिन्याचा मिळाला होता.
पुढे दुसरी मोठ्यापगाराची नोकरी लागल्यावर मात्र पहिल्या पगारातुन आजोबांसाठी धोतर आणि आज्यांसाठी नऊवारी पातळं घेतली होती.
त्यांना कोण कौतुक वाटल होत. :)
15 Apr 2010 - 7:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
पहिला पगार रु. १५०/- फक्त ११वी मधे असताना मिळाला होता. आमच्या कॉलेजमधल्या एका सरांच्या मदतीने नोकरीला लागलो होतो. पैशाची गरज अर्थात होतीच. म्हणजे घरची फार गरीबी वगेरे होती असे नाही पण भावाच्या इंजिनिअरींग कॉलेजची फी भरताना होणारी बाबांची धावपळ अस्वस्थ करत असे. या अस्वस्थते मुळेच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. बाबांवर आपल्या शिक्षणाचा भार टाकायचा नाही हे नक्की होते.
बाबांना माझा खुप अभिमान वाटला होता. ते जरी काही बोलले नाहीत तरी त्यांच्या चेहर्यावरुन समजत होते. त्यांचा सांगण्या वरुन पहिल्या पगाराची एक एन. एस. सी. घेतली. त्या साठी बाबांनी अजुन ३५० रु. दीले. मी अजुनही दर ६ वर्षांनी तीचे नुतनी करण करतो.
माझ्या मुलीच्या पहील्या पगारात मी ती भर म्हणुन घालणार आहे.
च्यायला जरा जास्तीच इमोशनल झालो या विषयाने.
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
15 Apr 2010 - 7:29 pm | मराठे
मी कॉलेजात असताना एका छोट्या कॉम्प्युटर क्लास मधे लॅब असिस्टंट (म्हणजे हरकाम्या) म्हणून काही महीने काम केलं होतं. तिथे राब राब राबून महिना फक्त ५०० रु. हातात आले. पहिला पगाराचा दिवस म्हणून प्रथम देवळात गेलो. नंतर घरी परत येताना रत्यात आता मी दर महीन्याला किमान पाचशे रुपये कमवू शकतो म्हणून बरं वाटत होतं. असंच विचार करता करता रस्त्यांवरून जाणार्या गाड्या बघता बघता मनात विचार आला, की अशी एखादी गाडी घ्यायची असेल तर (गाडीचं मला लहानपणापासूनच खूप आकर्षण वाटत आलंय) मला कमीत कमी १००० महीने असं काम करायला लागेल, तेही एकही पैसा खर्च न करता...हे जेव्हा वाटलं तेव्हा सगळा उत्साह मावळला. :(
15 Apr 2010 - 7:42 pm | अरुंधती
तसं पहायला गेलं तर पहिली कमाई कॉलेजमध्येच सुरु झाली... इंडियन एक्स्प्रेस का टाईम्सची शनिवारची जी तरुणाई स्पेशल आणि स्त्री स्पेशल पुरवणी यायची त्यात मी काहीबाही लिहायचे.... आणि ते पठ्ठे चक्क माझ्या खरडीला छापायचे देखील! ;-)
तेव्हा अशा पहिल्या लेखाचा तब्बल अडीचशे रुपयांचा चेक (अडीच कॉलम्सच्या, १५० शब्दांच्या लेखासाठी!) आलेला पाहून मी इतकी हरखले होते की कितीतरी दिवस तो चेक बँकेत भरलाच नव्हता.... टोपणनावाने लिहायचे म्हणून चेकपण टोपणनावाने आलेला... मग बँकेत विनंती केली, टोपणनावासाठी काहीतरी वेगळा अर्जपण केला बहुतेक खात्यावर ते नावही घालावे म्हणून... आठवत नाही... पण मग दर महिन्याला असे तीन-चार चेक्स आले तरी काय कॉलर ताठ व्हायची म्हणून सांगू....
शिवाय तुझा लेख वाचला, आवडला हे सांगणार्या प्रतिक्रिया, फोन वगैरेही.... मग तर गडी भलताच खूष! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
15 Apr 2010 - 8:28 pm | मनिष
पगार म्हटला म्हणून पगाराचे संगितले.
