खेळ माझा संपला

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
12 Mar 2008 - 11:42 am

बेसनलाडवांने सांगून सुद्धा "केश्या" ने आपला हट्ट सोडला नाही.. जालावरून जगदिश खेबुडकर यांचे चंद्र होता साक्षिलाहे नितांत सुंदर गाणे शोधले आणि पुन्हा एकदा प्रेयसीच्या तिर्थरुपांना आपल्या विडंबनात आणलेच..

तात होते आत जागे, ना सुगावा लागला,
खेळ माझा संपला, खेळ माझा संपला

घाम फुटला कंप सुटला, मज हिवाळी रात्रिला,
खेळ माझा संपला, खेळ माझा संपला!

घाबरा, बावरा, का मुखाचा चंद्रमा ?
अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा?
आणि प्रेमाने तिने मज, प्रश्न होता टाकला !

स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

-केशवसुमार

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 11:59 am | इनोबा म्हणे

केशवा मस्तच रे! बाकी काही म्हण तुझी ईश्टाईल काही औरच
कुणी काहीही म्हणो...आपण आपला धोपटमार्ग सोडू नये... हवं तर मार्गात येणार्‍याला धोपटा....

स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

हे तर अती जबरा....

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

बेसनलाडू's picture

12 Mar 2008 - 12:05 pm | बेसनलाडू

आणि गेय चित्रवर्णन
(वाचक)बेसनलाडू

धमाल मुलगा's picture

12 Mar 2008 - 12:10 pm | धमाल मुलगा

वा वा!!!
बेष्ट.
पण के.सु.बोवा,

घाबरा, बावरा, का मुखाचा चंद्रमा ?
अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा?
आणि प्रेमाने तिने मज, प्रश्न होता टाकला !

ह्यात 'चोर'सी अथवा तत्सम काही टाकणार होता का आपण? च्यामारी माझा जरा गैरसमज झाला ते 'चोळीसी' वाचून, म्हणून इचारल॑...बा.आ.का.का.क.ना.हे ज.जा.आ. (बाकी आपल्याला काव्यातल॑ काही कळत नाही हे जगजाहीर आहेच!)

आपला,
चावट ध मा ल.

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 12:46 pm | विसोबा खेचर

स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

हा हा हा, खल्लास विडंबन...

तात्या.

वा वा वा वा वा,

केशवसुमार,

बेफाम विडंबन. बेफाम. क्या बात है!!!!

अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा?

केवळ दोन अक्षर बदलून ही काय झकास ओळ झालेय? हॅट्स ऑफ. याला प्रतिभा असे म्हणतात.

झकास.

आमच्या एका स्नेह्यांनी असेच "सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?" या गीताचे आता तरी देशील का? एवढा एकमात्र बदल करून केलेले विडंबन आठवले.

स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

हा हा हा. हे ही सुंदर . ह ह पु वा.

आपला,
(हसरा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग's picture

12 Mar 2008 - 4:30 pm | चतुरंग

शंकर पाटलांच्या भाषेत सांगायचं तर "पिश्टान तापावं तसा तापलायस की!"

स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

हे बाकी जबरा.

एकच गोची - दिलेला दुवा 'तुम्हावर केली मी मर्जि बहाल' ह्या गाण्यावर उघडतो आहे!

(बहुदा त्यावरही तुमची मर्जी बसलेली दिसते येऊद्या आणखी एक झकास विडंबन!:)

चतुरंग

केशवसुमार's picture

13 Mar 2008 - 4:52 pm | केशवसुमार

चतुरंगशेठ,
चूक झालीय खरी..
पण आपला सरपंच झोपला असल्यामुळे त्याला पाठवलेले पत्र त्याने वाचले नाही आणि योग्य ती दुरुस्ती केली नाही.. असो.. अता जनरल डायर ला पण पत्र पाठवतो..
(खजिल)केशवसुमार

सरपंच's picture

13 Mar 2008 - 5:28 pm | सरपंच

पण आपला सरपंच झोपला असल्यामुळे त्याला पाठवलेले पत्र त्याने वाचले नाही आणि योग्य ती दुरुस्ती केली नाही.. असो..

आता योग्य तो बदल केला आहे. आपले पत्र वाचले नाही त्यामुळे उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत! परंतु त्याचबरोबर, भविष्यात निदान दुवे तरी बरोबर देत चला, ही आग्रहाची विनंती! :)

आपला,
(झोपाळू) सरपंच.

किशोरी's picture

12 Mar 2008 - 5:25 pm | किशोरी

>>स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला
हा हा हा हा:))
विडंबन एकदम मस्त!!

स्वाती राजेश's picture

12 Mar 2008 - 5:29 pm | स्वाती राजेश

केशवराव,
नेहमीप्रमाणे याही वेळी सुंदर विडंबन केले आहे.
स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

ह. ह. पु. वा.:)))))

वरदा's picture

12 Mar 2008 - 6:30 pm | वरदा

आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

कसलं सही....कसं सुचतं हो तुम्हाला...मी म्हणते प्रत्येक विडंबनाबरोबर तुमच्या चरणकमलांचा फोटू टाकत चला...आम्ही पाया पडतो... निव्वळ अप्रतिम...

प्राजु's picture

12 Mar 2008 - 7:01 pm | प्राजु

देव तुम्हाला भरपूर विडंबने करण्यासाठी भरपूर कविता आणि गझला देवो...

स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

हाहाहा..हाहाहा...
- (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर's picture

12 Mar 2008 - 8:26 pm | सुधीर कांदळकर

झकास. धन्य ती प्रतिभा.
हसतांना लिहिणे सुचत नाही. शब्द तोकडे.

बेला च्या प्रतिसादामुळे जीव भांड्यात पडला.

विडंबनाचा पंखा
सुधीर कांदळकर

सर्किट's picture

13 Mar 2008 - 2:58 am | सर्किट (not verified)

वा वा !!

विशेषतः "बाटाच्या बुटांनी" मधून घडवलेला अनुप्रास सुंदरच !

- सर्किट

केशवसुमार's picture

13 Mar 2008 - 4:53 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार

अविनाश ओगले's picture

13 Mar 2008 - 9:42 pm | अविनाश ओगले

जमले आहे विडंबन...