हिंदू..

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
22 Mar 2008 - 3:26 pm

माझे अवघे मी पण हिंदू
आयुष्याचा कणकण हिंदू,
ह्रदयामधले स्पंदन हिंदू
तन-मन हिंदू, जीवन हिंदू !

दरीदरीतिल वारे हिंदू
आकाशातिल तारे हिंदू,
इथली जमीन, माती हिंदू
सागर, सरिता गाती हिंदू !

धगधगणारी मशाल हिंदू
आकाशाहुन विशाल हिंदू,
सागरापरी अफाट हिंदू
हिमालयाहुन विराट हिंदू !

तलवारीचे पाते हिंदू
माणुसकीचे नाते हिंदू,
अन्यायावर प्रहार हिंदू
मानवतेचा विचार हिंदू !

महिला, बालक, जवान हिंदू
खेड्यामधला किसान हिंदू,
शहरांमधुनी फिरतो हिंदू
नसानसांतुन झरतो हिंदू !

प्रत्येकाची भाषा हिंदू
जात, धर्म अभिलाषा हिंदू
तुकाराम अन कबीर हिंदू
हरेक मस्जिद, मंदिर हिंदू !

इथला हरेक मानव हिंदू
अवघी जनता अभिनव हिंदू,
झंझावाती वादळ हिंदू
हिंदू हिंदू केवळ हिंदू !

आल मनात
लिहील मिपात..

प्रतिक्रिया

आणिबाणीचा शासनकर्ता's picture

22 Mar 2008 - 5:33 pm | आणिबाणीचा शासनकर्ता

आल मनात
लिहील मिपात..

धन्यवाद. फक्त स्वत:चंच लेखन इथे प्रकाशित करत जावे ही विनंती.

मिपावर फक्त मिपाच्या सभासदांचेच लेखन प्रसिद्ध व्हावे असेच पहिल्यापासून धोरण आहे. ज्या व्यक्ति मिपाच्या सभासद नाहीत अश्या व्यक्तिंचे लेखन केवळ संदर्भ म्हणून दोनचार ओळीत किंवा संबंधित लेखनाचा केवळ दुवाच येथे दिला जावा, असे मिपाचे धोरण आहे. मग ती व्यक्ति अगदी कुणीही असो!

वारंवार हे सांगूनदेखील काही मंडळी पुन्हा पुन्हा मिपावर जी मंडळी मिपाच्या सभासद नाहीत अशांचे लेखन मिपावर प्रकाशित करत असतात, पुढे ढकललेल्या इपत्रातील साहित्य तसा उल्लेख न करता मिपावर प्रकाशित करत असतात याचा अत्यंत खेद वाटतो. असे साहित्य कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय मिपावरून अप्रकाशित वा काढून टाकण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी आणि मगच मिपाबाह्य व्यक्तिंचे लेखन इथे कॉपीपेस्ट करण्याचे कष्ट उपसावेत!

पुढे ढकलेल्या इपत्रातील साहित्य मूळ लेखकाचा नामोल्लेख न केल्यास तर नाहीच, परंतु जरी नामोल्लेख केला असला तरी ते मिपावर राहू द्यायचे किंवा नाही, हेदेखील ठरवण्याचा संपूर्ण अधिकार मिपाकडे आहे याचीही कृपया नोंद घ्यावी!

मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांनाच स्वत:चे लेखन करण्याकरता आणि त्यावर इतर सभासदांना त्यांचे स्वत:चे वैयक्तिक प्रतिसादात्मक मत व्यक्त करण्याकरता तयार केले गेलेले संकेतस्थळ आहे याची कृपया नोंद घ्यावी!

विवेकवि,

आपण एकाच दिवशी धडाद्धड सात ते आठ वेळा, असे दुसर्‍याचे साहित्य इथे वरचेवर प्रकाशित करता असे आमचे निरिक्षण आहे. कृपया हा प्रकार ताबडतोब थांबवावा, अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे. मिपा हे मिपाबाह्य व्यक्तिंचे साहित्य वाचण्याचे किंवा पुढे ढकललेले साहित्य वाचण्याचे (शक्यतोवर!) ठिकाण नाही हे आपल्याला व या निमित्ताने सर्व सभासदांना शेवटचे सांगणे आहे.

यापुढे कुठलेही निवेदन न देता केवळ 'डिलिट'चे बटण दाबले जाईल याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे अशी कळकळीची व शेवटची विनंती!

-- जनरल डायर.