तशी पहिली कमाई कॉलेज मधे असतांना इंडीयन एक्सप्रेस मधे लिहिलेल्या लेखाची होती. १५० मिळाले...तेंव्हाही ते कमीच वाटले. पण स्व-कमाईचे कौतूक होते. काही दिवस ते पैसे आणि आणि लेख एक फाईल मधे ठेवले होते.... त्याचवेळी वपुंचा सकाळ मधे लेख आला होता आणि एका मुलीच्या आजारपणासाठी (मला वाटते स्वाती चिटणीस की अशीच कोणीतरी) त्यांनी आवाहन केले होते. मी ड्राफ्ट काढायला बँकेत गेलो तर त्याचे २०-२५ रुपये लागतील असे सांगितले, ते उगाच कशाला घालवा असा विचार करून मी सायकल दामटत घरी आलो. मग मी पत्र लिहून सरळ पत्राबरोबरच ते रोख पैसे वपुंना पाठवले. त्यांनी काही दिवसांनी त्याची पावती पाठवून दिली...मी मात्र त्यांनी माझ्या पत्राला उत्तर दिले नाही म्हणून बरेच दिवस खट्टू होतो! :)
पुढे काही लेख लिहिले इंडीयन एक्सप्रेसमधे, पण मग नंतर (नेहमीप्रमाणे) कंटाळा आला... :)
नंतर वाटत राहिले, त्यांनी वाचले तरी असेल का गचाळ अक्षरात लिहिलेले माझे ते पत्र? उत्तर नाही मिळणार आता...
15 Apr 2010 - 11:37 pm | स्वाती दिनेश
ती मुग्धा चिटणीस.तिला कॅन्सर झाला होता आणि त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला.
स्वाती चिटणीस वेगळी.
स्वाती
16 Apr 2010 - 1:06 am | मनिष
नक्की आठवत नव्हते ते नाव. मुग्धा चिटणीसच होती ती. स्वाती चिटणीस मला वाटते एक अभिनेत्री आहे!
16 Apr 2010 - 10:00 am | नितिन थत्ते
बरोबर. ती आमच्या चिटणीस सरांची मुलगी.
अजिंक्य देव बरोबर एका मराठी चित्रपटाची हिरॉइन होती ती.
नितिन थत्ते
15 Apr 2010 - 8:01 pm | मदनबाण
माझा पहिला पगार ८०० रुं होता....
देवघरात देवा समोर ठेवला होता मग आईला दिला होता...आजही तेच करतो...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
15 Apr 2010 - 8:44 pm | वाचक
मी अभियांत्रिकी मधे शिकत असताना चौथ्या वर्षाच्या सुरुवातीलाच कँपस मधून नोकरी मिळाली होती. तेव्हा ऑफर लेटर वर १२०,००० / वर्ष असा पगार होता, तेव्हाही तो खूपच वाटला होता.
पुढच्या सहा महिन्यात कंपनीचे एका दुसर्या मोठ्या कंपनीबरोबर मर्जर होउन आम्हाला चक्क नविन ऑफर लेटर १८०,००० / वर्ष ची मिळाली. नोकरी सुरु न होताच पहिली पगारवाढ :)
पहिला पगार अर्थातच बँकेत जमा झाला, चतुर्थ वर्ष अभियांत्रिकीची बरीच बक्षिसे मिळाल्यामुळे खिशात पैसे आधीच होते, म्हणून लगेच पगार काढला नाही. पण (बहुतेक घरचे बरे असल्यामुळे) नंतर सगळा पहिला पगार 'सर्वांसाठी गिफ्ट्स' घेण्यात खर्च केला होता एवढे आठवते :)
15 Apr 2010 - 11:15 pm | चित्रगुप्त
हे सर्व वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या....
१९७२ च्या सुमारास इंदूरला आर्टस्कूल मध्ये शिकत असतानाच तिथे कस्तुरबाग्रामला १५० रुपये दरमहा ची नोकरी लागली....
त्यापूर्वी रंग, ब्रश वगैरे विकत घेणे खूप जड जायचे..... आठवते, की एकदा हळूच एका गायीच्या शेपटीचे केस कापून ब्रश बनवण्याचा प्रयत्न केला होता.....तैलरंग महाग मिळायचे म्हणून पावडर कलर बेलतेलात मिसळून, घोटून तैलरंग बनवायचो....
ही नोकरी लागल्यावर...
साडेतीन रुपयांची उत्तम जलरंगांची पेटी घेतली.....
लेवीतान या रशियन चित्रकाराच्या चित्रांचे पुस्तक फार दिवसांपासून मनात भरले होते, ते साडेबारा रुपयांचे घेतले......तैलररंग,ब्रश, पॅलेट, वगैरे चाळीसएक रुपयांचे घेतले....
कस्तुरबाग्रामला खादीचे कपडे घालावे लागायचे, ते घेतले.....
वीस रुपये बरोबर घेऊन एका मित्रासोबत सायकलने मांडवगडला निसर्गचित्रे काढायला गेलो....
खूपच उत्साहाचने भारलेले दिवस होते ते....
आमची काही चित्रे:
चित्रगुप्त
आमचे काही धागे:
मोनालिसाच्या बहिणी ?????
http://www.misalpav.com/node/11860
आपल्या मोना(लिसा) वहिनी:
http://www.misalpav.com/node/11663
आमचे काही पूर्वजन्मः
http://www.misalpav.com/node/11667
15 Apr 2010 - 11:18 pm | शुचि
अफलातून!!मारव्हलस!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
15 Apr 2010 - 11:45 pm | झकासराव
चांगली कला आहे साहेब तुमच्या हातात :)
16 Apr 2010 - 1:10 am | मनिष
पहिले चित्र फारच आवडले. मला फार कळत नाही त्यातले, पण नजर खिळून राहिली. कुठेतरी एका डीप रुटेड संस्कृतीचा, इकोसिस्टीम चा आभास होतोय...आणि तो हिरवा आल्हाददायक, जीवनस्वरूप वाटतोय. एक फेमिनाईन ग्रेस आहे चित्राला आणि लय देखील...तुम्हाला काय सुचित करायचे होते या चित्रातून? वाचायला आवडेल.
16 Apr 2010 - 1:33 pm | चित्रगुप्त
@मनीषः
खरडवहीतील संदेश वाचला, परंतु तुमच्या खरडवहीत आम्हाला प्रवेश नाही:
(You are not allowed to post in this guestbook).
आमचा ईमेलः
sharadsovani@gmail.com
प्रत्येक चित्रातून अमुक एक विचार वा कल्पना सूचित करायची असते, असे माझ्या बाबतीत नाही. बहुतेकदा कशानेतरी भारून जातो....मग त्या झपाट्यात बरीचशी चित्रे रंगवली जातात....त्या सर्वांमध्ये काहीसे साम्य पण असते... अशी एक चित्रमालिका तयार होते....
प्रत्येक चित्र हे एक एकमेवाद्वितीय असा चाक्षुक अनुभव असतो...असावा... त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण..... मी माझ्या चित्रांना शीर्षके देत नाही, त्याने रसभंग होतो, किंवा बघणाराच्या स्वातंत्र्याला, स्वैर कल्पनेला आवर घातला जातो, असे वाटते, अर्थात चित्रात जर एखादी गोष्ट वा काही विचार मांडला असेल, तर शीर्षकामुळे ते कळायला मदत मिळते, हे खरे.
चित्र बघणाराने त्याला हव्या त्या कल्पना कराव्यात, हवा तो अर्थ लावावा..... यात कलावंताने आपले विचार लादू नयेत, असे मला वाटते.
माझ्या चित्राबद्दल तुम्ही लिहिलेले.....नजर खिळून राहिली. कुठेतरी एका डीप रुटेड संस्कृतीचा, इकोसिस्टीम चा आभास होतोय...आणि तो हिरवा आल्हाददायक, जीवनस्वरूप वाटतोय. एक फेमिनाईन ग्रेस आहे चित्राला आणि लय देखील... हे आवडले.
१९७७ पासून दिल्लीत आहे, त्यापूर्वी इंदूरात. आता पूर्णवेळ चित्रकार आहे.
16 Apr 2010 - 12:11 pm | विशाल कुलकर्णी
वाह सुरेख !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"